हलन्त
मी अगदी लहान असताना नुकतीच जेव्हा बाराखडीची ओळख झाली होती तेव्हा जाड ठश्यातील ज्योत्स्ना प्रकाशनाची "जोडाक्षर विरहित" गोष्टींची पुस्तके वाचल्याचे आठवते.
ह्याचाच अर्थ मराठी भाषेत अगदी गोष्टी लिहिता येतील इतके "जोडाक्षर विरहित" शब्द नक्की आहेत. तसेच सामान्यत: लिखाण करताना सतत असे जाणवते की शब्दांत जोडाक्षरे कमी आणि पूर्ण अक्षरे अधिक असतात. (पहा ###) भाषा तज्ज्ञांनी ह्यावर प्रकाश टाकावा. असे असताना खरे तर गमभन आविष्कारकर्त्यांनी देवनागरी टंकन सुविधेत हलन्त अक्षरे टंकन करण्याची सुविधा न देता कळ दाबताच पूर्ण अक्षर येईल अशी व्यवस्था करावी. म्हणजे 'a' वारंवार टंकावा लागणार नाही. छाहरीच्या धर्तीवर पूर्ण अक्षर जोडाक्षर म्हणून वापरायचे असेल तर / चा वापर करण्याची व्यवस्था करावी ज्यायोगे बरेच श्रम तसेच वेळही वाचेल. मनोगत, उपक्रम ह्यां सारख्या ठिकाणी टंकलेखन user friendly होईल.
.
.
.
.
# कविता आणि ललित लेखनासाठी हा पर्याय वापरू नये. प्रख्यात लेखकांच्या/कवींच्या साहित्याविषयी चर्चा करण्यासाठी हा पर्याय वापरता येईल.
# सार्वजनिक चर्चेचे सर्वमान्य संकेत पाळले जावेत.
# चर्चाप्रस्ताव लिहिताना विषयाची शक्य तितकी माहिती द्यावी.
Comments
मनोगत
या संकेतस्थळावर आपण म्हणता तशी शेवटी a न लिहिताही पूर्ण अक्षर उमटण्याची सोय आहे. तिथे हलन्त टंकायचे असल्यास .h असे टंकावे लागते. दुसरे म्हणजे तिथे दीर्ध वेलांटीसाठी ee किंवा ii असे दोन्ही पर्याय चालतात. इथे तसे चालत नाहीत. एकूणात तिथली पद्धती अतिशय लवचिक आहे म्हणूनच जास्त सोईस्कर वाटत असावी.
विनायक
युनिकोड
युनिकोडमध्ये आपण म्हणता तशी व्यवस्था आहे. जर युनिकोड आत्मसात केले तर नोटपॅडमध्ये लेख लिहून इथे चिकटवता येतो.
म्हणजे
आपल्याला एक्स-पी इनबिल्ट युनिकोड टंकनव्यवस्था म्हणायचे आहे का? ती पद्धत सुद्धा चांगली आहे. मी ती बरेचदा वापरते.
--------------------------X--X-------------------------------
फिकट निळीने रंगविलेला कापुस मेघांचा,
वरूनि कुणी गुलजार फिरविला हात कुसुंब्याचा ।
त्यांतहि हसली मंदपणे ती चंद्रकला राणी,
कडेकडेच्या मेघांवर ये मोत्यांचें पाणी ।।
हो
त्याबद्दल थोडी माहिती वेगळ्या प्रतिसादातून दिली आहे.
?
कुणी प्रकाश टाकेल का?छाहरी काय आहे?
दुसरी भाषा
आपल्याकडे विंडोज एक्स्पी किंवा व्हिस्टा असेल तर आपण इंग्रजीशिवाय मराठी ही भाषा जोडून आपला संगणक द्विभाषी करू शकता. त्यानंतर वर्ड, एक्सेल, पेंट अशा कोणत्याही प्रोग्रॅममध्ये मराठीत लिहू शकता. ही सोय मराठीसह जगातील सर्व प्रमुख भाषांसाठी उपलब्ध आहे.
तत्त्वत:--
तत्त्वत: कुठलाही फ़ॉन्ट वापरून कुठल्याही पानावर मराठीत लिखाण करता येते. उपक्रमावर गमभनच वापरायला पाहिजे किंवा मनोगतावर त्यांचाच फ़ॉन्ट वापरायला पाहिजे अशी सक्ती नाही. एखादे विशिष्ट ढब असलेले अक्षर एका फ़ॉन्टमध्ये मिळाले नाही की त्या अक्षराकरिता फ़ॉन्ट बदलावाच लागतो. दुसरीकडे लिहून इथे डकवण्याची अजिबात गरज़ नाही. माझ्या रोमन लिपीतल्या किंवा देवनागरी अथवा इतर भारतीय भाषांतल्या लिपींतल्या लिखाणात असे अनेकदा केलेले आढळून येईल.--वाचक्नवी