मराठी संकेतस्थळांचे अर्थकारण
मराठी संकेतस्थळांवरचे राजकारण, कंपूबाजी हा अतिशय चवीने चघळण्यात येणारा विषय आहे. पण मराठी संकेतस्थळांचे अर्थकारण ह्या विषयावर फारशी चर्चा झालेली दिसत नाही. ह्याविषयावर चर्चा व्हायला हवी असे वाटते.
प्रश्न:
१) एखादे मराठी संकेतस्थळ सुरू करायचे म्हटल्यास सुरवातीला कमीतकमी किती खर्च येतो आणि त्या खर्चात कुठल्या गोष्टींचा समावेश असतो?
२) ते मराठी संकेतस्थळ चालू स्थितीत ठेवण्यासाठी दरसाल कमीतकमी किती खर्च येऊ शकतो येतो आणि खर्चात कुठल्या गोष्टींचा समावेश असतो.
३) संकेतस्थळांचे मालक/चालक हे काही सदस्यांकडून पैसे घेत असतात काय?
४) संकेतस्थळांच्या सदस्यांकडून शुल्क आकारण्यात यायला हवे काय?
५) जाहिराती घ्यायला हव्यात काय? घेतल्यास त्यातून किती महसूल मिळू शकतो.
वरील प्रश्नांवर चर्चा करावी. तसेच ह्याशिवाय सदस्यांना प्रश्न सुचल्यास त्यांनी ते विचारावेत, ही नम्र विनंती.
Comments
माहीतीत भर पडेल
आजपर्यंत ज्या काही मोजक्या मराठी संकेतस्थळांचा मी अनुभव घेतला त्या पैकी कुठल्याही संकेतस्थळावर जाहीरात आढळली नाही. कुणी पैसेही मागितले नाहीत. मग या संकेतस्थळांचे अर्थकारण चालते तरी कसे? ह्या प्रश्नाबद्दल प्रस्तावित चर्चेतून नक्कीच माहीतीत भर पडेल. अर्थात या माहीतीचा उपयोग अजून काही नवीन संकेतस्थळे तयार व्हायलाही होऊ शकेल.
आपलाही एखादा कंपू करता येईल :)
मराठी
आजपर्यंत ज्या काही मोजक्या मराठी संकेतस्थळांचा मी अनुभव घेतला त्या पैकी कुठल्याही संकेतस्थळावर जाहीरात आढळली नाही.
मराठी माणूस व्यापारधंद्यात मागे का याचे उत्तर यात दडलेले असावे का?
---
सम पीपल आर भलाचंगा, सम आर भिकमंगा
कॅनॉट जज एनीबडी, सरीफ ऑर लफंगा
हे पाहिले का?
नसल्यास बघा.
असे सदस्य असल्यावर मालकांना संकेतस्थळे चालवण्याची चिंता नसावी. बाकी सविस्तर नंतर.
असो
>>नसल्यास बघा.
असो.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
सायलेन्स इज क्राइम
डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा धागा आहे.
इतके काही घडत असताना गप्प बसून राहणे म्हणजे "माझे गेले तर गेले, इतरांचेही जाऊ देत!" अशी विषारी मानसिकता दिसून येते.
धनंजय ह्यांनी उशीराने का होईना त्यांचा नैतिक आळस झटकला आणि लोकजागृती केली. पण बाकीच्या सापांचे काय? त्यांच्यावर कसले गारूड टाकले होते गारुड्याने कळत नाही.
काही कट्टर कार्यकर्ते तर अजूनही मालकांची बाजू घेत आहे. हे अगम्य आहे.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
अनाकलनीय
याच्याशी दूरान्वायानेही संबंध नसणार्या माझ्यासारख्या सदस्यांनाही यातून बरेच शिकायला मिळाले.
