उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
हिग्ज बोसॉन की परमेश्वर?
आरागॉर्न
October 14, 2009 - 12:06 pm
सर्न येथील लार्ज हेड्रॉन कोलॉइडर (एलएचसी) उन्हाळ्यात सुरू होणार होता. त्यात बिघाड झाल्याने तो आता नाताळच्या सुट्टीनंतर सुरू होईल. हा बिघाड का झाला असे तुम्हाला वाटते? याची काही कारणे पहा :
- हिग्ज बोसॉन म्हणजे जणू परमेश्वर आहे. त्याला आपले अस्तित्व उघड करायचे नव्हते म्हणून यात इतक्या अडचणी येत आहेत.
- जी सर्व यंत्रे हिग्ज बोसॉन तयार करण्याचा प्रयत्न करतील त्या सर्वांना अपयश येईल.
ही कारणे कुण्या ज्योतिष्याने दिल्यासारखी वाटली तरी तसे नाही. होल्गर निल्सन आणि निनोमिया नावाच्या दोन प्रसिद्ध शास्त्रज्ञांचे हे संशोधन आहे. त्यांच्या मते हिग्ज बोसॉन हा जवळजवळ परमेश्वरच आहे. त्याला तयार करण्याचा प्रयत्न केल्यास तो टाइम ट्रॅव्हलचा उपयोग करून असे सर्व प्रयत्न हाणून पाडेल.
सध्या विज्ञानाच्या व्याख्येबद्दल जी चर्चा चालू आहे त्या संदर्भात ही बातमी रोचक ठरावी.
बाय द वे, टाइम ट्रॅव्हलवर बरेच संशोधन चालू आहे. पदार्थविज्ञानाला टाइमट्रॅव्हल मान्य आहे आणि त्यावर बरेच संशोधनही चालू आहे.
दुवे:
Comments
दुरूस्ती
लेख चुकून भाषा विभागात गेला आहे. क्षमस्व.
--
हाहा गमतीदार
मी त्यांचा शोधनिबंध वाचला :
(पीडीएफ प्रत)
यात संख्याशास्त्र आणि कार्यकारणभाव यांच्यातला तात्त्विक संबंध गोंधळलेला आहे. अर्थात या दोघांनी विनोद म्हणून हा निबंध लिहिलेला असावा.
त्या विषयातल्या समाजाशी खूप ओळख नसल्यामुळे त्या लोकांचे "एप्रिल-फूल" विनोदी निबंध कसे ओळखावे ते माहीत नाही.
"अमुकतमुक प्रयोग म्हणजे जवळजवळ देवच सापडला" हे वाक्य मात्र काही सापडल्याच्या आनंदासाठी (किंवा काहीतरी सापडणे कठिण आहे, या अनुतापासाठी) काव्यात्म रीतीने अनेकांनी वापरलेले आहे. (कदाचित विनाश पावलेल्या, अत्यांत मोठ्या "हस्तिदंती चोचीच्या सुतारपक्ष्या"ला एक-दोन पक्षी-वैज्ञानिक "लॉर्ड गॉड बर्ड" म्हणतात, ते आठवले.)
हम्म..
या दोघांचा याबद्दल हा दुसरा निबंध आहे. पहिला २००७ मध्ये आला होता. अर्थातच यावर काही शास्त्रज्ञांनी बरेच तोंडसुख घेतल्याचे दिसून येते.
मात्र निल्सनने आपल्या बायोडेटामध्ये या निबंधाची नोंद केली आहे.
---
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
विनोदी?
गृहितकाशी निष्कर्ष सुसंगत आहेत ना? मग हे विज्ञानाला धरुनच आहे. त्यांना तुम्ही विनोदी/हास्यास्पद (एप्रिल फूल) कसे काय म्हणू शकता? अशा आशयाचा प्रतिसाद तुम्हाला इथे आल्यास मला आश्चर्य वाटणार नाही.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
सुसंगत नाही
खाली स्पष्टीकरण दिलेले आहे. हिग्स बोसॉन ऐवजी तुम्हाला-मला जमू शकणारा फ्यूचर कॉझॅलिटीचा प्रयोग सुचवला आहे. यातून तार्किक चूक बहुधा लक्षात येईल.
तर्काशी निष्कर्ष सुसंगत नाही असे वरील प्रतिसादात वेगळ्या प्रकारे म्हटले आहे :
"यात संख्याशास्त्र आणि कार्यकारणभाव यांच्यातला तात्त्विक संबंध गोंधळलेला आहे."
अशा प्रकारे विसंगती नेमकी कुठल्या प्रकारची आहे, ते सांगितले आहे. अधिक चर्चा वेळ मिळाल्यास आपल्याला करता येईल. पण आशा आहे, की खालील उदाहरणाने (रोजव्यवहारात प्रयोग जमू शकत असल्यामुळे) विसंगती सहज लक्षात येईल.
विसंगती दिसली तर रोजव्यवहारात आपण "हा विनोद आहे का?" ही शक्यता पडताळून बघतो. म्हणून तो उल्लेख केला आहे.
प्रकाटाआ
प्रतिसाद काढून टाकला आहे.
बहुधा
बहुधा विनोद नसावा. या दोघांचा याच विषयाशी समंधित बॅकवर्ड कॉझेशनवरचा निबंध इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॉडर्न फिजिक्स ए या मासिकात मागच्या वर्षी प्रसिद्ध झाल्याचे दिसते.
---
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
रोचक वाक्य
"Since LHC will produce particles of a mathematically new type of fundamental scalars, i.e. the Higgs particles, there is potentially a chance to find unseen effects, such as on influence going from future to past, which we suggest in the present paper."
हे सारांशातील वाक्य रोचक आहे.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
सहमत
श्री धनंजय, पीडीएफ उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. निबंधातील तर्क समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण सकृद्दर्शनी श्री धनंजय यांचे मत समर्पक वाटत आहे. श्री आरागॉर्न यांनी दिलेल्या दुसर्या निबंधाच्या दुव्यावरून 'या प्रयोगातून काय घडू शकेल?' किंवा 'या प्रयोगाची शक्य उपयुक्तता' अशा दाव्यांना तशाच प्रकारचा तर्क वापरून उडवून लावण्याचा प्रयत्न असावा. अर्थात या प्रयोगाविषयी फारशी माहिती नसल्याने आणि आकलन नसल्याने माझे मत पूर्ण चुकीचे असण्याची शक्यता आहे.
तुम्हाला स्वतःला काय वाटते?
आता हा प्रयोग करून बघूया :
माझे असे म्हणणे आहे की आज मला कार्यालयातून घरी जाणे हे भविष्यकाळाला/देवाला मान्य नाही आहे.
