मराठी संकेतस्थळ - मदत हवी आहे

नमस्कार मंडळी,
मला मराठी संकेतस्थळ सुरू करायचे आहे. या बाबतीत महाजाला वरुन मी बरीच माहीती मिळवली आहे. मला designing softwares अवगत आहे. परंतु scripting किंवा web programing बद्दल ज्ञान नाही. कृपया कुणी जाणकार खालील प्रश्नांची उत्तरे देईल का?

१. यासाठी मला कोणती softwares शिकावी लागतील. उदा. C++, VB, ASP, PHP इत्यादी.
२. web server सूचवावा
३. मला www.opensourcecms.com सारखे अन्य माहितीपुर्ण संकेतस्थळ सूचवावे.

जयेश

लेखनविषय: दुवे:

Comments

तुम्हाला काय हवे आहे त्यावर अवलंबून आहे.

जयेश,

वेबसाईट बनवने म्हणजे ढोबळ मानाने काही पाने लिहून सर्व्हरवर चढवने एवढे ढोबळ रुप आता राहिलेले नाही. त्यामुळे तुम्हाला नेमके 'काय' बनवायचे आहे. याची पुर्ण कल्पना असेल तर मग सगळं सहज सोपं होईल.

ढोबळमानाने संकेतस्थळ बनवण्यासाठी एचटीएमएल ते एक्सटीएमएल , पीएचपी, .एएसपी , . नेट आदी भाषा आहेत. शिका हव्या तेव्हढ्या. त्यानंतर संकेतस्थळाला विदा जोडायचा असेल तर मायएसक्युएल हवा, तोही शिका. आरेखनासाठी फोटोशॉप अथवा जिम्प शिका, कोरल तर उत्तमच.

अनेक वेब सर्व्हर आहेत.तुमचे बजेट काय? आवश्यकता काय काय? सहज गुगला अनेक मिळतील.

तुम्ही नेमकेपणाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर
http://www.cmsreview.com/
http://www.cmsglossary.com/
http://www.opensourcecms.com/
http://www.opencms.org/opencms/en/
http://www.cmswire.com/cms/cms-reviews/
http://www.openadvantage.org/articles/oadocument.2005-04-19.0329097790

असे अनेक पर्याय आहेत.

नीलकांत

खुपच छान उपक्रम आहे.

मी पण आपणा सारखाच एक वेब डिजायनर + डेवलोपर आहे. माझी काहि मदत लागल्यास जरुर कळवा...

धन्यवाद

आपल्याला काय हवे आहे ते आधी ठरवा

स्क्रिप्टींग जरी अवगत नसले तरी संकेतस्थळ बनविणे तेवढे अवघड राहिलेले नाहि.
आपण लिनक्स/युनिक्स वर आधारीत वेब सर्वर निवडल्यास काम अधिक सोपे होण्यास मदत मिळेल़ .
नीलकांत ने म्हटल्याप्रमाणे आपली गरज काय यांवर वेबसर्वर अवलंबुन आहे.
आपणाला नक्की काय तयार करायचे आहे ते ठरवा ..
पीएचपी बद्दल माहिती करुन घेणे जरुरीचे आहे. .परंतु याशिवायही संकेतस्थळ बनविता येईल...
एक गोष्ट नक्कीच चांगली आहे की आपल्याला ‍ ‍‍‍िडजायनिंग सॉफ्टवेअर अवगत आहेत़...
Adobe photoshop, corel draw, Macromedia Dreamweaver, Macromedia Fireworks, Macromedia Flash , Swish
संकेतस्थळ बनविणे करिता यासारखे सॉफ्टवेअर अवगत असणे आवश्यक आहे..
तरी जर काहि मदत लागल्यास आपण गुगलींग करु शकता...

 
^ वर