आइसलॅन्ड मधल्या ज्वालामुखीचा उद्रेक

बुधवारी सकाळी आइसलॅ न्ड मधल्या ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला. या ज्वालामुखीतून फेकल्या गेलेल्या राखेमुळे युरोपमधे विमानसेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. या ज्वालामुखीच्या रौद्र स्वरूपाचे दर्शन घडवणारे काही फोटो मला या दुव्यावर सापडले. सर्व उपक्रमीना ते पहाता यावेत म्हणून तो दुवा येथे दिला आहे.
चंद्रशेखर

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम

दुवा. या ज्वालामुखीतून फेकल्या गेलेल्या राखेच्या ढगाचा प्रवास किती वेगाने युरोपच्या दिशेने झाला, हे उपग्रहामार्फत घेतल्या गेलेल्या छायाचित्रांच्या पुढील चलच्चित्रात (व्हिडिओत) पाहता येईल - http://www.youtube.com/watch?v=WVkdt1dcpoA

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

उच्चार कसा करायचा?

Eyjafjallajokull या शब्दाचा उच्चार कसा करायचा?

एय्याह्फॅलहॉकु(क)ल असा काहीसा असावा का?

विकी असे म्हणतो-

[ˈɛɪjaˌfjatlaˌjœːkʏtl̥] एय्जलेक्त्ल् असा काही...पण नीट समजत नाही.

एव्हलूब ‘

यू ट्यूबवर याचा उच्चार एव्हलूब असा करायचा असे ऐकले
का ते माहित नाही
चन्द्रशेखर

उच्चार

वेगवेगळे लोक वेगवेगळा उच्चार करतात असे दिसते. आता इथे काही वेगळाच माहिती पुर्ण उच्चार दिसला त्याचा पुनरुच्चार मी करत् नाही आहे.
प्रकाश घाटपांडे

रौद्र

निसर्गाचे रौद्र रूप.
११ वा फोटो पाहून आश्चर्य वाटले.

छान फोटो

१७वा फोटो मस्तच... नैसर्गिक लालबुंद लाव्हाचे भव्य फटकारे आन् त्याच्याशी स्पर्धा करू पाहणारे मानवी गाड्यांच्या हेडलाइटस चे काजवे..

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

 
^ वर