सोनी अल्फा २०० के की कॅनन १०००डी

सोनी अल्फा २०० के व कॅनन १०००डी यांपैकी कुठला पर्याय निवडावा.
मान्यवरांनी मार्गदर्शन करावे... या प्रदेशात मी नवा प्राणी आहे..

लेखनविषय: दुवे:

Comments

वेबसाईट....

कृपया Dpreview.com या संकेतस्थळावर आपल्याला मार्गदर्शन मिळू शकेल. या संकेतस्थळावर दोन्ही कॅमेर्‍यांची तुलना करुन बघावी.

मला वाटते दोन्ही मधील कॅनन १००० डी कॅमेरा योग्य ठरेल. कॅननसाठी लेन्सचे बरेच चांगले तसेच किफायतशीर दरातले पर्याय उपलब्ध आहेत.
सोनीचा कॅमेरा घेण्याची काही गरज आहे असे वाटत नाही. कॅनन किंवा निकॉन या कंपन्यांच्या कॅमेर्‍यांचा विचार करावा.

-सौरभ.

==================

कॅनन

मला यातले काही कळत नाही परंतु एका कॅमेरावेड्या मित्राने माहिती दिली त्यावरून -
कॅनन ५ डी मार्क २ हा कॅमेरा जरा वरच्या श्रेणीत असला तरी हाच बरा आहे असे कळले.
यावरून उत्तम चित्रीकरणही करता येते.

आपला
गुंडोपंत

ह्म्....

काय राव गुंडोपंत! जवळजवळ दीड लाखाचा कॅमेरा तुम्ही सुचवत आहात.. एखाद्याने विचारलं की सँट्रो घेऊ की वॅगन आर घेऊ तर त्याला, "पुण्यात नुकतीच बीएमडब्ल्यूची शोरुम्स उघडली आहेत, त्याचाही विचार करा" असे सांगण्यासारखे आहे....:-)

-सौरभ.

==================

दिड लाख नाही ;)

सद्ध्या ९७००० बिल शिवाय मुंबईमध्ये आहे. छायाचित्रण हाच पोटापाण्याचा व्यवसाय असेल तर ही किंमत फार वाटत नाही. छंदाला जास्त वाटते :)

-
ध्रुव

अरे!

अरे! असे झाले का?
सॉरी माझ्या लक्ष्यातच आले नाही हो!

पण शक्य असेल घ्या तो कॅमेरा, तसे करण्यासाठी शुभेच्छा!
आणि येथे छान छान चित्रे डकवा!

आपला
गुंडोपंत

तुलना

Dpreview.com या संकेतस्थळावर दोन्ही कॅमेर्‍यांची तुलना केली असता, सोनी अल्फा २०० के उजवा वाटला, तसेच jjmehta.com या संकेतस्थळावर दोन्ही कॅमेर्‍यांच्या ३०० मी मी लेन्सेस जवळपास सारख्याच किमतीस भेटतात.
पुन्हा सोनी अल्फा २०० वर ३ years warranty आहे.
तरीही सोनीचा कॅमेरा घेण्याची काही गरज आहे असे वाटत नाही असे सौरभ यांना वाटते त्यावरुन नक्कीच सोनी अल्फा २०० मध्ये काहीतरी त्रुटी असव्यात.

बाकी गुंडोपतांनी सुचलावलेल्या कॅनन ५ डी मार्क २ हा कॅमेर्याची किंमत खिशाला मोठ्ठे भोक पाडणारी आहे.

सोनी

शक्य असेल तर सोनीची उत्पादने न घेतलेली बरी. त्यासाठी सोनीचीच उत्पादने घेणे गरजेचे असते. कदाचित त्या क्यॅमेराला सोनीचेच मेमरीकार्ड वापरावे लागते असे काही आहे का पहा.


असे वाटते

कदाचित त्या क्यॅमेराला सोनीचेच मेमरीकार्ड वापरावे लागते असे काही आहे का पहा.

