शालेय व महाविद्यालयीन ग्रंथालयांचे व्यवस्थापन

बहुतांशी शाळा-महाविद्यालयांतील ग्रंथालये अजुनही अनेक कारणांनी उपेक्षितच राहिली आहेत.
आर्थिक क्षमता असूनसुद्धा जागेची कमतरता, त्यामुळे ग्रंथ व ग्रंथेतर साहित्यसंग्रह वाढविण्यावर, वाचन कक्षातील आसन क्षमतेवर व इतर सोयी-सुविधांवर आलेली बंधने, इ. बाबींची योग्य ती दखल का घेतली जात नाही हा प्रश्‍न अजूनही अनुत्तरितच आहे असे वाटते.

लेखनविषय: दुवे:

Comments

निरुत्साह व ग्रंथालयांचे महत्व काय याचीच जाणिव नसणे

माझा अनुभवही चांगला नाही. माजी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाकरिता कपाटे दिली तर त्यांना कायमचे
कुलुप लावून ठेवण्यात येते असे आढळून आले.
शरद

हं

यावर अनेक मान्यवर आपली मते मांडतीलच.
पण या आधीही हे अनेकदा येथे चर्चीले गेले आहे.

ग्रंथालयांची स्थिती सुधारणे फार आवश्यक आहे यात मात्र संशय नाही.

जस जसे पुस्तकांचे वितरण वाढेल तसे तसे ग्रंथालयांची कुलुपे कमी होत जातील असे वाटते.

आपला
गुंडोपंत

एक वेगळाच विचार

मांडू इच्छितो - अवांतर वाटल्यास आधीच क्षमा मागून ठेवतो.

आता शाळा महाविद्यालयांमधे 'ग्रंथालये' हा विभाग् 'आउट्सोर्स' करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक शाळेकडे योग्य त्या व्यक्ती, प्रणाली किंवा पुरेसे मनुष्यबळ असेलच असे नव्हे. एखाद्या संस्थेने (नफा अथवा विना नफा) ही सुविधा पुरवायची. ह्यानुसार त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्ती, प्रणाली ह्यांचा वापर करुन सुसूत्रता आणता येउ शकेल. त्याचप्रमाणे भौगोलिकदृष्ट्या जवळ असणार्‍या शाळांमधे (निवडक, महाग) ग्रंथांचे मागणीप्रमाणे हस्तांतरणही करता येउ शकेल. शाळांवरील ह्या कामाचा अतिरिक्त भार कमी होउन नविनतम सुविधा त्वरित मिळावयाचा मार्ग मोकळा होउ शकेल.

सहमत आहे

वाचकराव,
तुमच्याशी सहमत आहे.
पण हे स्थित्यांतर प्रत्यक्षात कसे आणायचे?
कायदाच करावा लागेल बहुदा!

कारण पुस्तक खरेदी हे मोठे सरकारी कुरण आहे आणि त्यात अनेक अधिकारी आणि नेते सध्या चरत आहेत.
हे चरावू गेंडे बाहेर हाकलल्या शिवाय काही खरे नाही!

वाचनलयांची पुस्तक खरेदी या क्षेत्रात थोडीफार चौकशी केलीतर अनेक हकिकती बाहेत येतात!.

आपला
गुंडोपंत

शालेय व महाविद्यालयीन ग्रंथालयांचे व्यवस्थापन

प्रति,
वाचक
आपला विचार अवांतर नाही पण ह्या विषयावर सर्व बाजूंनी विचार होणे आवश्यक आहे असे वाटते.
मुळात कोणत्याही शैक्षणिक संस्थेचे शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रंथालय हे प्रमुख आधारस्तंभ आहेत.
प्रत्येक वर्षी, विद्यार्थ्यांकडून फी आकारताना त्यात ग्रंथालय फीचादेखील समावेश असतो. त्या फीचा विनियोग करून दरवर्षी थोड्याफार फरकाने ग्रंथालयांची सुधारणा करता येईल.
ग्रंथालय ही वर्धिष्णु संस्था आहे असे म्हटले जाते. पण ही वर्धिष्णुता एका रात्रीत आकारास यावी असे अपेक्षित नाही. त्यासाठी वेळ हा लागणारच.
भौगोलिकदृष्ट्या जवळ असलेल्या ग्रंथालयांमध्ये पुस्तकांचे हस्तांतरण (इंटर लाइब्ररी लोन) यापेक्षा डॉक्युमेंट डिलिव्हरी सर्वीस अधिक योग्य होईल असे वाटते.
अपुर्‍या ग्रंथालय कर्मचारी वर्गाचा विचार केला तर अनेकजण असे आहेत ज्यांना ग्रंथालयाच्या कामाची माहिती आहे पण ते अजूनही बेरोजगार आहेत. कमी वेतनावर सुद्धा काम करण्याची त्यांची तयारी असते, पण त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे.

