फोन्याटीक देवनागरी

मोबाईल फोन दिवसेंदिवस व्यापक होत आहेत.
फेसबुक , ब्लोग्स्पोट इ. स्थळांवर आता मोबाईल द्वारे ईमेल अथवा ऐसेमेस द्वारे लिखाण प्रकाशीत करण्याच्या अफलातून सोई सुरू झाल्या आहेत. या सोईचा फायदा घेण्या साठी मराठी मंडळींना मोबाईल मधे मराठीत ईमेल आणि ऐसेमेस सहजगत्या लिहिता येतील असे फोन्याटीक मराठी असणे जरूरी आहे.
१.ईमेल करीता फोन्याटीक देवनागरी बिल्टईन सुविधा असलेली मौडेल्स् कुठली ते कॄपया सांगावे.
२.बिल्टईन फोन्याटीक देवनागरीची सुविधा नसलेल्या मोबाईल मधे आपल्याला असे सोफ्टवेयर डाऊनलोड करून वापरता येऊ शकतील असे हैण्टसेटस कुठले कुठेले आहेत ? अर्थातच अश्या हैन्डसेट्समधे फुलकी बोर्ड असणे ही पहीली आवश्यकता आहे.
३.विन्डोज, स्याम्बीयन्, ऍपल अश्या वेगवेगळ्या ओपरेटींग सिस्टीमसशी जुळवून घेणारे फोन्यटीक देवनागरी सोफ्टवेयर डाऊन् लोड करता येतील अश्या साईटस् च्या लींक्स् दिल्यास आभारी राहीन.

धन्यवाद !
आपला नम्र

परमाणू

लेखनविषय: दुवे:

Comments

मर्यादा

तुम्ही म्हणता तसे मोबाईलवरुन फोनॅटिक टंकलेखन करायचे म्हटले तर त्यासाठी क्वेर्टी कीबोर्ड असलेला मोबाईल लागेल. (जो बहुतेक लोकांकडे नसतो. माझ्याकडे नाही. माझ्या नात्यात कोणाकडे नाही. कंपनीतील ओळखीच्या फक्त दोघांकडे आहे.)

मोबाईलच्या साध्या कीबोर्डवरुन फोनेटिक टंकलेखन करणे हे फारच अवघड आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मोबाईलवरून मराठी टंकलेखन

तुमच्याकडे भरपूर वेळ असला तरच हे करणे शक्य आहे.
विचार सोडलेला बरा
चन्द्रशेखर

धन्यवाद् !

अजानुकर्ण आणि चंद्रशे़खर , प्रतिसादा बद्दल धन्यवाद् !

माझ्या टंकलेखनातील त्रुट
फुल की बोर्ड = कयू यु ई आर टी

टचस्क्रीन् सह फुल की बोर्ड सह मोबाईल आता २-३ हजारात् उपलब्ध आहेत.

विडोज बेस्ड मोबाईल सुद्धा किमतीत् कमी होत आहेत.
विंडोज मधील रिजनल सेटींग्ज मधे भाषांची नावे पाहील्यास महाराष्ट्रातील एखाद्या तलुक्या इतक्या कमी लोकसंख्ये द्वारा वापराल्या जाणार्या भाषांची अनेक नावे दिसतात पण भारतीय भाषांची नावे तिथे दिसत नाहीत. फार तर सर्वांना मिळून "ईंडीक " अश्या नांवात् गुंडाळलेले आढळते.

आज वेळ असेल तरीही मोबाईलवर फोन्याटीक मराठी शक्य नाही अशी परीस्थीती आहे.
वेळ निघुन जाण्या आधी, याबाबत अनुभव असणार्या मराठी सौफ्टवेयर तद्न्यांनी जाणीवपुर्वक प्रयत्न करायला हवेत.
कदाचीत कुणी तरी तो प्रयत्न करीत असेल तर माझ्या माझ्या तर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे अभीनंदन !

जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.

विंडोज व मराठी

मोबाईल विंडोज मधे मराठी फॉन्ट नाही ही सद्य परिस्थिती आहे.
त्यमुळे सध्यातरी रोमन मराठीमधून लिहिणे एवढाच पर्याय दिसतो
चन्द्रशेखर

+१

मागे देखील आम्ही थोडी शोधा शोध केली व ह्या विषयी येथेच चर्चा देखील झाली होती पण योग्य तो मार्ग सापडला नाही.

:(

आम्ही पण वाट पाहत आहोत अश्या सुविधेची.

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

-१ चुक्

विंडोज मोबाईलवर् अगदीच फोनॅटिक नसले तरी उत्तम देवनागरी टंकक उपलब्ध आहे. सध्या विस्ताराने टंकायला वेळ नसल्याने माझ्या इंग्रजी ब्लॉगचा हा दुवा देत आहे.

वा !!

मस्त !
स्याम्बीयन साठी काय आहे ?