म्हणून मी असा निर्णय करतो की जर "पाय"चे आकडे १०००-१०१० असे असतील १२३४५६७८९०, (याची शक्यता खूप कमी आहे, आणि हे खरे आहे की नाही हे तुम्हालाही तपासता येईल) तर मी आज घरी जाणार नाही, ऑफिसातच झोप काढेन.
यातून वरील "फ्यूचर कॉझॅलिटीला" (भविष्य हे वर्तमानकाळातील कार्याचे कारण हे प्रमेय) काही समर्थन-विरोध मिळेल का? तुम्ही सांगितल्यास मी हा प्रयोग करण्यास तयार आहे.
नाहीतर माझ्या प्रमेयात आणि नील्सन यांच्या प्रमेयात काय तात्त्विक फरक आहे? प्रमेयाच्या चाचणीत काय तात्त्विक फरक आहे?
१०००-१०१० हे आकडे मी ठरवले म्हणून नको असल्यास, किंवा "पाय" ऐवजी "ई" किंवा अशी कुठली वेगळी आकड्यांची यादी हवी असल्यास, कोण्या तिर्हाइताला आपण "कुठले आकडे निवडूया?" असे विचारू.
गृहीतके
तुमचा प्रयोग आणि एलएचसीचा प्रयोग दोन्ही सारख्याच गृहितकांवर आधारलेले आहेत किंवा नाही याबद्दल साशंक आहे. जर असे असेल तर जगातील कुठल्याही गोष्टीचा कार्यकारणभाव रँडम नंबरच्या सहय्याने पडताळून पाहता यावा. मग त्यात हिग्ज बोसॉनचे वेगळेपण रहाणार नाही. निबंधाच्या पहिल्या परिच्छेदामध्ये लेखक बॅकवर्ड कॉझेशन मॉडेलचा उल्लेख करतात. (यासाठी ते चार संदर्भ देतात.) या मॉडेलमधली गृहीतके कदाचित यावर अधिक प्रकाश पाडू शकतील. माझ्या मते ह्या प्रयोगाचा आणि एलेचसीचा बराच जवळचा संबंध असावा. बॅकवर्ड कॉझॅलिटीचा क्वान्टम एन्टँगलमेंटशीही संबंध असावा. यावर दुसरीकडे प्रयोग चालू आहेत.
अवांतर : आपली आधीची चर्चा : "व्यासपीठ आणि दिल्या जाणार्या माहितीची अचूकता" यांतील संबंध इथे स्पष्ट व्हावा. एका अर्थी तुम्ही मला या निबंधावर पंच म्हणून माझे मत देण्यास सांगितले आहे. मी फिजिकल रिव्ह्यू लेटर्स या मासिकासाठीही पंच म्हणून काम बघतो. त्यांनी माझ्याकडे हा निबंध पाठवला असता तर मी नम्रपणे नकार कळवला असता, कारण हा माझा विषय नाही. याउलट उपक्रमावर मी माझे विचार चुकीचे असू शकतात ही शक्यता लक्षात घेऊनही ते व्यक्त करू शकतो. कारण इथे चुकीचे मत व्यक्त केले तरी गंभीर परीणाम होण्याची शक्यता नाही.
---
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
शंका
निनि यांचा प्रयोग आणि एलएचसीचा प्रयोग हे सारख्याच गृहीतकांवर आधारीत आहेत का?
प्रयोग
एल एच सीचा प्रयोग हिग्न बोसॉन तयार करणे हा आहे. (इतरही उद्दिष्टे असावीत.)
निनि यांचा प्रयोग हिग्ज बोसॉन एलएचसीने तयार होणे किंवा न होणे यावर आधारित आहे असे वाटते.
---
क्वांटम इंटँगलमेंट
या बाबतीत क्रेमरचा प्रयोग ठीक वाटतो. (तुमचा दुवा) त्याच्या निरीक्षणामधून काही निष्कर्ष काढत येतो, असे म्हणता येते. म्हणजे अमुकतमुक बांधणी केल्यास जर अनंत-चालणारे यंत्र मिळणे शक्य आहे असे सकृद्दर्शनी वाटते, आणि ऊर्जा-कॉन्झर्व्हेशनचा कायदा माहीत होण्यापूर्वी असे प्रयोग सार्थ असतात, त्याप्रमाणे क्रेमर यांचा प्रयोग भविष्यात कळेल अशा कायद्याच्या ज्ञानासाठी सकृद्दर्शनी ठीक वाटतो.
(बहुधा सिग्नल-टु-नॉइझमुळे त्यांना काहीच दिसणार नाही, असे माझे भाकीत आहे. चिरचलयंत्रे बांधणार्यांची यंत्रे घर्षणामुळे चालत नाही, असे त्यांच्या लक्षात येई, म्हणून ते नवीननवीन यंत्रे बनवत राहात. पण जोपर्यंत कॉन्झर्वेशन-लॉ समजला नाही, तोवर यंत्रे बांधत राहाणे ठीकच होते.)
क्वांटम एंटँगलमेंटचा एलएचसी/पत्त्यांचा खेळ यांच्याशी काय संबंध आहे?
(क्रेमर यांनी लेझरचे दोन भाग आधी एके ठिकाणी बद्ध होते, म्हणून सांगितले आहे. श्रडिंगेरच्या मांजराबद्दलच्या प्रयोगात कणाच्या 'अमुक' स्थितीचे निरीक्षण करून मांजर मारण्याचे कल्पित यंत्र आधी बांधलेले आहे. म्हणून कणाची स्थिती आणि मांजर यांच्यात अवश्यसंबंध प्रस्थापित होतो. यात मांजर त्या थोड्या वेळात दुसर्या कुठल्याही कारणाने मरण पावणार नाही, असे गृहीतक असते. एलएचसी दुसर्या कुठल्याही कारणाने बंद पडणार नाही, किंवा असा कुठलाही अवश्यसंबंध पत्त्यांच्या खेळाशी लावता येईल का?)
त्या चार संदर्भांमध्ये काय दिसते - विशेष मुद्दे सांगता येतील का? (फिज-रेव्ह-लेटर्स च्या सरावामुळे माझ्यापेक्षा भराभर वाचता येईल, म्हणून तुम्हालाच विचारायचा आगाऊपणा करतो आहे.)
हम्म
क्वांटम एन्टंगलमेंटचा बॅकवर्ड कॉझेशनशी संबंध असावा असा अंदाज आहे. एलेचसी आणि पत्त्यांची खेळ किंवा रँडमनेस यांचा नेमका काय संबंध आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही.
