पुणे पॅटर्न

मित्र हो,
हल्ली, राष्ट्रीय पातळीच्या राजकारणात पुणे पॅटर्न राबवायची अनेक राजकिय नेत्यांची वक्तवे वाचायला मिळाली. अलिकडची राजकिय समीकरणे पाहून अनेकदा अनेक प्रश्न पडतात. तुम्हाला काय वाटत? पुणे पॅटर्न राष्ट्रीय पातळीच्या राजकारणात राबवावा काय? आपली मते काय आहेत?

लेखनविषय: दुवे:

Comments

पुणे पॅटर्न ?

पुणे पॅटर्न काय आहे याबद्दल सविस्तर माहिती द्यावी.

(अनभिज्ञ) तो.

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

शहर विकास

शहर विकासाच्या मुद्यावर पुणेकरांनी कलामाडी, काँग्रेसला नाकारले. पण बहुमत कोणालाच दिले नाही. सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला होते तर, निवडणुकी पुर्वीची युती असल्याने शिवसेना-भाजपा यांची एकुण संख्या जास्त होती. पण कोणालाच बहुमत नव्हते कि बहुमताजवळ जाणे सहजा सहजी शक्य नव्हते. मग अपक्ष आणि मनसे यांच्या जोरावर काँग्रेसने सत्ता मिळवायचा प्रयत्न केला पण मुळातच कौल काँग्रेस विरोधात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना-भाजपा यांनी एकत्र येउन सत्ता संपादित केली अन शहर विकासाचे नाव पुढे करून काँग्रेसला सत्ते पासून् दूर ठेवले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना-भाजपा यांचे परस्परातील एकुण सामंजस्य पाहून हा प्रकार बरा वाटतो आहे आणि कदाचित खरोखच चांगला शहर विकास होईल असे वाटते. कोणा एकामुळे सत्ता चालणार नसल्याने हा प्रकार यशस्वी होईल असे वाटते.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना-भाजपा एकत्र येणे याला पुणे पॅटर्न असे म्हणले जात आहे.

चालेल

काँग्रेसइतका ढोंगी पक्ष दुसरा नाही. धर्मनिरपेक्ष पक्ष आरक्षणाला पाठिंबा देतोच कसा? हाजयात्रेला सवलती देतोच कसा? भ्रष्टाचारात नं. १. शिवाय काँग्रेसची शिवसेना-भाजपशीही बर्‍याच ठिकाणी युती आहे. त्यामुळे काँग्रेसने स्वतःला इतरांपेक्षा वेगळे म्हटले तरी एकूण सगळे एकाच माळेचे मणी. मग अ, ब, क, ड नावाचे चार समान विचारसरणीचे पक्ष कसेही एकमेकांशी जुळले तुटले तर् काय फरक पडतो?

एक मत

कोन्ग्रेस् पक्ष हा पुर्विपासुन मराठयान्चे खच्चिकरण करणारा पक्ष होता. सदैव या पक्षाने मराठि आपाआपसात कसे भान्ड्त राहतिल हेच पाहिले.
महाराष्ट्राच्या हितासाठि नेहमिच प्रादेशिक पक्ष्यान्च्या एकिकरणाचि गरज होति. (इथे राष्ट्रवादिला प्रदेशिक म्हणाल्याबद्द्ल क्षमस्व)
जर प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर निश्चितच दिल्लिवर दबाव येइल.

 
^ वर