जनुकात बदल केलेले कृषि उत्पादन

अनुक्रमच्या एका सभासदांनी मला जनुकबदल केलेल्या वांग्यांच्या बद्दलच्या एका पत्रकाची प्रत पाठवली आहे. या पत्रकानुसार ही वांगी अत्यंत विषारी आहेत व त्याचे दूरगामी परिणाम आपणास सर्वांना भोगावे लागतील असा दावा केला आहे. ही वांगी बाजारात न येऊ देण्याची ही शेवटची संधी असून पंतप्रधानांना त्वरीत पत्र पाठवावे अशी विनंतीही केली आहे. मी जालावर याचा शोध घेतला.
१. जनुकबदल वांगी विषारी असण्याबद्दल काही संदर्भ मिळाले नाहीत. या उलट त्यांचे उत्पादन व त्यावरील खर्च हा उत्पादकांना किफायतशीर आहे.
२. मी स्वतः परदेशात बराच काळ वास्तव्य केले आहे. तिथे बहुतेक कृषिउत्पन्न जनुकबदल केलेले असते असा माझा समज आहे. मला कधीच विषबाधा झालेली नाही.
३. ही उत्पादने दिसण्यास मोठी गोरीगोमटी व पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने वजनास जास्त असतात.
४. ही उत्पादने वापरून केलेल्या भाज्या, उसळी बेचव व पचपचीत होतात असा माझा तरी अनुभव आहे.
५. भारतात जरी ही वांगी मिळू लागली तरी ग्राहक ती कितपत वापरतील याबाबत शंका वाटते.
आपणास काय वाटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

अरेरे

आता परदेशासारख्या (तुलनेने मला)बेचव वाटणार्‍या भाज्या मिळणार हे वाचून वाईट वाटले.

भारतात जरी ही वांगी मिळू लागली तरी ग्राहक ती कितपत वापरतील याबाबत शंका वाटते. आपणास काय वाटते?

माझेही मत चवी बाबत आपल्यासारखेच आहे.. मात्र ह्या जनुकीय-संकरीत भाज्या किती भावाला विकल्या जातात तसेच त्याचा मार्केटवर कीती भडीमार केला जातो यावर ग्राहक ती किति विकत घेतील हे अवलंबून आहे.

जर ह्या भाज्या अतिशय स्वस्त असल्या (विषेशतः हल्लीच्या महागाईत) तर त्या भाज्यांना मोठा ग्राहकवर्ग मिळेल हे नक्की
किंवा अनेक मळेवाल्यांनी जर याच भाज्यांचे उत्पादन चालु केले व पर्यायाने बाजारावर त्याच भाज्यांचा भडीमार झाला तर पर्याय नसल्याने त्या भाज्यांना ग्राहकवर्ग आपोआप मिळेल.

आता दिड महिन्यात बाजारात येणारी संकरीत ज्वारीच घ्या, पाच महिन्यांच्या नैसर्गिक ज्वारीपेक्षा या ज्वारीची भाकरी चवीला/दर्जाला अतिशय मागे! तरीही शेतकर्‍याला नैसर्गिक ज्वारीचे उत्पादन घेणे महागाचे असल्याने संकरीत ज्वारी हा एकमेव पर्याय रहातो व बाजारात उपलब्ध असतो.

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

जैवतंत्रज्ञान आणि संकर

संकरित पिके आणि जैवतंत्रज्ञान वापरुन तयार केलेल्या पिकांच्या जाती यांच्यात एक मूलभूत फरक आहे. संकरित जातींत त्याच जातीच्या पण वेगवेगळ्या वाणांच्या नर व मादी बीजांचा संकर केलेला असतो. उदाहरणार्थ, पारंपारिक गव्हाची जात व गव्हाची बुटकी जात - या संकरातून पैदा होणार्‍या जातींत दोन्ही वाणांचे चांगले गुणधर्म येतात (किंवा यावेत अशी अपेक्षा असते). जैवतंत्रज्ञानात एखाद्या गुणधर्माला जबाबदार असणारी जनुके (जीन्स) एका वनस्पती / प्राण्यातून दुसर्‍या वनस्पती / प्राण्यात घातली जातात. त्यामुळे दुसर्‍या वनस्पती / प्राण्यात तो एकच गुणधर्म संक्रमित होतो. यातले प्रसिद्ध उदाहरण म्हणजे स्ट्रॉबेरीचे. स्ट्रॉबेरी फार थंड तापमान सहन करु शकत नाही. शास्त्रज्ञांनी मग अशा स्ट्रॉबेरीत थंडपणा सहन करण्याचा शार्कचा गुणधर्म घातला. आता ही 'जी एम' (जेनेटिकली मॉडिफाईड) स्ट्रॉबेरी शून्य डिग्री सेल्सियसलाही वाढू शकते. अशा प्रकारच्या स्ट्रॉबेरीला भारतासारख्या देशात प्रचंड विरोध होऊ शकतो. (ही शाकाहारी की मांसाहारी, म्हणून). शार्कच्या मांसाची ऍलर्जी असणार्‍या व्यक्तीला या स्ट्रॉबेरीज खाल्यानेही तसाच त्रास होऊ शकतो.
तात्पर्य काय, की जनुकीय बदल केलेली पिके सरसकट चांगली किंवा वाईट असे म्हणता येणार नाही. व्हिटॅमिन ए चे प्रमाण जास्त असलेला गोल्डन राईस
भारतासारख्या देशाला वरदान ठरु शकतो. त्याचवेळी काही प्रकारच्या तेलबिया, भाज्या यांतून काही विषारी अंश लोकांच्या आहारात उतरु शकतात.
विषय मोठा आहे.
सन्जोप राव
उर्ध्वबाहु:प्रवक्षामि न कश्चित् श्रुणोति मे!

