१ मे २००७ महाराष्ट्र दिन. त्यानिमित्त......

! ४७ वा वर्धापनदिन !

!! सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याच्या या १०६ शिल्पकारांना अभिवादन.

! जय हिंद ! जय जय महाराष्ट्र !!

! जय संयुक्त महाराष्ट्र !

मराठी भाषक म्हणजे मग तो कोणत्याही जाती धर्माचा(मराठी -हिंदु,मुस्लिम,बौद्ध,जैन,ख्रिच्छन,इ.) असो,मराठी भाषक नसुनही अस्खलित मराठी बोलणारा असो .पुरोगामी महाराष्ट्र राज्याचा ज्याला अभिमान आहे असा. (ही माझ्या मताप्रमाणे मराठी भाषक माणसाची व्याख्या)

विदर्भ,कोकण,खान्देश,उ.,प.महाराष्ट्र,मराठवाडा हे महाराष्ट्रातील प्रदेश एकत्र नांदावे ही इच्छा .

बेळगाव,कारवार,निपाणी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे. (कधी होणार माहीत नाही पण झालाच पाहिजे)

परप्रांतियांची समस्या,विज टंचाई,शेतकऱ्यांच्या आत्महत्या, इ. महाराष्ट्राला संकटे भेडसावत आहे . मराठी माध्यमाच्या शाळा शहरी भागात बंद पडत आहेत (खास करून मुंबईत). ज्या मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा झाल्या त्या मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी कमी होत चाललीय. आपणच मराठी भाषेला फाशी देतोय असे वाटते का? खैरलांजी प्रकरणामुळे महाराष्ट्र अजुनही पुरोगामी आहे असे वाटते का. कोणता पक्ष ,संघटना महाराष्ट्र राज्याचा विकास करू शकतो. अजुनही मराठी पंतप्रधान का झाला नाही. महाराष्ट्राच्या राजकारणावर,समाजकारणावर कोणत्या समाजाची पकड आहे.

आपणास काय वाटते आजच्या महाराष्ट्र राज्याबाबत.

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र ...........

आपला

कॉ.विकि

लेखनविषय: दुवे:

Comments

मी माझ्या महाराष्ट्राचा

१०६ हुतात्म्यांनी प्राणांर्पण करून संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आणले. उत्तुंग परंपरा लाभलेला असा हा महाराष्ट्र.
माय मराठी वाचवा.
जय जय महाराष्ट्र .

शुभेच्छा

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसन्ध्येला आपणालाही अनेक शुभेच्छा

माझ्याकडूनही शुभेच्छा

-राजीव.

 
^ वर