धन्यवाद !

जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.

जावा स्क्रिप्ट

सध्या मला माहित नाही पण असा अंदाज आहे की सिंबियनवर चालणारे एखादे फुल्ल फ्लेज्ड ब्राउजर गमभनच्या जावास्क्रिप्ट चालवु शकेल .. थोडे प्रयोग करुन नक्क्की सांगेन्

ब्राऊजर पेक्षा ..

ब्राऊजर वर चालेल म्हणजे औफ लाईन (बिल्ट इन) ईमेल मराठीत लिहीता येणार नाही अशी भिती मला सतावत् आहे. विंडोबेस्ड मधे असे होणार नाही असे वटते.
सौफ्टवेयरचे अ ब क ड माहीती नसल्याने ही माझी मर्यादा आहे. क्रुपया खुलासा करावा.

जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.

प्रयोग्

विंडो बेसड ऑफ्फलाइन मराठी टंककाचा दुवा मी आधीच आपणास दिला आहे. सिंबियनबाबत आधी म्हटल्याप्रमाणे थोडे प्रयोग करुन नक्की सांगेन. हा झाला खुलासा.
बाकी पुढील बोलणे आपण खरडवहीतुन करुया.

भ्रमणध्वनीवर देवनागरी

जुना धागा वर आणल्याबद्दल क्षमस्व (नवा धागा काढणे आवश्यक असल्यास कृपया संपादकांनी मला तशी सूचना द्यावी ही विनंती.) परंतु मी अशाच सुविधेच्या शोधात होतो.
नऊ वर्षांपूर्वी नोकियाच्या ३५३० (एस४०) मध्येही देवनागरी टंकन शक्य होते (उपयोग जुजबीच झाला). नोकिया ७५०० प्रिझमवरून (एस४०) मी उपक्रमवर अनेक प्रतिसाद लिहिले. परंतु, गेले दीड वर्षभर नोकियाच्या सी६-०० या बाकी चांगल्या सिंबियन सेलमुळे देवनागरी टंकनाला मी मुकलो होतो. अगदी, उपक्रमवर लॉगिन करण्यासाठीही मला माझे सदस्यनाम लिहिणे शक्य नव्हते, माझ्याच जुन्या प्रतिसादांत असलेले माझे सदस्यनाम कॉपीपेस्ट करून लॉगिन करावे लागे.
काही ऑनलाईन विज्युअल/फोनेटिक कीबोर्ड सापडले परंतु ते ऑपेरा मोबाईलवर नीट चालले नाहीत. अँड्रॉईड/आयफोन/विंडोजवाल्यांना काही चांगली सुविधा असल्यास मला माहिती नाही.
शेवटी, मी स्वतःच एक सोय बनविली आहे. ती येथे उपलब्ध आहे. तेथे टंकलेला मजकूर कॉपी करून कोठेही वापरावा असा उपयोग अपेक्षित आहे. काम अजून पूर्ण नाही, परंतु काही वाक्य्रे टंकण्यापुरती माझी अडचण मिटलेली आहे. ही सुविधा उपयुक्त करण्यासाठीच्या कल्पना सुचल्या, तर स्वागत आहे. विशेषतः, अर्गॉनॉमिक्सचे विचार अपेक्षित आहेत.
संस्थळाची मोबाईल आवृत्ती काढल्यास यासारखीच सुविधा देता येईल अशी मला आशा आहे.

धन्यवाद!

अगदी, उपक्रमवर लॉगिन करण्यासाठीही मला माझे सदस्यनाम लिहिणे शक्य नव्हते, माझ्याच जुन्या प्रतिसादांत असलेले माझे सदस्यनाम कॉपीपेस्ट करून लॉगिन करावे लागे.
कमाल आहे? माझ्याकडे सोनीएरिकसनचा सेल्यूलर फोन आहे. तो जावावर आधारलेला आहे. त्यावर मराठी कॉपी पेस्ट देखील होत नाही. करसर ते टेक्स्ट पकडतच नाही.

तुम्ही केलेले काम संगणाकवर बरं दिसतयं! सेल्यूलरवर उघडतं का ते पाहून सांगेन.
तुम्ही पुरवलेल्या ह्या सोयीबद्दल धन्यवाद!

आभार

प्रोत्साहनाबद्दल आभार.
टचस्क्रीनवाल्या सर्वच मोबाईलवर देवनागरी लिहिण्यासाठी त्या स्क्रिप्टांचा उपयोग होईल अशी आशा आहे, गेल्या काही दिवसांत मी त्या पानामध्ये सुधारणा केल्या आहेत. सध्या काही मारामारी सुरू नसल्यामुळे मला त्याचा उपयोग झाला नाही, मोबाईलवरून मराठी वाचणार्‍यांनी त्याच्या उपयुक्ततेची चाचणी करावी आणि सुधारणा सुचवाव्यात ही विनंती.

 
^ वर