अपव्यय
काही वर्षांपूर्वी भाभा अणुशक्ती केंद्राने खार्या पाण्याचे रूपांतर गोड्या पाण्यात करण्याचे रिव्हर्स ऑसमॉसिस तंत्रज्ञान विकसित केले असल्याचे वाचले होते. त्यावेळी देशी तंत्रज्ञांनी यश मिळवल्याचा अभिमान वाटला होता. पुढच्या काळातील पेय जलाच्या टंचाईवर उत्तम उपाय असे जाणवले होते. नंतर त्यांनी हे तंत्रज्ञान अल्प किंमतीत खुले करून दिल्याचेही वाचले होते.
या तंत्रात एका सूक्ष्म छिद्रे असलेल्या पडद्यातून (Membrane) खारे पाणी पास केले जाते पाण्यातील क्षार त्या पडद्यातच राहतात आणि गोडे पाणी पलिकडे जाते. नंतर त्या पडद्यात अडकलेले क्षार 'धुवावे' लागतात. त्यासाठी काही पाणी वाया जाते.
तरीही भारतात बर्याच भागांत गोड्यापाण्याची उपलब्धता कमी आहे अशा भागात हे वरदान आहे. समुद्राजवळच्या प्रदेशांत तर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते.
सध्या मी रहात असलेल्या गेस्टहाऊसमध्ये या तंत्रज्ञानावर आधारित आर ओ फिल्टर नवीनच बसवलेला आहे. त्यातून अतिशय सुंदर गोडे पाणी मिळते.
पण त्याचे ऑपरेशन पाहून संशय आला. त्या फिल्टरला एक ड्रेन पाईप आहे. ज्यातून हे 'मेम्ब्रेन धुणारे' पाणी बाहेर येते.
संशयातून मोजणी केली तेव्हा धक्कादायक निरीक्षण आले.
जेव्हा मी एक लीटर पाणी पिण्यासाठी त्यातून काढतो तेव्हा चार लीटर पाणी ड्रेन पाईप मधून वाहून जाते. हे बहुधा ठराविक कालावधी नंतर मेंब्रेन धुण्याची कटकट नको म्हणून केले असावे.
कुणा उपक्रमींकडे असे फिल्टर असतील तर त्यांतूनही इतके पाणी वाया जाते का?
गोड्या पाण्यासाठी चौपट पाणी वाया घालवणे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटते?
रोगापेक्षा उपाय भयंकर आहे असे मला वाटते.
दुसरे म्हणजे बहुतेक बाटलीबंद पाण्याच्या बाटल्यांवर आतील पाणी याच तंत्रज्ञानाने 'शुद्ध' केले असल्याचे लिहिलेले असते. अशा बाटल्या भरण्याच्या ठिकाणी तर केवढे पाणी वाया घालवले जात असेल !!!
Comments
तुम्ही म्हणता ते योग्य आहे.
रिव्हर्स ऑस्मोसिस् हा प्रकार घरात शुद्ध पाणी बनवण्यासाठी योग्य नाही. तोटे इथे पहा.
जेथे पिण्यासाठी गोडे पाणी मिळणे शक्य नाही (केवळ खारे पाणीच उपलब्ध आहे) केवळ अशा ठिकाणी ही पद्धत वापरणे योग्य आहे.
अन्यथा इतर सर्व ठिकाणी चारकोल-पोर्सेलिन कँडल आणि युव्ही फिल्ट्रेशन करणारे फिल्टर्स पुरेसे आहेत. -- "UVGI utilises the short wavelength of UV that is harmful to microorganisms. It is effective in destroying the nucleic acids in these organisms so that their DNA is disrupted by the UV radiation. This removes their reproductive capabilities and kills them."
(थोडक्यात केन्ट प्युरिफायर पेक्षा युरेका फोर्ब्स ऍक्वागार्ड वापरल्यास उत्तम.)
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
क्षार
हम्म्म्म्
पण युरेका टाईप फिल्टरमध्ये क्षारता कमी होत नाही. जेथे विहिरीचे कठीण आणि मचूळ पाणी मिळते तेथे याचा उपयोग नाही. तेथे क्षार काढण्याची काहीतरी सोय हवी.
सध्या टी व्ही वर आर ओ फिल्टरची दणक्यात जाहिरात चालू आहे.
(बी ए आर सी ने तंत्रज्ञान मोकळे करून एक फ्रॅन्केस्टाईन उभा केला आहे का?)
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
गोडे पाणी नसेलच तिथे काय करणार???
माझ्या भागातील ( बंगलोर) नव्या इमारतींमध्ये गोडे पाणीच येत नाही. मी दोन वर्षे दुकानातून वीस लिटरचे ड्रम मागवले पण त्यांचे बाह्यरूपच दिवसेंदिवस खराब होत आहे. अशा वेळी आर्.ओ. तंत्रज्ञान हा मोठा दिलासा आहे. चौपट पाणी वाया जाते खरे पण शुद्ध पाणी तर मिळते.
वाया जाणारे पाणी मी बादल्यांमध्ये जमवते व ते लादी पुसणे, बाथरूम धुणे ह्या कामांसाठी वापरते. ह्यापेक्षा आणखी काय उपाय कुणाला माहित असल्यास जरूर कळवा.
गौरी
ह्याला म्हणतात काटकसर
वाया जाणारे पाणी मी बादल्यांमध्ये जमवते व ते लादी पुसणे, बाथरूम धुणे ह्या कामांसाठी वापरते.
वा! ह्याला म्हणतात काटकसर. वॉशिंग मशीनमधून निघणारे पाणी आम्ही असेच बादल्यांमध्ये जमवून झाडांना देण्यासाठी वापरतो.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
फालतू अवांतर उपाय:
१. मिठाच्या पाण्याचा गुळण्या करण्यासाठी.
२. रश्श्याच्या भाजीसाठी. (मीठ वापरू नये)
३. लोणच्यात (ब्राइन पिकल्ज) वापरू शकता.
४. पाणीपुरीच्या पाण्यासाठी.
चहात साखरेऐवजी उसाचा रस टाकून बघणारे महाभाग मी खरेच बघितले आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा न मिळाल्यास नवलच.
तूर्तास एवढेच
वाया जाणारे पाणी
वाया जाणारे पाणी हे गोडे असते की खारे याबद्दल लेखात कळत नाही.
जगात समुद्र किनार्यावरील शहरांमधे गोडे पाणी हे समुद्रातूनच प्रक्रिया केलेले पाणी असते कि अन्य ठिकाणाहुन आणलेले असते. मुंबई बाबत गोडे पाणी कसे असावे?
प्रकाश घाटपांडे
खारेच असणार.
वाया जाणारे पाणी खारेच नसणार का?
मूळ पाण्यापेक्षा ते जास्त खारे असेल. समजा समुद्राचे पाणी आहे १ लीटर मध्ये सुमारे ३५ ग्रॅम मीठ. एकूण ५ लीटर पाणी वापरले. त्यातले १ ली बिन मिठाचे. म्हणजे आता ५ ली पाण्यातले १७५ ग्रॅम मीठ वाहणार्या ४ लीटर पाण्यात आहे. म्हणजे लीटरमागे ४३.७५ ग्रॅम मीट त्या वाया जाणार्या पाण्यात आहे.
मला काळजी समुद्राचे पाणी गोडे करताना वाया गेलेल्या पाण्याची नाही. देशांतर्गत भागात जेथे मचूळ पाणी येते तेथे आर ओ वापरून वाया जाणार्या पाण्याविषयी आहे.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)