नोंद :- वरील विचार हे माझे वैयक्तिक मत आहे. आपली तसेच इतरांची मते त्यापेक्षा वेगळी असू शकतात.

शालेय व महाविद्यालयीन ग्रंथालयांचे व्यवस्थापन

विना-अनुदानित शाळा व महाविद्यालयांच्या ग्रंथालयांची नॅक (NAAC) च्या धर्तीवर योजनाबद्ध प्रगती कशी करता येईल? ह्यावर कोणी प्रकाश टाकू शकेल का?

संगणकीकरणाची आवश्यकता

अनुदानित महाविद्यालयांमधे पहिल्यांदाच 'नॅक' ला सामोरे जातांना इमारतींना रंगरंगोटी बरोबर केवळ कार्यालयीन कागदपत्रांची केवळ पुर्तता असाच तो भाग होता असे मला वाटते. त्यामुळे ग्रथांलयाच्या बाबतीत फार थोडा व्यवस्थितपणा आला होता . पुस्तक खरेदी नोंदवही, ग्रंथालयात असलेल्या पुस्तकांच्या नोंदी. आणि नियमित देवाण-घेवाणाच्या अद्यावत नोंदी सोडल्यास काही विशेष आमच्या महाविद्यालयात तरी झाले नाही. मात्र महाविद्यालयाच्या ग्रंथालयात असलेल्या पुस्तकांचे संगणकीकरणाची आवश्यकता आहे. त्यासाठी योग्य रीतीने पुस्तकांची मांडामांड करावी लागेल. जे आमच्याकडे अजूनही नाही. खूप पुस्तके असूनही पुस्तकाची मागणी करणार्‍याला ग्रंथालयात पुस्तक असूनही पुस्तक देता येत नसेल तर ते ग्रंथालय काहीच कामाचे नाही असे वाटते. मोठ्या ग्रंथालयात असतात तसे कॅटलॉग करुन 'पुस्तकाचे नाव किंवा लेखकाचे नाव' सांगितल्याबरोबर ताबडतोब पुस्तकाची यादी समोर आली पाहिजे. आणि मागितलेले पुस्तक देता आले पाहिजे अशी सोय आवश्यक आहे, असे मला वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संगणकीकरण

ह्या संगणकीकरणाकरिता आज अनेक विकत वा मोफत पर्याय उपलब्ध आहेत. हा दुवा पहा:
इंटिग्रेटेड लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम्स्
ह्यातले एखादे घेउन त्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून 'प्रोजेक्ट्' च्या धर्तीवर 'स्थापना, सुधारणा आणि देखभाल' करवून घेता येइल.

शालेय व महाविद्यालयीन ग्रंथालयांचे व्यवस्थापन

अनुदानित किंवा विना-अनुदानित महाविद्यालयांमध्ये (१) ग्रंथालयाची जागा किती / कशी असावी?, (२) ग्रंथ संग्रह व इतर वाचन आणि वाचनेतर संदर्भ साहित्य किती / कसे असावे?, (३) ग्रंथालयाचा कर्मचारी वर्ग किती / कसा असावा?, (४) ग्रंथालयाच्या वाचकांना कोणत्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात?, (५) ग्रंथालयाचे कामकाज कसे असले पाहिजे? ह्या सर्व गोष्टींसाठी विद्यार्थी संख्या व इतर कोणते निकष युजीसी / नॅक ने लावले आहेत, ह्या बद्दलची माहिती प्रत्येक महाविद्यालयिन ग्रंथालयाकडे असणे आवश्यक आहे, असे वाटते.

महाविद्यालयिन ग्रंथालयांसाठी नॅक ( NAAC) ने दिलेल्या गाइडलाइन्स मध्ये फक्त काय असावे हे दिले आहे, पण किती व कसे असावे ह्याबद्दल कोणतीही मार्गदर्शक तत्वे दिलेली नाहीत.

ह्या बाबतीत जर कोणी जाणकार व्यक्ती माहिती देऊ शकत असेल तर हवी आहे.

 
^ वर