कधी रे येशील तू.. प्रत्यक्ष आशाताई गात असतानाचा दुवा!
राम राम मंडळी,
बर्याच दिवसांपूर्वी मी मनोगत या संकेतस्थळावर बाबुजींनी संगीत दिलेल्या, आणि आशाताईंनी गायलेल्या 'सुवासिनी' या चित्रपटातील 'जीवलगा कधी रे येशील तू' या गाण्याचे रसग्रहण केले होते. हे रसग्रहण सध्या माझ्या चावडीवर उपलब्ध असून आपल्याला ते,
http://tatya7.blogspot.com/2006/08/blog-post_28.html
या दुव्यावर वाचता येईल.
आज हा दुवा मुद्दामून इथे देण्यामागचं प्रयोजन असं की आज जालावर मुशाफिरी करताना मला प्रत्यक्ष आशाताईंनी दूरदर्शनवर हे गाणं गायलं होतं त्याचा दुवा सापडला. मंडळी, माझा या गाण्यावर खूप जीव आहे. आज स्वतः आशाताईंना हे गाणं गाताना बघितलं आणि अतिशय आनंद झाला. तो आपल्या सर्वांसोबत वाटण्याकरता हा लेखनप्रपंच. या चित्रिकरणात या गाण्याचे संगीतकार बाबुजीही दिसत आहेत. एक एक जागा, एक एक हरकत आशाताईंच्या गळ्यातून अगदी जशी हवी तशी निघताना बघून बाबुजींच्या चेहर्यावर अत्यंत समाधान दिसते आहे!
बाबुजींना आशाताईंचं खूप कौतुक होतं. ते मला एकदा म्हणाले होते, "अरे गाण्यावर तिच्याएवढी मेहनत करणारी दुसरी गायिका मी बघितली नाही."
असो!
मंडळी, आपल्याला http://www.youtube.com/watch?v=tgHP7maJeR0&NR=1 या दुव्यावर हे गाणं ऐकता येईल.
आपला,
(संगीतप्रेमी) तात्या.
Comments
आभार
तात्या, दुव्याबद्दल अनेक धन्यवाद. बाबूजींना आणि आशाताईंना प्रत्यक्ष गाताना पाहून बरे वाटले.
व्वा......
तात्यासाहेब! धन्यवाद या व्हिडीओसाठी.. परवाच आशा भोसलेंचा प्रत्यक्ष कार्यक्रम पाहायचा योग आला.. हे गाणे म्हटले त्यांनी.. अर्थातच सुंदर...