आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने...

ह्या समुदाय मराठी भाषा, बोलीभाषा, वाक्प्रचार, म्हणी, शब्दांच्या व्युत्पत्ती आदी विषयांवरील रंजक-रोचक देवाणघेवाण, सवालजवाब आणि चर्चा व्हावी. भाषेवर, शब्दांवर प्रेम करणाऱ्या आणि भाषाव्यवहाराकडे चिकित्सकपणे (दुसऱ्या शब्दांत कीसपाडूपणे) बघणाऱ्या सर्वांचे इथे हार्दिक स्वागत.

कोटेबल कोट्स

कोट्स वाचणे, जमवणे, लक्षात ठेवणे आणि योग्य वेळी वापरणे असा अनेकांचा छंद असतो. थोडक्या शब्दात मानवी स्वभाव, वागणूक, परिस्थिती इ. इ. वर नेमके भाष्य करणार्‍या कोट्स वाचणार्‍याला एक वेगळाच आनंद देऊन जातात.

उदाहरणार्थ हे पाहा :

'अंतर्नाद' -एप्रिल २००८

आवर्जून वाचावा असा अंक आहे. सहसा एखादा अंक अथपासून इतीपर्यंत आवडतो असे होत नाही. पण या अंकाच्या देखण्या मुखपृष्ठापासून त्यातील लेख, कवितांपर्यंत सगळे उत्कृष्ट आहे.

आखूड लोकांचा प्रदेश

'अनुभव' च्या या वर्षीच्या दिवाळी अंकात "आखुड लोकांचा प्रदेश' या नावाचा सुहास पळशीकरांचा एक मस्त लेख आहे. सातत्याने महाराष्ट्र व मराठी भाषा यांवर कसा अन्याय होतो आहे, असे गळे काढणार्‍यांना पळशीकरांनी पुराव्यासह चपराक दिली आहे.

दिवाळी अंक - काय वाचाल?

२००७ सालचे सगळे दिवाळी अंक आता प्रकाशित झाले आहेत.

संवादकला २ - शब्दसामर्थ्य आणि वाचन

भाषा कोणतीही असो, तिच्यातील प्रकटन प्रभावी व्हायचे असेल तर आपला शब्दसंग्रह मोठा असला पाहिजे. असे म्हणतात, की वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत तुमचा शब्दसंग्रह नव्वद टक्के संपृक्त / समृद्ध झालेला असतो.

निळ्या काचेचे पेन

कोणतेही पूर्वगृह, कोणत्याही निष्ठा, कोणतेही अहंकार (धार्मिक कार्यक्रमात जानव्यातली लोखंडी किल्ली बाजूला काढून ठेवतात त्याप्रमाणे - जी.

विविध

१) "ऐपत" शब्दाची फोड
आपण 'ऐपत' हा शब्द आर्थिक क्षमता या अर्थाने वापरतो. त्याची फोड अशी :
ऐपत = ऐ + पत = आय + पत
आय म्हणजे उत्पन्न (उदा. आयकर म्हणजे इन्कम टॅक्स).

परोक्ष-अपरोक्ष

संस्कृतात एखादी गोष्ट आपण उपस्थित नसताना घडून गेली असता त्या घटनेचे वर्णन करण्यासाठी परोक्ष भूतकाळ वापरला जातो.

'सुख' व 'दु:ख' यांची व्युत्पत्ति

'सु' म्हणजे काहीतरी चांगले / अनुकूल. 'दु:' म्हणजे काहीतरी वाईट / प्रतिकूल. उदा. सुलभ वि. दुर्लभ, सुकाळ वि. दुष्काळ, सुष्ट वि. दुष्ट.

'ख' म्हणजे आकाश. म्हणून 'खग' अर्थ आकाशमार्गे गमन करणारा म्हणजे पक्षी.

लिपी आणि मौखिक ज्ञान

नमस्कार मंडळी,
प्रियाली यांनी या आधी सुरु केलेल्या या चर्चेत्तून पुढे आलेली माहिती, सदस्यांचे प्रतिसाद यावर विचार करत असता या परंपरेशी निगडित एका पैलूकडे माझे लक्ष गेले.

भाषाभगिनी इ.

टग्या यांच्या वारांची नावे ह्या प्रियालीकृत चर्चेवर आलेल्या अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसादाचा हा वेगळा लेख बनवण्यात आला आहे
उपक्रम
...

वारांची नावे

मराठी भाषेतील वारांची नावे आणि त्यांची निवड कशी आणि केव्हा केली गेली याबाबत उपक्रमाच्या सदस्यांना अधिक माहिती आहे काय?

आई

मराठीतील आई शब्दाचे मूळ काय? बहुसंख्य भाषांमध्ये मातेला संबोधणारा शब्द म ने सुरू होतो किंवा संपतो. मराठीत नाही. असे का असावे?

मराठीतली फार्शी २-

मराठीतली फार्शी २-

शाब्दिक आणि व्याकरणाचे प्रश्न

जिथे क्रियापादे कर्त्याच्या लिंगानुसार बदलतात तिथे दोन वेगवेगळ्या लिंगातील कर्ते एका उभयान्वयी अव्ययाने जोडले तर क्रियापद कोणते वापरावे हा प्रश्न मला नेहमी पडतो.

मराठीतली फार्शी-१

मराठी भाषेत अनेक फार्शी शब्द इतके रूढ झाले आहेत की, आता एखादा शब्द फार्शीतून आला आहे हे सांगताही येणार नाही. ह्या शिवाय मराठीतले काही शब्द फारशी नसले तरी त्यांच्या निर्मितीमागे फार्शी प्रभाव आहे.

Syndicate content