पूर्वांचलातील आशेचे किरण
पूर्वांचलात झपाट्याने होत असलेले मतांतरण पाहून त्याच्या धोक्यापासुन आपल्या समाजाला वाचवून मूळ परंपरा,संस्कृती व उपासना पध्दती सुरक्षित ठेवण्यासाठी तेथील अनेक जनजातींमधील द्र्ष्ट्या महापुरुषांनी संघटना स्थापन केल्या. अरुणाचल प्रदेशमध्ये 'डोनी पोलो' पंथाची संघटना आहे, तर नागालँडमध्ये स्वातंत्रसेनानी राणी माँ 'गायडिन्ल्यू' ने स्थापन केलेली 'जेलियांग राँग हराक्का असोसिएशन' ही संघटना हिंदू नागांच्या परंपरा टिकवून ठेवते आहे. हिंदू अंगामींची 'जाफू फिकी फुतसाना' संघटनाही अशीच स्वपंथाच्या रक्षणासाठी कटिबध्द् आहे. मेघालयात तर १८९९ साली याच उद्देशाने 'बाबू जीबनरॉय' व त्यांच्या सहकार्यांनी 'सेंग खासी' ही संघटना स्थापन केली. तर जयंतियांमध्ये 'सेंग राज' ही सघटना स्थापन झाली. आज मेघालयात १७५ वर्षांच्या प्रयत्नांनंतर देखील मिशनरी ७०% पेक्षा अधिक मतांतरण करू शकले नाहीत, याचे प्रमुख कारण या संघटना आहेत. पण ही विषम लढाई आहे. मिशनरीं च्या मागे विदेशातील समृध्द् देशांतुन येणारा अमाप पैसा व तेथील राज्य सरकारांचे पाठ्बळ आहे तर या राष्ट्रीय भावनेनी पछाडलेल्या संस्था तुट्पुज्या पैशात आणी उर्वरित भारतिय आणी केन्द्र सरकारच्या उदासीनतेमुळे दुर्लक्षीत अवस्थेत आपल्या अस्मितेची लढाई लढत आहेत.
या संघटनांचे अनेक वर्षे एकलकोंडे प्रयत्न चालू होते, पण यांच्याच काही पुढार्यांनी एकत्र येऊन 'इंडियन ट्रायबल कल्चरल फोरम ची स्थापना केली व अशा सर्व लहान लहान संघटनांना एक मंच मिळू शकला.
भारतातीलच नव्हे तर जगातील प्रथम क्रमांकाची असलेली बिगरसरकारी, सामाजिक, सांस्कृतिक संस्था म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आहे. पूर्वांचलाच्या समस्येच्या बाबतीतही संघ त्या समस्येच्या स्वरुपाचा व गांभीर्याचा सखोल विचार करुन आवश्यक असलेली शक्ती तेथे उभी करण्याचा प्रयत्न करित आहे. मातृभुमीच्या या एकाकी पड्लेल्या अनमोल भागाच्या रक्षणासाटी संघाने गेल्या साठ वर्षामध्ये शेकडो प्रचारक तेथे पाठविले. त्यापैकी अनेकांनी तर स्वतःला संपूर्ण आयुष्यभरासाठी पूर्वांचलात वाहून घेतले.
लोकांमध्ये भारतमातेच्या भक्तीची भावना भिनवणार्या या संघटनेचे कार्य काही सहजपणे पूर्वांचलात पसरले नाही, तर भारतभक्ती जागवणार्या सर्व संस्थांना शत्रू क्रमांक एक मानणार्या अतिरेकी गटांनी संघाला देखील आपल्या 'हिट लिस्ट' वर अग्रक्रम दिला. संघाच्या तीन प्रचारकांच्या आसाममध्ये हत्या झाल्या. २७ जानेवारी १९८९ रोजी उत्तरप्रदेशातुन आसामात प्रचारक म्हणुन गेलेल्या 'स्व. ओमप्रकाशजीं ' ची उल्फाच्या अतिरेक्यांनी, श्रध्दांजली सभेत हात जोडून डोळे मिटलेल्या स्थितीत बसलेले असतांना पाठीमागून गोळ्या झाडून हत्या केली. पुण्यातून गेलेले प्रचारक 'स्व.प्रमोद दीक्षित' यांनी गुवाहाटीत स्वतः २७ वेळा रक्तदान केले, व स्वकीयांचेच रक्त सांडण्यास प्रवृत्त होत असलेल्या आसामच्या तरुणांना रक्तदानाचे महत्व शिकवून रक्तदाता सूचीचा प्रकल्प चालू केला. १६ ऑगष्ट १९९१ रोजी आसामच्या बरपेटा जिल्ह्याच्या सघ कार्यालयात शिरुन 'उल्फा' ने प्रमोदजींची हत्या केली. तर केरळ मधून आसामात पोचलेल्या 'स्व.मुरलीधरनजीं' ची देखील हालहाल करुन हत्या करण्यात आली. ५० वर्षे रक्त, घाम व अश्रुंचे सिंचन करुन संघाच्या स्वयंसेवकांनी आसामात राष्ट्रभक्ती जागवली. आज आसाममध्ये भारताच्या बाजुने अतिरेक्यांच्या विरोधात असमीया समाजाला संघटितपणे उभे करण्यात संघाला यश मीळतांना दिसत आहे.