सहमत

जनुकीय बदल केलेली पिके सरसकट चांगली किंवा वाईट असे म्हणता येणार नाही.

सहमत.

अवाढव्य प्रमाणात वाढलेल्या लोकसंख्येला खाऊ घालायचे, तेही कमी पाण्यावर, आहे तितक्या जमिनी वापरून म्हणजे जनुकीय बदल केलेल्या पिकांना पर्याय नाही असे मला वाटते.

+१

हेच म्हणतो.

गरज

गरज, गुणवत्ता, सेवा, मागणी आणि पुरवठा ह्यावरच ठरेल कि ही उत्पादने किती काळ निर्माण केली जातिल याच बरोबर आपल्या सवई आणि नको तिथे काटकसर करण्याची प्रवृत्ती यातहि बदल करावे लागतिल.
सदानंद ठाकूर
आम्हाला येथे भेट द्या http://www.mutualfundconsultantindia.com

असहमत

या आणि तत्सम पिकांना पाणी जास्त लागते. प्रत्यक्ष अनुभव नि अभ्यासावरुन सांगतोय. कुठेही लोकल जातीच जास्ती सुटेबल ठरल्या आहेत, पाणी आणि हवामानासंदर्भात (हे इतरांच्या अनुभव नि अभ्यासावरुन ) . पन् विक्रीसाठी मोठ्या कंपन्यांना त्यांचा उपयोग शुन्य असल्याने ............

वा

वा ! लेख आणि प्रतिसाद छान आहेत.
मागे मी असे ऐकले होते की भारतामध्ये बाजारात मिळणार्‍या लाल, पिवळ्या भोपळी मिरच्या अश्या बियाण्याच्या असतात की त्यांचे नैसर्गिक पुनरुत्पादन करता येत नाही. त्याला 'टर्मिनेटींग बिया' की काहितरी म्हणतात. म्हणजे अश्या स्थितीमध्ये शेतकर्‍याला प्रत्येकवेळी ते बियाणे बनवणार्‍या कंपनीकडेच जावे लागेल. आपण लेखात म्हटलेली उत्पादने आणि या तर्‍हेची उत्पादने एकच आहेत काय? की त्यातही फरक असतो?
--लिखाळ.

टर्मिनेटर सीड

'मनसांटो कॉर्पोरेशन' नावाची (काहीशी कुप्रसिद्ध) अमेरिकन कंपनी अश्याप्रकारचे टर्मिनेटर सीड बनवते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी संशोधन केलेले बियाणे हे त्यांची बौद्धीक मालमत्ता असल्याने शेतकर्यांना ते वापरण्यासाठी दरवेळेला मोबदला द्यावा लागेल. त्यासाठी त्यांनी बनवलेले बियाणे हे एकदाच वापरता येण्यासारखे असुन त्यापासुन आलेल्या पिकांना होणार्‍या बिया ह्या पुन्हा पेरणी करायला कुचकामी असतात. शेतकर्‍याकडे एकमेव पर्याय म्हणजे नविन पुन्हा ह्या कंपनी कडून खरेदी करणे.

भारतासारख्या विकसनशील देशात राजकारण्यांना खिशात घालून अतीशय स्वस्त दरात हेक्टरी कितीतरी अधिक उत्पादन देणारे हे बियाणे शेतकर्‍यांच्या गळ्यात मारले जात होते. दरवेळी कंपनीला पैसे भरुन हे बियाणे विकत घ्यावे लागेल ही माहिती अर्थातच शेतकर्यापासून लपवून ठेवुन. पुढे ह्यावर आंदोलन वगैरेही झाले होते. ह्याची सद्यस्थीती काय आहे कल्पना नाही. भारतातील किती शेतकरी हे टर्मिनेटर सीड वापरतात ह्याचा अंदाज नाही.

