उद्धृतांक (सायटेशन इंडेक्स)

पुणे विद्यापीठाचा अभियांत्रिकीचा संगणन या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम ब-यापैकी प्रगत आहे. त्यामुळे, नुकताच, कुतूहलापोटी, पुणे विद्यापीठातून संगणनशास्त्रात कोणते शोधनिबंध प्रकाशित झाले आहे याचा शोध घेतला. त्यातूनच संशोधनाच्या गुणवत्तेचा विचारही मनात आला. विद्यापीठाची गुणवत्ता मोजण्यासाठी सर्वसामान्यांनाही कळेल असे कोणते एकक आहे याचा शोध घेतांनाच शोधनिबंधांचा विषय समोर आला.

कुठल्याही विद्यापीठात किंवा संशोधन केंद्रात काम करणा-या संशोधकांचे उद्धृतांक (सायटेशन इंडेक्स) पाहिल्यास वस्तुनिष्ठ आकडेवारी समोर येऊ शकते. उद्धृतांक काढण्याची पद्धत ही तशी शास्रीय आहे. त्यामुळे, त्याचा वापर करून कोणत्याही संशोधनाचे आणि ओघानेच त्या संशोधकाच्या कार्याचे महत्त्व चटकन कळू शकते. त्याने एखाद्या विद्यापीठाची गुणवत्ता नेमकी कुठल्या स्थितीत आहे ते कळते. तसेच गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी कोणत्या दिशेने प्रयत्न करायला हवे हेही स्पष्ट होऊ शकते. यावरून काही प्रश्न उपस्थित होतात.

१. पुणे विद्यापीठातून पूर्ण वेळ काम करणा-या प्राध्यापकांपैकी आजवर संगणनशास्त्रात कुणी शोधनिबंध प्रकाशित केले आहेत काय? ते मायाजाळावर कुठे मिळतील? विद्यापीठातून या विषयात कुणाला पीएचडी मिळाली आहे का? (अपवाद - श्री. गिरीश पळशीकर हे टाटा संशोधन, संवर्धन आणि आरेखन केंद्रात वैज्ञानिक आहेत. ते पुणे विद्यापीठाशी संबंधीत आहेत. त्यांचे शोधनिबंध त्यांच्या संस्थळावर उपलब्ध आहेत. मात्र त्यांचे शिक्षण पुणे विद्यापीठाच्या बाहेर झालेले दिसते.)
२. भारतीय शास्त्रज्ञांचे उद्धृतांक मायाजाळावर कुठे मिळतील?
३. उद्धृतांकाच्या सहाय्याने बाबत भारत, अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, फ्रान्स असा तुलनात्मक अभ्यास कुणी केल्यास त्याचा दुवा मिळू शकेल काय?

इंग्रजी दुवे -
१. http://en.wikipedia.org/wiki/Citation_index
२. http://thomsonreuters.com/products_services/scientific/Web_of_Science

लेखनविषय: दुवे:

Comments

अरे वा!

शैलेश हा उत्तम प्रस्ताव आहे.
आपली अश्या रीतीने शोध घेण्याची कल्पना अतिशय उत्तम आहे.
कार्यबाहुल्यामुळे मला सध्या जालावर वेळच मिळत नाहीये,
अन्यथा यात मला सहभागी व्हायला फार आवडले असते.

मी मागे पुणे विद्यापीठ आणी मराठी भाषेचा संगणकाशी संबंध या विषयावर खूप आगपाखड केली होती.
त्या अथवा तत्सम विचार धारेवरील हा काही तरी रचनात्मक भर असलेला चर्चा प्रस्ताव पाहून आनंद वाटला.

मात्र असा शोध निबंधांचा 'शोध घ्यावा लागणे' हे पुणे विद्यापीठाला किती लांच्छनास्पद आहे!

आपला
गुंडोपंत

साशंक

कुठल्याही विद्यापीठात किंवा संशोधन केंद्रात काम करणा-या संशोधकांचे उद्धृतांक (सायटेशन इंडेक्स) पाहिल्यास वस्तुनिष्ठ आकडेवारी समोर येऊ शकते.
याबद्दल साशंक आहे. हे खरे आहे की उद्धृतांक बर्‍यापैकी वस्तुनिष्ट मानला जातो. आणि नोबेल वगैरे मिळालेल्या निबंधांचा उद्धृतांक अर्थातच खूप जास्त असतो. पण बरेचदा संशोधकांमध्ये तू माझा निबंध साइट कर, मी तुझा करतो असा अलिखित करार असतो. त्यामुळे हा एकमेव क्रायटेरिया(प्रतिशब्द?) मानला जाऊ शकतो का याबद्दल साशंक आहे.
----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