हा संदर्भ चाळला. यात आधीपेक्षा थोडी अधिक माहिती कळाली पण पुरेशी नाही. जेवढे मुद्दे कळले ते असे :
हिग्ज बोसॉन शोधण्यासाठी आत्तापर्यंत कधीही न वापरलेल्या उर्जेच्या रेजीममध्ये जावे लागणार आहे. असे झाल्यात ते म्हणतात, " However each time we surpass a new energy scale so as to produce, for example, a type of particle with new mathematical properties, we should retest our well-working
principles of earlier experiments."
म्हणजे बहुधा हिग्ज बोसॉन पाळत असलेली तत्वे आत्ताच्या तत्वांपेक्षा वेगळी असू शकतील. लेखकांच्या म्हणण्याप्रमाणे ही परिस्थिती हॉकिंग्ज यांनी मांडलेल्या विश्वाच्या उगमकालात असलेल्या परिस्थितीप्रमाणे असू शकेल.
माझा पाथ इंटेग्रल, स्टँडर्ड मॉडेल, पार्टीकल फिजिक्स इ. विषयांचा काहीच अभ्यास नसल्याने लेखकांचे आर्गुमेंट कळणे जवळजवळ अशक्य वाटते आहे. शिवाय त्यातही ते आणखी आधीचे संदर्भ देत आहेत. साधारणपणे अशा प्रकारच्या निबंधांमध्ये असेच होते असा अनुभव आहे. आंतरजालावर कुणी सोप्या शब्दात हे समजावले आहे का याचा शोध घेतला पण अजून तरी काही विशेष सापडले नाही.
---
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
थोडेसे कळले
निसर्गात हा प्रयोग घडूच नये अशी काही व्यवस्था अस्तित्त्वात असावी काय? हे ठरण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा प्रयोग व्हावा असे निनिंचे मत दिसते. म्हणजे समजा असे एकमताने ठरले की पत्त्यांच्या ड्रॉवरून हा प्रयोग कसा करावा (काही बंधने वापरून्, करूच नये, काहीच बंधने न घालता) हे ठरेल. जर निसर्गात अशी काही पूर्वयोजना असेल जी या प्रयोगास होऊ देणार नाही तर या पत्त्यांच्या ड्रॉमध्ये प्रयोग करू नये असे आउटकम निघेल. पत्त्यांचा प्रयोग न करता (या प्रयोगाविरुद्ध पूर्वयोजना असल्यास) एलएचसी काही इतर कारणाने होणार नाही पण एलएचसी होऊ नये याची प्रोबॅबिलिटी मोजणे शक्य होणार नाही. शोधनिबंधात वापरलेला प्रयोग वापरल्यास ही प्रोबॅबिलिटी मोजता येईल, असा काहीसा युक्तिवाद वाटतो.
शक्यतेचे गणित करता येईल का?
गणित करता येईल असा छुपा युक्तिवाद आहे, पण गणित दिलेले नाही. (तसे गणित योग्य नाही.)
समजा आपण पत्त्यांचा "रॉयल फ्लश" हा निकष ठरवला (प्रॉबॅबिलिटी = ०.०००००१५४) किंवा दहा फासे सर्व ":::" पडावेत असा निकष ठरवला (प्रॉबॅबिलिटी = ०.०००००००१६५) तर काय फरक पडणार आहे?
आता बघा कुठलेतरी कठिण काम घेऊया, मी त्याचा प्रयत्न करतो, पण फसतो आहे असे.
आजवर मी मराठी संकेतस्थळांवर १०-२० कविता लिहिल्या आहेत, एकालाही १००वर वेगवेगळ्या आयडींचे प्रतिसाद मिळालेले नाहीत. बहुधा असे मिळू नयेत हे पूर्वनियोजित आहे. याची शक्यता मला माहीत नाही.
आता फासे १० (तुम्ही म्हणाल तर २० वेळेला) टाकून बघतो. प्रत्येक फासा ":::" असा पडला तर माझ्या मनात आता घोळणारी कविता मराठी संकेतस्थळांवर प्रसिद्ध करणार नाही. प्रॉबॅबिलिटीचे गणित काय आहे?
मी प्रयोग करायला तयार आहेच. पण वैचारिक प्रयोग तर आताही करता येईल.
समजा १. फासे १०दा ":::" असे पडले. मी कविता प्रसिद्ध केली नाही. पूर्वनियोजनाच्या शक्यतेचे गणित सांगा.
समजा २. फासे कमीअधिक, वेगवेगळे पडले. मी कविता प्रसिद्ध केली. (२अ) १००पेक्षा अधिक प्रतिसादकांनी प्रतिसाद दिले नाहीत. पूर्वनियोजनाच्या शक्यतेचे गणित सांगा. (२आ) १००पेक्षा अधिक प्रतिसादकांनी प्रतिसाद दिले. पूर्वनियोजनाच्या शक्यतेचे गणित सांगा.
या निबंधलेखकांचा "शक्यता" आणि "कार्यकारणभाव" या कल्पनांच्या बाबतीत कमालीचा गोंधळ होतो आहे.
गोंधळ तर मान्य
श्री धनंजय, मलाही शक्यतेच्या गणिताबाबत गोंधळ वाटत आहे. म्हणजे जो काही निकष ड्रॉ काढण्यासाठी वापरायचा आहे तो अचुक असून त्यावरुन ठरलेल्या प्रोबॅबिलिटिज बरोबर आहे, असा काही गोंधळ निबंधात आहे. (पण असाच गोंधळ एलएचसीच्या परिणामांबाबत आहे का? आणि त्यावर लेखकांना भाष्य करायचे आहे का? हे मात्र माहीत नाही.) मला फक्त लेखकांचे मोटिवेशन समजले.
टाईम ट्रॅवल
ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम या पुस्तकात "ऍरो ऑफ टाईम" असे एक प्रकरण आहे. त्यात असे प्रतिपादन केले आहे की काळाच्या थर्मोडायनॅमिक बाणाची दिशा (डिसऑर्डर आधी कमी आणि नंतर जास्त असते), मानसिक काळाच्या बाणाची दिशा (आपल्याला आधीच्या गोष्टी 'आठवतात' नंतरच्या नाही) आणि वैश्विक काळाच्या बाणाची दिशा (विश्व आधी लहान आणि नंतर मोठे असते) तीनही एकच असतील (आधी कडून नंतरकडे) तरच विश्वामध्ये बुद्धिमान जीवांचे जगणे शक्य आहे.
त्यावरून काळामध्ये उलट प्रवास करताच येणार नाही असे वाटत होते.
नितिन थत्ते
(स्वगत: तुला काय कळतंय का यातलं. उचलली बोटं आणि हाणली कीबोर्डवर)
विज्ञान नक्की कोणत्या दिशेने जात आहे?