मराठी सायटींवर जे प्रकार चालतात त्याबद्दल बरेच बोलून झाले आहे पण आत्तापर्यंत ते चर्चांपुरते मर्यादित होते. मला बरेचदा असा प्रश्न पडत असे की अमुक प्रकार वाईट असूनही लोक गप्प का रहातात? मग ते गांधींच्या हत्येची सरळ सरळ भलावणी करणे असो किंवा आणखी काही. पण आता मात्र स्वतःच्या घराला आग लागल्यानंतरही जर सदस्य मौन पाळत असतील तर सर्व प्रकार अनाकलनीय आहे. याला भीड म्हणावे की भीती?
---
सम पीपल आर भलाचंगा, सम आर भिकमंगा
कॅनॉट जज एनीबडी, सरीफ ऑर लफंगा
कारणे
* शक्यतो अवांतर ठरेल माझा प्रतिसाद
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मानवस्वभाव गुण असे देता येईल्.
१. समोरच्या वरिल विश्वास असा सहजासहजी तोडून टाकता न येणं
२. व्यवहारीक दृष्टीकोन नसणे (तो असता तर हा प्रकार झालाच नसता)
३. आपली हेटाळणी होईल ही भिती.
४. असे तो कसे करेल, अडचणीत आहे होईल सर्व सुरळीत हा विश्वास.
५. व्यक्तीगत जिवन व नेटवरील जिवन हे वेगळे ठेवण्याचा प्रयत्न.
मी ४ नंबर प्रमाणे विचार करतो, "असे तो कसे करेल, अडचणीत आहे होईल सर्व सुरळीत हा विश्वास."
त्याचा गैरफायदा घेऊन त्याच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा त्याच्या उत्तराची वाट पाहणे कधी ही सोईस्कर अथवा व्यक्तीगत स्वरुपामध्ये संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा पण् असे ऑनलाईन् नको, बाकीच्यांच्या विश्वासावर देखील तडा जातो ह्यामुळे.
राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
तुमची
कारणे जोपर्यंत फसवणूक झाली आहे हे लक्षात येत नाही तोपर्यंत ठीक आहेत. एकदा फसवणूक झाली आहे हे कळल्यानंतरही लोक गप्प कसे राहू शकतात कल्पना नाही. अर्थात यालाही मानवस्वभाव म्हणता येईल.
---
सम पीपल आर भलाचंगा, सम आर भिकमंगा
कॅनॉट जज एनीबडी, सरीफ ऑर लफंगा
छान
छान!! चांगला विषय आहे. आम्हाला सुद्धा थोडी फार माहिती मिळेल.
मला वाटतं की इतर कोणतेही संकेतस्थळ उभे करुन चालवायला जेवढा खर्च येईल तितकाच मराठी संकेतस्थळासाठी यावा. खर्च किती येतो यासाठी अनेक मुद्दे विचारात घ्यावे लागलील. ढोबळ मानाने, संकेतस्थळाचे नाव आणि वेबस्पेस याचा ठराविक कालखंडासाठीचा खर्च हा मुख्य खर्च. या पुढे संकेतस्थळ उभारणीसाठी एखादा जर स्वतः त्यातला तज्ञ असेल तर फुकट. पण व्यावसायिक लोकांकडून करुन घेतल्यास तो खर्च किती असावा याची कल्पना नाही. तज्ञ लोकांच्या प्रतिसादामधून बरिच माहिती मिळेल असे वाटते.
संकेतस्थळ व अर्थकारण
संकेतस्थळ काढण्यासाठी पैसे हे आवश्यक आहेतच पण त्याच बरोबर त्या प्रणालीची पुर्ण माहीती असलेली चांगली हा बोनस ठरु शकतो.
१. एकादे संकेतस्थळ चालू करण्यासाठी कंमीत कमी ५ हजार ते जवळ ५०००० / ७०००० हजर पर्यंत वार्षिक खर्च येतो. हा खर्च तुमचे डोमेन नेम / होस्टींग व तुम्हाला हव्या असलेल्या सुविधेनुसार ठरतो. डेडिकेटेड सर्वर घेतला तर खर्च वाढतच जातो कारण एक-एक प्रणाली साठी देखील पैसे मोजावे लागतात.
