मूळ गाणे ओळखा

हिंदी गाणी ढापणारे अनेक संगीतकार आपल्याला माहित आहेत पण अशी अनेक गाणी असतात की जी इतर भाषांतील गाण्यांवरून ढापली आहेत हे माहित नसते. अशी मूळ गाणी, ढापलेल्या चाली आणि संगितकार तुम्हाला माहित आहेत काय?

मला काही दिवसांपूर्वीच या गाण्यावरून सुप्रसिद्ध हिंदी गाणे बनवले आहे असे कळले. ओळखा बघू? चित्रपट आणि संगीतकार सांगा आणि ओळखणार्‍याने पुढचे गाणे द्यायचे.

सुप्रसिद्ध आणि सर्वांना माहित असलेली गाणी टाळली तरी चालतील.

Comments

चुरा लिया है?

उत्तर चुकले असल्यास आर. डीं. च्या पंख्यांनी माफ करावे ही विनंती.
पण, उत्तर बरोबर असेल तर गाण्याचा मुखडा लिहिणार्‍या गीतकाराच्या विनोदबुद्धीला दाद द्यावीशी वाटते :) !

हाहा

बहोत अच्छे ! चुरा लिया है तुमने जो धुन् को ! :-)
काय अमितराव , तुम्ही काय केवळ कोडी (मग ती यनावालांची असोत किंवा ही गाण्याची ) सोडवायपुरतेच दर्शन देणार का ! :-) ह. घ्या.

चुरा लियाच आहे

चुरा लियाच आहे, शंकाच नाही पण तुम्ही मूळ गाणे दिलेले आहे असे वाटते आणि आम्हाला चोरलेले गाणे ओळखायचे आहे.

बाकी, गाण्याचा मुखडा फिट्ट बसतो या कुलकर्णींच्या मताशी सहमत. :-))))

हे गाणे देखील चोरलेले आहे हे माहित नव्हते.

वरचे गाणे माझे सर्वात आवडते आहे आणि त्याचे चोरलेले गाणेही बरे आहे.

माझा ब्लॉग.

अशाच काही ढापलेल्या गाण्यांवर मी काही दिवसांपूर्वी माझ्या ब्लॉगवर लेख लिहीला होता. त्याची लिंक देतीय.

[ अशा कॉप्यांचा उत्तम डेटाबेस इथे मिळेल.. http://www.itwofs.com/ ]

छान

खूपच गाणी मिळाली तुमच्या ब्लॉगवर. तुमचा ब्लॉगही छान आहे. धन्यवाद.

एल्विसचे ढापलेले गाणे

हे गाणेही सुपरिचित आहे.

आता दुसर्‍या कोणालातरी पकडूया

प्रियालीताईंनी दिलेली गाणी "तेरे लिये, जमाना तेरे लिये" आणि "तेरा मुझसे है" ही आर. डीं. ची आहेत.

आता http://www.parrikar.org/music/todi/rajurkar.ram हे पहा.
मंडळी, नुसती चालच नाही तर शब्दही लक्षपूर्वक ऐका. या गाण्याने गीतकार आणि संगीतकार अशी उभयतांना प्रेरणा दिलेली दिसते. (हे संशोधन राजन पर्रीकरांचे आहे.)

http://www.esnips.com/doc/bdfeb791-1939-4399-aac4-f974b84146d6/Roshan-Ja...

http://www.esnips.com/doc/4b204446-6117-425c-81d1-6ed84eb56478/Ab-Ke-Hum...

ही उदाहरणे सुपरिचित आहेतच.
आणखी गाणी येऊ द्या!प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
अमित

मला तर एकही ओळखता आलं नाही.

अमित, तुम्हीच सांगा ही गाणी कुठे आणि कोणी ढापली आहेत ती.

प्रेरणा

१. झूठे नैना बोले (की जूठे? असा एक cliche आहे) हे लेकिन मधले गाणे.
३. मालवून टाक दीप - मुखडा आणि अंतर्‍याच्या सगळ्या ओळींची चाल सारखी आहे.
२. चंद्रलेखा प्रकाशित एका नवीन नाटकातले एक गाणे जसेच्या तसे "रौशन जमाले यार" वरून घेतले आहे.

