रक्तदात्यांची माहिती

समस्त वाचकवर्गास,
विशेष विनंती,

आपल्यापैकी बर्‍याच जणांना असा अनुभव आला असेल की ज्यावेळी आपल्या घरातील एखादी व्यक्ती, नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी इ. पैकी कोणी कोणत्याही कारणास्तव हॉस्पिटल मध्ये दाखल झालेले असते.

त्यांपैकी काही जणांवर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते व त्यावेळी रक्ताची गरज भासते.

प्रत्येकवेळी त्याच्या रक्तगटाशी जुळणारे रक्त त्या हॉस्पिटलमध्ये किंवा ब्लड बँकेत उपलब्ध असेलच असे नाही.

अशावेळी आपल्या जवळच्या, आपल्या माहितीतल्या लोकांचा रक्तगट कोणता आहे व त्या व्यक्तींना रक्तदान करताना कोणत्याही वैद्यकीय अडचणी नाहीत ह्या विषयीची माहिती आपल्याला असल्यास ती वेळेला नक्कीच उपयोगी पडते.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पॉझिटीव्ह रक्तगटाच्या ( A+, B+, O+) व्यक्ती अनेक असतात पण निगेटीव्ह रक्तगटाच्या व्यक्ती फार कमी संख्येने आढळतात. त्यामुळे अशा व्यक्तिंची माहिती असणे विशेष महत्त्वाचे आहे.

अशा माहितीच्या उपलब्धतेबद्दल (विशेष करून निगेटीव्ह ब्लड ग्रुप) जर आपल्या समस्त वाचक वर्गापैकी कोणास काही माहिती असल्यास कृपया कळवावी.

आपला विश्वासू,
श्रीसागर

लेखनविषय: दुवे:

Comments

नक्की कसे?

अशा माहितीच्या उपलब्धतेबद्दल (विशेष करून निगेटीव्ह ब्लड ग्रुप) जर आपल्या समस्त वाचक वर्गापैकी कोणास काही माहिती असल्यास कृपया कळवावी.

नक्की कुठे आणि कसे कळवायचे?






ब्लडग्रुप बद्दल नाही पण...

याबद्दल नाही पण रोग व त्यावरील औषधे याबद्दल येथे पहा.

नितीन

रक्तगट आणि रक्तदाते

श्री. नितीन महाजन,

नमस्कार,

आपण दिलेली माहितीही निश्चितच अनेकांच्या उपयोगी पडेल.

माझा निगेटीव्ह ब्लड ग्रुप बद्दल माहिती विचारण्याचा उद्देश असा की इमर्जन्सी ला अशा ग्रुप्सचे ब्लड मिळणे खूप मुश्कील असते.

आपल्या किंवा आपल्या नातेवाईकांच्या आयुष्यात असा प्रसंग कधीतरी येतोच. त्यामुळे अशी माहिती असल्यास त्या-त्या ग्रुप च्या व्यक्तीशी लगेच संपर्क साधता येतो.

 
^ वर