२. पैसे घालूनच संकेतस्थळ चालू होऊ शकते संकेतस्थळातून कुठल्याही प्रकारचे उत्पन्न न घेता फक्त स्वसेवा ( स्वार्थ, माझा आहे स्वार्थ उगाच स्वार्थाला देशभक्ती, राष्ट्रभक्ती अथवा भाषा भक्तीचे नाव देण्यापेक्षा हे बरं) करण्यासाठीच चालवले गेले तर व्यापारिक दृष्ट्या हा तोट्याचा धंदा आहे ;)
३. फुकट असून सदस्यांचे येवढे नखरे चालतात तेथे जर विकत (पैसे देऊन्) जर हे सदस्य झाले तर मालकाची तिरडी उचलायला जास्त वेळ लागणार नाही ;)
४. जाहीराती मिळत नाहीत ! अथवा जाहिराती मिळवण्यासाठी जी पॅरेलल व्यवस्था उभी करावी लागते ई खर्चिक तसेच वेळ खाऊ असते त्यामुळे जाहीरातीच्या मागे जवळ जवळ कुठलेही मराठी संकेतस्थळ पडल्ले नाही.
५. युवाअड्डाच्या वेळी मी जाहीराती घेतल्या होत्या व महिन्याची कमाई ३००-५०० रु. होत होती देखील् पण् नियमितपणा नाही व जाहिरात देण्यार्या कंपण्या ( गुगल / आय बिब्बो इत्यादी) तुमचा पैसा तुमच्या नकळत खाऊन देखील टाकतात नियमांचे कारण देऊन् हे देखील् शिकलो.
६. एखादे संकेतस्थळ चालणे व तानंतर ते विकले जाणे ह्यातूनच तुम्हाला तुमचा पैसा बाहेर कढाता येतो. माझे शब्द हे मी विकलेले माझे पहिले संकेतस्थळ त्यांने चांगली कमाई करुन् दिली होती त्यामुळेच मी चारपाच नवीन संकेतस्थळे काढू शकलो, काही चालतात काही बंद पडतात, धंदा म्हणाले की सगळेच आले त्यात. त्यामुळे नो वरी, जस्ट बी हॅप्पी !
७. तुमच्याकडे सखोल माहीती असल्याशिवाय संकेतस्थळाच्या धंद्यात पडून नये ही खास सुचना, दुसर्याच्या खांद्यावर ठेऊन चालवलेली गोळी व्यवस्थीतच आपले टार्गेट पुर्ण् करेल असे खुप कमी वेळा घडते.
८. संकेतस्थळाचे अर्थकारण हे वेगगेगळ्या व्यक्तीचे वेगवेगळ्या स्वभावानुसार ठरते. जसे उपक्रम, मिपा सारखी संकेतस्थळ कमी ऍप्ल्लीकेशनस वापरतात व मनोगत , मीम सारखी संकेतस्थळे जास्त ऍप्लिकेशनवर भर देतात त्यामुळे लागणारी जागा / बॅन्डविडथ / बॅक अप / php , sql, myspl, scripts ह्यावर जास्त पैसा लागतो.
९. जागा घेताना जवळ जवळ १०० जागी शोध घेऊनच मग घ्यावी फक्त स्वस्त आहे म्हणून् घेऊ नये, नंतर् प्रचंड मनस्ताप होतो.
१०. बेस्ट ऑफ लक् ;)
राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
चांगली माहिती
एकादे संकेतस्थळ चालू करण्यासाठी कंमीत कमी ५ हजार ते जवळ ५०००० / ७०००० हजर पर्यंत वार्षिक खर्च येतो. हा खर्च तुमचे डोमेन नेम / होस्टींग व तुम्हाला हव्या असलेल्या सुविधेनुसार ठरतो. डेडिकेटेड सर्वर घेतला तर खर्च वाढतच जातो कारण एक-एक प्रणाली साठी देखील पैसे मोजावे लागतात.