असो,
अमित

रागसंगीतावर आधारित गाणी

रागसंगीतावर आधारित गाणी हा स्वतंत्र विषय व्हायला हरकत नाही. बंदिशी, ठुमर्‍या, लोकगीते, धुन् या सार्‍या आपल्या सांस्कृतिक ठेव्याचा भाग आहेत. त्यावर कुणाचा कॉपीराईट् नाही. या प्रकारातले माझ्या मताने सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे रेहेमान ने "दिल्ली-६" चित्रपटात केलेले बडे गुलाम अली आणि श्रेया घोषालचे गाणे. "ब्रेथ्-टेकींग्" प्रकार आहे !

याउलट आधुनिक काळातल्या , रेकॉर्डींग आर्टीस्ट्स् च्या चाली (प्रसंगी त्यातल्या मधल्या तुकड्यासकट) घेणे ही चोरी झाली. भारतीय उपखंडातले कायदे याबाबतीत अस्तित्त्वात नसल्यात जमा आहेत आणि कुणी खटला वगैरे भरलाच तरी एकूण न्यायप्रक्रियेच्या स्वरूपामुळे त्यातून काहीही निष्पन्न होत नाही असे एकंदर चित्र असल्याने सर्वांची चलती आहे.

अवांतर : "जूठे नैना" हेच बरोबर. "दुसर्‍या सौंदर्यवतीकडे उष्टावलेले डोळे" असा अर्थ.

अन्नू मलिक

याचे वरिजिनल्?

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

अन्नु की हो गयी वाह भई वाह!

लास्ट क्रिसमस आणि कोणते असणार?

चाली चोरण्यात अन्नु पुढे की आरडी पुढे अशी शर्यत लावता यावी.

अकेले हम अकेले तुम : विरोधाभासांचा चमत्कार

बरोबर. या चित्रपटात विरोधाभास खच्चून भरले आहेत.
हे गाणे चित्रपटात (म्हणे) आमिर खानने घाम गाळून बनवलेले असते आणि पैसे हवेत म्हणून तो अमर-कौशिक या संगीतकारांना विकतो. मुळात अन्नू मलिकने हे गाणे ढापताना व्हॅमला एक कपर्दिकही दिलेली नाही पण ठीक आहे, हिंदी चित्रपट आणि वास्तवता यांचा संबंध काय? आता तुम्ही म्हणाल की मन्सूर खान सारख्या बर्‍यापैकी समंजस दिग्दर्शकाने हे कसे चालवून घेतले? तर तोही हमामात आंघोळ करतो आहे. हा चित्रपट क्रेमर व्हर्सेस क्रेमरवरून जसाच्या तसा ढापलेला आहे. डस्टीन हॉफमनच्या जागी आमिर आणि मेरिल स्ट्रीपच्या जागी मनीषा! इथे शब्द खुंटतात.

आता यातले दुसरे गाणे "राजा को रानी से प्यार हो गया" कशावरून ढापले आहे सांगा पाहू?
नाही जमले तर धनंजय यांनी गाइडचा दुवा दिलेलाच आहे. (हिंट : मूळ चित्रपट आणि गाणे लई, लई, लईच परसिद्ध आहे.)
---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

गॉडफादर थीम

डस्टीन हॉफमनच्या जागी आमिर आणि मेरिल स्ट्रीपच्या जागी मनीषा! इथे शब्द खुंटतात.

डस्टीनच्या जागी आमिर ठीक पुढे शब्द नक्कीच खुंटतात. :-)

अन्नू मलिकने हे गाणे ढापताना व्हॅमला एक कपर्दिकही दिलेली नाही पण ठीक आहे, हिंदी चित्रपट आणि वास्तवता यांचा संबंध काय?

अन्नू मलिकने गाणे ढापले नसावे फक्त प्रेरणा घेतली असावी. ;-) असे त्याचेच म्हणणे.

असेच दुसरे प्रेरित झालेले संगितकार भप्पीदा आणि राजेश रोशन.

