शाळांमधून संस्कृत हा विषय बंद केला जावा का?

संस्कृत सारखी व्यवहारात निरुपयोगी असलेली भाषा माध्यमिक शिक्षणात शिकवल्याने नक्की काय फायदा होतो ते मला अजूनही लक्षात आलेले नाही. कृपया कोणतीही भाषा शिकण्याचे सर्व-साधारण फायदे देऊ नयेत. कारण ते 'कोणत्याही' भाषेला लागू होतात. संस्कृत ऐवजी जपानी किंवा स्पॅनिश अशा भाषांचे पर्याय दिल्यास त्यांचा व्यवहारात काहीतरी उपयोग होऊ शकतो. पण तरीही जवळपास प्रत्येक मराठी शाळेत १०० मार्क संस्कृत हा विषय मोठ्याप्रमाणावर अजूनही शिकवला जातो. इतक्या घाऊक प्रमाणात शाळांमधून संस्कृत शिकवण्याचे कारण काय असावे? मी शाळेत असताना निव्वळ प्रवाहासोबत जायचे म्हणून संस्कृत विषय घेतला आणि नंतर पस्तावत घोकंपट्टी करत कसा बसा सोडवला. त्याकाळी संस्कृत हा पर्यायच शाळेत नसत तर मला ह्या उपयोग शून्य नरकातून जावे लागले नसते. उपक्रमींना काय वाटते? शाळांमधून संस्कृत हा विषय बंद केला जावा का?

माझ्या मते, ज्यांना संस्कृत शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा पर्याय महाविद्यालयात असावा. माध्यमिक शालेय पातळीवर असले अनावश्यक विषय भरण्याची बिलकुल गरज नाही.

लेखनविषय: दुवे:

Comments

बाकी सारे मान्य

वैदिक गणित असे काही नसते हो!

मुळातच अनेक कालबाह्य विषय हे शाळेत शिकवावे का ? आजचे शिक्षणाने

thanthanpal.blogspot.com

मुळातच अनेक कालबाह्य विषय हे शाळेत शिकवावे का ? आजचे शिक्षणाने मुलांना धड हमाली करता येत नाही.( अंग मेहनत या अर्थाने शब्द घ्या ) ना नोकरी ना स्वतःचा धंदा करता येतो. श्रमाला प्रतिष्टा मिळवून देणाऱ्या शिक्षणाचा नवीन अभ्यासक्रम आखणे गरजेचे आहे. इंग्रजांनी त्यांना लागणाऱ्या कारकुनाचा अभ्यासक्रम आपण ६० वर्षात बदलला नाही. मुळातच अनेक कालबाह्य विषय हे शाळेत शिकवावे का ? आज शेती व्यवसाय , तंत्राद्य्न ,नितीमत्ता , समाज यावर आधारित नवीन अभ्यासक्रम तय्यार कारणे आवश्यक आहे.

हमालीचा प्लॅटफॉर्म

मुळातच अनेक कालबाह्य विषय हे शाळेत शिकवावे का ? आजचे शिक्षणाने मुलांना धड हमाली करता येत नाही.( अंग मेहनत या अर्थाने शब्द घ्या ) ना नोकरी ना स्वतःचा धंदा करता येतो. श्रमाला प्रतिष्टा मिळवून देणाऱ्या शिक्षणाचा नवीन अभ्यासक्रम आखणे गरजेचे आहे. इंग्रजांनी त्यांना लागणाऱ्या कारकुनाचा अभ्यासक्रम आपण ६० वर्षात बदलला नाही. मुळातच अनेक कालबाह्य विषय हे शाळेत शिकवावे का ? आज शेती व्यवसाय , तंत्राद्य्न ,नितीमत्ता , समाज यावर आधारित नवीन अभ्यासक्रम तय्यार कारणे आवश्यक आहे.

अहो ठणठणकाका, भारतात सर्वात सोपे काय असेल तर ती आहे हमाली. विचारा त्यांना - तुमचा प्लॅटफॉर्म कोणता? - सगळे हमाल बिनचूक उत्तरे देतील.