संकेतस्थळाचे अर्थकारण हे वेगगेगळ्या व्यक्तीचे वेगवेगळ्या स्वभावानुसार ठरते. जसे उपक्रम, मिपा सारखी संकेतस्थळ कमी ऍप्ल्लीकेशनस वापरतात व मनोगत , मीम सारखी संकेतस्थळे जास्त ऍप्लिकेशनवर भर देतात त्यामुळे लागणारी जागा / बॅन्डविडथ / बॅक अप / php , sql, myspl, scripts ह्यावर जास्त पैसा लागतो.
चांगली माहिती. धन्यवाद राजेसाहेब. मी असे ऐकले आहे की, ब्लॉगर.कॉम वर डोमेन बुक केल्यास (उदा. www.example.com असे) वर्षाला फक्त जवळपास ५०० रुपये एवढाच खर्च येतो. अर्थात .इन च्या डोमेनना थोडे जास्त पैसे लागतात असे वाटते. चूभूद्याघ्या.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
बरोबर
सहम्त आहे पण्,
तुम्हाला आपले ऍप्लिकेशन अपलोड इत्यादी नाही कराता येत..
मालकी सर्व ब्लॉगरची तुमचे फक्त डोमेन :(
त्यामुळे फायदा काहीच नाही.. मेंबर बेस वाढला की नंतर् त्रास् होतो...
विनायक पाचलग ह्यांनि असा प्रयत्न केला होता ;)
राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
महत्वाचे
आणि हो एक राहीले,
जमेल तेवढे सदस्यांबरोबर व्यवस्थित राहावे सारखे सारखे मालकी हक्क गाजवू नये सदस्य संकेतस्थळासाठी कधीच येत नाही सदस्य येतो तो चार घटका मनोरंजन करुन् घेण्यासाठी / करण्यासाठी, आपले अनुभव आपली कल्पना पब्लिक समोर मांडण्यासाठी, त्यामुळे ढवळाढ्वळ करु नये.
जमेल तेवढे सर्व निर्णय सदस्यांच्यावरच सोपवावेत, जेणे करुन वाद त्यावेळीच / तेथेच संपतील.
सदस्यांना मोकळिक द्यावी ९९% द्यावी पण १% आपले अधिकार आहेत हे दाखवून देत राहावे जेणे करुन वातावरण खेळीमेळीचे राहील व पोषक राहील.
टिआरपी हा सर्वात मोठा मुद्दा आहे, व टिआरपी वाढवण्यासाठी आचरट चाळे करण्यापेक्षा जर भरीव लेखन् केले तर् चांगले जेणे करुन सदस्य कमी असू देत पण येणार्या प्रत्येक वाचकास काही ना काही नवीन मिळत राहील.
नवीन प्रकारच्या संपर्क साधनांचा व्यवस्थित वापर करुन कोणाला ही न दुखवता तुम्ही आपल्या संकेतस्थळाची जाहिरात करु शकता जसे फेसबुक / ऑर्कुट / टिव्टर् / इन्.कॉम् अश्या संकेतस्थळावर्..
खुप् स्कोप् आहे मराठी संकेतस्थळासांठी कारण् फक्त ५००० च मेंबर आहेत सध्या जे इकडे तिकडे मराठी संकेतस्थळावर् फिरत असतात म्हणजे टोटल् मराठी भाषिकांच्या १% पण् नाही त्यामुळे नवनवीन लोकांपर्यंत संकेतस्थळ पोहचवणे हे सर्वात अवघड कार्य करावेच लागेल.