स्वारी

डस्टीनच्या जागी आमिर ठीक
स्वारी.. असहमत. :)
डस्टीनपुढे आमिर म्हणजे लिनक्सपुढे व्हिस्टा. आमिर सर्व खानांच्या तुलनेत लंगडी गाय आहे. पण डस्टीन किंवा अल पचिनो बघितल्यावर हे सर्व गल्लीतले ब्रॅडमन वाटायला लागतात* ;)
(खरे तर इथे तुलना चुकते आहे बहुतेक. आमिरची तुलना टॉम क्रूझशी करायला हवी. दोघेही सुपरस्टार/अभिनेते आहेत. पण आमिरने डस्टीनचीच भूमिका केल्याने तुलना अपरिहार्य ठरते.)

*नसीर, ओम पुरी यासारखे अपवाद वगळून.
---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

अल पचिनो?

श्री आरागॉर्न, येथे वैयक्तिक आवडीनिवडी आणि त्यावरून अभिनेत्यांची तुलना होत आहे म्हणून माझेही मत.

अल पचिनो बघितल्यावर हे सर्व गल्लीतले ब्रॅडमन वाटायला लागतात

अल पचिनो या अभिनेत्याच्या अभिनयाविषयी असहमत. अल पचिनो हे कधी झोपलेच नाहीत असा भास त्यांना पाहतांना नेहमी होतो. (यामुळेच त्यांचा 'इन्सोम्निया' या चित्रपटातील अभिनय आवडला होता की काय असे वाटते. )

अरेरे!

मग तुम्ही अल् पचीनोचा अभिनय बघू शकला नाहीत त्याबद्दल वाईट वाटते!
डेविल्स् ऍडवोकेट जरूर बघा. तुमचे मत बदलेल हे नक्की! :)

चतुरंग

अल पचिनो

डेविल्स् ऍडवोकेट जरूर बघा. तुमचे मत बदलेल हे नक्की! :)

श्री चतुरंग, सुचवणूकीबद्दल धन्यवाद. बघितला आहे. मत बदललेले नाही. अल पचिनोचा अभिनय सर्वच चित्रपटात आवडला नाही असे नाही. काही भुमिका (गॉडफादर, स्कारफेस) आवडलेल्या आहेत.

मग तुम्ही अल् पचीनोचा अभिनय बघू शकला नाहीत त्याबद्दल वाईट वाटते!

असो.

सहमत

याशिवाय सेंट ऑफ अ वुमनही जरूर बघावा.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

मला वाटते.

डस्टीनपुढे आमिर म्हणजे लिनक्सपुढे व्हिस्टा.
शेवटी पसंद अपनी अपनी खयाल अपना अपना हेच खरे. एकेकाळचा "स्कारफेस" पचिनो नंतर नंतर "सिमॉन " आणि इतर तद्दन फालतू रोल्स् करतो. "फिलाडेल्फिया" सारख्या अविस्मरणीय भूमिका करणारा टॉम हँन्क्स् डॅन ब्राऊनच्या पोपट सिनेमात येऊन जातो. याउलट, पूर्ण करीयरभर अत्यंत उथळ प्रतिमा जोपासणारा शाहरुख खान "चक दे इंडिया" मधे दिलासा देऊन जातो. एकंदर काय, त्रिकालाबाधित अशी गुणवत्ता सार्‍याच अभिनेत्याना ठेवता येतेच असे नाही. त्यांचे चित्रपटाबद्दलचे अंदाज चुकतात, भूमिकेचा अदमास चुकतो. खुद्द हॉफमनची सुद्धा प्रत्येक भूमिका थोडीच "रेन मॅन" इतकी मोठी असते ?

आवड

सहमत आहे, कुणाला काय आवडावे याचे नियम नाहीत.
सर्व चित्रपट उत्कॄष्टच असावेत असा निकष लावल्यास आवडण्यासाठी अभिनेतेच सापडणार नाहीत. असो. धाग्यातील विषयांतराबद्दल क्षमस्व.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

सहमत

श्री मुक्तसुनीत, प्रत्येकाच्या आवडीविषयी सहमत.

पूर्ण करीयरभर अत्यंत उथळ प्रतिमा जोपासणारा शाहरुख खान "चक दे इंडिया" मधे दिलासा देऊन जातो

शाहरुख खान मणि कौल यांच्या 'इडियट'मध्येही होता याची नोंद घ्यावी.