नील्सन आणि निनोमिया यांचे 'पत्ताखेच आणि लार्ज हेड्रॉन कोलायडरचे हिग्ज बोसॉन्स निर्माण करण्यातील यश ' यांचा बादरायण संबंध जोडणारे शोधनिबंध खरेतर 'एलेचसी'इंजिनियर आणि संशोधकांची (अपघाताबाबत त्यांनी दिलेल्या लंगड्या सबबींची) टर उडवण्यासाठी गंभीरपणाचा आव आणून लिहिलेले सार्कास्टिक लेखन वाटते.
पण पुढे झालेल्या चर्चेत अन्सर्टन्टी प्रिन्सिपल, बॅकवर्ड कॉजेशन,क्वांटम एन्टँगलमेंट, श्रॉडिंजरचे मांजर हे वाचले असता 'आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना' या म्हणीची आठवण आली.
श्रॉडिंजरचे मांजर तर लहानपणीच्या एका खेळाचे क्रूर रुपांतर करून केलेला वैचारिक प्रयोग वाटतो.
"माझ्या मुठीतला मुंगळा जिवंत आहे की मेलेला? ते ओळख बघू" असे काहीसे. मुठीतला मुंगळा एकाच वेळेला जिवंत आणि मेलेला असतो काय कुणास ठाऊक?( इथे मूठ एका अज्ञात शक्तीची असावी. मा कर्म'फल' हेतुर्भु:?)
क्वांटम मेकॅनिक्स या विषयाचा आणि पत्ताखेचीचा काहीही संबंध नाही असे माझे मत झाले.नाहीतर पत्ते खेचण्यापेक्षा मुहूर्त पाहून,अतृप्त आत्म्यांना शांत करण्यासाठी बोकड किंवा रेडा कापून मगच 'सर्न'ने 'एलेचसी' सुरू करायला हवा असा सल्ला भारतातील अनेक शास्त्रज्ञ देतील याची खात्री आहे.(पत्ताखेचीपरास मुहूर्त पाहून / बळी देऊन / नवग्रह शांती करून यश मिळाल्याच्या घटनांचा विदा जास्त असावा.)
विज्ञानाच्या व्याख्येवरुन
विज्ञानाच्या व्याख्येवरुनच हमरीतुमरीवर येणारे सदस्य पाहता ही चर्चा आश्चर्यकारक वाटली नाही. मात्र शोधनिबंध व निष्कर्ष मनोरंजक आहेत.
(जे विज्ञान आहे ते विज्ञान अशीही कोणी वसुलि व्याख्या केली नाही तरच नवल)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
श्रॉडिंजर आणि अद्वैत सिद्धांत
पुढे कोणी अशा मतप्रणालीचा शास्त्रज्ञ झाला काय?
श्रॉडिंजर आणि भारतीय तत्वज्ञान
दिशा
आधी मलाही धनंजय यांच्याप्रमाणे हा विनोद आहे असे वाटले होते पण तसे नाही. निल्सन हे जागतिक किर्तीचे स्ट्रिंग थिअरिस्ट आहेत. या विषयावर त्यांचे ४-५ निबंध आहेत पैकी एक (इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॉडर्न फिजिक्स ए मधील) प्रसिद्ध झालेला आहे. कॉन्ड मॅट अर्काइव्हमध्ये लेख प्रसिद्ध करण्यास पंचांची मान्यता लागत नाही. याउलट एखाद्या मासिकात लेख प्रसिद्ध झाला याचा अर्थ त्या मासिकाच्या पंचांनी तो वाचून, त्याबद्दल असलेल्या शंकांचे लेखकांकडून निवारण करून मग त्याला मान्यता दिली आहे असा होतो.
इथे कळीचा मुद्दा हा की पत्ते खेचण्याचा आणि एलएचसी बंद पडण्याचा नेमका संबंध काय? हे कळण्यासाठी या विषयाच्या बरेच खोलात जावे लागेल असे दिसते. आणि ते विशेषज्ञांशिवाय इतरांना कठीण जावे. याचा हिग्ज बोसॉनशीही जवळचा संबंध आहे हे विसरून चालणार नाही.
केवळ अविश्वसनीय म्हणून असत्य किंवा अवैज्ञानिक हा प्रतिवाद चालणार नाही. आत्ता सर्वमान्य असलेले बरेच सिद्धांत जेव्हा पहिल्यांदा मांडले गेले तेव्हा अविश्वसनीय होते. स्थल-कालासारख्या गोष्टी सापेक्ष आहेत, विश्व सतत प्रसरण पावते आहे, इलेक्ट्रॉन क्रिकेटच्या चेंडूप्रमाणे न वागता एखाद्या लाटेप्रमाणे वागतो या सर्व गोष्टी आपल्या 'कॉमन सेन्सच्या' विरूद्ध आहेत. आइनस्टाइनचा शेवटपर्यंत क्वांटम थिअरीवर विश्वास बसला नव्हता. म्हणूनचा त्याने "God does not play dice" असे म्हटले.
याचा प्रतिवाद करायचा झाल्यास तो वैज्ञानिक पद्धतीने आणि तपशीलवार करायला हवा. कदाचित विरोधी क्यांपातील स्ट्रिंग थिअरिस्ट तसे करतीलही. तोपर्यंत यावर कुठलेही मत देणे योग्य नव्हे असे वाटते.
---
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
खोलात जाऊन - कॉमन सेन्स
२००७ मधील निबंधात सुरुवातीचा भाग काही समीकरणे मांडण्यात गेलेला आहे, तर पुढे काही भाग प्रयोगाच्या चौकटीबाबत आहे. (भाग ४ आणि ५, मला वाटते.) यात प्रथम भागाताली गणिते "पाथ इंटेग्रल" वगैरेजे आहेत, त्यांचा संबंध भाग ४-५ मधील शक्यता गणिताला लावलेला नाही. शक्यता गणित (प्रॉबॅबिलिटी) आणि एलएचसीला आलेला खर्च वगैरे गणितात कुठलाही नवीन सिद्धांत मांडलेला नाही. निल्सन हे "आपण ज्ञानशास्त्राचा (एपिस्टेमॉलॉजीचा) आमूलाग्र नवा प्रकार सांगतो" असे म्हणत नाहीत. पण त्यांचा वाद हल्लीच्या ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने तर्कदुष्ट आहे. हल्लीचे ज्ञानशास्त्र चुकलेले आहे, असे त्यांचे म्हणणे असेल, तर पाथ इंटेग्रलच्या गणिताचा दाखला चालणार नाही.
कणलहरी वर्णनात काम करणार्या वैज्ञानिकांनीही ज्ञानशास्त्राचा आमूलाग्र वेगळा प्रकार सांगितला नाही. "क्वांटम मेकॅनिक्सने ज्ञानशास्त्रच बदलले" म्हणणार्यांचे खंडन फाइनमॅनने केलेले आहे, त्या लेखाचे भाषांतर मी येथे उपक्रमावर दिलेले आहे.