या विशिष्ट मॉडेलबद्दल वैयक्तिक अनुभवाअभावी खात्रीलायकरीत्या बोलू इच्छीत नाही, (आणि कॅमेरा किंवा छायाचित्रण या प्रकारांबद्दल मला फारसे कळते अशातलाही भाग नाही,) परंतु ऐकीव सामान्यज्ञानाच्या आणि थोडेफार बाजारात जे काही पाहिले आहे त्याच्या आधारावर, सोनीच्या कॅमेर्‍यांना सोनीचेच मेमरीकार्ड (कॅमेर्‍याच्या मॉडेलवर अवलंबून मेमरी स्टिक किंवा मेमरी स्टिक प्रो ड्युओ किंवा तत्सम यांपैकी कोणतेतरी एक किंवा काही मोबाइल कॅमेर्‍यांच्या बाबतीत मेमरी स्टिक मायक्रो) लागते, असे दिसते. ही विशिष्ट मेमरीकार्डे बनवणारे सोनीव्यतिरिक्त इतर 'जेनेरिक' उत्पादक फारसे नाहीत (अपवाद म्हणून सॅनडिस्कची या जातकुळीतली मेमरीकार्डे पाहिलेली आहेत, परंतु इतर उत्पादकांबाबत ऐकलेले नाही.), त्यामुळे स्पर्धा कमी असल्याने (उदाहरणादाखल, सोनीव्यतिरिक्त इतर अनेक किंवा बहुधा 'ऑलिंपस'सारखे अपवाद वगळल्यास इतर बहुतांश कॅमेर्‍यांना चालू शकणार्‍या) एसडी जातीतल्या मेमरीकार्डांच्या तुलनेत ही मेमरीकार्डे महागात पडतात असे निरीक्षणाअंती वाटते.

अर्थात, मेमरीकार्डावर चित्रे कायमस्वरूपी साठवून न ठेवता अधूनमधून ती संगणकावर डाउनलोड करून मेमरीकार्डावरून पुसून टाकून मेमरीकार्ड पुन्हापुन्हा वापरायचे असेल, तर हा एका वेळचा अधिकचा खर्च मानता यायला हरकत नसावी, असे वाटते. (अर्थात, हे शेवटचे मत हे 'ओपन थिंकिंग' किंवा 'खुद के साथ बातां' प्रकारातले असून त्याला अनुभवाचे कोणतेही पाठबळ नसल्याने ग्राह्य मानू नये, हे ओघाने आले.)

चूभूद्याघ्या.

हेच तर

हेच तर सोनीचे लफडे आहे. जोवर सगळ ठिक चालू आहे तोवर ठिक. पण एकदा का बिघडलं की सोनी शिवाय पर्याय नाही आणि ते सहज साध्य नाही.


सोनी नको...

सोनी नको. फक्त Dpreview.com यावर जाऊ नका. कॅनॉन व निकॉन अनेक वर्षे एसएलाअर श्रेणीत उत्तमोत्तम कॅमेरे आणत आहेत.
तसेच jjmehta.com वरील सगळ्या किंमती विश्वासार्ह आहेत असे नाही. कॅनॉनच्या ७०-३०० लेन्स् पेक्षा ५५-२५० लेन्स् जास्त चांगली आहे असे समजले जाते. त्यामुळे नुसत्या लेन्स मिमिवर काहीही ठरवण्यापुर्वी बराच विचार करावा अशी विनंती.

निर्णय तुमचा आहे. मला विचारले असता मी खालील गोष्टींचा विचार केला असता.
१. वेगवेगळ्या लेन्सेसची उपलब्धता
२. किंमत
३. छायाचित्राचा दर्जा.
४. कॅमेराची घडण
५. रिसेल :)

वरील सर्व बाबतीत सोनीपेक्षा कॅनॉन उजवा ठरेल असे वाटते. निकॉनमध्येही पर्याय आहेतच. नुकताच (३० जुलैला) निकॉननी नवा डी३००० हा कॅमेरा आणला आहे. हा त्यांच्याच वर्षानुवर्षे प्रचंड खपाच्या डी४० ला बदलेल असे वाटते. तसेच आत्तातरी किंमत कमी आहे असे कळते (३०००० ते ३५०००)

तुमचा वापर व गरज या दोन्ही गोष्टी बघा. एसएलाआर कॅमेरा ही मोठी वस्तु आहे (माझ्यासाठी तरी) विचारांती निर्णय घ्या.

