प्रसार माध्यमे व सप्तभगीनी

आजच्या काळात प्रसार माध्यमांचा बोलबाला आहे. तसा तो पुर्वी नव्हता असे नाही पण ज्या पध्द्तीने आज टी.व्ही माध्यमे एखादा विषय लावून धरतात त्याचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. मी माझ्या लिखाणात जी माहिती दिली ती मला मी त्याभागात गेल्यानंतर समजली. थोड्या खोलात गेल्यावर मला अनेक घटनांबद्दल सविस्तर माहिती मिळत गेली. इंटरनेट चा मला या संदर्भात फार उपयोग झाला. मला एका गोष्टीचे नवल वाटले ती ही की मला ईशान्य भारताबद्दल कळलेले संदर्भ व घटना या आजची तेथील परिस्थीती ही भारतासाठी शासनकर्त्यांना फारशी गंभीर वाटली नाही की त्याकडे मुद्दाम डोळेझाक केल्या गेली. प्रसार माध्यमांनी देखील याचा पाठपुरावा करुन सामान्य् जनतेला या गोष्टी कळाव्या असा प्रयत्न कां केला नाही. कारण तिथे जात पर्यंत मला देखील याबाबत फारशी माहिती नव्हती.

भारताच्या एकोप्याच्या दृष्टीने हे प्रश्न फार महत्वाचे आहेत आणि या विषयावर सांगोपांग चर्चा व्हावी असे मला वाटते आपले सुज्ञ सभासद यात गंभीरतेने सहभागी होतील यावर माझा विश्वास आहे.

 
^ वर