आसाममधील चहाच्या मळ्यांमध्ये देखील स्वयंसेवकांनी प्रवेश केला. बालवाड्या व शाळांचे एकीकडे जाळे विणले तर दुसरीकडे भजनी मंडळे चालवून, व्हिडियोवर रामायण, महाभारत चित्रपटरुपाने दाखवणे व लगेचच त्याच्या भाषेत २५ मिनिटे प्रवचन करुन मिशनर्यांच्या धोक्यापासून सावध राहण्याचा संदेश त्यांना देणे इत्यादी मार्गांनी जागरणाचे काम चालवले. चहाच्या मळ्यांमध्ये देखील मतांतरणाला अटकाव करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संघाच्या स्वयंसेवकांनी केले.
मणिपूर व त्रिपुराच्या मैदानी भागांत राहणार्या मैतेयी व बंगाली समाजातही स्वयंसेवक उभे करुन त्यांच्याद्वारे फुटीरतेची भावना दूर करण्याचे कार्य संघ वेगाने करतो आहे.
अरुणाचल प्रदेश, नागालँडम् मणिपूर व त्रिपुराचा डोंगराळ भाग, मिझोराम व मेघालय इत्यादी स्थानी स्वयंसेवकांनी स्थापन केलेल्या सेवाभारती द्वारे कार्यकर्ते अविरत झटताना दिसतात.
पूर्वांचलात जन्म घेतलेल्या व संस्कृती रक्षणासाठी सज्ज एकांड्या शिलेदाराप्रमाणे वर्षानुवर्षे लढत असलेल्या 'सेंग खासीं' सारख्या संस्थांचे पाठबळ बनून त्यांची मरगळ दूर करण्याचे कामही स्वयंसेवकांनी केले. या संघटनांना एका मंचावर आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वनवासी कल्याणाश्रम् करतो आहे.
तेथे चाललेल्या कार्यांमध्ये एक महत्त्वाचा वाटा उचलण्यालाठी, तेथील गरीब व गरजू विद्यार्थि-विद्यार्थिंनीसाठी वसतिगृहे चालविण्यास पुणे, लातुर् येथे प्रारंभ केला. नाशिक येथील 'राष्ट्रीय संस्कार मंडळ', संभाजीनगरातील(औरंगाबाद) 'मराठवाडा युवक विकास मंडळ ', डोंबिवलीतील 'अभुदय प्रतिष्ठान', रत्नागिरीतील 'राष्ट्रीय सेवा समिती' इत्यादी संघटनांना अशा प्रकारची वसतिगृहे चालविण्यासाठी उद्युक्त केले. याशिवाय सांगली व परभणी अशा ठिकाणी चालविण्यात येत असलेल्या 'पूर्वांचल विद्यार्थी कल्याण प्रकल्पां' मध्ये एकूण १०० पेक्षा अधिक जनजातीय विद्यार्थी - म्हणजेच उद्याच्या पूर्वांचलाचे भाग्यविधाते घडत आहेत.
जून २००१ मध्ये चिंचवड येथील 'तात्या बापट स्मृती समिती' च्या माध्यमातून मणिपूरच्या उखरुल या जिल्ह्यातील तांखुल नागांच्या ख्रिस्ती विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरु करण्यात आले. स्व्. भैय्यजी काणे यांनी जेथे अनेक वर्षे काम केले तेथील भारतप्रेमी नागांनी अत्यंत उत्साहाने आपली मुले संघ कार्यकर्त्यांना घडविण्याच्या हेतूने दिली आहेत.