उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
काही विशिष्ट् ग्रहयोगांचे फलीत्
निमिष_सोनार
June 10, 2009 - 7:32 pm
मला जन्मकुंडलीतील् काही विशिष्ट् ग्रहयोगांचे फलीत् जाणून् घ्यायचे आहे.
(१) मंगळ् शनी युती द्वितीय स्थानात्
(२) प्रथमस्थानी लग्नी मीनेचा शुक्र
(३) सप्तम्स्थानी कन्या राशीत् प्लुटो
(४) नवम् स्थानी वृश्चिक् राशीत् नेपच्यून्
(५) अष्टम् स्थानी तुळ् राशीत् राहू हर्शल् युती
कुणी मार्गदर्शन् करेल् काय्?
दुवे:
Comments
मार्गदर्शन
(१) मंगळ शनी युती द्वितीय स्थानात
मंगळ शनी युती द्वितीय स्थानात असल्यास स्त्रियांबद्दल विशेष राग वाटू शकतो. मराठी संकेतस्थळांवर स्त्रियांच्या मनातील उपजत सूडबुद्धी, पुरुषांवर होणारे अन्याय अशा चर्चा सुरु करण्याची इच्छा होऊ शकते.
(२) प्रथमस्थानी लग्नी मीनेचा शुक्र
प्रथमस्थानी-लग्नी मीनेचा शुक्र असल्यास शुक्रवारी सर्वप्रथम मासे खावेसे वाटेल.
(३) सप्तम्स्थानी कन्या राशीत प्लुटो
ह्या ग्रहयोगाचे वैशिष्ट्य म्हणजे सासु सुनांमधील भांडणांमुळे भारतात सर्वत्र युद्धे सुरु होऊ शकतात की काय अशी शंका मनात येईल. अमेरिकेने इराकवर केलेल्या हल्ल्यापेक्षाही जास्त गंभीर स्वरुपाची हानी आणि प्रचंड स्वरुपाच्या तणावाचा सामना पुरुषांना करावा लागण्याची शक्यता आहे.
(४) नवम् स्थानी वृश्चिक् राशीत् नेपच्यून्
ह्या ग्रहयोगामुळे विंचू चावला हे भारूड नऊ वेळा ऐकावेसे वाटेल.
(५) अष्टम् स्थानी तुळ् राशीत् राहू हर्शल् युती
मराठी संकेतस्थळांवर ग्रहयोगांबाबत चर्चा करावीशी वाटेल.
आपला,
(चर्चाप्रस्तावामुळे डोक्याची वैतागवाडी झालेला) आजानुकर्ण
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
हे माहिती नव्हते
वा!
चांगली माहिती दिलीत. हे कधी वाचायला मिळालेच नव्हते.
कोणत्या पुस्तकात आहे ही?
माझ्या कडे
वराहमिहिर आहे (वरदा प्रकाशन - ५०० रुपयांना मिळाले शिवाय १०% सूट!)
त्यात आपण म्हणता तसे काहीच नाही हो!
आणि विष्णु शर्मांचेही आहे,
पण त्यातही असा उल्लेख दिसत नाहीये.
आपला
गुंडोपंत
नशीबाचे खेळ
प्रथमस्थानी बुध असणाऱ्यांना ही माहिती उपजतच असते. कुठल्याही पुस्तकात मिळणारे ज्ञान नाही हे म्हाराजा.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
बुध
प्रथम स्थानी बुध!
हं!
[स्वगत
बुध असला तरी त्याला बुद्धीच्या दिशेने चालना देणारा चंद्र आणि त्याचा योग्य तो संबंधही आवश्यक असतो. आणि हे बुधाने मिळवण्याचे ज्ञान सात्विक स्वरूपाचे असण्यासाठी त्याचा गुरुशी संबंधही आवश्यक ठरतो. अन्यथा असलेले ज्ञान 'मी' पणा मिरवण्याच्याच कामी येते!
या ज्ञानातून उपजीवीका करण्यासाठी दशमाचा संबंध असला पाहिजे अन्यथा पदवी मिळते परंतु उपजीवीकेचे काम मात्र त्यातले होत नाही. ]
असो,
आपला
गुंडोपंत
सात्विक स्वरूपाचे ज्ञान
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
तुझे तुज धन कळो आले
असे म्हटले तेव्हा ज्ञानाचा उपयोग उपजीविकेसाठी करणे हे ज्ञानोबांना अभिप्रेत होते काय?.
बोधिवृक्षाखाली बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली तेव्हा तो त्याच्या आयुष्यातील परमोच्च प्रसंग होता की चला दोन वेळच्या भाकरतुकड्याची सोय झाली असे त्याला वाटले?
