उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
गुढविद्या-भुतेखेते याविषयी माहीती
सचिन मधुकर परांजपे
April 21, 2007 - 12:51 pm
मी स्वतः एक् ज्योतिष मार्गदर्शक् असुन् भारतीय तत्वद्न्यान् आणि गुढविद्यांचा शास्त्रदशुध्द् अभ्यासक् आहे ....भुते आणि आत्मे यांचे वास्तुमधुन् उच्चाटन् करणे व त्यांना मुक्ति देणे असले माझे प्रकार् सुरु असतात....याविषयी कोणाला काही मार्ग्दर्शन् हवे असल्यास् चर्चा सुरु ठेऊया
सचिन् मधुकर् परांजपे
दुवे:
Comments
वा! वा!
भुते आणि आत्मे यांचे वास्तुमधुन् उच्चाटन् करणे व त्यांना मुक्ति देणे असले माझे प्रकार् सुरु असतात....
वा परांजपे साहेब, आप तो काम के आदमी लगते हो!
कधी कधी माझ्या स्वतःच्याच अंगात (म्हणजे माझी शरीररुपी वास्तू हो! तशी ऐसपैस आहे बरं का!! :)) भूत येतं आणि मी निरनिराळ्या मराठी संकेतस्थळांच्या प्रशासकांना आणि मालकांना यथेच्छ शिव्या देऊ लागतो! ;) कालांतराने ते भूत उतरतंही परंतु यावर काही जालीम उपाय आपण करावा अशी आपल्याला नम्र विनंती.
I am serious. कृपया हलके घेऊ नका... ;))
आपला,
(पिंपळावरचा समंध!) तात्या.
शुद्धलेखन
भारतीय तत्वज्ञान आणि गूढविद्यांच्या शास्त्रशुध्द अभ्यासासोबत आपण मराठी शुद्धलेखन व येथील टंकप्रणालीचाही थोडा अभ्यास करावा ही नम्र विनंती. अन्यथा आपणास काय म्हणावयाचे आहे हे बर्याच जणांना कळणार नाही.
भूतप्रेत व गूढविद्या हा माझ्याही आवडीचा विषय आहे. आपल्या माहितीची वाट पाहत आहे.
धन्यवाद.
गुढविद्या-भुतेखेते
मी भुता पेक्षा याला "तो"लागलाय.याला "ती" लागली असे ऐकले नाही ,पाहीलेले आहे.ते सत्य असते का ? आपण वर उल्लीखलेले विषयांचे काही उदाहरणे मला वाचायला नक्कीच आवडतील.?
आपला
भुताखेताच्या विषयाला डचकणारा.
लागणे.
मिलिंदराव.
लागणे,(क्रि.)या अर्थाने हा शब्द मी वापरला.फारशी तुन हा शब्द आला आहे का ? हे मला माहीत नाही.
१.चिकटणे, जुळणे,२.स्पर्श करणे;शिवणे,३.लावणे.४.मूळ धरणे;रुजणे. ५.मार बसणे,६.मिटणे;बंद होणे,७. नाते असणे;संबंध असणे.
८.बहर येणे,फळ धरणे.
पैकी मी क्र.१ च्या अर्थाने हा शब्द वापरला असावा असे वाटते.
संदर्भः- साकेत शालेय मराठी शब्दकोश. संपादक :- स. ध. झांबरे. प्रु.क्र.२८०. प्रथम आव्रुत्ती २००१ किंमत चारशे रु.
मस्त!
खूपच रंजक विषय. लवकर लिहा!
हे असं खरंच असतं ?
भुतं खेतं खरच असतात? कमाल आहे .
नीलकांत
काही प्रश्न.
"भुते आणि आत्मे यांचे वास्तु मधुन उच्चाटन् करणे व त्यांना मुक्ती देणे असले माझे प्रकार सुरू असतात"
०. भूत असेल तर मुळात त्याचे उच्चाटन का करायचे?
१. असं करण्या साठी काय काय करावं लागते?
२. आणी वास्तू मध्ये भूत आहे हे कसे समजते?
३. एकदा भूत आहे समजले तर ते कोणते भूत आहे कसे ठरवले जाते?
४. हे कोण ठरवते? या मागचे निकष काय आहेत?
५. या मध्ये आपला अधिकार काय?
६. हा अधिकार कसा ठरतो?
७. शास्त्रशुद्ध अभ्यासक म्हणजे काय - कोणत्या संस्थेतून हे शिक्षण आपण घेतले आहे?
८. भुता कडे ही काही खास शक्ती असतील असे मानून, समजा प्रतिक्रिया दिली तर काय केले जाते?
असे काही प्रश्न आम्हाला पडले बुआ!
आपला
(पछाडलेला) अण्णा
अपेक्षा
परान्जपे साहेब
अण्णान्च्या सर्व प्रश्नान्च्या उत्तरान्चि आपल्याकडुन अपेक्षा आहे.
धन्यवाद
भूता खेतांचा दोस्त?
चला, एक नविन भूत् दाखल झालं. काहि तरी नविन विषय मिळणार!
अंनिस च्या कार्यकर्त्याना नव्याने डोकेदुखी.
जंतरमंतर.