कणलहरी वर्णन हे आदल्या ज्ञानशास्त्राशी सुसंगत होते, पण आदल्या भौतिकवर्णनाशी फारकत घेऊन होते. ही अविश्वसनीयता वेगळी. यात त्यांना साथ देणारे कित्येक प्रयोग (न्यूटनच्या गणितापेक्षा वेगळे असे प्रयोग) आधीच उपलब्ध होते, हासुद्धा क्षुल्लक तपशील नव्हे.
एलएचसीच्या प्रयोगाची ऊर्जा कुठल्याही आदल्या ऊर्जेपेक्षा अधिक आहे, म्हणून काही नवीन आश्चर्यकारक, पूर्वी कल्पनातीत वाटणार्या, अशा गोष्टी आपल्याला दिसतील. येथवर ठीक. पण त्या अगणित कल्पनातीत गोष्टींमधून पत्त्याचा खेळ! म्हणूनच वर मी म्हटले आहे, की तुम्ही उल्लेखलेला क्रेमरचा प्रयोग सकृद्दर्शनी करण्यालायक आहे. बॅकवर्ड कॉझेशन असूच शकत नाही असे काही माझे गृहीतक नाही. लेझरच्या दोन भागांची एंटँगलमेंट फॉर्वर्ड कॉझेशनची असू शकेल, किंवा बॅकवर्ड कॉझेशनची असू शकेल. म्हणून एलएचसीची पत्त्याच्या खेळाशी एंटँगलमेंट शोधायचा प्रयोग करायचा म्हणजे एलएचसीचा कुठल्याही गोष्टीशी एंटँगलमेंट करायचा प्रयोग करायचा.
(आणि ज्या ऊर्जांचे कण एलएचसी मध्ये वापरण्यात येतात त्या ऊर्जेचे कॉस्मिक कण सारखे पृथ्वीच्या वातावरणावर आदळत असतात असे ऐकले आहे. हा ऊर्जेचा स्तर खरोखर इतका अ-पूर्व आहे काय?)
हे उदाहरण बघा :
"हल्ली मनुष्यांची जितकी लोकसंख्या आहे, ती पूर्वीच्या काळातल्या कुठल्याही लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. [इथे लोकसंख्या-सांख्यिकीतले काही गणित देतो असे समजा. ते ठीक असेल नसेल, पण त्यात पत्त्यांच्या खेळाचा काही संबंध दाखवला जात नाही.] लोकसंख्या पूर्वीपेक्षा अधिक असल्यामुळे पूर्वीच्या शास्त्रापेक्षा वेगळे काहीतरी कल्पनातीत असे दिसू शकेल. भारताची लोकसंख्या स्थिर करायचे प्रयोग आजवर सफल झालेले नाहीत. हे आता कल्पनातीत वाटणार्या बॅकवर्ड कॉझेशन मुळे होते. [येथे वाटल्यास क्वांटम एंटँगलमेंटचे संदर्भ देतो. पत्त्यांचे खेळ क्वांटम एंटँगल होतात, असा कुठलाही निर्देश नाही, असे येथे म्हणाल तर तेथेही म्हणावे लागेल.] आज भारतात करोडो रुपये खर्च करून कुटुंबनियोजनाच्या जाहिराती करण्याचा प्रयोग आहे, एलएचसी सारखा. म्हणून पत्त्यांचा खेळ करूया. जर अशक्य कोटीतला पत्ता आला तर आपण कुटुंबनियोजनविभागाचा अर्थसंकल्प नगण्य करूया, किंवा बंद करूया. यातून लोकसंखेच्या बाबतीत बॅकवर्ड कॉझेशनबाबत काही प्रमाण मिळेल."
निळी वाक्ये सर्व मान्य. लाल वाक्ये अमान्य. विशेषतः निळ्या अधोरेखित वाक्यामुळे लाल अधोरेखित वाक्याला पुष्टी मिळवणे मुळीच सयुक्तिक नाही. अशी पुष्टी सांगणारे ज्ञानशास्त्र उपयोगी असल्यास आपण "सयुक्तिक" साठी नवी व्याख्या करू आणि ते वापरू लागू. पण तसा स्पष्ट वाद नि-नि करत नाहीत, फक्त आडून करतात.
तुम्ही दिलेल्या २००७ निबंधाच्या दुव्यात "एलएचसी वरील खर्च" "एलएचसी प्रयोगात १/२००००० इतकी अनपेक्षित घटना दिसल्यास "हिग्स बोसॉन सापडला असे मानले जाईल" वगैरे चर्चा आहे. ते परिच्छेद वाचून पुन्हा माझी शंका बळावली, की लेख या खर्चाबाबत, आणि एलएचसीच्या "१/२००००० निकषा"बाबत व्यंग्यात्मक टीका असू शकेल. अशी व्यंग्यात्मक टीका प्रसिद्ध स्ट्रिंग शास्त्रज्ञाने लिहिल्यास अपेक्षित आहे, मजेदार आहे.
व्यंग्य असल्यास त्याचे उत्तरही वेगळ्या प्रकारे दिले जाईल. "सांख्यिकीमधील प्रमाणे विज्ञानात कशी वापरली जावीत" अशी काही चर्चा करण्यास तो निबंधसंच विचारप्रवर्तक होऊ शकेल. नपेक्षा नि-नि यांच्या प्रयोगात सांख्यिकीचा आयोजित वापर, आणि एलएचसी प्रयोगातला सांख्यिकीचा निकष तत्त्वतः वेगळा आहे अशी चर्चा होऊ शकते (वर अक्षय म्हणतात तशी.)
उदाहरणे
मी दिलेली इतर उदाहरणे केवळ अविश्वसनीय या गटातील होती. त्यांचा या उदाहरणाशी डायरेक्ट संबंध आहे असे माझे म्हणणे नाही.
दुसरे म्हणजे यात क्वान्टम एन्टॅगलमेंट असेलच असेही माझे म्हणणे नाही. दुसर्या प्रयोगात ती आहे म्हणून कदाचित बॅकवर्ड कॉझेशनमध्ये ती असावी असा अंदाज आहे. बॅकवर्ड कॉझेशनची सर्व गृहीतके मी बघितलेली नाहीत.
उर्जेचा स्तर अपूर्व असावा असे वाटते. नक्की विदासाठि आणखी शोध घ्यायला हवा.
---
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
वाचत आहे.
कॉजॅलिटी आणि डिटरमिनिझम बद्दल वाचत आहे.
