छायाचित्रः <नाव सुचवा>

एकदा कँटीनमधून पुन्हा कार्यस्थळाकडे जात असताना ऑफीसमधे पुढील ड्रुश्य दिसलं.. हातातील सोनी एरिक्सन डब्लू-७००आय ने तो क्षण टिपला आहे

या चित्राला काय नाव द्यावं ते समजेना.. तुम्हीच सुचवा

लेखनविषय: दुवे:

Comments

नाव दे :

नॉन स्मोकर फुलपाखरू! :)

मस्त फोटो आहे !

नॉन स्मोकर

फुलपाखरु बरोबर सिगरेटच्या चित्रावर जाऊन बसले आहे, तेव्हा ते नॉन स्मोकर फुलपाखरू कसे काय?

कारण्,

नॉन स्मोकींग झोनच्या पाटीवर बसले म्हणून्!

हलकी सुचना

माझे शिर्षक - हलकी सुचना - लाइट वॉर्नींग् - ह्या अर्थाने. फुलपाखराबारोबर हवेत उडणारी.

ती फुलराणी

सिगरेट सोडलेल्या सुरवंटाचे फुलपाखरू झालेले दिसते. चित्रासाठी ती फुलराणी हे नाव चांगले वाटते आहे. काहीही संबंध नसला तरी. पण अशी सुरेख फालतू नावे, शीर्षके मला खूप आवडतात. शिवाय ती फुलराणी पुलंचं नाटक आहे ना. तेच हो अनुवादित. जगातल्या कुठल्याही गोष्टीला कसेही करून पुलंशी, पुलंच्या साहित्याशी जोडता आलं की मला फार फार आनंद होतो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

प्रयत्न

फारसे चांगले शीर्षक नाही हे कबूल, पण 'नो फ्लाय झोन' कसे वाटते?

सुंदर

वा.. मस्त चित्र आहे. फार छान.

छान

चित्र आवडले. पाहून पॅसिव्ह स्मोकर असे नाव सुचले. नाव फारसे समर्पक नाही असे वाटते आहे.

----

छान

गन्स् अन् रोजेस् सारखे 'सिगरेट्स् अन् बटरफ्लाईज्' कसे वाटते?

शीर्षक-कम-स्लोगन

'लाईफ इज "फ्लीटिंग", एनीवे' हे चालू शकेल का? [अगदीच खांडेकरी वळणाचं वाटत नसल्यास :)]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

मस्त

हे नाव मस्त आहे.
अजून नावे येऊ द्यात.. उपक्रमी नावे ठेवण्यात अशी मागे बघुन आश्चर्य वाटले ;)

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

अवांतर

आतापर्यंत आलेल्या प्रतिसादांमधून धक्कादायक विदा समोर आला आहे. ८३% सदस्यांना शीर्षक मराठीत न सुचता आंग्ल भाषेत सुचले आहे. याचा अर्थ काय असावा? मराठीला भविष्यकाळात होणार्‍या अन्जायनाची ही पूर्वसूचना आहे का? तिला आत्ताच आयसीयूमध्ये दाखल करावे का? सध्या तरी मराठीची धुरा केवळ श्री. धम्मकलाडू आपल्या खांद्यावर वहात आहेत असे दिसते.

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

इंग्रजी शीर्षकबद्दल...

पाटीवरील मजकूर इंग्रजीत असल्याने शीर्षकासाठी चटकन इंग्रजी शब्द सुचणे स्वाभावीक वाटते आहे. मराठी नाही सुचले याला हे समर्थन होणार नाही पण सुचणे या प्रक्रीयेमागे असलेल्या क्रीया गुंतागुंतीच्या असूशकतात. त्यांबद्दल काही अंदाज वर्तवला.
-- (मनकवडा) लिखाळ.

धूर-अनारोग्य यांपासून इतरांना परावृत्त करणारा संदेश फुलपाखराला (फुलपाखरू आपल्याला आनंदी निरोगी उल्हसीत जीवनाचे प्रतिक वाटत असते) आवडला आहे त्यामुळे ते तेथे जाऊन बसले आहे असे मला चित्र पाहून वाटले. पण त्यासाठी एक-दोन शब्दांतले समर्पक शीर्षक सुचले नाही.
--लिखाळ.

फुकपाखरु..

फुलपाखरु "स्मोकींग" वरील बंदी हटवण्यासाठी प्रयत्न करत आहे असे दिसते. त्याला आपण 'फुकपाखरु' असे म्हणुया! :)

विसंगत

असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ! :-)

 
^ वर