मी तुमच्या जागी असतो तर कॅनॉन ४००, निकॉन डी५०००, डी३००० या पर्यायांचाही विचार केला असता.

थोडं बजेट अजून वढवता येत असेल तर निकॉन डी९०, डी३००, डी३००एस(नवा आहे, विक्री सुरु नाही झाली अजुन) अथवा कॅनॉन ४५०डी, कॅनॉन ४०डी यांचाही विचार केला असता.

मुंबईमध्ये कॅमेरे घेता अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेक दुकाने, वेगवेगळ्या किंमती. तुम्हाला सर्वोत्तम कॅमेरा मिळेल ही शुभेच्छा!

-
ध्रुव

ओके...

५ डी मार्क टू ची किंमत जेजे वरच बघून सांगितली होती... :-) १ लाख ३९ हजार लेन्सशिवाय.

अर्थातच तिथल्यापेक्षा स्वस्त इतरत्रही मिळू शकेल.

-सौरभ.

==================

सहमत

सोनी नको याच्याशी सहमत आहे. सोनी क्यामेर्‍याचा प्रत्यक्ष अनुभव नाही. पण सोनी कंपनीचा अनुभव चांगला नाही.

मी आणि दुर्दैव, दोघांनी जाऊन सोनीचा एमपी३ प्लेअर खरेदी केला. तो संगणकाला जोडल्यावर लक्षात आले की त्यात गाणी टाकायची तर फक्त सोनिकस्टेज नावाचे त्यांचे सॉप्फ्टवेअरच चालते. सोनिकस्टेजपुढे विंडोज थंड वार्‍याची झुळूक आहे. याला पर्याय म्हणून आंतरजालावर शोधले असता सर्व लोक या सॉफ्टवेअरच्या नावाने कंठशोष करत असल्याचे दिसले. तेव्हापासून सोनी या नावावर बहिष्कार टाकला आहे.

तात्पर्यः सोनीचे हार्डवेअर छान आहे पण सॉफ्टवेअर केवळ करायचे म्हणून करतात असे वाटते. क्यामेरा डिजीटल असल्याने यात सॉफ्टवेअर लागणारच. शिवाय क्यामेर्‍यांच्या जगात कॅनन, निकॉन ही नावे विश्वासार्ह आहेत. तेव्हा त्यांचा विचार करावा असे वाटते.

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

सोनी अनुभव

:) सोनीच्या हँडिकॅमचा सुद्धा असाच अनुभव आहे. विस्टावाल्या नव्या लॅपटॉपवर तो जोडता येत नाही. जोडायचाच असेल तर १५०० रु. ची नवीन केबल घ्यावी लागते सोनीचीच.
विषयांतर होईल म्हणून नाहीतर सोनीचे अनुभव अशी वेगळी चर्चा टाकायला काही हरकत नाही. :)


सोनीचे चांगले अनुभव

माझ्याकडील डिजीटल म्हणता येतील अश्या सगळ्या वस्तु सोनीच्या आहेत; ज्यात क्यामेरा, मोबाईल फोन, ल्यापटॉप, हँडीकॅम, वेबक्याम, मेमरी कार्डे आदी गोष्टी आहेत.. सगळ्या वस्तु सोनीच्याच असल्याने वर उल्लेख केलेला कंप्याटीबीलीटीचा प्रश्न आला नाहि. शिवाय सगळ्या वस्तु उत्तम चालत आहेत (आता विस्टा फाल्तू आहे त्यात त्या बिचार्‍या(!) सोनीचा काय दोष)

(सोन्या)ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

वाईटच असे नाही

सोनीचे सगळेच अनुभव वाईट असे म्हणणे नक्कीच नाही. पण तुझ्या प्रतिसादात एक मुद्दा आहे की