* मी मागे सुचना केली होती माझे शब्दच्या वेळी तीच परत करतो जेवढी मराठी संकेतस्थळे आहेत त्यांनी वेब रिंग प्रमाणे काम केले तर नक्कीच सर्व संकेतस्थळांना / वाचकांना / लेखकांना त्याचा फायदा होईल पण आपल्या मराठी माणसाचा स्वभाव गुण् आडवा येतो ना :) मिळून् कार्य करणे जसे आपल्या रक्तातच नाही... :(
असो.
बदल होतील, जुने जाईल नवीन येत राहील्... परिवर्तन होत राहतं !
राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
सिनर्जी हवी
सूचना चांगली आहे. पण काहीतरी सिनर्जी हवी. कुठल्यातरी बळकट अशा समान धाग्याने ही संकेतस्थळे बांधता यायला हवी.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
पर्याय
>>सूचना चांगली आहे. पण काहीतरी सिनर्जी हवी. कुठल्यातरी बळकट अशा समान धाग्याने ही संकेतस्थळे बांधता यायला हवी.
दोन पर्याय समोर आहेत्.
RSS FEEDS अथवा मुख्यपेजवर इतर संकेतस्थळांचे लोगो.
पण् लोगो पेक्षा RSS FEEDS कधी ही उत्तम जेणे करुन इतर संकेतस्थळावर नवीन काय घडतयं ते आपोआप कळेल व जवळ जवळ सर्व मराठी संकेतस्थळांचे RSS FEEDS आहेतच व त्यासाठी काही खास काही काम करावे लागणार नाही.
लोगोचा वापर केला तर संकेतस्थळाचे नाव नेहमी नजरेत राहते व जेणे करुन एका संकेतस्थळाचे काम (तमाम नाही ;) ) झाल्यावर सदस्य दुसर्या संकेतस्थळावर ट्रान्सफर होईल. व नवीन सदस्यांना नवीन साईटचा पत्ता आपोआप मिळत राहील.
राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
हो
मान्य आहे, पब्लीसिटी केलीच पाहीजे. पण मराठी संकेतस्थळांमधे विवीधता कुठे आहे? ज्या संकेतस्थळांवर लोक येतात ते म्हणजे एक प्रकारचे कट्टे आहेत, सोशल नेटवर्कीक साइट्स आहेत. त्याचे कारण मराठी संकेतस्थळे ही अजुनही हौशीखातरच वापरली जातात. माझ्यामते (फक्त अंदाज) ८०००-१०००० पेक्षा जास्त लोक मराठी स्थळांवर येत नसतील, आणि त्यातील फक्त काहीशे आठवड्यातून निदान एकदा तरी मराठी स्थळांवर येत असतील, बाकी सगळे हवशे गवशे, त्या मुळे टू मेनी बिझनेसेस चेसींग, टू मेनी कस्टमर्स अशी स्थीती असावी.
त्या मुळे जो पर्यत वेगवेगळ्या गरजा असलेली वेगवेगळी लोक जास्त प्रमाणात मराठीतुन महीती साठी मराठी स्थळांवर येत नाहीत तो पर्यत इंटरनेटवर मराठीचा विकास कठीण आहे. हे कोंबडी आणि अंड्या सारखे आहे. विवीधता नाही, विश्वासारह माहीती नाही त्या मुळे चांगल्या माहीती साठी शहरी लोक इंग्रजी स्थळे वापरतात, आणि मराठीतून टाइमपास साठी हे कट्टे वापरले जातात.
त्या मुळे अर्थकारण ह्या विषयावर आत्ता बोलणे इज टू अर्ली असे वाटते.
ही परीस्थीती बदलण्यासाठी काय करता येइल हा एका वेगळ्या लेखाचा विषय आहे, त्या मुळे त्या बद्दल इथे सविस्तर लिहीत नाही.
