रिकामटेकडा उद्योग

रिकामटेकदा उद्योग

मधे एकदा एका प्रतिसादात वाचले : ".... मला वाटायचे मराठी संकेतस्थळांवर रोजच्या रोज खरडणारे लोक रिकामटेकडे असतात .."
मौज वाटली. आपल्यासारखे इतरही रिकामटेकडे लोक आहेत तर. म्हटले, चला, कोण आहेत ते तर बघू. पण आपण इतर मराठी संकेतस्थळे वाचत नसल्याने निदान उपक्रमवरची समानधर्मी माणसे शोधावीत. आणि हो, प्रथम रिकामटेकडा याचा शब्दकोशातला अर्थ बघितला. उगाच कोणाचा पापड मोडावयास नको. 'आळशी, निरुद्योगी". चालेल. प्रत्येक नवर्‍याला (व बर्‍याच चाकरमान्यांनाही ) ही विशेषणे रोजच ऐकावी लागत असल्याने बहुदा फार unparlamentory नसावीत. आपल्या पंक्तीत बसवल्याबद्दल (निदान मनोमन) कोणी फार कुरकुर करणार नाही. तेव्हा नेहमीचा आळस सोडून जरा कामाला लागलो. वर्षभरात (नवीन सभासदांबाबतीत ते सभासद झाल्यापासून) कोणी किती लेख/चर्चा व किती प्रतिसाद लिहले त्याची यादी काढली. अर्थात नेहमी समोर येणारे काही सभासदच घेतले. काही छुपे रुस्तुम राहून गेले तर त्यांनी ते रिकामटेकडे असले तरी आळशीही आहेत हे लक्षात ठेऊन "अहो मी, अहो मी," असा आरडाओरडा करू नये. दुसर्‍याची नावे सुचवावयाला हरकत नाही. (नाही, म्हणजे हरकत घेणारा मी कोण म्हणा!)

क्र. नाव कालमर्यादा लेख/चर्चा प्रतिसाद

१. शरद १ वर्ष ६४ ६७
२. प्रकाश घाटपांडे १वर्ष २६ १५०
३. नानावटी १ वर्ष ४६ २५
४. प्रियाली १ वर्ष १५ १६५
५. वसुलि ६ महिने ९ ४०
६. राजेश ३ महिने ९ ४५ (चु,भु,दे,घे. आकडेमोड जमत नाही)

श्री. राजेश व वसुलि यांचे भवितव्य उज्ज्वल दिसते. इतर कोणतीही शेरेबाजी करावयास व कोणी केली तर त्याला उत्तर द्यावयास माझी तयरी नाही. फक्त लेख/चर्चा व प्रतिसाद देणार्‍याचे तीन वर्ग दिसतात, तेवढे नोंदवून थांबतो.
(१) रामदासपंथी ..... शहाणे करून सोडावे सकलजन.
(२) तुकारामपंथी .... बुडती हे जन, देखवे न डोळा.
(३) गप्पिष्ट ........... ऐकायला कोणी नाही ? टाका लिहून.

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

स्पष्टीकरण

आकड्यांचे स्पष्टीकरण द्यावे. शरद १ वर्ष ६४ लेख/चर्चा ६७च प्रतिसाद शक्य वाटत नाही.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

कसे मोजले ?

मी वापरलेली पद्धत
(१)येण्याची नोंद करा.
(२) नवे लेखन वर जाऊन तेथील शरद या नावावर क्लिक करा.
(३) तेथे वाटचालवर क्लिक करा.
(४) तेथे शरद याने उपक्रमवर लिहलेल्या सर्व लेखांची/चर्चांची व प्रतिसादांची यादी मिळेल.
(५) जेथे लेखक याखाली शरद असेल तो लेख/चर्चा शरद याने लिहला.
(६) जेथे लेखक याखाली दुसरे नाव असेल तेथे त्या लेखावर शरद याचा प्रतिसाद असेल.
(७) मागे जात जात एक वर्ष (किंवा कमी वेळ) , इथे १ एप्रिल २००९ या वेळेपर्यंतच्या लेख/प्रतिसादांची संख्या मोजा.
(८) श्री. राजेश वा श्री. वसुलि यांना सभासद होऊन १ वर्ष झाले नसल्याने ३/६ महिने असा योग्य तो कालावधी धरा.
(९) या पद्धतीने कोणाचेही लेख/प्रतिसाद किती हे मोजा.
(१०) एका कागदावर नाव, लेख/चर्चा, प्रतिसाद असे टेबल करा. त्यात संख्या भरा. थोडीफार चूक होईल हे आधीच कबूल करा.