- राजीव.

सहमत..!

>>आज शेती व्यवसाय , तंत्राद्य्न ,नितीमत्ता , समाज यावर आधारित नवीन अभ्यासक्रम तय्यार कारणे आवश्यक आहे.

सहमत आहे.

-दिलीप बिरुटे

हो

बंद केला तरी हरकत नाही. त्याचबरोबर इतिहासही बंद करावा, उपयोग काय १९४७ मध्ये काय झाले हे माहीत करून घ्यायचा?

बाकी त्या टोपीकराला आमच्याकडून काहीतर शिक असे सांगावेसे वाटते. त्याने ऑक्सफोर्डला संस्कृतचा नवीन अभ्यासक्रम सुरू केलाय, वेडाच दिसतोय.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

आरागॉर्न यांस विनंती

अशी सूचना पाठवायची झाल्यास यांनाही आणि यांनाही , यांनाही पाठवावी लागेल असे दिसते. आरागॉर्न यांनी याची कृपया नोंद घ्यावी.

विनंती

आरागॉर्न ह्यांस विनंती: मुक्तसुनीत ह्यांच्या सूचनांचे पालन झाले की नविन सूचनांसाठी त्यांनाच संपर्क साधावा.इथले धागे हायजॅक करु नयेत.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

ऑक्सफर्ड

ऑक्सफर्डला शाळेमधे संस्कृत शिकवतात का? प्रस्ताव नीट वाचून पाहा.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

संस्कृत

संस्कृत नाही ल्याटीन मात्र शिकवतात. :)

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

ल्याटीन

इंग्लंडातल्या शाळांमधे ल्याटीन शिकवावे की नाही हा ह्या चर्चेचा विषय नाही. तिथे ल्याटीन किती घावूक प्रमाणात शिकवले जाते आणि किती प्रवाहपतित त्यात बळी पडतात ह्याविषयी कल्पना नसल्याने त्याचा ह्या चर्चेत संबंध नाही. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे इंग्लंडात असे केले जाते म्हणून आपणही करावे ह्यात काही तथ्य नाही.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

अर्थ

कोणताही श्लोक स्तोत्र वगैरे ऐकताना, वाचताना साधारण अर्थ लक्षात येतो. थोडे प्रयास केले की बहुतेक पूर्ण समजते.

त्यामुळे पुराणमतवादी लोकांची मते काही प्रमाणात तरी स्वतःच्या समजण्याच्या जोरावर खोडून काढता येतात. एखादा माणूस या श्लोकाचा घोळात घोळ अर्थ सांगू लागला तर त्याला थांबवता येते.

एवढा तरी मला शाळेत संस्कृत शिकण्याचा (जरा निगेटिव्ह) फायदा झाला.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

माझं मत..

उपक्रमींना काय वाटते? शाळांमधून संस्कृत हा विषय बंद केला जावा का?

हा विषय ऑप्शनल असावा.. प्रत्येक विद्यार्थ्यावर संस्कृत शिकायचा जुलुम असू नये..

ज्यांना शिकायचंय त्यांचा वर्ग वेगळा असावा..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

सहमत

प्रत्येक विद्यार्थ्यावर संस्कृत शिकायचा जुलुम असू नये..

सहमत आहे...!
जुलुम शब्द आवडला....! :)

-दिलीप बिरुटे

ऑप्शनल

हा विषय ऑप्शनल असावा..

प्रत्येक शाळांमधे ऑप्शनल असतोच असं नाही. काही शाळांमधे ५० मार्कांचं संस्कृत घेणं भाग पडतं. आणि थेट सक्तिचा नसला तरी गुण मिळवण्यास इतर विषयांपेक्षा बरा पडतो त्यामुळे स्पर्धेत राहण्यासाठी तो सक्तिने घ्यावा लागतो.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

भाषा प्रवाही असते म्हणजे काय?