तुषार
विश्व जालावरील मराठी जगत
संकेतस्थळ व अर्थकारण
अमुक शेअर इतक्याला झाला तमुक शेअर इतका होईल असे काही संकेतस्थळांवर सांगून सदस्यांचे पैसे बुडवण्याचे/लाटण्याचे प्रकारही चालतात असे ऐकून आहे. सट्टेबाजीला/जुगाराला (अप्रत्यक्ष) प्रोत्साहन देणारी असली आवाहने टाळणेही महत्वाचे.
(सावध) बेसनलाडू
शेअर
फुकट मध्ये टिप्स देणे व पैसे घेऊन् देणे मध्ये जमीन् आस्मानचा फरक...
तसेच,
दोस्ती मध्ये व्यवहार ठेऊच नये जेणे करुन वाद होणार् नाही व कधी काळी व्यवहार करावाच लागला तर तो लिखित... !
माझ्या संकेतस्थळवरील अनेकजण माझे क्लांइन्ट आहेतच पण् कॅशमध्ये व्यवहार् नाही फक्त चेक ने ते पण् डिमेट संदर्भात.... नो इझी मनी गेम.. !
व जो खेळला असेल त्याच्या पेक्षा जास्त जे त्याला खेळाला आपले पैसे देऊ केले त्यांची चुक मोठी माणतो मी..
राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
फुकट
"There is no free lunch" ही म्हण तुम्हाला माहितच असेल. फुकट टीप्स दिल्याने क्लायंट बनायला मदत होते.
(फुकटा) बेसनलाडू
?
सहमत आहे,
स्वत:च्या हक्काच्या जागेत जर तुम्ही स्वतःचाच्या कामाची पब्लिसिटी नाही करणार तर् का मग उपक्रमवर् ?????
**
खोटे बोलून् अथवा डब्बल-ट्रिपल करुन देतो असे म्हणून लुबाडण्यापेक्षा सचोटीने व्यापार केलेला काय् वाईट :)
राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
माझी उत्तरे
माझे संकेतस्थळ नाही त्यामुळे कल्पना नाही.
माहित नाही.
वर उत्तर दिलेले आहे. तशाप्रकारची फसवणूक कोणाही चालकाकडून होऊ नये असे वाटते. संकेतस्थळांचे सदस्यत्व घेताना अशा गोष्टींची काळजी आता घ्यावी लागेल.
हे त्या चालकावर अवलंबून आहे.
जोपर्यंत डोकेदुखी ठरत नाहीत तोपर्यंत जाहीराती घेण्यास हरकत नसावी पण मराठी संकेतस्थळ सदस्य अमुक जाहीरात का? तमुक जाहीरात का? यावर धांगडधिंगा घालण्याचा संभव आहे.
+ १
>जोपर्यंत डोकेदुखी ठरत नाहीत तोपर्यंत जाहीराती घेण्यास हरकत नसावी पण मराठी संकेतस्थळ सदस्य अमुक जाहीरात का? तमुक जाहीरात का? यावर धांगडधिंगा घालण्याचा संभव आहे.
+ १
असे नक्कीच होऊ शकते.
* एक गोंधळ आठवला ई-सकाळच्या आवृती मध्ये एकदा कसलीतरी ऍड डिस्प्ले झाली होती व त्यामुळे झालेला दंगा व गोंधळ. प्रणाली देखील चुकू शकते ह्यावर कोणी विश्वासच ठेवत नाहीत लगेच आसुड घेऊन वार करण्यास तयार्.. :)
राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
हाहा!
मलाही आठवले. तिचा दुवा आहे का? इथे द्यावा. म्हणजे पसंत नसणार्या जाहिरातींचे काय होते याची कल्पना नवेच्छूक चालकांना येईल.
वाईट वाटले
सदर चर्चा ज्या लेखाकडे निर्देश करते आहे तो लेख आताच वाचला. सदर लेख केवळ श्री. धनंजय यांनी लिहिला आहे म्हणून माझी या घटनेच्या सत्यतेबाबत खात्री पटू शकली. दुसऱ्या कोणी लिहिला असता तर विश्वास ठेवणे कदाचित अवघड गेले असते.
