ग्रंथालय शास्त्र

समस्त वाचकवर्गास,
सप्रेम नमस्कार,
ज्या व्यक्तींनी ग्रंथालय शास्त्रात पीएच.डी. घेतली आहे व ज्यांचे मुंबईत कायमस्वरूपी वास्तव्य आहे अशा व ग्रंथालय शास्त्राच्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट वर्कसाठी गाइड म्हणून वेळ देऊ शकतील अशा व्यक्तिंची माहिती हवी आहे.

सदर विनंती हा सार्वजनिक चर्चेचा विषय नसला तरी एका विशिष्ट शैक्षणिक क्षेत्रातील माहिती म्हणून आवश्यक आहे.

कृपया काही माहिती असल्यास कळवावी.

लेखनविषय: दुवे:

Comments

चौकशी करतो.

>>समस्त वाचकवर्गास, सप्रेम नमस्कार,
नमस्कार..!

>>ज्या व्यक्तींनी ग्रंथालय शास्त्रात पीएच.डी. घेतली आहे व ज्यांचे मुंबईत कायमस्वरूपी वास्तव्य आहे..
असा उपक्रमी आमच्या ऐकण्यात नाही, वाचण्यात नाही.

>>एका विशिष्ट शैक्षणिक क्षेत्रातील माहिती म्हणून आवश्यक आहे.
हं ! खरं आहे, शैक्षणिक क्षेत्रातील माहितींची देवाण-घेवाण होणे आवश्यक आहे.

>>कृपया काही माहिती असल्यास कळवावी.
ओळखीच्या उपक्रमींकडे चौकशी करतो.

अवांतर : ग्रंथालयशास्त्राच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा मार्गदर्शक मिळाला तरी, आता युजीसीच्या नवीन नियमानुसार संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी एक पूर्वपरिक्षा असेल,[नेट-सेट उत्तीर्ण असलेल्यांना पूर्वपरिक्षा नाही] त्यातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना, विद्यापीठ ठरवेल त्या मार्गदर्शकाकडे पाठवतील. [या शिवाय प्रोजेक्ट वर्क वेगळे असे काही म्हणायचे आहे का ? ]

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
[संशोधक मार्गदर्शक]

ग्रंथालय शास्त्र - प्रोजेक्ट वर्क

प्रा. डॉ. दिलीप बिरुटे,
सप्रेम नमस्कार,

कोणत्याही विषयावर संशोधन करणे म्हणजे खूप सखोल अभ्यास करणे होय व असा अभ्यास पीएच. डी. साठी केला जातो, ह्यात दुमत नसावे. पण त्याच्या खालच्या पातळीवर जे अभ्यासक्रम असतात त्यांतदेखील प्रोजेक्ट वर्क चा अंतर्भाव केलेला असतो.

उदाहरणार्थ - ग्रंथालय शास्त्राच्या बाबतीत बी.लिब. एस्सी. व एम.लिब.एस्सी. असे अभ्यासक्रम आहेत. त्यांमध्ये Evaluative Study, Comparative Study, Case study of different types of libraries अशा प्रकारचे प्रोजेक्टस दिले जातात जे library automation, library services, इ. विषयांशी संबंधित असतात. असे प्रोजेक्टस विद्यार्थ्यांनी ग्रंथालय शास्त्रातील तज्ञ व्यक्तीच्या (Ph.D. holder, Lecturer) मार्गदर्शनाखाली करणे अपेक्षित असते.
आपण स्वत: पीएच.डी. धारक आहात त्यामुळे आपणास माझे म्हणणे समजले असेलच.
असो.
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

Abhang Deshpande

समजले

>>ज्या व्यक्तींनी ग्रंथालय शास्त्रात पीएच.डी. घेतली आहे व ज्यांचे मुंबईत कायमस्वरूपी वास्तव्य आहे
अशा व्यक्तीचा आपण शोध घेत होता, त्यामुळे संशोधन मार्गदर्शकाविषयी प्रतिसाद लिहिला. आपण उल्लेखलेल्या प्रोजेक्टसाठी अधिव्याख्याताही चालू शकतो. तो संशोधक मार्गदर्शकच असला पाहिजे असे नसावे, अर्थात आपले म्हणने समजले.

-दिलीप बिरुटे

 
^ वर