तीन भारतरत्न

एक आश्चर्य
आजपावेतो ४१ भारतरत्न बहाल करण्यात आली. इतक्या वर्षात,देशातील व देशाबाहेरील व्यक्तींना. म्हणजे तसा हा दुर्मिळ मान. पण आश्चर्यकारक गोष्ट अशी की एका पंचक्रोशीतील तीघांना हा मान मिळाला आहे. हे कोण व कोठले ?
अवांतर- जड चर्चेतुन थोडासा विरंगुळा म्हणुन या कडे पहावे.
शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

हे ते तिघे...

१९५४ सालचे पहिलेच भारत रत्न तामिळनाडुतील ३ व्यक्तींना दिले गेले -
१) सर्वपल्ली राधाकृष्णन
२) सी राजगोपालाचारी
३) सी व्ही रामन

हेच की तुम्हाला अजून कोणी अपेक्षित होते?

आभार - विकी

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

हेच् का?

१. जवाहरलाल नेहरू
२. लाल बहादुर शास्त्री
३. इंदिरा गांधी

अलाहाबाद-काशी.

अजून २

सत्यजित रे - पं. रविशंकर - अमर्त्य सेन हे त्रिकूट तर नव्हे? (रविशंकरांचा शांतिनिकेतनाशी संबंध आला नाही बहुतेक, नाहीतर तो एक समान धागा असता.) दुसरे म्हणजे १९९७-९८ दरम्यान (जयललितांच्या अमूल्य पाठिंब्यामुळे) तिन्ही भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्ती तामिळनाडूतल्या होत्या (अब्दुल कलाम - एम. एस. सुब्बलक्ष्मी - सी. सुब्रह्मण्यम्)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

०.७८

५२ वर्षात ४१ म्हणजे वर्षाला ०.७८. तितकेही दुर्मिळ वाटत नाही, मला वाटले ०.५च्या खाली असेल.

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

चार भारतरत्ने

१. महर्षी कर्वे
२. लता मंगेशकर
३. भीमसेन जोशी
४. बाबासाहेब आंबेडकर

अजून एक

पी व्ही काणे

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

पम्चक्रोशि

पंचक्रोशी म्हन्जे धा मैल्, आहे का नाही? धा मैलात् कोनाला भारतरत्न मिळाले हे सांगा, उग्गाच लताबाई आनि भिम्शेन्चे नाव कसे टाकता ? लताबाई पेड्रा रोडला आनि भिम्शेन् पुन्यात्.

आमचे हमाल बंधू हेच खरे भारतरत्न. हे नसते तर बिम्शेन् आनि लताबाईंचे तंबुरे कोनी उचलून नेले असते ?

- हमाल
सारी दुनिया का बोझ हम उठते है

रत्नागिरी - खेड

धों. के. कर्वे
पां.वा. काणे
भी. रा. आंबेडकर

हे तिघे?

आचार्य

+ आचार्य विनोबा भावे

पवनार

इनुबा भावे पवनारचे. रत्नांग्रीत कुठे टाकताय त्यांना ?

- हमाल
सारी दुनिया का बोझ हम उठते है

पर जलमले तर अलिबागेजवळ

इनुबा पवनारात आस्रम घालून र्ह्यायल्ते खरं.
पर जलमले तिथं कोकनातच की वो!

पुणे ?

पुणे ही कर्म भुमि मानली तर

विनोबा भावे, कर्वे, अणि काणे असे तीन होतील्?

(नक्कि काय् पन्चक्रोशित् धरायचे हा वांदा आहे, जन्मस्थान?)

तीघेजण

भारतरत्न ---- कोण , कुठले ?

४१ भारतरत्न धारकांची माहिती वाचत असतांना बरीच अचंबा वाटावी अशी माहिती समोर आली. यांपैकी २० राजकारणी आहेत. जे खिरापत वाटणार ते आपल्या कळपातल्यांना चमचाभर जास्त देणार हे व्यवहाराला धरूनच आहे. नशीब आपले कीं हा आकडा २५ वा ३० नाही ! कला क्षेत्रातले सगळॆजण संगीतातले. इतर कलांमधील आपल्या करंटेपणाचा हा निर्देशक. शिक्षण क्षेत्राची परिस्थिती जरा बरी आहे.समाजसेवा मात्र दुर्लक्षितच आहे. मग बाबा आमटेंचा विचार का झाला नाही हा भाबडा विचार मनात आणूच नये.श्री.विसूनाना व इतर जाणकारांनी निरनिराळ्या गटातील विभागणीचा तक्ता करून सर्वानाच उपकृत करावे. असो.
कोण, कुठले ?

तिघांचा विचार करतांना जन्मस्थळच विचारात घेतले पाहिजे. नाहीतर सगळे राजकारणी दिल्लीतलेच ! आता जे.आर.डी.टाटा आणि लता मंगेशकर मुंबईतले; पण एकाचा जन्म पॅरिसमधील तर दुसरीचा इंदूरचा ! डॉ. बाबासाहेब जन्माने महूचे आणि त्यांचा कोकणाशी संबंध तसा चवदार तळ्यापासूनच म्हणावयास हरकत नाही.

तामिळनाडूतील भारतरत्न निरनिराळ्या गावचे दिसतात, अंतरे किती, माहीत नाहीत. माझा भुगोल कच्चाच. सोडून देऊ. महाराष्ट्रापुरता विचार करावयाचा तर लता, डॉ. बाबासाहेब, पं.भीमसेन यांना वगळता, डॉ. काणे, डॉ. अण्णासाहेब कर्वे व आ. विनोबा या तिघांचा जन्म उत्तर रत्नागिरी आणि द. कुलाबा जिल्हा येथील. श्री. हमालसाहेब यंच्या पंचक्रोशी म्हंजै धा मैल या बिनतोड गणिताला थोडीशी मुरड घालून, जवळचे असा अर्थ घ्यावा. पूर्वी ही गावे पायी चालण्याच्या अंतरामधीलच होती.

शरद

आंबवडे देखील कोकणातलेच गाव आहे.

बाबासाहेबांचे मूळ गाव आंबवडे देखील कोकणातलेच.

-पुण्याचे पेशवे

 
^ वर