शि़क्षणाचा गमभन .........

मुळाक्षरे शिकण्यास सुरवात करताना, अ आ ई इ पासुन सुरु होत असताना - अ आ ई इ किंवा क ख ग घ असे न म्हणता, गमभन शिकण्यास सुरवात केली असे का म्हणतात. हा वाक्य प्रचार कसा काय वापरला जातो. ग म भ न या चार अक्षरांचा एकमेकांशी विशिष्ठ संबंध आहे का?

-- एक स्टुपिड् प्रश्न ?

लेखनविषय: दुवे:

Comments

ग म भ न

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
तुमचा प्रश्न योग्य आहे. मनात प्रश्न उद्भवला म्हणजे तुम्ही त्या विषयावर विचार केला. विचार करणे महत्त्वाचे असे मला वाटते.
सरळलते पासून सुरवात करून क्लिष्टतेकडे जावे असा शिक्षणशास्त्राचा नियम आहे. ग, म. भ न ही अक्षरे लिहिणे सोपे आहे. कारण यांत वळणे नाहीत. तीन गाठी आहेत. अ आ इ ई या अक्षरांत वळणे आहेत. ई ची वळणे लक्षात ठेवणे तर अवघडच आहे.ग लिहिणे सोपे. त्याला मधे एक आडवी रेघ (स्लीपिंग लाईन) दिली की म. त्याला वर गाठ काढली की भ. त्याचा वरचा थोडा भाग पुसला की न.
तर अक्षरलेखन ग म भ न पासून सुरू करण्यामागे हा विचार असावा.

एक माहिती:

सरांनी वर उत्तर दिलेच आहे
एक माहिती: नव्या शिक्षण पद्धतीत हल्ली सुरुवात 'व ब क ळ 'अशी होते [कारण तेच]

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

आणखी काही कल्पना

हल्ली मुळाक्षरं शिकवायला ग,म, भ, न अशी सुरवात करतात. त्याचं कारण असं देतात की 'ग' हे अक्षर लिहायला अगदी सोपं आहे. एक उभी रेघ, त्याच्या शेवटी लहानशी गाठ आणि नंतर बाजूला नुसती एक उभी रेघ. त्यानंतरचं 'म' हे अक्षर म्हणजे 'ग'मधे एक आडवी रेघ घालणं. 'भ' म्हणजे 'म'च्या सुरवातीला एक गाठ देणं. 'न' म्हणजे 'म' मधली पहिली उभी रेघ पुसणं. अशा प्रकारे थोडथोडा फरक असणारी अक्षरं एका मागोमाग शिकणं.

पूर्वी 'श्री' हे अत्यंत कठीण अक्षर सुरवातीला शिकवीत. (मी तसं शिकलो आहे). ते शिकायला खूप दिवस लागत. अनेकजण त्यासाठी मदत करीत. त्यामागचा विचार असा की सुरवातीलाच एकदम कठीण अक्षर शिकवलं की नंतर कुठलंही अक्षर सोपं जाईल. (कदाचित त्यावरूनच कुठल्याही गोष्टीची सुरवात म्हणजे श्रीगणेशा असं म्हणत असावेत). मुलाला 'श्री' लिहिता येणं हा त्यावेळी एक महत्वाचा टप्पा समजला जाई.

अर्थात् शिक्षणाचा प्रसार लवकर व्हायला हवा असेल तर ग म भ न या क्रमानी सुरवात करणं श्रेयस्कर.

इंग्रजी अक्षरं शिकवताना सुद्धा A पासून सुरवात करण्याऐवजी सर्वात सोप्या I पासून सुरवात करता येईल. नंतर L. नंतर J. कदाचित B हे अक्षर सर्वात शेवटी शिकवावं लागेल.

श्री गणेशाय नम:

मला वाटते श्री गणेशाय नम: ही सुरवात असे व म्हणून श्री प्रथम. अर्थात हे सर्व कार्यारंभी गणेशाला नमन करावयाचे याचा एक भाग.
शरद

वा !

तुम्हा सर्वांचा आभारी आहे. मला असे वाटते की या ही पेक्षा काहीतरी वेगळे सुद्धा असावे.

काहीही वेगळे नाही!

या ही पेक्षा काहीतरी वेगळे सुद्धा असावे.

सोप्याकडून अवघडाकडे जाणे हेच कारण. दुसरे काहीही वेगळे नाही. ही घ्या पूर्ण अक्षरावळ :
ग म भ न
र स त ल ऌ ॡ ळ
ण प ष फ
व ब ख क
उ ऊ श
अ अं अः आ ओ औ
ट ठ द ढ
ड इ ई झ ह
च घ ध छ
ज य थ
ए ऐ
ऋ ॠ .
--वाचक्‍नवी

धन्यवाद

ग म भ न, र स त ल अशी अक्षरावळ मीही लहानपणी शिकले होते परंतु त्यानंतर काय येते ते मला आठवत नव्हते. ते येथे दिल्याबद्दल धन्यवाद.

".....शिक्षण रसातळाला जाईल!"

ग म भ न र स त ल ..........

"श्रीगणेशा"वाल्यांचा "ग म भ न" पद्धतीला विरोध होता. तो व्यक्त करताना ते म्हणायचे "ग म भ न शिकल्यावर सगळं (शिक्षण) रसातळाला जाणार आहे. कारण ग म भ न च्या पुढची अक्षरंच मुळी 'र स त ल' आहेत."

 
^ वर