श्री. घासकडवी यांनी व्य.नीवर माहिती विचारली आहे, श्री. नितिन यांनाही कुतूहल आहे म्हणून सविस्तर माहिती. (रिकामटेकड्याकडे अशा फालतूक गोष्टींकरता किती वेळ असतो हेही पहावयाचे असेल तर स्वत: एखाददुसर्‍या सभासदाविषयी अशीच माहिती गोळा करावी. माझ्या चूका काढावयास एक चांगली संधी, उदा. १४५ नाहीत, १४७ आहेत इत्यादी.
शरद

सपशेल चुकीची माहिती

मी गेल्या वर्षभरात १५ लेख/चर्चा टाकलेल्याच नाहीत. माहिती सपशेल चुकीची आहे. तसेही जेथे जेथे माझे नाव येते तेथे तेथे शरदकाका हटकून चुका करतातच असा अनुभव आहे. ;-)

बाकी चालू द्या. करमणूक आहे.

शरदकाका

शब्द हे हत्यार आहे, जपून वापरा.

मजकूर संपादित.

सन्जोप राव
हुई मुद्दत कि 'गालिब' मर गया, पर याद आता है
वो हर इक बात पर कहना, कि यूं होता तो क्या होता

चांगला उद्योग

चालू द्या.........!

-दिलीप बिरुटे

रिकामटेकडा उद्योग

केवल लेख दिले म्हनुण उज्ज्वल भवितव्य.मला मान्य् नाहि. त्याना उज्ज्वल भवितव्य आहे . आम्हाला पण आहे कारण लेख/चर्चा वाचतो, and I am रिकामटेकडा (प्रत्येक नवर्‍याला ....) too.मला मराठी लीहिताना जमत नाहि. हे सगले कापि पेस्त केले आहे. ism
वापरयता येते का? अर्धवट टाइप झालेला लेख save करायची सोय आहे का? केवल त्या कारण ने लीहित नाहि.

अर्धवट लेखनासाठी उपाय

>>अर्धवट टाइप झालेला लेख save करायची सोय आहे का?
नाही.

>>केवल त्या कारण ने लीहित नाहि.
अर्धवट राहिले तरी काही काळजी करायची नाही. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण टाकलेल्या अर्धवट प्रतिसादात [उपप्रतिसाद आला नसेल तर ] संपादन करुन भर घालायची. इथे अनेक सन्माननीय उपक्रमी [अपवाद असू शकतात] आपला प्रतिसाद कमीत कमी दोनदा आणि जास्ती जास्त सात-आठ वेळेला तरी दुरुस्त करीत असतात. तेव्हा 'कापि पेस्त' आवश्यक असेल तिथे जरुर करा.

दुसरी युक्ती अशी की, आपणच आपल्याला लेखन करुन निरोप पाठवायचा म्हणजे आपले लेखन आपोआप साठवले जाईल. लेखन करण्यासाठी अजून काही मदत लागली तर [नवीन धागा काढण्यापेक्षा ] निरोप,खरड, किंवा इथेही उपप्रतिसाद लिहून जरुर विचारा.

-दिलीप बिरुटे
[रिकामटेकडा उपक्रमी]

फायदा काय.

मला वाटते माझ्या प्रतिसादाचे शीर्षक म्हणजे निव्वळच उपयोगितावादाच्या वळचणीला जाणे झाले आहे. तरीही वर काही ठिकाणी म्हटल्याप्रमाणे करमणुक हा एक लाभ असला तरी सध्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरु असलेल्या मराठी संकेतस्थळ स्पर्धेत उपक्रम सहभागी आहे की नाही हे जाणून घ्यायला आवडेल (या निमित्ताने) मग उपक्रमचे रेटींग ( भाव) वाढवण्यासाठी अजून काही रिकामटेकडे उद्योगही करता येतील.
असो....
चालू द्या.

 
^ वर