रागांवर आधारित हिंदी मराठी गीते

हिंदुस्थानी रागदारीवर आधारित अनेक गीते आहेत. आपल्याला माहिती असतील तर रागाचं नाव व त्यावर आधारित गीते येथे द्याल. उदाहरणार्थ केतकी गुलाब जुही हे बसंत बहार चित्रपटातील गीत हे राग बसंत वर आधारित आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

बसंतबहार.

उदाहरणार्थ केतकी गुलाब जुही हे बसंत बहार चित्रपटातील गीत हे राग बसंत वर आधारित आहे.

माझ्या माहितीप्रमाणे हे गाणे बसंतबहार या जोड रागावर आधारीत आहे. आदरणीय तात्याजी अधिक खुलासा करतील.

- ईश्वरी.

हे पहा

www.parrikar.org

या राजन पर्रीकरांच्या संकेतस्थळावर अनेक रागांवर आधारित असंख्य गाण्यांचे तुकडे, क्वचित पूर्ण गाणीही आहेत. शिवाय अभ्यासपूर्ण विवेचन पण आहे. त्याशिवाय शास्त्रीय संगीतातील दिग्गज लोकांनी गायलेल्या रागांचे नमुने पण आहेत. एकंदरीत हे संकेतस्थळ माझ्या फारच आवडीचे आहे.

विनायक

यादी

इथे पहा.

बहोत खुब!

तुम्ही मिलींद नांवाची माणसेच हुशार हं! एवढा छान पसारा मांडलात कि यंव रे यंव . मानले बुवा तुम्हाला. दिल खुश!
थोडे मराठी गाण्यांबद्दल काही सांगाल का?

नुसतं गाणं आणि रागाचं नांव

नुसतं गाणं आणि रागाचं नांव हे सांगणारी संकेतस्थळं फारशी उपयोगी नाहीत. तर त्यातला सांगितिक भाग हा कुणीतरी शिकवावाही लागतो हे या मंडळींना माहीत नाही!

तात्या.

राग कसे ओळखावे?

संगीत सरिता-राग कसे ओळखावे हे डॉ. विठ्ठल ठाकूर यांचे पुस्तक वाचनीय आणि संग्राह्य आहे. मलपृष्ठावर छापलेले श्री. पु.ल. आणि अभिषेकी यांचे अभिप्राय सर्व काही सांगून जातात.

माझ्याकडे २००२ साली प्रसिद्ध् झालेली पाचविइ आवृत्ती (किं. ८० रुपये) आहे. अगदीच वाजवी किंमत वाटली.

कलोअ,
सुभाष

 
^ वर