उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
पर्यावरणाचा र्हास [मानवाकडून]
केशव
April 19, 2007 - 12:58 am
दिनांक १८-०४ -२००७ चा म.टाईम्स वाचा. [ जाहिरात करीत नाही. ] कझाकिस्तान मधिल ' अरल ' समुद्र आटत चालल्याची फोटो सहीत आलेली माहिती संवेदनशील मनाला अस्वस्थ करणारी आहे.
क्रुपया प्रतिसाद पाठवावा.
दुवे:
Comments
माहिमची खाडी
अरल समुद्र हा चारीबाजूंनी जमिनीने व्यापलेला आहे. त्याला मिळाणार्या अमु दर्या आणि सीर दर्या या नद्यांचा मार्ग वळवावा लागला कारण मध्या आशियात फारशा इतर नद्या नाहीत. (हे करणे अनिवार्य असावे.) त्यामुळे तो संकुचित होऊ लागला. त्यातच रशियाने तेथे रासायनिक चाचण्या करून (याबाबत काय बोला?) पर्यावरणाचा र्हास केला.
अरल, अमु आणि सीर दर्याबद्दल मराठी विकिवर एकेका ओळीचे लेख ;-) लिहील्याने ही माहिती माझ्याकडे होती. इंग्रजी विकिवर अरल समुद्राबाबत विस्तृत वाचता येईल.
असो. पर्यावरणाचा र्हास पाहण्यासाठी लांब जायला नको. मुंबईतील माहिमच्या खाडीची अवस्था याहून वेगळी नाही.
अवांतर १:
यात जाहिरात नाही परंतु केवळ् वाचा सांगण्यापेक्षा त्या बातमीचा दुवा द्या कारण आज (दिनांक १९.०४.०७) शोधली असता मला ती मिळाली नाही.
अवांतर/ विषयांतर २:
दर्या हा देखील फारशी शब्द आहे.
दुवा!
हा घ्या दुवा !
जागतिक तापमानवाढ
जागतिक तापमानवाढीचा प्रश्न भविष्यात अधिक उग्र बनण्याची लक्षणे आहेत. काही भागात कमी पाऊस, वाढते वाळवंटीकरण, काही ठिकाणी अतिवृष्टी/पूर, ध्रुवांवरील बर्फ वितळण्याचा दर वाढल्यास समुद्राची पातळी वाढण्याचा धोका, अश्या अनेक रूपाने हा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. जागतिक तापमानवाढीविरुद्ध तातडीने संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे. दुर्दैवाने राजकीय आणि व्यावसायिक कारणांनी अश्या प्रयत्नांना खीळ बसत आहे.
अवांतर : कृ लिहिण्यासाठी kRu असे लिहावे. अधिक माहिती टंकलेखन साहाय्य मध्ये आहे.
हवामानातला बदल्
तापमानात होणारा हा बद्दल खरंच भयानक आणि विचार करण्याच्या पलीकडे आहे.
मुंबईच तापमान जेव्हा ३६ अंशाच्या बाहेर जाते तेव्हा रात्रीच्या कोरड्या हवामानामुळे
जमिनीवर पाय ठेवला असता गरम लागतो.
हे सगळा बद्दल मन थक्क करणारा आहे.
डे आफ्टर टुमारो या चित्रपटातला काही भाग तरी २६ जुलैच्या पावसात अनुभवायला मिळाला पण तापमानात होणारा हा बदल पूर्णं चित्रपटच खरा करून दाखवेल हि भिती वाटते.
मुंबईमुळे कोकणात धोका
मुंबईत खाड्या बुजवून तेथे टोलेजंग इमारती उभारलेल्या आहेत. पण समुद्राला एका बाजूनी अडवले तर तो दुसरीकडे वाट शोधणारचं.
अलिबागला समुद्र पुढे सरकतो आहे. तीच अवस्था इतर किनार्यांवरही कमी अधिक प्रमाणात पहावयास मिळते.
उपक्रमावर अलिबाग किनारपट्टीवरिल कोणी असेल तर त्यांना विचारा की, पूर्वी कुलाबा किल्ल्यात भरतीच्या वेळेसही गुढघाभर पाण्यातून जाता येत होते, तसे आता येते का?
आमच्या नातेवाईकांकडे सासवने येथे (अलिबाग जवळ) आता भरतीचे पाणी थेट वाडीत येते. पूर्वी हे होत नसे. अगदी पौर्णिमा, अमावास्येची भरती सुध्दा वाडीत आलेली नाही.
आपला बाप्या काही सांगू शकेल, तो तिथून जवळचाच दापोलीचा आहे.
आपला,
(अस्वस्थ) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
गंभीर
हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. माणसाने इतक्या विविध प्रकारे प्रकारे पर्यावरणाचा नाश केला आहे की कुठून सुरुवात करावी तेच कळत नाही. तपमानवाढ आहेच, ह्या वर्षीचा युरोपमधील हिवाळा गेल्या तीनशे वर्षात सर्वात उबदार होता. वसंतात येणारी फुले जानेवारीतच दिसू लागली होती. याशिवाय प्रदूषण, विविध प्राण्यांचे शिकारीमुळे उच्चाटन हे मुद्दे आहेतच. ह्या महिन्याच्या नॅशनल जिओग्राफिकमध्ये प्रमाणाबाहेर मासेमारीमुळे माश्यांचे आणि पर्यायाने सागराच्या इकोसिस्टीमचे भवितव्य कसे धोक्यात आले आहे यावर विस्तृत लेख आहेत.