ज्ञान हे उपजीविकेचे साधन नसून ते आयुष्याचे साध्य आहे. किंबहुना उपजीविकेसाठी ज्ञान ही संकल्पना मांडणे हे ज्ञानाचे अवमूल्यन आहे असे वाटते. सात्विक स्वरूपाचे ज्ञान ही देखील एक चुकीची कल्पना आहे. ज्ञान ही बुळबुळीत भेंडीची सात्विक भाजी नसून ज्वलजहाल तामसी तांबडा कोल्हापुरी रस्सा आहे.
ज्ञानप्राप्तीसाठी गुरुची आवश्यकता असली तरी एकदा ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर मीपणा मिरवण्यातला फोलपणाही लक्षात येतो असे वाटते. अन्यथा नाम्या तुझं मडकं कच्चंच राहील की लेका...
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
आपण महान आहात
आपण महान आहात!
ज्ञानोबा, बुद्ध, तुकारामांचे अभंग... आणे जीभेवर असलेले त्यातले दृष्टांत!
वा! आपणाला तर सगळे ज्ञान आहेच!
मी एक अज्ञानी पामर काय बोलणार आपल्या पुढे?
असे म्हटले तेव्हा ज्ञानाचा उपयोग उपजीविकेसाठी करणे हे ज्ञानोबांना अभिप्रेत होते काय?
मला कल्पना नाही महाराज, कधी वैकुंठाला गेलो तर नक्की विचारेन.
बोधिवृक्षाखाली बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली तेव्हा तो त्याच्या आयुष्यातील परमोच्च प्रसंग होता की चला दोन वेळच्या भाकरतुकड्याची सोय झाली असे त्याला वाटले?
बुद्धाची कल्पना नाही महाराज, परंतु नंतरच्या अनेक पुराणिकांची आणि भीक्खुंच्या आयुष्यभराच्या भाकरतुकड्याची नक्की सोय झाली, असे काही इतिहास वाचला असता समजले!
ज्ञान हे उपजीविकेचे साधन नसून ते आयुष्याचे साध्य आहे. किंबहुना उपजीविकेसाठी ज्ञान ही संकल्पना मांडणे हे ज्ञानाचे अवमूल्यन आहे असे वाटते. सात्विक स्वरूपाचे ज्ञान ही देखील एक चुकीची कल्पना आहे. ज्ञान ही बुळबुळीत भेंडीची सात्विक भाजी नसून ज्वलजहाल तामसी तांबडा कोल्हापुरी रस्सा आहे.
टाळ्या!!! टाळ्या!!! टाळ्या!!!
बोला! पुंडलीक वरदा... हारी विठ्ठल!!
'ज्वलजहाल तामसी तांबडा कोल्हापुरी रस्सा' वा वावा!!
आपल्या वाक्याने आम्हाला जेवणाची आठवण झाली. या रविवारी एका कोंबडीस मोक्ष प्राप्तीचा योग आत्ताच आम्हाला दिसतो आहे. ही ला सांगितले पाहिजे...
अन्यथा नाम्या तुझं मडकं कच्चंच राहील की लेका...
महाराज आमचं मडकं कच्चेच नव्हे तर जरासं टिचलेलं सुद्धा आहे. म्हणूनच काही आंग्लाळलेले स्नेही आम्हाला क्रॅक पॉट म्हणून संबोधतात याची जाणीव आहे आम्हाला.
आपणही परत आम्हाला वास्तवाची जाणीव करून दिली याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
आपला
(अज्ञानातच सुख मानणारा आणि शेवटच्या स्थानी बुध असणारा)
गुंडोपंत
ज्ञानोबा आणि वैकुंठ/तुका जालासे संतुष्ट, घरा आले वैकुंठपीठ
माफ करा पण वैकुंठगमन तुकोबांनी केले आहे असे वाटते. (आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा- विष्णुपंत पागनीस)
त्यामुळे तुकोबांप्रमाणे सदेह किंवा इतर मार्गांनी वैकुंठाला गेलात तरी तेथे ज्ञानोबा भेटण्याची शक्यता कमीच आहे.
बाकी कोंबडीची मोक्षप्राप्ती तिच्या कोणत्या ग्रहदशेमुळे झाली याचा विचार करतो आहोत. :p
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
वैकुंठ
आम्हाला वैकुंठ म्हणजेच स्वर्ग असे ज्ञात आहे.
आता ज्ञानोबा तेथे नसतील तर कुठे असावेत असा विचार करतो आहे.
