उपद्रवी सदस्यांना कसे हाताळावे ?

कुठलेही चांगले काम् हातात् घेतले की त्यात मोडता घालू पहाणार्या लोकांची महाराष्ट्रात् कमी नाही. आता या किंवा इतर् अशाच् लोकप्रइय् वेबसाईटचे पहा. त्या साईटचे नियम् धाब्यावर् बसवून् धांगडधीम्गा करून् वातावरण् दुषित् करणयात् काही मंडली आघाडी वर् असतात्.

मला तर् असे दिसले आहे की तिच् ति॰ह् मंडळि आसतात्. कुणाला शिवा देण्यचा शौक्, तर् कुणाला प्रशासकांनी सारखे आपल्या फालतू इमेलला उत्तरे द्यावीत् असा आग्रह्. वात् घालायला आनी लेखनस्वातंत्र्य या नावाने गळे काढायला पुढे . वेळोवेली साईट् सोडुन् जातो म्हणनार् आनी पुन्हा परत् येणार्. कोणाला तर् आपनच् मराठी ईंटरनेटचे तारणहार् असे वाटते आणि स्वतः कुथ्लेच् संकेत्स्थळ् सुरु न् करता ब्लॉगवर् वगैरे तद्न्य असलाच्या थाटात् लेखावर् लेख्..

यांचा कसा बंदोबस्त् करता येईल् ? सर्व् संकेतस्थळाच्या प्रशासकांनी एकत्र येउन् यांना बॅन् केले तर् कसे ? म्हणजे हा उपद्रव् तरी थांबेल्.

आपले मत् मांडा.

लेखनविषय: दुवे:

Comments

योग्य मुद्दे!

काय वेलणकर साहेब, इकडे कुठे? ;)

ओळखलंत का? अहो मी तात्या! ;)

सर्व् संकेतस्थळाच्या प्रशासकांनी एकत्र येउन् यांना बॅन् केले तर् कसे ? म्हणजे हा उपद्रव् तरी थांबेल्.

अगदी खरं आहे! आपले मुद्दे अगदी योग्य आहेत.

आपला,
(मानभावी!) तात्या.

ता क - शुद्धलेखनाची बाकी तुम्ही मस्तच करून टाकली आहे! ;)

कडक कारवाई आवश्यक

अशा सदस्यांना निलंबित करावे, हा प्रश्न् अशा सदस्यांना (बहुदा) सामाजिक जाणीव नसल्यामुळे उद्भवतो. जी शिकविणे आपले काम नाही.

पण.......................

मोडता पाय घालणे आपली परंपरा आहे. आपली परंपरा आपण जपली पाहिजे की नाही. त्यामुळे यावर विचार व्हावा ही इच्छा !
आपला
कॉ.विकि

समजले नाही.

आपले अशुद्धलेखन अजिबात समजले नाही.

कृपया आपण टंकलेल्या खालील शब्दांचे अर्थ दिल्यास आपल्या चर्चाविषयाचा ढोबळ अंदाज येईल असे वाटते.

पहाणार्या
लोकप्रइय्
धांगडधीम्गा
करणयात्
तिच्
ति॰ह्
मंडळि
मंडली
आसतात्
देण्यचा
शिवा शौक्
आनी
वेळोवेली
सोडुन्
म्हणनार्
आपनच्
कुथ्लेच्
तद्न्य
असलाच्या
येउन्

आपल्या दुरुस्त चर्चाप्रस्तावाची वाट पाहत आहे.

माझा ह्या प्रस्तावाशी संबंध नाही.

मी सुमारे ३ वर्षांपूर्वी मनोगत हे संकेतस्थळ सुरू केले ह्याची कदाचित इथल्या काही सदस्यांना माहिती असेल; मात्र ह्या चर्चेचा प्रस्ताव येथे ठेवणारे वेलणकर हे सदस्य इतर कोणीतरी असून माझा ह्या चर्चेच्या प्रस्तावाशी काहीही संबंध नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.

कळावे
-महेश वेलणकर

मिलिंदराव,आमचा मानाचा मुजरा घ्यावा.

आपण मनोगत हे संकेतस्थळ सुरू केले (आता जरी चालवत नसाल तरी) त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
येथे देखील आपले माहितीपूर्ण प्रतिसाद यावेत, हीच इच्छा.

भन्नाट.

क्या बात है!

(ह्या शब्दाच्या वृत्तातच जवळचेच एक नावही स्पष्ट होते.)

क्या बात है मिलिंदशेठ, क्या बात है..

वाटलच मला ...

महेशराव खुलाशा बद्दल आभारी, नसता तुमच्या बद्दल म्हणजे प्रशासकांचे संकेतस्थळाब द्दल च्या धोरणाबद्दल आणखी वाइट मत झाले असते .आणि हे जे कुनी वेलणकर आहेत.ते सदस्यांमधे भांडणे व्हावेत याच उद्देशाने त्यांनी असा विषय निवडला असावा असे वाटते.खरे तर अश्या आगलाव्यांना कसे रोखले पाहीजे याची चर्चा झाली पाहीजे.

:)

:) पुनश्च हरी ॐ!!!

पल्लवी

कोण हे वेलणकर ?

या वेलणकरांना एकदम हे असे काय झाले ? ते म्हणतात तसे तर ईथे काहीच भांडण वगैरे दिसत नाही. काहितरी वाद पेटवुन द्यायचा एवढाच उद्देश दिसतो.

विनंती

वेलणकरांच्या (गैर)नावचा (जाणूनबुजून)वापर करत सुरू केलेल्या या चर्चेतील मूळ मुद्याला (उपद्रवी सदस्यांना कसे हाताळावे) सोडून असलेले सारे प्रतिसाद (या सकट) हटवावेत ही उपक्रमांना विनंती. चर्चेत व्यक्तिगत उल्लेख टाळून मुद्याला धरून लिखाण करावे ही प्रतिसादकर्त्यांना विनंती.

(शक्य झाल्यास मूळ चर्चा प्रस्तावातील शुद्धलेखनाच्या चुका सुधाराव्यात.)

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

सुधारणा

"(गैर)नावचा (जाणूनबुजून)वापर"

ऐवजी "नावाचा जाणूनबुजून (गैर)वापर" हे योग्य होईल.

आगाऊपणाबद्दल क्षमस्व.

 
^ वर