मागील एकदोन दिवस यासंदर्भातील काही कुणकुण कानावर आली होती, मात्र या घटनेस तथाकथित जबाबदार व्यक्तीशी पटत नसले/ संकेतस्थळीय मतभेद असले तरी ती व्यक्ती या स्वरुपाची फसवणूक या माध्यमातून करु शकेल असे वाटले नव्हते. या फसवणुकीसाठी वापरलेली काही कारणे वाचून फारच वाईट वाटले. एखाद्याच्या माणुसकीचा अशा पद्धतीने गैरफायदा घेतला तर माणुसकीवरील एकंदर समाजाचा विश्वासच उडेल याची भीती वाटते.
बाकी गुंतवणूक म्हणून पैसे देणाऱ्यांनी काही प्राथमिक खबरदाऱ्या घेणे नेहमीच आवश्यक असते. जगात असे अनेक प्रकार घडलेले असूनही सुशिक्षित लोकांकडून अशा चुका होतात याचे आश्चर्य वाटते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
असेच...
सदर चर्चा ज्या लेखाकडे निर्देश करते आहे तो लेख आताच वाचला. सदर लेख केवळ श्री. धनंजय यांनी लिहिला आहे म्हणून माझी या घटनेच्या सत्यतेबाबत खात्री पटू शकली. दुसऱ्या कोणी लिहिला असता तर विश्वास ठेवणे कदाचित अवघड गेले असते.
असेच...
==================
+
वाईट वाटले
असेच म्हणतो. तरीही एकदम पैसे काढून देण्यापूर्वी विचार केला असता.
----
मुकी बिचारी कुणी हाका! अशी मेंढरे बनू नका । गेल्या गोष्टी स्मरू नका, गत काळाचा शोक फुका ॥
अहो कसल अर्थकारण ?
(मराठी) संकेतस्थळे केवळ 'स्वतःची हौस' म्हणून काढायची. पदरचे पैसे आणि वेळ खर्च करुन सदस्यांना बागडायला मैदान :)
आमचेच बघा ना - 'कुठे काय' मधून आम्हाला कसला फायदा? उलट पदरचेच् पैसे जातायत पण माझी तक्रार नाही, मला आनंद मिळतोय (आणि परवडतय) तोपर्यंत चालवायचे.
'मायबोली' - एवढ्या वर्षांनी (साधारण १० च्या वर) आत्ता आत्ता 'ब्रेक ईव्हन्' होत असेल.
मायबोली
'मायबोली' - एवढ्या वर्षांनी (साधारण १० च्या वर) आत्ता आत्ता 'ब्रेक ईव्हन्' होत असेल.
खरे आहे. मायबोलीने जरा का होईना त्यातून ब्रेकइव्हन करण्याचा प्रयत्न केला. तरी देखील त्यांचा उद्देश हा सामाजीक म्हणून संकेतस्थळ चालवणे, अर्थात धंदा करण्यासाठी म्हणून संकेतस्थळ चालवायचे नाही असाच आहे, असे मायबोलीकारांशी अनेकदा झालेल्या गप्पाटप्पातून जाणवले आहे. त्या अर्थाने त्यांनी काही महाराष्ट्रातील प्रकल्पात (जाहीर/अधिकृत) मदत देखील केली आहे.
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
...
मी वर कुठेतरी लिहले आहे स्वार्थ... मराठी संकेतस्थळ चालवणे म्हणजे सरळ सरळ स्वार्थ आहे.
१. मी १२-१३ वर्ष मातृभाषेपासुन लांब होतो. काहीतरी करायचे चांगले म्हणून्....
