सेवा भारती मेघालय - एक अपील
सेवा भारती ही संस्था मेघालयातील दुर्गम भागात मोबाईल डिस्पेन्सरी चालविते. या प्रकल्पा अंतर्गत तेथील खेड्यात एक मोबाईल व्हॅन, एक डोक्टर, एक कंपाऊंडर आणी एक ड्रायव्हर असा ताफा असतो. एकदा शिलांगहुन निघाले की हे एक महिना दुर्गम खेड्यात फिरत असतात. साधारण पणे महिन्यातुन १० ते १५ कँप करुन हे परत येतात. १ दिवस विश्रांती घेउन व औषधाचा स्टॉक घेउन लगेच दुसर्या भागातील कँप्स साठी रवाना होतात. हे कार्य अविरत गेल्या ९ वर्षापासुन अविरत चालत आहे. मेघालयाचा पुर्व-पश्चिम विस्तार बघता हे अंतर १२ तासाचे आहे. पश्चिम भाग म्हणजे गारो हिल्स व पुर्व भाग म्हणजे खासी हिल्स व जयंतिया हिल्स. त्यामुळे गारो हिल्स साठी तुरा हे मुख्यालय ठेवले आहे. व एक व्हॅन तिथे असते. हा सर्व पसारा भारतभरातुन येण्यार्या देणग्यातुन व सरकारी तुटपुंजे अनुदानातुन भागविला जातो. ही सेवा मेघालयाच्या सर्व खेड्यात पोचविण्याचा प्रयत्न असतो परंतु संसाधनाच्या व मनुष्य बळाच्या कमतरतेमुळे हे शक्य होत नाही. त्यात पुन्हा गेल्या दोन वर्षापासुन सरकारी अनुदान मिळाले नाही. नुकताच या संदर्भात केन्द्रात चौकशी केल्यानंतर असे कळले कि संबधीत सचीवांनी या मोबाईल डिस्पेन्सरीची गरज नाही या कारणाने अनुदान बंद केले आहे. देशाच्या ईशान्य कोपर्यात कशाची गरज आहे हे दिल्लीच्या केबीन मध्ये बसलेल्या व्यक्तिला कसे काय उमजते हा एक् वेगळा विषय आहे. तिथे खेटा घालणे हा देखील समाजसेवेचा एक अभिन्न भाग झाला आहे.
तरि देखील हि सेवा अविरत चालु आहे. या माध्यमाद्वारे मी येथील सेवाभावी व सक्षम मित्रांना असे आवाहन करतो कि त्यांची ईच्छा जर या प्रकल्पाला आपला हातभार लावण्याची झाल्यास त्यांनी श्रीमती पुर्णीमा मेहता, यांचेशी prm@mte-india.com अथवा मोबा.९४२२०८८६८४ यावर संपर्क साधुन अधिक माहिती घ्यावी. सेवा भारती मेघालय या संस्थेला दिली जाणारी देणगी हि आय करापासुन मुक्त आहे.
संस्थेचे मेघालयातील प्रमुख श्री प्रशांत महामुनी यांना देखील थेट संपर्क साधता येतो त्यांचा email, ID- maprashan@yahoo.com व फोन नं ०९४३६११९१५७ हा असुन आवश्यक ती माहिती आपण त्यांना संपर्क साधुन घेउ शकता.
या सदरात हे आवाहन योग्य कि अयोग्य याची कल्पना नसतांना ही या कार्याची सद्य स्थीती आपणास कळावी या प्रामाणिक हेतुने हे धाडस् केले आहे.