पुढील पाच वर्षांत भारत अन्नधान्य आयात करणारा सर्वांत मोठा देश

खालील अस्वस्थ करणारी बातमी ई-सकाळ मधे वाचनात आली. ती वाचून आपल्याला काय वाटले?

पुढील पाच वर्षांत भारत अन्नधान्य आयात करणारा सर्वांत मोठा देश - शरद पवार

मुंबई, ता. २९ - पर्यावरणात कमालीचा असमतोल निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे जमिनीचा पोत ढासळत असून त्याचा गंभीर परिणाम कृषी उत्पादनांवर होत आहे. ....
कृषी उत्पादनात दिवसेंदिवस घट होऊ लागल्याने पुढील चार - पाच वर्षांत भारत हा सर्वाधिक अन्नधान्य आयात करणारा देश असेल, अशी धक्कादायक माहिती केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये "सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रमा'च्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. भारत हा कृषीप्रधान देश असला तरी पुरेसे अन्नधान्याचे उत्पादन होत नाही. गेल्या वर्षी गव्हाचे कमी उत्पादन झाल्याने यंदा हे उत्पादन वाढविण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. तरीही त्यात पुरेशी वाढ झाली नाही. शेती उत्पादनात अग्रेसर असलेल्या पंजाब, हरियाना या राज्यांच्या जमिनीचाही दर्जा ढासळत आहे. पुढील ४० - ५० वर्षांत तर संपूर्ण जगालाच ही समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावेल, असे पवार म्हणाले.

देशासमोरील अशा आव्हानांची प्रत्येक नागरिकाला जाणीव होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी लहानपणापासूनच शाळेत शिक्षण मिळायला हवे. भारतात आजही ६४ टक्के समाज शेतीवर उपजीविका करत आहे. हे प्रमाण कमी व्हायला हवे. विद्यार्थ्यांना शाळेत विज्ञानाधिष्ठित शिक्षण मिळायला हवे. जगात होत असलेल्या बदलांची दखल घेऊन आपणही बदलणे आवश्‍यक असल्याचे आवाहनही त्यांनी केले. राज्यातील शिक्षणाची स्थिती सुधारण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक संघटना चांगले योगदान मिळणे आवश्‍यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

लेखनविषय: दुवे:

Comments

ह्म्म्म्

हे सुशिक्षितांना थोडेफार कळते. हे वक्तव्य पवार साहेबांनी काही वर्षे आधी केले असते तर हा प्रश्न जास्त गंभीर झाला नसता. असो, वेळ गेलेली नाही. काही उपाय असे ही आहेत.
१. उसाची शेती कमी करणे
२. सेंद्रीय खते वापरणे.
३. व्यवस्थाप मार्गदर्शक तत्वे वापरून आहे त्या उप्लब्धतेचा पुरेपूर वापर करणे..


- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.

...

३. व्यवस्थान मार्गदर्शक तत्वे वापरून आहे त्या उप्लब्धतेचा पुरेपूर वापर करणे.. असे वाचावे


- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.

व्यवस्थापन, उपलब्धता

3. मराठीत टंकताना 'गमभन' वापरून, आहे त्या उपलब्धतेचा पुरेपूर वापर करणे. (हलके घ्या.)

(अवांतर : 'उपलब्धते'चा फारतर 'फायदा उठवता येतो', पण वापर 'सोयी'चा होतो असे वाटते.)

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

आपण मागे चाललोय

सर्वात प्रथम मनात आलेला विचार हाच होता कि आपण मागे चाललोय

मुळापासून हादरून जायला झाल ! पूर्विच्या दुष्काळाच्या , रेशनच्या, लाल ज्वारीच्या कथा आई-बाबाकडून् ऐकल्या आहेत
आपण परत तिकडेच तर नाही ना जाणार? आमच्या पिढिला तर ह्या सर्व गोष्टी फक्त ऐकून माहित झालेल्या

त्यामुळे टरकले आहे.

केवळ

रासायनिक खतेच की पुन्हा पुन्हा त्याच जमिनीवर पिके काढल्याने जमिनीचा कस ढासळला आहे?

भारतात आजही ६४ टक्के समाज शेतीवर उपजीविका करत आहे. हे प्रमाण कमी व्हायला हवे.

हे प्रमाण कमी झाले तर इतक्या अमर्याद वाढलेल्या लोकसंख्येला अन्न कोठून मिळायचे?

 
^ वर