इथे मॅट्रीक्स चित्रपटातील संवाद आठवतो. एजंट मॉर्फिअसला म्हणतो, "तुम्ही माणसे जिथे जाता तिथल्या साधनसंपत्तीचा नाश करता."
राजेंद्र
मनुष्याची हाव
मला अजूनही आठवतं, माझ्या लहानपणी ३३ अंश सेल्सियस हे मुंबईतील उन्हाळयातलं महत्तम तापमान असायचं. यावर्षी एप्रिल महिन्यातच ३६ अंश सेल्सियस पार केलं.
विकास करताना पर्यावरणाकडे केलेल्या दुर्लक्षाचाच हा परिणाम आहे.
पाच सात वर्षांपूर्वी मी पहाटे पहाटे व्यायाम म्हणुन सायकलने फेरफटका मारायला बाहेर पडत असे. अशावेळी परेल ते भायखाळा असा प्रवास असे. पहिल्याच दिवशी सायकल चालवताना अचानक हवेमध्ये गारवा जाणवायला लागला. थोड्याच अंतरावर राणीच्या बागेची हद्द सुरू झालेली दिसली. पुढे हाच अनुभव रोज यायला लागला.
सांगण्याचा मुद्दा हा, की जर फक्त एवढा लहानसा वृक्षांनी अच्छादलेला जमिनीचा तुकडा जर वातावरणात जाणवण्या एवढा फरक करू शकतो तर नक्कीच एकंदरीत परिस्थिती सुधारता येऊ शकते.
पण सुरवात मात्र स्वतः पासुनच करायला हवी.
फक्त चर्चा करुन काय उपयोग? प्रत्यक्ष कृती करायला हवी.
आपल्या सोसायटीत, रस्त्यांच्या कडेला, आपल्या मैदानाशेजारी जमेल तिथे झाडे लावायला हवीत.
रस्त्यांच्या कडेला इतकी झाडे हवीत कि दुपारचं तळपतं उन जाणवायला नको.
आणि यात अशक्य काहीच नाही.
आणि झाडेही इथल्या हवामानाला आणि पशूपक्ष्याना साजेशीच असायला हवीत. गुलमोहर सारखी झाडे दिसायला कितीही सुंदर असली तरी ती येथील पशुपक्ष्याना फळे, मध आणि निवार्या साठी पुरेश्या भरगच्च फांद्या देतात कि नाही हे तपासून मगच झाडे लावायला हवीत.
स्थानि़क झाडे निवडायला हवीत.
बरं झाडे लावता येत नाहीत आणि आहेत ती टिकवूनही ठेवता येत नाहीत. ज्याना झाडे लावता येत नसतील त्यानी इथे नमूद केलेल्या गोष्टी करून पहाव्यात. कागद हा झाडांपासून तयारा होतो हे काही नव्याने सांगायची गरज नाही. वापरून झालेला कागद हा कचरा म्हणून न फेकता तो रद्दी मध्येच द्यावा. वापरुन झालेला कागद म्हणजे फक्त वर्तमान पत्राचा कागद असा गैरसमज करुन घेऊ नका. वाण्याच्या दुकानातून एखादी वस्तू बांधून आणलेला कागद, नको असलेल्या झेरॉक्सचे कागद, निवडणुकांच्या काळात आपल्या नेते मंडळींनी वाटलेली प्रसिद्धी पत्रके इ. गोष्टी सुद्धा रद्दीतच द्या.
यासंदर्भात आणखीन एक गोष्ट सांगाविशी वाटते. काही वर्षापूर्वी एका वर्तमान पत्रामध्ये पर्यावरण विषयक एक सदर प्रसिद्ध झालं होतं. त्यात एक महत्वाची गोष्ट सुचवली होती. पालक मुलांसाठी दरवर्षी नवीन वह्या पुस्तके विकत घेतात. मागील वर्षीच्या वह्या सर्रास रद्दी मध्ये दिल्या जातात. पण त्या वह्यांमधील किती वह्याची किती पानं कोरीच होती हे पाहीलं जातं का? त्या कोर्या पानांचा उपयोग पुढील वर्षा साठी केला जाऊ शकत नाही का? मग मी हा प्रयोग करुन पहायचं ठरवलं. त्यावर्षी मी बारावी विज्ञान वर्षाला असल्या कारणाने बरंच कच्चं लिखाण करायला लागायाचं. मी त्यासाठी वर्तमान पत्रात सांगितल्या प्रमाणे रद्दी मधील कोरे कागद वापरायला सुरूवात केली. छापील कागदाची मागील कोरी बाजू सुद्धा उपयोगात आणली. आणि काय सांगू मंडळींनो, ते बारावीचं वर्ष सोडाच पण आजतागायत मी कच्च्या कामासाठी वही खरेदी केलेली नाही!!!!! म्हणजे आपण अजाणतेपणाने किती उपयुक्त कागद कचर्यात फेकतो त्याचा विचार करा !!
