बेन्नी लावा

ज्यांना बेन्नी लावा हा काय प्रकार आहे हे माहित नसेल त्यांना शिर्षकावरुन काहीही समजले नसेल. मलाही नुकताच हा प्रकार कळला. पण 'बेन्नी लावा' ह्या शब्दांनी यूट्यूबर अक्षरशः धुमाकुळ माजवला आहे, इतका की प्रभु देवा हा दक्षीणात्य नट यूट्यूबवर आणि जगभरात बेन्नी लावा म्हणूनच ओळखला जातो आहे. हे सगळे सुरू झाले एका पाश्चात्य सुपिक डोक्याच्या वल्लीने प्रभु देवाचे नृत्य पाहून तो नक्की काय शब्द म्हणत असेल ह्याचे अंदाज बांधायला सुरू केल्यावर. गाण्याचे भाषांतर कुणीही करू शकेल पण गाण्याचे मूळ भाषेतील शब्दांच्या उच्चाराशी मिळते जुळते शब्द शोधून संपूर्ण गाणे इंग्रजीत लिहून यू ट्यूबवर अपलोड केले. 'गाण्याचे हे इंग्रजी भाषांतर नसून मला हे गाणे असे ऐकू आले' अश्या मथळ्याखाली हा विडीयो आला आणि धमाल घडली.

हा विडीयो इतका प्रसिद्ध झाला की त्याचे क्रोएशियाच्या लोकांनी केलेले हे सादरीकरण पाहा.

'पंजाबी पीपल' नावाच्या कॅनडाच्या ग्रूपने सादर केलेले तेच गाणे इथे पाहा.

Comments

धमाल्!

हा हा हा! धमाल!

हाहाहाहाहा!!!

मला वाटायचे की मराठी संकेतस्थळांवर रोजच्या रोज खरडणारे लोक रिकामटेकडे असतात पण हे सर्व तर बाप लोक आहेत. भयंकर रिकामटेकडे दिसतात.

सहमत

भयंकर रिकामटेकडे दिसतात.

सहमत आहे! इंटरनेटने माणसाच्या रिकामटेकडेपणाला सीमा नाही हे सिद्ध केले आहे :-)

जबरी!!

सॉलीड धमाल!!

पहीले बेन्नी लावा (ट्रान्सलेशन) माहीत होते पण क्रोएशिया व्हर्जन माहीत नव्हते.

जबरी!!

+1

एकदम सहमत

चन्द्रशेखर

जबरी

खरचं जबरी प्रकार आहे

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

=))

आरारारा ... उडलो फुटभर !! काय पण ट्राण्स्लेशण आहे =))
जालावर रोज खरणारे रिकामटेकडे लै वातुळ असतात .. हे रिकामटेकडे तर एकदम तुफान !

- (रिकामटेकडा) टारझन

मस्त, आणखी...

बेन्नी लावा आवडले. विशेषतः क्रोएशियन आवृत्ती मस्त आहे.

एकंदरीत 'देसी म्युजि़क'ला परदेशी वाढती मागणी आहे असे दिसते.

मेरील डेविस आणि चार्ली व्हाइट यांचा बॉलिवूड गाण्यावरचा स्केटिंग-डान्सही यूट्यूब वर गाजत होता (सगळी ऐश्वर्या रायची गाणी का घेतली आहेत ते कळले नाही.)

तसेच विन्स्टन स्पिअर ने भारतीय टोपण नाव घेऊन केलेला फनी बॉलिवूड डान्सही यूट्यूबवर प्रसिद्ध आहे.

अजुन् काही.

भारतीय गाण्यांवर् नाचताहेत फिरंगी!

उत्तम! डोळे निवले पाहून!

भलतेच ओरिएंटेशन दिसते आहे!

:)

झकास...!

धमाल..

धमाल प्रकार आहे..
स्वाती

 
^ वर