उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
इनोवेशन साठी मराठी शब्द ??
गौरी दाभोळकर
December 30, 2009 - 3:25 am
इनोवेशन ह्या शब्दासाठी चपखल मराठी शब्द आहे का?
सोहोनीन्च्या शब्दकोशामध्ये खालील दोन अर्थ सापडतात :
१. नवीन गोष्टी सुरू करणे
२. नवा उपक्रम, नवीन चाल, नूतन पद्धत
माझ्या आयडियाझ :
१. नूतनपद्धतीकरण
२. नवोपक्रम
तुमच्या आयडियाझ ?
धन्यवाद,
गौरी
दुवे:
Comments
इनोवेशन
इनोवेशन साठी इनोवेशन हाच मराठी शब्द योग्य वाटतो.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
+१
सहमत आहे.
नितिन थत्ते
इनोव्हेशन
सृजनता हा शब्द कसा वाटतो?
चन्द्रशेखर
नव्हे
सृजनता म्हणजे क्रिएटिव्हीटी, नाही का?
नाविन्य!
नाविन्य हा शब्द कसा वाटतोय?
नवोन्मेषशालिनी
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
शोध ?
Innovation = शोध
अस होत नाही का ?
_____________________________________________________________________________________
सुतो वा सूतपुत्रोवा यो वा को वा भवाम्यहम् |
दैवायत्ते कुले जन्म मदायत्तं तु पौरूषम्॥
शोध
शोध म्हणजे 'डिस्कवरी' बहुदा.
नाविन्यनिर्मीती !
नाविन्यनिर्मीती !
(काहीतरी नवीन करण्याची क्रिया !!)
धन्यवाद
शोध,नाविन्य,सृजनता,नाविन्यनिर्मीती ह्या पर्यायांबद्दल धन्यवाद.
इनोवेशन ह्या संकल्पनेत ३ गोष्टींचा समावेश होतो :
१. कल्पना (आईडीआ)
२. अमलबजावणी (ईम्प्लीमेण्टेशन)
३. उपयोग (नफा किंवा सामाजीक सुधारणा )
उदा: फोर्ड मोटर, कोड्याक क्यामेरा, गांधीजींचा सत्याग्रह
गौरी
नवसंकल्पना
मागे सकाळ मध्ये इनोवेशन करिता "नवसंकल्पना" शब्द वाचल्याचे आठवते. परंतु सर्वच संदर्भात हा योग्य असेल असे नाही.
इनोवेशन म्हटल्यावर त्यात नाविन्य, शोध, सृजनशीलता इत्यादी अर्थ आपसुकच सूचित होतात. त्यामुळे मूळ इंग्लिश शब्द किंवा पर्यायी मराठी शब्द विवेकानुसार वापरावेत
जयेश
एका इंग्रजी..
एका इंग्रजी शब्दासाठी परिपूर्ण अर्थाचा एकच मराठी शब्द असला पाहिजे हा दुराग्रह सोडला तर अनेक शब्द मिळतील.
नवसंकल्पना, नवनिर्मिती, नावीन्य, नवा आविष्कार, नवा अवतार, नवा पायंडा, नवक्ॡप्ती, नवा प्रकाश, नवोन्मेष,
अभिनवता वगैरे शब्दांतला एखादा शब्द संदर्भानुसार वापरावा.-- वाचक्नवी
+१
सहमत.
संदर्भातील अर्थाचे सुयोग्य संदेशन मराठीत करायचे असल्यास त्या संदर्भात जो काय अर्थ आहे, तशा अर्थाचा मराठी शब्द मिळवणे शक्य आहे. वरील यादीतले शब्द चांगले आहेत.
दोन भाषांमध्ये तंतोतंत जुळणारी अर्थवलये असणारे शब्द सापडणार नाहीत. अगदी वस्तुवाचक शब्दांची भावनिक अर्थवलयेसुद्धा भाषा-भाषांत वेगळीच असतात.
"ग्रंथ" आणि "पुस्तक" यांची नेमकी अर्थवलये सांभाळणारे इंग्रजी शब्द कुठले? कुठलेच नाहीत. पण त्यामुळे
"अवेस्ता हा पारशी लोकांचा धार्मिक ग्रंथ आहे." (सहसा "धार्मिक पुस्तक" म्हणत नाहीत.)
"काय जाडजूड ग्रंथ/पुस्तक आहे!"
"पुस्तकाचे मलपृष्ठ चकचकीत आहे." (सहसा "ग्रंथाचे मलपृष्ठ" म्हणत नाहीत.)
म्हणजे मराठी शब्दांची अर्थवलये आणि संदर्भवलये थोडीतरी वेगळी आहेत.
म्हणून काही पुढील इंग्रजी भाषांतरे मुळीच चुकलेली नाहीत :
"अवेस्ता इज् द् होली स्क्रिप्चर् ऑव्ह् द् पारसी पीपल्."
"ह्वॉट् अ थिक् टोम्/बुक् इट् इज्!"
"द् बुक् हॅज् अ शायनी डस्ट् जॅकेट्."
कारण प्रत्येक संदर्भात सुयोग्य अर्थ संदेशित होतो आहे.
टोम्
धन्यवाद! या निमित्याने टोम हा विस्मरणात गेलेला शब्द परत वाचला गेला. --वाचक्नवी