भौतिक विज्ञानाचे तत्त्वज्ञान बदलले आहे असे भासले (ऍरिस्टॉटल -> न्यूटन -> आईनस्टाईन -> श्रॉडिंजर/हायजेनबर्ग->फाईनमन) तरीही उपरोल्लेखित शोधनिबंध कठोरपणे शास्त्रीय आहे असे वाटत नाही.
सुपरकंडक्टींग सुपर कोलायडरची ग्रँट (युएस्)काँग्रेसने रद्द केल्याने तो प्रोजेक्ट बंद पडला->सोव्हिएट रशिया नष्ट झाल्याने असे झाले असावे.
एलेच्सीमध्ये अपघात झाला -> सुपरकंडक्टरचा रोध वाढल्याने असे झाले -> अपघात पोचण्यास अवघड ठिकाणी झाला
या सर्व बाबी सर्वसामान्य अपघात अथवा दुर्दैवी घटना होत्या इतकेच म्हणून वेळ मारून नेली गेली.
या प्रकारच्या मानवनिर्मित कारणांपेक्षा एखादे अतिशय कमी शक्यतेचे कारण (जसे पत्ताखेच) एलेच्सी बंद करण्यासाठी/अयशस्वी होण्यासाठी असावे
म्हणजेच कोणतीही मानवनिर्मित बाधा एलेच्सीच्या कार्यात येऊ नये अशी तळमळ या शोधनिबंधातून त्यांनी प्रकट केली असावी असे वाटते.
'पत्तेखेच ते एलेच्सीचे यश' हा अतिशय कमजोर बंध आहे असे म्हणता येईल. (नाहीतरी विश्वात (कालपैसात) घडलेल्या / घडणार्या प्रत्येक घटनेचा इतर गोष्टींशी काही-ना-काही बंध असतोच.)
"विशेषज्ञांशिवाय इतरांना कठिण जावे"
माझ्या स्वतःच्या व्यावसायिक कामामध्ये काहीकाही तपशील वाचून समजून घ्यायला वेळ लागतो, हे खरे आहे. तपशीलवार निष्कर्ष आकळायला विशेषज्ञ असल्यास वेळ कमी लागतो.
पण माझ्या विज्ञानकार्याचे मूलभूत ज्ञानशास्त्र आणी तर्कशास्त्र कळण्यासाठी माझ्या विषयातीलच तज्ञ लागेल, असे मी म्हणू लागलो, तर माझ्या कार्याकडे लोकांनी अधिक शंकेखोरपणे बघावे. त्यापूर्वीसुद्धा मैत्रीपूर्ण संशयाने बघावे.
("पटल्यास मान्य करावे" या भावनेने "मैत्रीपूर्ण" शब्द वापरला आहे. "न-पटल्यास मान्य करू नये", या हेतूने "संशय" शब्द वापरला आहे. "लोकांना पटवायची माझी मुळी इच्छाच नाही, पण त्यांना पटवल्याचा आभास करतो आहे, असे समजावे" या मथितार्थाने "शंकेखोर" शब्द वापरला आहे.)
सहमत..
सहमत आहे पण याविषयी जनरलायझेशन करणे थोडे अवघड आहे.
माझ्या मते प्रयोगातील नेमकी गृहीतके जाणून घेतल्याशिवाय तर्क बरोबर आहेत किंवा चूक हे सांगणे थोडे अवघड आहे. तुम्ही बहुधा असहमत असाल. तुमच्या व्यवसायातील उदाहरण द्यायचे तर बहुधा मला तुम्ही एखादा इसीजी दाखवून हा निरोगी आहे किंवा नाही हे विचारले तर मला अर्थातच सांगता येणार नाही. आता समजा मी महिनाभर फक्त इसीजी म्हणजे काय, ते कसे मोजतात, रोगी-निरोगी यातील फरक वगैरेंचा अभ्यास केला तर कदाचित सांगूही शकेन. (त्यातही माझ्या अभ्यासात तसाच इसीजी आला असेल आणि तुम्ही मला दाखवलेला इसीजी फारसा किचकट नसेल तर!)
पण त्यात तुम्हाला तुमच्या अनुभवामुळे जी इनसाइट आहे ती मला येणे कधीही शक्य नाही.
हे उदाहरण कितपत योग्य आहे याबद्दलही साशंक आहे. नसेल तर तुम्ही सांगतालच. :)
---
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
ज्ञानशास्त्र विरुद्ध विशिष्ट तर्क यांच्यात फरक
ज्ञानशास्त्र विरुद्ध विशिष्ट तर्क यांच्यात फरक हा मी कदाचित समजावून सांगू शकलो नाही.
तर्क (लॉजिक या अर्थी) यात सर्वत्र लागू सामान्यीकरण "अमुक चौकटीचे कुठलेही गृहीतक असेल, तर तमुक निष्कर्ष" वगैरे असते.
"जर क्ष तर य, आणि जर य तर ज्ञ; असे असल्यास जर क्ष तर य." यात "क्ष, य, ज्ञ" हे कुठल्याही शास्त्रातील दुर्बोध तपशील असोत, आपणा सर्वांना चौकट मान्य आहे. हे तर्कशास्त्र ज्ञानशास्त्राच्या (एपिस्टेमॉलॉजी च्या) बाजूला जाते.
१. जर (क्ष = ईसीजीमध्ये P-wave दिसत नाहीत, रेषा थरथरती आहे, प्रत्येक RR कालांतर वेगवेगळे आहे) तर (य = कर्णिकेमध्ये विद्युत्प्रसारणाचा atrial fibrillation हा बिघाड आहे)
२. जर (य = कर्णिकेमध्ये विद्युत्प्रसारणाचा atrial fibrillation हा बिघाड आहे) तर (ज्ञ = Thromobosis आणि embolism यांचा धोका कमी करण्यासाठी औषधयोजना विचारात घेतली पाहिजे)
कित्येक लोकांना करड्या ठशातल्या ईसीजी तपशिलांबद्दल फारशी माहिती नसेल. पण पुढील दोन वाक्यांपैकी कुठले तर्कसंगत आहे हे सांगण्यात ईसीजीचा सराव लागत नाही, तर तर्कशुद्ध विचाराचा सराव लागतो.
३अ. जर (क्ष = ईसीजीमध्ये P-wave दिसत नाहीत, रेषा थरथरती आहे, प्रत्येक RR कालांतर वेगवेगळे आहे) तर (ज्ञ = Thromobosis आणि embolism यांचा धोका कमी करण्यासाठी औषधयोजना विचारात घेतली पाहिजे.)
३आ. जर (क्ष = ईसीजीमध्ये P-wave दिसत नाहीत, रेषा थरथरती आहे, प्रत्येक RR कालांतर वेगवेगळे आहे) तर (ज्ञ = Thromobosis आणि embolism यांचा धोका कमी करण्यासाठी औषधयोजना विचारात घेतली नाही पाहिजे.)