भूतप्रेत, जादुटोणा, पिशाच्च उतरवायचे जंतरमंतर उपाय आमच्याकडेही आहेत. श्री भोलेनाथाची घोर तपस्या करून आम्ही ते प्राप्त केले आहेत.
जय भोलेनाथ!
बाबा त्रिकाल.
भुत आला .पळा आता.
तुम्ही सिध्द करूनच दाखवा भुत आहेत ते .
संकेतस्थळावरच्या एकावर तरी लिंबू फिरवून बघा. आम्ही टाचण्या लावण्याचे काम करतो.
-एका सुंदर तरूणिचे जिवंत भुत रोज रात्री मला दिसते. काय कारण असेल तिच्या दिसण्याचे कळत नाही. कृपया मार्गदर्शन करा.
आपला(अं. नि. स वाला)
कॉ.विकि
भुते
विषय् खरंच गंभीर् आहे .....या क्षेत्रातील आमचे श्रेष्ठत्व वादातीत आहे असं मी समजतो याला कारण् अनुभवाची शिदोरी हे आहे..कोणत्याही संस्थेतुन डिग्री मिळवली नाही कारण तशि गरज् भासलीच नाही मला...पातंजल योगशास्त्राचा अभ्यास कोल्हटकर् आणि रजनीशांच्या माध्यमातुन् केला आणि ध्यानधारणेच्या सिध्दींच्या मागे लागलो...."त्रयमेकत्र संयमः: " साध्य झाल्यानंतर् हे सगळे खेळ् सुरु केले ,लोकांना अनुभव् आले आणि त्यांनीच मग मला डोक्यावर् घेतला आता....व्यावसायिकपणे हे सगळं सुरु आहे
सचिन मधुकर् परांजपे
भुतांविषयी
भुतांविषयी माहिती सांगा.
प्रतिसादातील व्यक्तिगत रोखाचा भाग काढून टाकला आहे. कृपया, अशाप्रकारचे विधान टाळावे ही विनंती - उपसंपादक.
नेमकं काय ते कळू द्या की राव!
परांजपे साहेब,
हा भुता खेतांचा प्रकार नेमका काय ते कळू द्या की आम्हाला. आणि नेमक्या कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला लोकांनी डोक्यावर घेतले तेही कळेल.
नीलकांत
ईनोद
दोन भुते गप्पा मारत बसलेली होती.
भूत १: अरे, अरे, तो बघ माणूस
भूत २: काहितरीच बडबडू नकोस. माणूस बिणूस काही नसते. सगळे मनाचे खेळ असतात.
क्लास..;)
काहितरीच बडबडू नकोस. माणूस बिणूस काही नसते. सगळे मनाचे खेळ असतात.
क्लास..;)
आपला,
(माणूस) तात्या.
हाहाहाहाहा
हाहाहाहाहा,
कोकणात झाडाझाडावर भुते आहेत असे म्हणतात.
कोकणात चरीभरी नावाचं एक भूत असतं.
ते गावभर चरून त्याच्या धन्याचं घर भरतं, असं म्हणतात.
ते तुम्हाला वश असेल तर आम्हाला जरूर कळवा. आम्ही तसे एक भूत आपल्याकडून विकत घेऊ.
आपला,
(वांग्याभूत) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
भुताटकी.....
लहान असताना भुतांना पहण्याची फार् इच्छा होती
पण आत्तापर्यत हिटलर सरख्या भुतांचा परीचय (इतिहासावरुन :) ) झाल्यावर अजून भूतं पाहण्यची इच्छा नही
विषय आणि प्रतिसाद फारच मस्त आहेत (सगळे माणसांनीच लिहील्यासारखे वटतात)
....अनघा
राम गोपाल वर्मा
राम गोपाल वर्मा यांचे या कामी मार्गदर्शन घेता येईल. भूताटकीचे चित्रपट काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. रंगिलामधून आणलेल्या उर्मिलाला त्यांनी भूत मधून मुक्ती दिली.
भूतं फक्त आपल्याकडे असतात की जगात सगळीकडे? काही किस्से वगैरे??
आवडलं!
हाहा! हे बाकी एकदम खरं! वाक्य मस्तच सुचलं आहे.
वा!
रंगिलामधून आणलेल्या उर्मिलाला त्यांनी भूत मधून मुक्ती दिली.
वा! छान वाक्य आहे..
बाकी उर्मिलाला पाहून आपण तर साला घायाळच होतो! लई भारी आयटम आहे बॉस..
तात्या.
अण्णांच्या प्रश्नाला उत्तरे ?
परांजपे साहेब,
आपण अण्णासाहेबांच्या प्रश्नांना हळूच बगल दिली आहे.
असे संशयपिशाच्च आमच्या मनी आले आहे.
तेव्हा याचा बंदोबस्त करावा!
आपला
(पिशाच्च पिडित) गुंडोपंत
विषयाला बगल दिलि नाहीये...
मित्रांनो झालयं काय कि या महराष्ट्र सरकारच्या डोक्यावर् हे भारनियमनाचे भुत बसले आहे त्यामुळे मनात् असुनही तुमच्याशि संपर्क ठेवता येत नाही...या लोडशेडींगच्या भुतावर् निदान माझ्याकडे तरी इलाज नाहीये!!!!
सचिन