+१

पेटंटेड् जी एम् बियाणे-
बरोबर भारतात काही एनजीओजनी याबाबत आवाज उठवला होता. वंदना शिवा यांच्या एका मुलाखतीत त्यांच्या संस्थेने छोट्या शेतकर्‍यांना एकत्र करुन एक बियाणेबँक/पेढी (नवधान्य का असे काहीसे नाव होते)सुरु केली होती. ज्यात विविध प्रकारची बियाणे आसपासच्या शेतकरी आणून जमा करतात व सहकारी तत्वावर आधारीत पुढच्या पेरणीला एकमेकांना देणे होते. असे काहीसे पाहील्याचे आठवते. एक दुवा

Many farmers are returning to traditional methods promoted by Navdanya (Nine Seeds), an organization based in New Delhi that Shiva helped found 11 years ago. Navdanya encourages farmers to produce hardy native varieties of crops that can be grown organically with natural fertilizer and no artificial chemicals. The group works in an area for three years, helping local farmers form their own self-supporting organization and seed bank. Navdanya has spread to some 80 districts in 12 states and has collected more than 2,000 seed varieties. It has set up a marketing network through which farmers sell their organic harvest.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

टर्मिनेटर सीड

भारतामध्ये बाजारात मिळणार्‍या लाल, पिवळ्या भोपळी मिरच्या अश्या बियाण्याच्या असतात की त्यांचे नैसर्गिक पुनरुत्पादन करता येत नाही. त्याला 'टर्मिनेटींग बिया' की काहितरी म्हणतात. म्हणजे अश्या स्थितीमध्ये शेतकर्‍याला प्रत्येकवेळी ते बियाणे बनवणार्‍या कंपनीकडेच जावे लागेल.
माहिती बरोबर आहे. बदल फक्त 'टर्मिनेटर' या शब्दाचा. भारतात माझ्या माहितीनुसार अद्याप टरर्मिनेटर सीडस उपलब्ध नाहीत.
मोनसॅन्टो ही कंपनी असे टर्मिनेटर बियाणे बनवण्यात आघाडीवर आहे (सोयाबीन?). अशा विघातक आणि शेतकरीविरुद्ध धोरणांमुळे मोनसॅन्टोला 'मोन्सॅटान' असे उपरोधाने म्हटले जाते.
टर्मिनेटर सीडस हा जैवतंत्रज्ञानाने तयार केलेल्या बियाण्यांचा एक प्रकार आहे. जैवतंत्रज्ञानाने बर्‍याच प्रकारची बियाणी तयार केली आहेत.
सन्जोप राव
उर्ध्वबाहु:प्रवक्षामि न कश्चित् श्रुणोति मे!

पचपचीत भाज्या

या प्रकाराचा मला अनुभव आहे. पण त्यांचे कारण जनुकीय बदल केलेली पिकेच असतील असे मला वाटत नाही.

गेल्या शतकात संकरीकरणाच्या पारंपरिक पद्धतीने भाजी अधिक टवटवीत आणि भरदार बनवण्याची प्रक्रिया लांब वाहातुकीच्या बाजाराच्या देशांत चालू आहे. शिवाय फळे अणि काही फळभाज्या कच्च्या तोडून आयत्या वेळी कृत्रिम रीतीने पिकवतात. कच्ची फळे वाहातुकीच्या दरम्यात कुजत नाहीत, म्हणून हा प्रकार. परंतु त्यामुळे भाज्यांची चव पचपचीत होते.

जनुकीय बदलांच्या बाबतीत सरसकट विधान बहुधा करता येणार नाही.

स्वतः मी जमल्यास जिल्ह्यातल्या जिल्ह्यात पिकवलेल्या भाज्या खायचा प्रयत्न करतो. पण हे हिवाळ्यात जमत नाही.

^सहमत.

सहमत.

जर लोकांची पसंती चविष्ट भाज्यांन्या/फळांना असेल तर मागणी प्रमाणे त्या प्रकारचे जनुकीय बदल् करणं विक्रेत्यांना/व्यापार्‍यांना भाग पडेलच.

वा

पिवळ्या भो मिरच्यांबद्दल विस्तृत माहितीसाठी प्रतिसादकर्त्यांचे आभार.
धनंजयाचे मुद्दे सुद्धा विचार करण्यासारखे.
--लिखाळ.

नेमकं काय खातो आपण - जी एम् पिकं विष की वरदान

या आठड्याच्या लोकप्रभेत नेमकं काय खातो आपण - जी एम् पिकं विष की वरदान हा लेख आला आहे.

लेख वाचनीय आहे. मला त्यातून अनेक पैलूंची माहिती समजली.

त्यात वांग्याच्या वाणाचा उल्लेख आहे ते वांगे मूळ चर्चाप्रस्तावात उल्लेखलेलेच आहे असे वाटते.
--लिखाळ.

 
^ वर