क्रायटेरिया

क्रायटेरिया = निकष

ही अडचण सोडवल्या जाऊ शकते

समजा त्यांनी अहो रूपम् अहो ध्वनीम् असा प्रकार केला तरी त्यांचे उद्धृतांक सारख्याच पातळीत येतील. उद्धृतांकाचा विदा एखाद्या आज्ञावलीला भरवल्यास अनोन्य उद्धृताचे थवे सहज काढता येतील. त्याची उद्धृतांकांच्या पातळीशी सांगड घातली तर ही पद्धत गुणवत्ता मापनासाठी अधिक नेमकी करता येईल. निकषांची कोणतीही पद्धत वापरली तरी त्यात भानगडी करणारी मंडळी, रिकामे उद्योग हे करणारच! जसे कोणतीही कुलुप लावण्यामागे सज्जन माणसाची बुद्धी भ्रष्ट होऊ नये हा भाग जास्त महत्त्वाचा असतो, चोर तर कुलुप तोडूनही येतोच, तसलाच काहीसा भाग म्हणता येईल. मात्र, निकष जितके शास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ, तितके अधिक चांगले.

बाकी उद्धृतांक हा एकमेव निकष असू नये याबाबतीत पूर्ण सहमत आहे.

गुंडोपंत, राजेंद्र, तो,
आपल्या अभिप्रायांसाठी मनःपूर्वक आभार!

स्नेहांकित,
शैलेश

पब्लिश ऑर पेरिश

या संदर्भात पब्लिश ऑर पेरिश या आज्ञावलीचा उपयोग होऊ शकेल. ही मी वापरलेली नाही त्यामुळे तिचे फायदे/तोटे माहित नाहीत. पण ही वापरून उद्धृतांक आणि इतरही काही निकष मिळू शकतील असे वाटते.
आणि ही मुक्तस्त्रोत आहे. :)

ताक : या आज्ञावलीच्या पानावर हे वाक्य सापडले. याचा अर्थ नीट लागला नाही.
Publish or Perish is designed to empower individual academics to present their case for research impact to its best advantage. We would be concerned if it would be used for academic staff evaluation purposes in a mechanistic way.

----
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

सायटेशन इंडेक्स - आण्खी काही माहिती

उद्धृतांक ऍवजी उल्लेखांक हा शब्द सुटसुटीत वाटतॉ.

साइन्स सायटेशन् इंडेक्स या विषयावर करंट सायन्सच्या २००१ ते २००४ पर्यंतच्या अनेक अंकात वाचावयास मिळेल. १० मे २००४ च्या अंकात भारत व इतर देशाबरोबर तुलना केलेले टेबल आहे. काही अंकात या विषयी उलट सुलट प्रतिक्रिया वाचावयास मिळेल. लिंकची यादी फार मोठी होईल म्हणून देत नाही. एकंदरीत तुलनेने आपण याही क्षेत्रात फार मागासलेले आहोत हे कबूल करवयास हरकत नसावी.

सहमत

एकंदरीत तुलनेने आपण याही क्षेत्रात फार मागासलेले आहोत हे कबूल करवयास हरकत नसावी.
भारतातून आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेख व्हावा असे एकही शास्त्रिय जर्नल (मासिक?) निघत नाही. भारतातील सर्व मान्यवर शास्त्रज्ञ त्यांचे महत्वाचे निबंध परदेशी जर्नलमध्ये प्रकाशित करतात.

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

सहमत्

किमान खगोलशास्त्राततरी भारतातल्या जर्नलमधे (बासी Bulletin of Astronomical Society of India) निबंध प्रसिद्ध करण्यासाठी 'लालूच' दाखवली जाते, उदा. वर्षातला सर्वात चांगला निबंध जर ३५ वर्षांखालच्या संशोधकाने, निबंधाचा पहिला ऑथर् (मराठी शब्द?) प्रसिद्ध केला असेल तर त्याला/तिला २०हजार रुपयांचे बक्षिस मिळते. बर्‍याच भारतीय कॉन्फरन्सेसमधे चांगले पोस्टर आणि भाषण देणार्‍यांनाही बक्षिस मिळते.
अर्थात विदेशी आहेत म्हणून जर्नल्स चांगलीच असतात असं नाही. 'नेचर' आणि 'सायन्स' वगळता, खगोलशास्त्रात तीन मोठी जर्नल्स आहेत आणि भारतीय साधारणतः एका ब्रिटिश जर्नलचं माध्यम वापरतात, कारण १. वाचकवर्ग, २. जर्नलचा दर्जा, ३.त्यात निबंध प्रसिद्ध करण्याची फी (महाग डॉलर्समधे) पडत नाही.

 
^ वर