मराठी भाषा प्रवाही आहे म्हणजे धन्स, धन्यु, विकांत अशा शब्दांचा बलात्कार सहन करण्याइतपत ती दुबळी आहे असेच काय?
सन्जोप राव
इलाही ये तूफान है किस बला का
के हाथोंसे छूटा है दामन हया का

रावसाहेब

हा विषय नवीन धाग्याचा आहे. तेव्हा वसुलि हायजॅक वगैरे म्हणतील.

बाकी विषय निघालाच आहे म्हणून - मला असे नवीन शब्द हे बलात्कार वाटत नाहीत. थ्यांक्स म्हणून परक्यांकडे वेसवेगिरी करण्यापेक्षा धन्यु म्हणून गावातल्या याराबरोबरचा संग बरा...

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

सुभाषिते...

माझ्या मते संस्कृत मधे असलेली सुंदर सुभाषिते ही एकच बाब सुद्धा शाळांमधून ही भाषा शिकवण्यासाठी पुरेशी आहे. मुले अवती भवती जे जे काही चांगले वाईट मिळेल त्या सार्‍यातूनच काहीना काही शिकत असतात. त्यांना चांगले उपलब्ध करून देणे ही मोठ्यांची जबाबदारी.

शहाणे...उंटावरचे
...विद्याधन:सर्वधनप्रधानम् !!

स्कोरिंग?

काही विषय विद्यार्थ्यांनी यावे म्हणून मुद्दाम स्कोरिंग विषय केलेले असतात. संस्कृत हा त्यातलाच एक. विद्यार्थी कमी झाले की दर्जा कमी केला जातो.

महाराष्ट्रात भाषा विषय हा वर्गवारीने शिकवला जातो. म्हणजे माझी मुख्य भाषा मराठी असेल तर त्याचा दर्जा चांगला ठेवतात. दुसर्‍या दर्जाच्या भाषेत मात्र दर्जा कमी ठेवला जातो. म्हणजे पहिल्या दर्जाच्या भाषेत निबंधासारखे स्वतंत्र लेखन अपेक्षित असते तर दुसर्‍या दर्जाच्या भाषेत कामचलाऊ व्यवहारात प्राविण्य मिळवणे महत्वाचे असते.

संस्कृत किंवा फ्रेंच सारख्या परिसर अगंय भाषांसाठी मात्र हे दुसर्‍या दर्जाचे शिक्षण दिले जात नाही. मग त्या भाषेची परिक्षा पाठ केलेली वाक्ये, शब्दांची रुपे, अर्थ इत्यादींवर अवलंबून असते. याउलट दुसर्‍या दर्जाच्या इतर भाषा (हिंदी, इंग्रजी वा मराठी) यात हा दर्जा एवढा खालावलेला नसतो. कित्येक जण म्हणून या भाषा (हिंदी ऐव़जी ) ऐच्छिक भाषा म्हणून घेतात. अर्थातच परिक्षा झाली की विसरण्याचे प्रमाण जास्त असते.

या सर्वांचा फायदा संस्कृत (फ्रेंच) भाषेच्या शिक्ष़कांना रोजगार मिळावा म्हणून होत असावा.

पाठांतर:
लक्षात ठेवण्यासाठी तीन प्रकारे प्रयत्न केले जातात. एकात समजून लक्षात ठेवणे, दुसर्‍यात तात्पुरते पाठ करणे (परिक्षे आधी काही दिवस केलेली घोकंपट्टी) आणि तिसर्‍यात नियमीत म्हणणे (पाढे, स्तोत्रे). यातील शेवटच्या प्रकाराचे रिटेंशन/रिकॉल सगळ्यात जास्त असते. मात्र पहिल्याचे दुसर्‍यापेक्षा जास्त असावे असा माझा कयास आहे. म्हणून समजून लक्षात ठेवणे याप्रकारास जास्त महत्व दिले पाहिजे. आता बहुसंख्य व्यवहारात पाठ केलेल्या (दुसर्‍या प्रकाराने) गोष्टींचा बिलकूल फायदा नसतो. म्हणजे लाप्लास वगैरे आठवत नसले तर व्यवहारात जेव्हा उपयोग होतो तेव्हा पुस्तक बघून सांगता येतेच.