आपला
गुंडोपंत
वैकुंठ म्हणजे स्वर्ग असेलच असे नाही... नक्की कल्पना नाही
स्वर्ग-नरक या मरणोत्तर आयुष्य घालवण्याच्या जागा आहेत (कॉलनी किंवा वसाहत स्वरुपाच्या). वैकुंठ हा विष्णुचा आणि कैलास हे शंकराचा असे हे देवतांचे बंगले आहेत. वैकुंठ हा बंगला नक्की स्वर्ग नावाच्या वसाहतीत आहे की काय याची कल्पना नाही. मात्र इंद्र स्वर्गात राहतो (त्याच्या बंगल्याचे नाव माहीत नाही.) आणि विष्णु (किंवा शंकर) आणि इंद्राचे फारसे पटत नाही किंवा त्यांचे मैत्रीपूर्ण म्हणावे असे सख्य नाही असे पुराणांमध्ये वाचले आहे. त्यावरुन वैकुंठ स्वर्गात नसावे असे वाटते. मात्र अनेकदा खोपच्यात सापडलेला इंद्र मदत मागण्यासाठी विष्णु-शंकर असे अडचणीच्या स्वरुपानुसार (म्हणजे विष्णुने दिलेल्या वरदानाने डोकेदुखी झाल्याने शंकराकडे किंवा शंकराने दिलेल्या वरदानाने स्थान डळमळीत होऊ पाहत असता विष्णुकडे अशा) चकरा मारत असतो हे पाहता ही ठिकाणे फारशी लांबही नसावीत.
थोडासा अधिक विचार केल्यास नारद ही व्यक्ती ह्या ठिकाणी कळ लावण्यासाठी पायी जाऊ शकते म्हणजे तुमच्या म्हणण्यात कदाचित तथ्य असेल.
पण मूळ मुद्दा ज्ञानोबांना भेटण्याचा असल्याने आणि त्यांनी पृथ्वीवरच (पुण्यापासून जवळच आळंदी येथे. मनपा-आळंदी-मनपा बस दर तासाला आहे.) संजीवन समाधी घेतल्याने ज्ञानोबा तुम्हाला स्वर्गात किंवा वैकुंठात भेटणे शक्य नाही अशी ठाम खात्री आहे.
चू.भू.द्या.घ्या.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
अवांतरः तुकारामांचे वैकुंठगमन
'संत तुकाराम' या चित्रपटातील तुकारामांच्या वैकुंठगमनावर आधारित एक सुरेख प्रसंग येथे पाहता येईल.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
भिक्खुपदाचे निकष/निषेध
गुंडोपंत म्हणतातः भीक्खुंच्या आयुष्यभराच्या भाकरतुकड्याची नक्की सोय झाली, असे काही इतिहास वाचला असता समजले!१
धम्मपदामध्ये दिलेले आणि भिक्खुसंघाने अंगिकारलेले भिक्खुपदाचे निकष हे स्पष्ट आहेत. किंबहुना मार्क्सच्या अनेक संकल्पनांचा पाया बुद्ध तत्त्वज्ञानात दिसतो. विस्तारभयामुळे त्यात जात नाही.
मात्र,
१, २ व ३ - रोजच्या वापरासाठी तीन वस्त्रे
४ - कमरेचे नेसूचे एक वस्त्र
५ - खाण्या-पिण्यासाठी एक भांडे
६ - दाढी-केस कापण्यासाठी वस्तरा
७ - सुई
८ - पाण्याची गाळणी
अशा केवळ आठ वस्तू जवळ बाळगण्याची परवानगी भिक्खुंना आहे. ह्या व्यतिरिक्त वस्तू बाळगणाऱ्यांना भिक्खु मानण्याची पद्धत नाही. ह्या वस्तूंमधून काही वेळेपुरती भाकरतुकड्याची सोय होत असली तरी आयुष्यभराची सोय कशी काय होते हे समजले नाही. श्री. गुंडोपंत यांनी अजाणतेपणाने भिक्खुंचा उपमर्द करुन त्यांच्या भावना दुखावल्या आहेत त्याबद्दल मी त्यांचा तीव्र निषेध करतो.
आदरणीय गुंडोपंत यांनी कोणत्या इतिहासात हे आयुष्यभराची सोय वगैरे वाचले आहे हे सांगावे अशी मी त्यांना विनंती करतो.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
हं
नेहमीच्या धांदरटपणामुळे मी आपले त्यात भीक्खुंनाही गोवून टाकले, खरे आहे भीक्खुंचा संदर्भ तेथे यायला नको होता.
ते मठाधीपतींची असे हवे होते!
आपला
गुंडोपंत
आभारी आहे
दया, क्षमा, शांती हे भिक्खुंकडे असणारे महत्त्वाचे गुण आहेत. तुमचे स्पष्टीकरण पुरेसे आणि समाधानकारक आहे असे वाटते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
इतर ग्रह?