माझ्याकडील डिजीटल म्हणता येतील अश्या सगळ्या वस्तु सोनीच्या आहेत;

तुझ्या सारखे सगळे सोनीचेच घ्यावे असा ग्राहकवर्ग तयार करण्याचे सोनीचे लक्ष दिसते. पण सोनी म्हणजे सर्वोत्तम नाही हे सत्य आहे. मला सोनीचा डिव्हीडी प्लेअर घेऊन त्यात फक्त शक्यतो सोनीच्याच डिव्हीडी वापराव्या लागत असतील तर काय फायदा?
एका ठराविक सेटअपमध्ये सोनीच्या सगळ्याच वस्तु उत्तम चालतात. पण त्यांना बदल सहसा झेपत नाही. साधे मेमरी कार्डचे उदाहरण घेऊ. सोनी-एरिकसनच्या मोबाईलला त्यांचेच मेमरी कार्ड लागते. जर समजा ४ जीबीचे कार्ड हवे असेल तर सोनीचेच घ्यायचे ज्याची किंमत समजा क्ष रु आहे. तर बाजारत ती ०.६*क्ष ला मिळते. पण त्या फायद्यासाठी मला माझ्या फोनवर पाणी सोडावे लागेल. ते शक्य नाही. मग मी झक मारत सोनी एके सोनी करत जातो. मनात नसताना. अर्थात मी सोनीचे चाहते सुद्धा पाहिले आहेत आणि सोनी नवीन तंत्रज्ञान बाजार आणण्यात अग्रेसर असते. पण सोनीला सोनीच हा आग्रह पटत नाही. अर्थात त्या आग्रहाचा दुराग्रह मानून इतर चांगली उत्पादने सुद्धा येतात हा एक मोठा मुद्दा आहे.
जसे मनोगतामुळे गमभन तयार झाले आणि त्यावर अवलंबुन इतर मराठी संकेतस्थळे... :)


सहमत

सोनी नवीन तंत्रज्ञान बाजार आणण्यात अग्रेसर असते. पण सोनीला सोनीच हा आग्रह पटत नाही.

सहमत आहे
हा आग्रह अयोग्यच वाटतो. माझी प्रत्येकवेळी सोनी खरेदी विविध कारणांनी , प्रसंगी योगायोगाने झाल्याने हा जाचकपणा जाणवला नाहि इतकेच.

तसेच मी सोनी वापरत असलो तरी वरील तज्ञ मंडळी कॅनन व निकॉन सांगत आहेत तेव्हा कॅनन वा निकॉन घेणे उत्तम (कारण मी क्यामेरा घेताना तो छान दिसतो + डील बजेटमधे बसले + माझ्या मित्रांकडे आहे + मैत्रिणीला आवडला ;) असल्या सर्वसामान्य कारणांमुळे घेतला आहे)

(छायाचित्रात चित्रापेक्षा छायाच अधिक पाडणारा)ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

विक्री पश्चात सेवा

विक्री पश्चात सेवा हा सुद्धा एक मोठा मुद्दा आहे. या बाबतीत मला निकॉनचा चांगला अनुभव आहे. कॅनॉनची सेवा चांगली असावी असे वाटते.


कॅनॉनची सेवा

कॅनन चा चांगला अनुभव आला.
माझ्या कॅनन कॅमेरा च्या सीसीडी मध्ये बिघाड झाला.
कॅनन ने हि त्यांचीच चूक असल्याचे मान्य केले.
माझा व माझ्या तीन-चार मित्रांचा कॅनन कॅमेरा त्यांनी ताबडतोब फुकट दुरुस्त करून दिला.

ठरलं का?

मगं... ठरल का कुठला घ्यायचा ते...?
-
ध्रुव

सध्यातरी नाही पण लवकरच....

आपल्या सर्वांच्या सुचनांबद्दल धन्यवाद, सध्यातरी नाही पण लवकरच घेईन कॅनन १०००डी .

 
^ वर