केवळ पाठांतर करण्याची शक्ति वाढवण्यासाठी (अशी शक्ति असेल तर) संस्कृत विषय शाळेत शिकवायची गरज नाही.

केवळ संस्कृत ही आपल्या भाषांची जननी आहे ही देखिल एक गैर समजूत.

प्रमोद

छान प्रतिसाद

केवळ संस्कृत ही आपल्या भाषांची जननी आहे ही देखिल एक गैर समजूत.

भाषांची जननी वगैरे सोडा, राजेश घासकडवींच्या मते तर संस्कृत हा आपल्या सांस्कृतीक इतिहासाचा पाया आहे म्हणे. कसलाही संदर्भ न देता हे असले दावे ठोकून देणे ही आपल्या शिक्षण व्यवस्थेची दुरावस्था म्हणावे की आणखी काही?

लक्षात ठेवण्यासाठी तीन प्रकारे प्रयत्न केले जातात. एकात समजून लक्षात ठेवणे, दुसर्‍यात तात्पुरते पाठ करणे (परिक्षे आधी काही दिवस केलेली घोकंपट्टी) आणि तिसर्‍यात नियमीत म्हणणे (पाढे, स्तोत्रे). यातील शेवटच्या प्रकाराचे रिटेंशन/रिकॉल सगळ्यात जास्त असते. मात्र पहिल्याचे दुसर्‍यापेक्षा जास्त असावे असा माझा कयास आहे. म्हणून समजून लक्षात ठेवणे याप्रकारास जास्त महत्व दिले पाहिजे. आता बहुसंख्य व्यवहारात पाठ केलेल्या (दुसर्‍या प्रकाराने) गोष्टींचा बिलकूल फायदा नसतो. म्हणजे लाप्लास वगैरे आठवत नसले तर व्यवहारात जेव्हा उपयोग होतो तेव्हा पुस्तक बघून सांगता येतेच

अगदी हेच म्हणतो.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

पाठांतर

संस्कृतमध्ये पाठांतर करावे लागते अशा अर्थाचा युक्तिवाद वाचून आश्चर्य वाटले. कुठलीही नवीन भाषा शिकताना त्या भाषेच्या खाचाखोचांची सवय होईपर्यंत स्मरणशक्तीवर भर द्यावाच लागतो. मोठेपणी नवीन भाषा शिकणार्‍यांना हे चटकन लक्षात यावे. फ्रेंचमध्ये मराठीप्रमाणेच वस्तूंना स्त्रीलिंग किंवा पुल्लींग दिले आहे. ते लक्षात ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. फक्त लहानपणी घोकंपट्टी हा सरळसोट मार्ग वापरला जातो. मोठेपणी असोसिएशन वगैरे वापरून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न होतो.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

सहमत आहे

माझ्या मतेही पाठांतराचा मुद्दा हा गौण आहे.
ह्यावर अजानुकर्ण आणि विसुनाना ह्यांचा प्रतिसाद वाचायला आवडेल.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

लाप्लास, संस्कृत आणि भाषांतर

संस्कृत शाळांतून शिकवावी का याचे उत्तर "हो" असे वाटते. संस्कृत शिकवण्याचा जर काही उपयोग होत नसेल तर तो दोष भाषेचा नसून शिक्षण पद्धतीचा आहे.

लहान मुले विविध भाषा लवकर शिकतात असा एक प्रवाद आहे (तो खरा का खोटा याची शहानिशा केलेली नाही) तसे असल्यास संस्कृत प्राथमिक शाळेपासूनच शिकण्याचा "ऑप्शन" असावा. ८वी पासून शिकवण्यात येणारे (निदान ५० मार्कांच्या संस्कृताने) पुढील आयुष्यात कोणताही उपयोग मला झाल्याचे आठवत नाही. तेवढी खोलवर भाषा शिकून होतच नाही. एखाद्याचा झाला असल्यास माझ्यातर्फे मनःपूर्वक अभिनंदन.