गुरु रवी चंद्र बुधादी ग्रह कुठे आहेत?
द्वितीय हे मारक स्थान आहे मंगळ स्वराशीत असल्याने आपले मत निर्भीडपणे व्यक्त करण्यास अडचण नसावी. मात्र त्यातून शनी मंगळ एकत्रीत पणे तेथे असल्याने बोलणे तिखट असावे. यावर नियंत्रण ठेवणे अवघड जात असावे. जेंव्हा बोलायचे आहे तेंव्हा बोअलले जात नसावे पण नंतर खुपच स्फोटक काही तरी वाक्य जात असावे असे वाटते.
मंगळाची चौथी दृष्टी पंचमस्थानावर जात आहे. ते चंद्राचे स्थान आहे. त्यामुळे स्वभाव आगखाऊ/ भडकू असावा की काय असे वाटले. (म्हणून चंद्र कुठे आहे हे विचारले आहे. गुरु च्या योग्य सान्निध्यात असेल तर मात्र तसे नसून अतिशय चांगला स्वभाव परंतु मन मोकळा असा असेल.)
शनी ची दृष्टी व्ययावरही आहे त्यामुळे खर्चावर चांगले(च) नियंत्रण असावे.
राहते घर जुने आहे काय?
जोडीदार सुंदर आणि हुषार असावा.
शनी मंगळाची एकत्रीत दृष्टी अष्टमावर आहे. तेथेच राहू आहे, शिवाय हर्षल. त्यामुळे आयुष्य विषयक काही तरी गर्भीत चिंता असावी असे जाणवते. यात कधी अतिशय उत्तम तर कधी अतिशय वाईट असे काही तरी घडते. (पण इतर ग्रहस्थिती माहिती नसल्याने काय ते मात्र सांगता येत नाहीये.)
मात्र त्याच वेळी मीनेचा शुक्र लग्नी हे तसे चांगले आहे. ही व्यक्ती कलासक्त असावी.
मात्रे कलेवर उपजिवीका करतच असेल असे नव्हे.
मात्र प्लूटो आणि नेपच्युन विषयी मला काही सांगता येणार नाही.
नोंदः वरील सर्व स्पष्टीकरण जर पत्रीका योग्य असेल तरच लागू
आपला
गुंडोपंत
अवांतर
१ शंकाः लेखनाचे वर्गीकरण भाषा असे का केले आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
फलीत
पत्रीकेत दिलेली माहीती अपूर्ण आहे. तथापि, अभ्यास व अनुभव यांवर आधारित एक भाकित मांडणे शक्य आहे. सदरहू पत्रिकाधारकास तात्काळ मलराशिविमर्शक किंवा तत्सम उपनाम धारण करणार्या गृहविरहार्ती मेधाविन नरपुंगवाकडून तेजोभंगाचा अत्यय संभवतो. विदेशेवास्यव्य असणार्या प्रस्तुत उपद्रवाची मण्डार्पण करुन शांती करण्याचा यत्न करावा.
सन्जोप राव
काही उत्पीडक व्यक्ती याला शृंगभंग करून गोवत्सांत क्रीडा करण्याचा यत्न करणे असे म्हणतात, पण आपण निश्चिंत असावे, महाराज… गुरुदेव वैद्यराज दल्यप्रवाद.
हं
आवांतरः
मलराशिविमर्शक? हं! ... विदुषक, काजळमाया.
ठीक ठीक! चालायचेच!
आपला
गुंडोपंत
एका दगडात दोन पक्षी
चालू द्या, चालू द्या. उक्रमवर मिपा.ही!
शरद
वा वा वा!..
वा वा वा!.. आज बरीच ज्ञानोपासना झाली :).. चालु द्या
स्वगतः त्या बिरुटेसरांना आणि कर्णाला काहि काम नाहि दिसते.. अरे म्हणावं मग यापेक्षा एखादा फर्मास माहितीपूर्ण वगैरे असा लेख येऊद्यात
ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्याच्या त्या प्राथमिक चुका
अर्रर्र !
>>स्वगतः त्या बिरुटेसरांना आणि कर्णाला काहि काम नाहि दिसते..
अर्रर्र ! या चर्चेत तर आमचे काहीच योगदान नाही. काही माहितीपूर्ण प्रतिसाद लिहू का ? ;)
>>कर्णाला काहि काम नाहि दिसते.. अरे म्हणावं मग यापेक्षा एखादा फर्मास माहितीपूर्ण वगैरे असा लेख येऊद्यात
सहमत आहे !!! :)
-दिलीप बिरुटे