महाविद्यालयीन ग्रंथालयांचे व्यवस्थापन

अनुदानित किंवा विना-अनुदानित महाविद्यालयांमध्ये (१) ग्रंथालयाची जागा किती / कशी असावी?, (२) ग्रंथ संग्रह व इतर वाचन आणि वाचनेतर संदर्भ साहित्य किती / कसे असावे?, (३) ग्रंथालयाचा कर्मचारी वर्ग किती / कसा असावा?, (४) ग्रंथालयाच्या वाचकांना कोणत्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात?, (५) ग्रंथालयाचे कामकाज कसे असले पाहिजे? ह्या सर्व गोष्टींसाठी विद्यार्थी संख्या व इतर कोणते निकष युजीसी / नॅक ने लावले आहेत, ह्या बद्दलची माहिती प्रत्येक महाविद्यालयिन ग्रंथालयाकडे असणे आवश्यक आहे, असे वाटते.

महाविद्यालयिन ग्रंथालयांसाठी नॅक ( NAAC) ने दिलेल्या गाइडलाइन्स मध्ये फक्त काय असावे हे दिले आहे, पण किती व कसे असावे ह्याबद्दल कोणतीही मार्गदर्शक तत्वे दिलेली नाहीत.

ह्या बाबतीत जर कोणी जाणकार व्यक्ती माहिती देऊ शकत असेल तर हवी आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

विचारुन सांगतो !

युजीसीने एक मार्गदर्शक पुस्तिका नॅक पूर्वी प्रत्येक महाविद्यालयाला पुरवली होती त्यात असे म्हटले आहे (ग्रंथापालाने तोंडीच माहिती पुरवली) की, प्रत्येक महाविद्यालयाच्या परिसरात ग्रंथालयासाठी स्वतंत्र इमारत पाहिजे. ग्रंथालयाचे संगणीकरण झाले पाहिजे, स्वतंत्र वाचन कक्ष (विद्यार्थी-विद्यार्थीनीसाठी), अद्यावत संदर्भ पुस्तके, नियतकालिके, अभ्यासक्रमातील पुस्तके,कॅटलॉग, इत्यादी-इत्यादी.

युजीसीने दिलेली मार्गदर्शिका वाचली तर आपल्याला बरीच माहिती मिळेल.

-दिलीप बिरुटे

महाविद्यालयीन ग्रंथालयांचे व्यवस्थापन

नॅक (NAAC) ही कक्षा युजीसी अंतर्गतच असून नॅक ने दिलेल्या गाइड लाइन्स उपलब्ध आहेत. त्या वाचल्यानंतर असे समजते कि महाविद्यालयिन ग्रंथालयात कोणत्या गोष्टी असाव्यात. पण त्यावरून हे स्पष्ट होत नाही कि त्या कशा व किती प्रमाणात (Ratio) असाव्यात?
उदाहरण -
समजा, एकूण विद्यार्थ्यांची संख्या एक हजार आहे तर त्यास अनुसरून वाचन कक्षाची बैठक व्यवस्था किती असावी? किती विद्यार्थ्यांमागे एक संगणक उपलब्ध असावा?
ग्रंथपाल, साहाय्यक ग्रंथपाल, ग्रंथालय साहाय्यक, ग्रंथालय परिचर, इ. कर्मचार्यांची नेमणूक करताना किती विद्यार्थ्यांमागे एक व्यक्ती ?

युजीसीने काही वर्षांपूर्वी आयोजित केलेल्या वर्कशॉप मध्ये ग्रंथालय कर्मचार्यांच्या नियुक्तीबद्दल नमूद केले आहे पण त्यानंतर जर काही बदल झाले असतील तर त्याचा उल्लेख मला कुठे आढळला नाही.

 
^ वर