प्रतिसाद

तसा तर शाहरुख खान हा "इन् व्हिच् ऍनी गिव्ह्स् इट् टू दोज वन्स् " या १९८९ च्या , अरुंधती रॉय लिखित टेलेफिल्म् मधेही होताच की. परंतु रॉय किंवा खान या गोष्टीकरता ओळखले जात नाहीत.

प्रतिमा जोपासणारा

या शब्दप्रयोगामुळे संदर्भ द्यावा लागला. 'इन् व्हिच् ऍनी गिव्ह्स् इट् टू दोज वन्स्' या चित्रपटात शाहरुख खान मूख्य भुमिकेत नव्हता पन 'इडियट' मध्ये तो प्रमुख भुमिकेत आहे. तरीही श्री मुक्तसुनीत यांच्या मताशी सहमत आहे. त्याने एक-दोन चित्रपटात केलेल्या भुमिकांवरून प्रतिमा जपण्याचा प्रयत्न केला नाही, हे माझे मत योग्य वाटत नाही . व्यावसायिक चित्रपटात एकच एक 'राहूल' अशी प्रतिमा जपणे याचा त्याने उल्लेखही केलेला आहे. (श्री मुक्तसुनीत यांनी खरडीतून हे स्पष्ट केल्याबद्दल त्यांचे आभार)

सागर किनारे

सागर किनारेच्या चालीवर दोन जुनी गाणी आहेत. :)

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

एक माहिती आए

एक म्हणजे "रहे ना रहे हम". दुसरे कुठले ?

रहे ना रहे हम चे ओरिजिनल

:-)

हम जिस स्कूल में पढते हैं वहां के कुछ हेडमास्टर्स् यां हैं. :-)

दोन लेख

पूर्वी मनोगतावर लिहिले होते. इथेही लोकांना रोचक वाटतील.

ऋषीचे कूळ आणि गाण्याचे मूळ

ऋषीचे कूळ आणि गाण्याचे मूळ भाग २

छान

भाग छान आहेत. बरीचशी गाणी जुनी असल्याने मला माहित नव्हती. नवीन गाणीच माहित आहेत.

वा!

रोचक माहिती. हे ठाउक नव्हते.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

ठंडी हवाएं

दुसरे हेच ना?

आपलाच माल आहे. आय मीन, आर.डी.च्या वडलांचा. ;-) आर. डी. ने मागे एकदा मुलाखतीत सांगितल्याचे आठवते.

बरोबर

मला हेच माहित होते. :)
वर दिलेले तेरा दिल कहां है ठाउक नव्हते.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

नरम गरम मधले हे गाणे

हमें रास्तोंकी जरुरत नहीं है, हमें तेरे पाओंके निशान मिल गये है ...

हे तर नव्हे?

~ संदीप.

चालचोरांची घराणी

दिवाळी लोकप्रभामध्ये आलेला शिरीष कणेकरांचा चालचोरांची घराणी हा लेख ह्यासंदर्भात रोचक ठरावा.
दुवा - http://www.loksatta.com/lokprabha/diwali2009/lp06.htm

भल्याभल्या संगीतकारांनी चोरलेल्या चाली आणि त्यांची मूळ गाणी यांची यादी देणारी आणि ती दोन्ही गाणी तिथल्यातिथे ऐकवण्याची सोय एका संकेतस्थळावर सापडल्याचा उल्लेख लेखात आहे, मात्र ते संकेतस्थळ कोणते ते लिहिलेले नाही.

वर भाग्यश्री यांनी दिलेला दुवा

वर भाग्यश्री यांनी दिलेलाच दुवा असावा :

[ अशा कॉप्यांचा उत्तम डेटाबेस इथे मिळेल.. http://www.itwofs.com/ ]

या दुव्यावरचा अनुदिनीकार मात्र "ढापणे" आणि "पारंपरिक किंवा दुसर्‍या संगीतकाराची चाल नव्या पद्धतीने आपली करणे" यांच्यात फरक करतो. (मुक्तसुनीतही वर हा फरक करण्याबद्दल बोलतात.)

एकाच चित्रपटात

आमच्या एका गायक मित्राने सांगितलेले.
गाईड चित्रपटात "मोसे छल किये जाय" आणि "क्या से क्या हो गया" ही दोन्ही गाणी पाठोपाठ आहेत ती एकाच सुरावटीवर बांधलेली आहेत.

नितिन थत्ते

 
^ वर