पाठांतराचे फायदे वगैरे प्रतिसाद थोडेसे बालीश वाटले. मराठी व्याकरणाचे आणि इंग्रजी व्याकरणाचे नियम पाठ वगैरे केल्याचे आठवत नाही. लाप्लासचाही पुढील आयुष्यात उपयोग झाला नाही आणि झालाच असता तर पाठ केलेली सिद्धता वापरली असती की पुस्तक उघडून वापरली असती हे सांगण्याची गरज नाही. बहुधा, लाप्लास वापरण्याची सतत गरज लागली असती तर लाप्लास डोळे झाकून आठवला असता. लाप्लास आणि संस्कृत दोहोंचे पाठांतर करण्याचा उद्देश परीक्षेत गुण मिळवणे इतकेच होते. अमेरिकन शाळांत पाठांतर पद्धती नाही. परंतु, महाविद्यालयीन विद्यार्थी लाप्लास वापरत असावेतच असे वाटते.

संस्कृताचा विषय निघाला की मठूर (मत्तूर) या गावाचे नाव नेहमी निघते. तिथले लोक पाठांतराने संस्कृत बोलतात का हे जाणून घ्यावेसे वाटले. असावेत असे मला वाटत नाही. चू. भू. दे. घे.

खरे आहे

लहान मुले विविध भाषा लवकर शिकतात असा एक प्रवाद आहे (तो खरा का खोटा याची शहानिशा केलेली नाही)

खरे आहे. यावर बरेच संशोधनही चालू आहे. काहींच्या मते भाषा शिकण्यासाठी विशेष गुणसूत्रे असतात.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

नकळत सारे घडले..

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
वसंतराव,
या प्रस्तावातील तुमचे सर्व लेखन दक्षतापूर्वक वाचले.तुमचे लेखन बहुतांशीं व्याकरणशुद्ध, निर्दोष आणि अस्खलित आहे.सदोष वाक्यरचना कुठेही नाही. शुद्धलेखनाचे दोष नगण्य आहेत.(उदा. दुरावस्था, नविन, पुर्वी इ.) लेखनात तुम्ही अर्थपूर्ण सामासिक शब्द आत्मविश्वासपूर्वक वापरता. उपयोगशून्य,उपभोग्यसुंदर हे शब्द तर नवीन वाटतात. याचे कारण तुम्ही तुमच्या शालेय शिक्षणात, अनिच्छेने का होईना, संस्कृतभाषेचा अभ्यास केला, हे आहे असे मला वाटते.
"....तर मला ह्या उपयोग शून्य नरकातून जावे लागले नसते. "
हे संस्कृत भाषेच्या संदर्भातील तुमचे विधान मात्र दुर्दैवी आहे.हे वाचणे मला क्लेशदायक झाले.

