अन्य फाँट चा वापर

या संकेतस्थळावर लिखाण करताना गमभन व्यतरिक्त अन्य मराठी फाँट चा वापर करण्यासहि सुविधा असावी जेणे करुन ज्याला जी सवय त्या फाँटचा वापर अथवा दोनांचे एकत्रीकरण करुन लिखाण करता येइल.
मला स्वतःला भावलेला आणखी एक फाँट म्हणजे संस्कृत २००३. याचे वैशिष्ठ म्हणजे इंग्रजी ए चा कमीत कमी वापर करावा लागतो व हा फाँट सुध्दा युनिकोड मधेच असल्यामुळे कोणत्याही संकेतस्थळावर याचा वापर शक्य आहे त्याप्रमाणे हा फाँट वर्ड डाक्युमेंट मधेसुध्दा वापरता येत असल्यामुळे आधी लिखाण करुन नंतर येथे डकवता येणे सोइचे होइल. गमभनचा एक ड्राबॅक म्हणजे ए चा जास्त वापर करावा लागतो आणि चुक झाल्यास सुधारणा करताना जास्त वेळ जातो.
संस्कृत २००३ मधे पुर्णविराम व स्वल्पविराम सुविधा संस्कृत प्रमाणे आहे (उभी रेघ स्वरुपात) पण अशा ठीकाणी इंग्रजीमधे शिफ्ट करुन काम करता येते.
मी स्वतः http://www.mutualfundconsultantindia.com ह्या मराठी मधिल् वेब साइटची सर्वच सुमारे २८ पाने ऑनलाइन फक्त ८ दिवसात तयार केली आहेत.
गमभन फाँट चांगलाच आहे पण एक पर्याय असावा म्हणून चर्चेला विषय ठेवला आहे. तसेच यावर भाष्य करण्यापुर्वी आपणहि संस्कृत २००३ चा वापर करुन पहावा. गुगल मधे पर्याय दिल्यावर उपलब्ध आहेच त्याचप्रमाणे वरिल संकेतस्थळावर संगणकावर उतरुन घेण्याची सुविधा उपलभध्द आहे.

सदानंद

लेखनविषय: दुवे:

Comments

सोय आहेच!

उपक्रमावर गमभनव्यतिरिक्त बरहासारखे अन्य फ़ॉन्ट्‌स वापरता येतात. फक्त दाखल होण्यापुरते गमभन वापरून मग बरहाकडे जाता येते. बरहात शब्दातील शेवटचा अकार पूर्ण करण्यासाठी 'ए' लागत नाही. शिवाय स्वल्पविराम आदी विरामचिन्हांकरता रोमनकडे जाण्याची आवश्यकता नाही. जोडाक्षरे विविध पद्धतीने(उभी मांडणी वा आडवी) टंकमुद्रित करता येतात. --वाचक्‍नवी

फाँट

मला वाटतं गमभन/बरहा हे फाँट नाहीत.
सीडॅक योगेश हा फाँट आहे. उपक्रमकर्त्यांनी या ए टाइप करण्याची कृपया नोंद घ्यावी आणि गमभनची नवी आवृत्ती उपक्रमावर वापरावी.






मराठी फॉन्ट

मराठी साठी युनिकोड ८ चे अनेक फॉन्ट जालावर उपलब्ध आहेत. मुख्य प्रश्न सर्वसाधारणपणे कोणता फॉन्ट सर्व लोकांच्या संगणकावर दिसू शकतो हा आहे. जे लोक विन्डोज एक्सपी वापरतात त्यांना मंगल फॉन्ट उपलब्ध असतोच. त्यामुळे आपले लेखन् जास्त लोकांना वाचता यावे असे वाटत असेल तर मंगल वापरणे केंव्हाही श्रेयस्कर.
चन्द्रशेखर

घोळ होतो आहे!

सदानंदराव,
मला वाटते तुमची फाँट आणि लेखन सुवीधा यात गल्लत होते आहे. फाँट म्हणजे मराठी टंक म्हणजे अक्षरे कोणत्या पद्धतीने सुलेखित व्हावी याचा विशिष्ट ठसा. म्हणजे इंग्रजी मध्ये एरियल हा टाइम्स रोमन पेक्षा वेगळा दिसतो. हा टंकातला फरक झाला.

मात्र बरहा किंवा गमभन या मराठीत लिखाण करू देणार्‍या सुवीधा आहेत. गमभन फाँट नाही!

त्यात टंकन दिसण्यासाठी इतर (युनिकोड) टंकही वापरता येतात. तुम्ही म्हणता तो संस्कृत २००३ वापरण्यापेक्षा सीडॅक चा योगेश वापरून पाहा. अक्षरे अगदी प्रसन्न दिसू लागतात. आणि यात पुर्णविराम व स्वल्पविराम सुविधा संस्कृत प्रमाणे नसून मराठीच आहे!

आपला
गुंडोपंत

 
^ वर