उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
वातूळ भाज्या
पल्लवी
April 19, 2007 - 6:15 pm
वातूळ अन्न पदार्थ. काही भाज्या व अन्न पदार्थ वातूळ असतात असं ऐकून आहे. जसं बटाटा, वांग... आपण काय सांगू शकता या विषयावर? आपल्या मोलाच्या प्रतिसादांची वाट पाहत आहे.
दुवे:
Comments
गवार..
गवारीची भाजीही वातुळ असते असं म्हणतात. मला मात्र गूळ गोडामसाला घातलेली गवारीची भाजी अत्यंत आवडते!
आपला,
(वातड!) तात्या.
क्या बात है..
पण त्यावर लिंबू पिळून थोडे मीठ पेरले तर अधिकच !
क्या बात है..
मिलिंदा, भृणहत्येकडून एकदम गवारीच्या भाजीकडे बरा वळलास! ;)
तात्या.
वात
या वातूळचा 'वात' प्रवृत्तीशी संबंध आहे का?
वांग?
ही कोणती भाजी आहे? वांगं असं म्हणायचं आहे का?
वांग हा एक ग्रामीण शब्दही मराठीत आहे.
वांग
हो मला वांगं असं म्हणायचं होतं.
पल्लवी
वातूळ म्हणजे काय?
वातूळ म्हणजे काय?
नीलकांत
वातुळ म्हणजे वातकारक!
होय. वातुळचा वात प्रकृतिशी संबंध आहे. ह्या भाज्या खाल्ल्यामुळे शरीरातला वात वाढतो असे म्हणतात.
लाल भोपळा ,वाल,वालपापडी आणि हरभरे हे देखिल वातुळ ह्या प्रकारात मोडतात.
बटाटा
काही महिन्यांपूर्वी झोपेतून उठल्यावर पायातून (पोटरीतून) गोळे येत असत. त्यावेळी अर्धा-एक मिनिट असह्य वेदना होत असे . डॉक्टरना विचारले असता त्यांनी बटाटा (हरभरे/वांगी जास्त खाल्ली जात नाहीत.) अती खाल्ला गेल्यामुळे शरीरातला वात वाढतो व त्यामुळे पायात क्रॅम्प्स येतात असे सांगितले. खाण्यात बटाट्याचे प्रमाण (मोठ्या मुश्किलीने) कमी केल्यावर ही समस्या दूर झाली.
आपली,
(बटाटा प्रेमी) प्राजक्ती
प्राजक्ती - क्रॅम्पस् बाबत
पोटरीतून गोळे येणे हे बरेचदा पोटॅशियमच्या कमतरतेमुळेही होते. केळ्यात मोठ्याप्रमाणात पोटॅशियम असते. रोज एक केळे खाल्ल्याने हे दूर होऊ शकते.
खरेतर पोटॅशियम बटाट्यातही असते. बटाटा शिजवल्याने ते कदाचित कमी होत असेल परंतु आयुर्वेद आणि ऍलोपथीचे निकष बरेचदा फारच भिन्न असतात असे दिसते.
डिस्क्लेमरः मी डॉक्टर नाही परंतु हीच समस्या माझ्या एका जवळच्या नातलगांना होती आणि तेव्हा डॉक्टरांनी केळ्याचा उपाय सुचवला होता. दुवा येथे आहे. डॉक्टरांनी याबाबत अधिक खुलासा करावा.
धन्यवाद
हो केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते हे ऐकले आहे. पोटॅशियम च्या कमतरतेमुळे असे होत असेल तर रोज केळी खाणे हा उपाय चांगलाच (तसा सोपा)आहे. पण मी बटाटा खाणे कमी केल्यावर ही समस्या दूर झाली त्यामुळे क्रॅम्प्स् येण्यामागे ही दोन्ही कारणे असावीत.
आपण दिलेला दुवा खूप चांगली माहिती पुरवितो. धन्यवाद!
डॉक्टरांनी याबाबत अधिक खुलासा करावा..
चांगला विषय
वा वा ,
चांगला विषय चर्चेला घेतला आहे.
वातूळ भाज्यांबरोबर इतर वातूळ पदार्थांबद्दल माहिती मिळाली तर त्या पासून दूर राहून आरोग्य राखता येईल असे वाटते.
(पादरा) बापू
उडीद, बेसन
उडीद आणि बेसन हे पदार्थ ही फार वातूळ आहेत असे ऐकून आहे. त्याचप्रमाणे पपई सुध्दा.
(ऐकीव) बापू
का ?
अमुक एक भाजि वातुळ आहे म्हणुन थाम्बु नका, तर ति का वातुळ आहे हे कोणितरि सान्गावे अशि अपेक्षा करतो.
वातूळ आणि वातड?
विषय इंटरेस्टींग आहे. उपवासाचे काही पदार्थसुद्धा (उदा साबुदाणा, रताळं) मुळात वातूळच असतात. शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करून तयार केल्याने ते अधिक वातुळ आणि आम्लधर्मी होतात आणि त्याचा पचनशक्तीवर ताण पडतो.
वातूळ आणि वातड या दोहोंचा अर्थ एकच आहे का?
- ईश्वरी.
नाही
वातुळ आणि वातड ह्या दोन्हीचे अर्थ वेवगेवळे आहेत. वातुळ चा अर्थ वरील चर्चेतून स्पष्ट झाला असेलच. वातड म्हणजे चामट(चामड्याप्रमाणे) व चिवट, दातांने सहज तुकडा पडणार नाही असे. उदा. शेळी जाते जिवानिशी, खाणारा म्हणतो वातड.