२. उद्या कोणीतर विचारले की मराठीसाठी तुम्ही काय केलेत तर त्याचे उत्तर म्हणून्,
३. खरोखर मराठी भाषेतील गोडवा जीव लावतो म्हणून
४. कुणाचा द्वेष करण्यासाठी नाहीतर आपल्याला जे मराठीमुळे मिळाले ते परतफेड कुठून तरी व्हावी म्हणून.
५. परत स्वार्थ, राह ना बिघडे स्वर्ग की... म्हणून.
* एक योगायोग आठवला, मराठीतील चार शब्द न लिहता येणारा राज जैन मराठी संकेतस्थळाचा मालक असे काहीसे वाक्य होते ते.... :)
काय करु ?
मराठी भाषा ही मला जन्माने मिळाली, घरी कन्नड बोलत पण जवळ जवळ पुर्णवेळ मराठीतच संभाषण चाले, त्यामुळे मला मराठी येतं, शाळे मध्ये, हॉस्टेल मध्ये मराठीच होते... त्यामुळे मला मराठी येतं, व माणसाने ज्या भाषेत तुम्ही विचार करु शकता त्या भाषेवर आईपेक्षा जास्त प्रेम करावे हे मला मराठीने शिकवलं म्हणून्.... मला मराठी प्रिय आहे, मला आज ही ७ भाषा येतात पण मी विचार मराठी मध्येच करतो, लिपी जाणतो ती फक्त देवनागरी.. शिव्या येतात त्या अस्सल कोल्हापुरी...
ह्या सर्वाचे काही तरी देणं लागतो म्हणून मी मराठी संकेतस्थळ काढत असतो, ठीक आहे एक फेल, दुसरे फेल, तिसरे फेल, असे करत १०० फेल जरी झाले तरी.. मी १०१ वे मराठी संकेतस्थळ नक्की काढेन.. !!!!
त्यामुळे पैसे नका बघू राव,
पैसा कधी ही कमवता येईल...ऋण फेडण्याचा मोका कधी कधी मिळतो.... व तो मला गमवणे शक्य नाही व शक्यतो तुम्हाला ही.. त्यामुळे नका काळजी करु... चार पैसे.. खर्च होतात चालेल...
राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
:-(
त्यामुळे पैसे नका बघू राव,
पैसा कधी ही कमवता येईल...ऋण फेडण्याचा मोका कधी कधी मिळतो.... व तो मला गमवणे शक्य नाही व शक्यतो तुम्हाला ही.. त्यामुळे नका काळजी करु... चार पैसे.. खर्च होतात चालेल...
एकदम हृदयाला हात घालणारे विचार.....
||वाछितो विजयी होईबा||
गल्ली चुकलं काय हो हे, पी.एल?
माणसाने ज्या भाषेत तुम्ही विचार करु शकता त्या भाषेवर आईपेक्षा जास्त प्रेम करावे हे मला मराठीने शिकवलं म्हणून्.... मला मराठी प्रिय आहे, मला आज ही ७ भाषा येतात पण मी विचार मराठी मध्येच करतो, लिपी जाणतो ती फक्त देवनागरी.. शिव्या येतात त्या अस्सल कोल्हापुरी...
ह्या सर्वाचे काही तरी देणं लागतो म्हणून मी मराठी संकेतस्थळ काढत असतो, ठीक आहे एक फेल, दुसरे फेल, तिसरे फेल, असे करत १०० फेल जरी झाले तरी.. मी १०१ वे मराठी संकेतस्थळ नक्की काढेन.. !!!!
त्यामुळे पैसे नका बघू राव,
पैसा कधी ही कमवता येईल...ऋण फेडण्याचा मोका कधी कधी मिळतो.... व तो मला गमवणे शक्य नाही
काळीज भेदून जाणारा प्रतिसाद. गहिवरलो.
प्रतिसाद देण्याच्या स्थळाची जागा चुकली की काय या शंकेने थरकाप उडाला.
सन्जोप राव
उफक पर खडी है सहर
अंधेरा है दिलमें इधर
वही रोज का सिलसिला