वरील ३अ बरोबर की ३आ बरोबर हे समजण्यासाठी कोणी ईसीजीचा अभ्यास केला पाहिजे, असे म्हणणे ठीक वाटत नाही. (तुमचा सध्या ईसीजीचा अभ्यास नसेल तर) तुम्हाला ३अ आणि ३आ पैकी कुठला निष्कर्ष १ आणि २ शी सुसंगत वाटतो? हे उत्तर देण्यासाठी ईसीजीचा अभ्यास जरुरीचा आहे, असे तुमचे मत आहे का?
पण मुळात पी-वेव्ह, आर-आर वगैरे तपशील ईसीजीमध्ये शोधून बघण्यासाठी सराव लागतो, हे बरोबर आहे. या विशिष्ट तर्काचा उपयोग करून घेण्यासाठी त्या औषधोपचारांचाही अभ्यास लागतो, हेसुद्धा खरे. ईसीजी बघणार्या आणि औषधोपचार करणार्या व्यक्तीला हे समजून घेणे आवश्यक आहे, ते आहेच.
त्या सरावाच्या बळावर मी तुम्हाला सांगू लागलो, "१ आणि २ वरून ३अ आणि ३आ यांच्यात तुम्ही फरक करू शकणार नाही", तर ते तुम्ही मुळीच चालवून घेऊ नका.
अखेर भानगड मिटली
हिग्ज बोसॉन शॉन कॅरलचे कल्याण/दादर/सांताक्रूझ करो. या भल्या माणसाने ही भानगड मर्त्य माणसांना समजेल अशा भाषेत समजावून सांगितली आहे.शॉनचे मुद्दे परत अनुवाद करून देण्यात काही फायदा वाटत नाही. पण इथे शॉनची काही वाक्ये रोचक वाटतात ती देतो आहे.
"The theory is undeniably crazy — but not crackpot, which is a distinction worth drawing."
"The disappointing thing about the responses to the article is how non-intellectual they have been. I haven’t heard “the NN argument against contributions to the imaginary action that are homogeneous in field types is specious,” or even “I see no reason whatsoever to contemplate imaginary actions, so I’m going to ignore this” (which would be a perfectly defensible stance). It’s been more like “this is completely counter to my everyday experience, therefore it must be crackpot!” That’s not a very sciencey attitude. It certainly would have been incompatible with all sorts of important breakthroughs in physics through the years. The Nielsen/Ninomiya scenario isn’t going to be one of those breakthroughs, I feel pretty sure. But it’s sensible enough that it merits disagreement on the basis of rational arguments, not just rolling of eyes."
ताक : ह्या रोमन अक्षरांच्या नियमाचे काहीतरी करा राव!
---
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
मृदु भावों के अंगूरों की आज बना लाया हाला,
प्रियतम, अपने ही हाथों से आज पिलाऊँगा प्याला,
पहले भोग लगा लूँ तेरा फिर प्रसाद जग पाएगा,
सबसे पहले तेरा स्वागत करती मेरी मधुशाला।।१।
प्यास तुझे तो, विश्व तपाकर पूर्ण निकालूँगा हाला,
एक पाँव से साकी बनकर नाचूँगा लेकर प्याला,
जीवन की मधुता तो तेरे ऊपर कब का वार चुका,
आज निछावर कर दूँगा मैं तुझ पर जग की मधुशाला।।२।
प्रियतम, तू मेरी हाला है, मैं तेरा प्यासा प्याला,
अपने को मुझमें भरकर तू बनता है पीनेवाला,
मैं तुझको छक छलका करता, मस्त मुझे पी तू होता,
एक दूसरे की हम दोनों आज परस्पर मधुशाला।।३।
भावुकता अंगूर लता से खींच कल्पना की हाला,
कवि साकी बनकर आया है भरकर कविता का प्याला,
कभी न कण-भर खाली होगा लाख पिएँ, दो लाख पिएँ!
पाठकगण हैं पीनेवाले, पुस्तक मेरी मधुशाला।।४।
मधुर भावनाओं की सुमधुर नित्य बनाता हूँ हाला,
भरता हूँ इस मधु से अपने अंतर का प्यासा प्याला,
उठा कल्पना के हाथों से स्वयं उसे पी जाता हूँ,
अपने ही में हूँ मैं साकी, पीनेवाला, मधुशाला।।५।
मदिरालय जाने को घर से चलता है पीनेवला,
'किस पथ से जाऊँ?' असमंजस में है वह भोलाभाला,
अलग-अलग पथ बतलाते सब पर मैं यह बतलाता हूँ -
'राह पकड़ तू एक चला चल, पा जाएगा मधुशाला।'। ६।
चलने ही चलने में कितना जीवन, हाय, बिता डाला!
'दूर अभी है', पर, कहता है हर पथ बतलानेवाला,
हिम्मत है न बढूँ आगे को साहस है न फिरुँ पीछे,
किंकर्तव्यविमूढ़ मुझे कर दूर खड़ी है मधुशाला।।७।
मुख से तू अविरत कहता जा मधु, मदिरा, मादक हाला,
हाथों में अनुभव करता जा एक ललित कल्पित प्याला,
ध्यान किए जा मन में सुमधुर सुखकर, सुंदर साकी का,
और बढ़ा चल, पथिक, न तुझको दूर लगेगी मधुशाला।।८।
मदिरा पीने की अभिलाषा ही बन जाए जब हाला,
अधरों की आतुरता में ही जब आभासित हो प्याला,
बने ध्यान ही करते-करते जब साकी साकार, सखे,
रहे न हाला, प्याला, साकी, तुझे मिलेगी मधुशाला।।९।
सुन, कलकल़ , छलछल़ मधुघट से गिरती प्यालों में हाला,
सुन, रूनझुन रूनझुन चल वितरण करती मधु साकीबाला,
बस आ पहुंचे, दुर नहीं कुछ, चार कदम अब चलना है,
चहक रहे, सुन, पीनेवाले, महक रही, ले, मधुशाला।।१०।
जलतरंग बजता, जब चुंबन करता प्याले को प्याला,
वीणा झंकृत होती, चलती जब रूनझुन साकीबाला,
डाँट डपट मधुविक्रेता की ध्वनित पखावज करती है,
मधुरव से मधु की मादकता और बढ़ाती मधुशाला।।११।
मेंहदी रंजित मृदुल हथेली पर माणिक मधु का प्याला,
अंगूरी अवगुंठन डाले स्वर्ण वर्ण साकीबाला,
पाग बैंजनी, जामा नीला डाट डटे पीनेवाले,
इन्द्रधनुष से होड़ लगाती आज रंगीली मधुशाला।।१२।
हाथों में आने से पहले नाज़ दिखाएगा प्याला,
अधरों पर आने से पहले अदा दिखाएगी हाला,
बहुतेरे इनकार करेगा साकी आने से पहले,
पथिक, न घबरा जाना, पहले मान करेगी मधुशाला।।१३।
लाल सुरा की धार लपट सी कह न इसे देना ज्वाला,
फेनिल मदिरा है, मत इसको कह देना उर का छाला,
दर्द नशा है इस मदिरा का विगत स्मृतियाँ साकी हैं,
पीड़ा में आनंद जिसे हो, आए मेरी मधुशाला।।१४।
दुसरा पैलू
चर्चेत भाग घेतलेल्या सर्वांचे आभार.