संस्कृत आणि पाठांतर

१. संस्कृत म्हणजे निव्वळ पाठांतर, ही एक खुळचट समजूत आहे. पाठांतराशिवाय प्रत्यक्ष पद्धतीने संस्कृत शिकता येते, मात्र त्यासाठी संस्कृत पाठशाळेत जायला पाहिजे. शाळेमधल्या आठवडी दोन तासिकांमध्ये संस्कृत शिकायला हवे असेल तर नाइलाजाने पाठांतराची कास धरावी लागते. तीही पहिली एकदोन वर्षे. पुढे पाठांतर न करता संस्कृत उत्तम शिकता येते. कॉलेजमधली मुले संस्कृत शब्द आणि धातू पाठ करतात असे माझा अनुभव नाही.
२.सुभाषितांचे लक्षात राहणे हे चित्रपटांच्या गाण्यांप्रमाणे आवडीने होते, सुभाषिते पाठ करावी लागत नाहीत.
३. संस्कृत भाषेचे अल्पज्ञानही इतर भारतीय भाषा, विशेषतः मराठी शिकण्यासाठी निश्चित उपयोगी पडते. वसुलिंना ते कसे उपयोगी पडले आहे ते यनावालांनी दाखवून दिलेच आहे.
४. माझ्या मते शाळांमधून संस्कृत, आज उत्तरी भारतात आहे तसे, अनिवार्य असावे. विकल्प असेलच तर वरच्या वर्गात गेल्यावर लॆटिन किंवा ग्रीक/पर्शियनचा असावा. अभिजात भाषा आणि चालू भाषा यांची उपयोगिता वेगवेगळी आहे.
५.विद्यार्थी बारावी उत्तीर्ण होईपर्यंत त्याला राज्यभाषा, एक अभिजात भाषा, एक किंवा दोन परदेशी भाषा आणि एक परप्रांताची भाषा अभ्यासायला मिळाली पाहिजे.
६. केवळ संस्कृत न शिकल्याने संस्कृत वाङ्‌मयाच्या सौंदर्यास्वादाला पारखा झालेला निव्वळ दुर्दैवी म्हणावा लागेल.--वाचक्‍नवी

सहमत

विद्यार्थी बारावी उत्तीर्ण होईपर्यंत त्याला राज्यभाषा, एक अभिजात भाषा, एक किंवा दोन परदेशी भाषा आणि एक परप्रांताची भाषा अभ्यासायला मिळाली पाहिजे.

सहमत आहे. हे अर्थातच माझे वैयक्तिक मत आहे. मला भाषा शिकायला आवडतात म्हणून असेल कदाचित. या वयात इटालियन शिकण्यासाठी तीन वर्षे मेहनत करावी लागली, आता फ्रेंचला किती वेळ लागेल माहीत नाही. मधूनच बंगाली आणि पंजाबी खुणावत असतात.
लहानपणी एकूणातच लर्निंग कर्व्ह आणि भाषा शिकण्याची क्षमता भरपूर असते. तेव्हा संधी मिळाली असती तर हे सर्व झटक्यात झाले असते अशी आता हळहळ वाटते.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

पर्याय उपलब्ध असावेत.

पाठांतराविषयी सहमत आहे.

विद्यार्थी बारावी उत्तीर्ण होईपर्यंत त्याला राज्यभाषा, एक अभिजात भाषा, एक किंवा दोन परदेशी भाषा आणि एक परप्रांताची भाषा अभ्यासायला मिळाली पाहिजे.

असा पर्याय उपलब्ध हवा पण सक्ती नको. इतक्या भाषांचा भडिमार झाल्याने नापासांची संख्या वाढेल का काय अशी शंका आली.

अरेरे

संस्कृत भाषेचे अल्पज्ञानही इतर भारतीय भाषा, विशेषतः मराठी शिकण्यासाठी निश्चित उपयोगी पडते. वसुलिंना ते कसे उपयोगी पडले आहे ते यनावालांनी दाखवून दिलेच आहे.
मराठी शिकण्यासाठी संस्कृत भाषेचे ज्ञान आवश्यक आहे का तेवढे सांगा. वसुलिंनी जे शब्द घडवले आहेत ते संस्कृत न शिकताही घडवता येता. बाकी संस्कृत भाषेचे ज्ञान मराठी भाषा शिकण्यासाठी उपयोगी पडते का नाही हे नंतर बघू. शहाणपणा पाजळण्यासाठी मात्र संस्कृतचे ज्ञान निश्चितच उपयोगी पडते असे मला वाटते.

केवळ संस्कृत न शिकल्याने संस्कृत वाङ्‌मयाच्या सौंदर्यास्वादाला पारखा झालेला निव्वळ दुर्दैवी म्हणावा लागे
अरेरे! ज्ञानेश्वर माउलींनी कशाला अमृतानुभव लिहिला, कशाला ज्ञानेश्वरी लिहिली ! ही मंडळी काही सुधरत नाहीत

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर