झाड

ऍबस्ट्रॅक्ट सारखं काहीतरी करण्याचा प्रयत्न.

फोकल लेंथ: २१ मिमी
ऍपर्चरः ३.५
आयएसओ: ८००

मूळ चित्र रंगीत. ब्ल्याक अँड व्हाईटमधे रूपांतरित. काटछाट आणि इतर गोष्टींसाठी गिंपचा वापर. सॉफ्ट फोकस मुद्दामून दिलेला.

लेखनविषय: दुवे:

Comments

वाहवा

उबुंटूच्या शिकी ब्रेव्ह या निळसर थीमसाठी अत्युत्कृष्ट वॉलपेपर. रंग आणि दृश्यही आफ्रिकन आले आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ओरिजनल साईझ

ओरिजनल साईझचा फोटो वॉलपेपर म्हणून लावायला मिळेल का? [इतरत्र कोठे वापरणार नाही]


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हेच म्हणतो ...

फोटो खरोखरच अप्रतिम आहे ह्यात वाद नाही. मस्तच जमला आहे ...

>>ओरिजनल साईझचा फोटो वॉलपेपर म्हणून लावायला मिळेल का? [इतरत्र कोठे वापरणार नाही]
+१, असा फोटो आमच्या संगणकाच्या डेस्कटॉपवर लावायला नक्की आनंद होईल

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

सर्व बाबतीत छान

छायाचित्रकाराने काढताना काय काळजी घेतली, वेगवेगळे फोटो काढून पैकी याची निवड कशी केली, वगैरे तपशील एका प्रतिसादात देऊन चर्चेची खोली वाढवावी. अशी विनंती.

फोटो काढताना काय् केले

चित्राच्या काँपोझिशनमधे काही कौतुक नाही आहे. पण एक्सपोजर टाईम १/५ सेकंद असल्याने आणि ट्रायपॉड नसल्याने फोटो घेताना जरा कस लागला इतकेच. बाकी चाचणीसाठी एक्सपोजर ब्र्याकेटिंग आधी करून पाहिले होते, त्यात +१ ईव्ही काँपेन्सेशनवर फोटो बरे आले. म्हणून हा फोटो तसाच काढला.

वाह!

वाह! चित्र खूपच आवडले..
संगणकाच्या मुख्यपटलावर लावण्याजोगे.. विस्तीर्ण (मुळच्या) आकारात मिळेल काय?

ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्‍याच्या त्या प्राथमिक चुका

असेच्

असेच विचारतो. चित्र सहीच आहे.

- सूर्य.

जबरी!

सही दिसतंय चित्र! खरे तर फोटो, पण चित्रंच वाटते आहे..
मलाही आवडेल मूळ फोटो वॉलपेपर म्हणून!

चित्राबद्दल अधिक माहिती

वरील छायाचित्र हे यलोस्टोन तळ्याकाठी संध्याकाळी सव्वासात वाजता काढलेले आहे. छायाचित्राची मूळ संकल्पना माझ्या सोबत असलेल्या मित्राला सुचली. एकूणच थंडी, ढगाळ आकाश, गोठलेले तळे आणि तळ्याच्या काठाशी असलेले एकाकी झाड हे पाहून त्याला साधारण भुताळी असा परिणाम साधणारा फोटो काढायची इच्छा झाली. म्हणून मी हा फोटो काढला. मूळ फोटो याच्यापेक्षा मोठा आहे, हा फोटो क्रॉप केलेला आहे. पण साधारण एक तृतीयांशाचा नियम सांभाळण्याचा यत्न केलेला आहे. मूळ फोटोमधे वर उल्लेखिलेला भुताळी परिणाम देण्यासाठी व्हाईट ब्यालन्स टंगस्टन ठेवला होता. रंगीत फोटो असा आहे (मूळ नाही) -

गिंपमधे प्रक्रिया करताना क्रॉपिंग झाल्यावर च्यानल मिक्सर वापरून या चित्राला कृष्णधवल केले. नंतर कृष्णधवल चित्राची एक कॉपी नवीन लेयरमधे घेतली आणि तिला ४० पिक्सेल त्रिज्या ठेवून गाऊशियन ब्लर केले. नंतर त्या लेयरची अपारदर्शकता (ओपॅसिटी) ५०% ठेवली. यामुळे सॉफ्ट फोकस परिणाम आला. थोडा रंग भरण्यासाठी याच लेयरला कलर्स -> कलराईझ हे टूल वापरून थोडी निळसर झाक दिली. सॉफ्ट फोकस दिला नसता तरी चालले असते पण मूळ चित्र आयएसओ ८०० ला काढलेले असल्याने चित्रात नॉइज होता. कृष्णधवल आणि ब्लर केल्याने तो थोडा कमी झाला. असे प्रोसेसिंग केले.

मोठ्या आकारातील चित्र येथून उतरवून घेता येईल. हे चित्र केवळ वैयक्तिक वापरासाठीच ठेवावे अशी सर्वांना नम्र विनंती.

 
^ वर