---
शॉन कॅरल असेही म्हणतात
शॉन कॅरल त्या अनुदिनीलेखात असेही म्हणतात :
> I’ve always found it pretty paternalistic and condescending to
> claim that we should shield the public from speculative science
> until it’s been established one way or the other. The public are
> grown-ups, and we should assume the best of them rather than the worst.
भाषांतर (वाक्ये मराठीत लिहिता यावी, म्हणून तोडावी लागली आहेत. वेगळी विरामचिह्ने घालावी लागली आहेत. ज्यांना इंग्रजी भाषा नीट समजते, त्यांनी भाषांतरात चूक झाली असेल तर सुधारावी):
जेव्हा पुढील दावा करतात, मला तो नेहमीच खूप आत्मगुरवीकारक (मी तुझा बाप-गुरू मानणारा) आणि अवमानकारक वाटतो : "विज्ञानातल्या कल्पितमात्र शक्यता (स्पेक्युलेटिव्ह) जोवर या किंवा त्या पक्षात सिद्ध होत नाहीत तोवर आपण समाजाचा त्या कल्पनांपासून बचाव करावा." समाज प्रौढ आहे, आणि त्यांच्याविषयी सर्वात हीन असे नव्हे, तर सर्वात उत्तम असे गृहीत धरावे.
याबाबत त्यांचे कल्याण होवो, असे माझेही मत आहे. (पण हे मत काही प्रमाणात आरागॉर्न यांच्या मतापेक्षा वेगळे असावे.) येथे त्यांचे मत मला प्रमाण म्हणून देत नाही, त्यांचे मत वाचण्यापूर्वी साधारण अशा प्रकारचे मत मी येथे वर मांडलेले आहे.
(आरागॉर्न यांच्याशी "अग्री टु डिसग्री" असे ठरवले आहे, म्हणून पुढील वाद शॉन कॅरल यांच्याशीच. कदाचित त्यांचे उपक्रम संकेतस्थळावर तितके येणेजाणे नसेल, म्हणून त्यांच्या अनुदिनीवरही प्रतिसाद दिलेला आहे.)
कल्याण झाले तर यापुढे कात्रज :
"क्रेझी" आणि "क्रॅकपॉट" यांच्यातला शॉन कॅरल यांनी केलेला फरक मला कळला नाही. ते स्वतः असे काही म्हणतात : नि-नि यांचा प्रस्तावित सिद्धांत वास्तविक असण्याची आधीची (म्हणजे आताची) शक्यता दशलक्षात एक याहीपेक्षा कमी आहे, त्यामुळे शॉन कॅरल त्याच्या भाकितांकडे गंभीरपणे बघणार नाहीत.
इंग्रजीत :
> I think that the Bayesian prior probability on their model
> being right is less than one in a million, so I’m not going to
> take its predictions very seriously.
आणि कॅरल यांनी "कल्पना खरी असायची आधीची शक्यता" ही कुठून काढली? त्यांच्या हल्लीच्या आयुष्यामधूनच ना? मग "“this is completely counter to my everyday experience, therefore it must be crackpot!” That’s not a very sciencey attitude." असे नेमके कोणाबद्दल म्हणत आहेत?
इतकेच काय कॅरल नि-नि यांच्या प्रस्तावाबाबत म्हणतात -
> Having invoked the tooth fairy twice — contemplating
> an imaginary part of the action, then choosing its form
> so as to only be relevant where the Higgs is concerned
> — they consider consequences.
दंतकथेतल्या पर्यांसारख्या दोन कल्पना ते आधी उपस्थित करतात -- १. क्रियेचा कल्पित (ऋणसंख्यांचे वर्गमूळ या अर्थी) भाग कल्पितात, आणि २. त्या भागाचे गणिती समीकरण कसे असावे ते कल्पितात -- आणि मग त्याच्या परिणामांची कल्पना करतात.
दंतपर्या आधी कल्पून त्याचे गणित अमुक असे मांडून, मग मात्र ते गणित नीट केले, तर्कसंगत केले...
मग क्रॅकपॉट आणि क्रेझी मधले फरक आहेत तरी काय? कुठल्याही प्रवादात "अमुकपर्यंत दंतपर्या" असल्या, पण शेवटल्या वाक्यात आदल्या वाक्यापासून तर्कसंगत संबंध असल्यास हा फरक करावा काय?
कल्पित-असिद्ध विचारांची ग्राह्य उदाहरणे शॉन कॅरल देतात - "स्ट्रिंग थियरी, विश्वप्रसरण-इन्फेल्शन, अन्यत्र-प्राणिमात्र-एक्सोबायॉलॉजी". यासुद्धा बहुधा क्रेझी आहेत पण क्रॅकपॉट नाहीत. मला वाटते की स्ट्रिंग थियरी, इन्फ्लेशन, आणि एक्सोबायॉलॉजीवाले म्हणू लागले, की रशियात राज्यक्रांती स्ट्रिंगथियरीमुळे टाळता आली असती, विश्वप्रसरणामुळे डाऊ जोन्स वाढतो, आणि एक्सोबायोलॉजी म्हणून ओबामा हे एलियन आहेत, तर मी (धनंजय) त्यांनाही टीका करण्यालायक म्हणेन. पण त्या थियरी असले कुठले संबंध लावत नाहीत. नि-नि मात्र आपल्या थियरीचा संबंध यूएस संसदेने एका प्रकल्पासाठी पैसे बंद करण्याशी लावतात! (खरे तर दंतपर्यांची या प्रकाराशी गणिती सुसंगती आहे, हे शॉन कॅरल यांनीसुद्धा दाखवलेले नाही.)
मला समजावून सांगण्यासाठी शॉन कॅरल यांनी त्यांच्या-मते-क्रॅकपॉट असलेल्या कल्पनांचीही उदाहरणे दिली असती तर बरे झाले असते. तोवर शॉन कॅरल यांना काय सामान्यनियम करायचा आहे, ते कळत नाही.