या ठिकाणी महात्मा गांधींनी सांगीतलेला एक विचार तंतोतंत लागू होतो. "There is enough for everyone's need but not for anyone's greed"
मनुष्य प्राण्याच्या गरजा भागवण्यासाठी हा निसर्ग नक्कीच समर्थ आहे. पण याची चंगळवादाची हौस मात्र हा निसर्ग नाही पुरवू शकत.
आज आम्ही आंधळा विकास साधत आहोत. आणि यासाठी पर्यावरणाचा बळी दिला जातोय.
एखाद्या शेतकर्याची, त्याच्या आई-वडिलांनी रक्ताचा घाम करून मिळवलेली ,पिकावू शेतजमीन आम्ही विकासाच्या नावाखाली त्याच्याकडुन हिसकावून घेत आहोत. त्याच्या आई-वडिलांनी मुलाच्या मायेनी वाढवलेली झाडं तोडतो आहोत. त्या जमीनीवर आम्ही मोठमोठे कारखाने, कॉरपोरेट सेन्टर्स, उभारात आहोत. या बांधकामा साठी आणि कारखान्यासाठी आसपासच्या विहिरी, तलाव उपसत आहोत. आणि त्यामधील तथाकथीत सुशिक्षीत, उच्चभ्रू तंत्रज्ञांना filtered minerals water पाजत आहोत.
आमचं बांधकाम सुद्धा येथील वातावरणाला बिलकूल साजेसं नसणारं. आमच्या इमारतीच्या भिंती सुद्धा खिडक्या नसलेल्या, बाहेरून छान दिसणार्या अत्यंत पातळ अशा काचांपासून बनविलेल्या. त्या फार गरम होतात म्हणून आम्ही आतमध्ये वातानूकूलीत यंत्रणा बसवतो. इंग्रजांनी सुद्धा बांधकामं करताना येथील हवामानाला अनुकूल अशा, भरपुर खिडक्यांच्या हवेशीर इमारती बांधाल्या. आज हे स्वातंत्र्यापूर्व काळातलं तंत्रज्ञान म्हणून आम्ही वापरत नाही, कारण आम्ही आज विकसनशील देशातले आहोत!
या वातानुकूलीत यंत्रणांना फार वीज लागते. ती आम्ही उरल्या सुरल्या शेतकर्यांकडे भारनियमन करुन मिळवतो.
विकास करायचा म्हणजे हे सर्व आलंच अशी आम्ही सारवासारवही करतो.
पण आज आम्हाला मातीत हात घालायला लाज वाटते. तर झाडे लावणे दूर.
आम्ही विकसनशील देशातील सुशिक्षीत माणसं. झाडं, पानं, फुलं ह्या सर्व शेतकर्यांनी करायच्या गोष्टी. आम्ही का म्हणुन कराव्यात या गोष्टी? ज्याला त्रास होइल तो करील. वातावरणातील उष्णता वाढली तर आम्ही आमचा एअरकंडिशन वापरू! लोडशेडिंग असेल तर जनरेटर वापरू! हवेतील ऑक्सिजन का काय म्हणतात तो कमी झाला तर आम्ही ऑक्सिजनच्या नळकांड्या वापरून कामावर जाऊ.
पण झाडे लावण्याचं आणि पर्यावरणाचं आम्हाला सांगू नका. We don't have time to talk this nonsense !
(निसर्ग प्रेमी) रम्या
सहमत/परंतु
शेतीमुळेही पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. शेती करणे हा पर्यावरणास पूरक व्यवसाय नाही.
स्पष्ट करा !
' शेती मुळेही पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे.'
कृपया स्पष्ट कराल का? शेतीत रासायनिक द्रव्यें न वापरता सेंद्रीय शेती केली तर ती हानिकारक कशी ?
शेती
शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वने तोडून ती जागा मोकळी करुन् घ्यावी लागते. पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो. ही मोकळी केलेली जमीन जर पिकाखाली नसेल तर त्याची मोठ्या प्रमाणावर धूप होते.
या तोडलेल्या वनांमधील प्राणी, पक्षी यांची निवासस्थाने नष्ट होतात. जंगलात पूर्वीपासून राहत असलेले आदिवासी देशोधडीला लागतात. हे इतर परिणाम आहेतच.
गेल्या काही वर्षात ब्राझील व ऍमेझॉमन खोर्यांमधील अनेक वने ही अमेरिकेतील उपभोगवादी जनतेला मका व सोयाबीन पुरवण्यासाठी शेती करावी म्हणून भुईसपाट करण्यात आली आहेत. ४०० वर्षात या भागातील जितकी जंगले नष्ट झाली त्याच्या दुप्पट गेल्या १० वर्षात शेतीच्या नावाखाली नष्ट झाली आहेत.