द हॅपनिंग...
मध्यंतरी जास्वंदीचे फळ ही कथा वाचनात आली.. त्या कथेची एकंदरीत कन्सेप्ट, व तिथले प्रतिसादांवरून कळले की द हॅपनिंग मधे असंच काहीसं आहे.. तेव्हापासून तो पाहायचाच होता..
सुरवात सेंट्रल पार्क न्युयॉर्क.. रोजचीच सकाळ, लोकांचे नेहेमीचे रूटीन.. कोणी फिरायला आलेय, कोणी वाचत बसलेय.. पण अचानक लोकं डिसओरिएंटेड होतात.. पहील्यांदा असंबद्ध बडबड, कुठेतरी हरवलेली नजर.. मग पूर्णपणे सगळं जनजीवन ठप्प होऊन थांबते.. सगळे स्तब्ध..
आणि मग सिरिज ऑफ सुसायडल इव्हेंट्स.. सगळी लोकं, त्यांना जो जवळचा मरायचा मार्ग असेल तो स्विकारून मरतात...
म्हणजे... पिक्चरमधे दाखवलेली क्लेअर.. केसांची पीन मानेत खुपसते.. कुठल्याश्या बांधकामावरची लोकं, सटासट बिल्डींगवरून खाली कोसळतात.. ( हे सगळ्यात भयानक दृश्य! ) :|
हळूहळू समजते की हा एकप्रकारचा ऍटॅक आहे.. आधी तो टेररिस्ट ऍटॅक वाटतो.. काहीतरी बायोलॉजिकली केलेला... मूळात सगळीकडे गोंधळ सुरू होतो.. न्युयॉर्क सिटी खाली करण्याचा निर्णाय होतो.. सगळे सामान घेऊन निघतात प्रवासाला.. जसाजसा प्रवास चालू होतो.. तशा न्युज येतात.. कुठला एरिआ अफेक्टेड झाला.. कोणी कसं मारले स्वत:ला !! (यात एका प्राणीसंग्रहालयातले दृश्य आहे.. तो माणुस स्वत:ला वाघ-सिंहाच्या हवाली करतो.. )
चित्रपटाचा नायक, त्याच्या बायको वर मित्राबरोबर निघालेला.. त्याचा मित्र (त्याच्या) बायकोला शोधायला जातो दुसर्या गावी.. तिथे तोही अफेक्टेड एरिआ.. मरायचे मार्ग शोधून मरतात सगळे...
इकडे नायक.. एका बॉटनिस्टच्या गाडीत बसून निघतो.. त्या बॉटनिस्टच्या मते, हे सगळं झाडं घडवून आणत आहेत.. ते कम्युनिकेट करत आहेत वार्याच्या मदतीने.. आणि काही विषारी केमिकल्स सोडून माणसांना मरायला भाग पाडत आहेत... नायक-नायिका त्याला सायकीक समजून त्याचे बोलणे हसण्यावारी सोडून देतात ..
पुढे बर्याच गोष्टी घडतात.. नायक सांईटीस्ट असल्याने जरा विचार करतो.. बॉटनिस्टचे म्हणणे कदाचित खरे असावे अशा मुद्द्याला येऊन थांबतो... त्यावरून असा निष्कर्ष काढतो, की जेव्हढी कमी लोकसंख्येची जागा, जितकी कमी लोकं तितका धोका कमी आहे.. म्हणून ग्रुप्स स्प्लिट करून फिरत राहतात... एका घरी पोचतात... तिथली जगाशी काहीही कॉन्टॅक्ट नसलेली बाई त्यांना थारा देते... जेवायला आणि रात्री राहायला जागा देते... पण व्हीमझिकल स्वभावाची चुणुक दाखवून देते... हे सगळे तिच्या घरी काहीतरी चोरी करायला आलेत ही तिची भावना...
शेवटी तीही खिडक्यांवर डोकं आपटून मरून घेते.... म्हणजे एकट्यालाही धोका आहेच... याचाच अर्थ नायक-नायिकाही धोक्यात आहेत... .....
असो...
शेवट सांगण्यात काही हशील नाही...
नाईट श्यामलनचे डोके काहीतरी भन्नाट चालते हे नक्की .. परंतू सिनेमा अर्धवट संपल्यासारखा वाटतो... हे का होते.. असे का झाले असावे याचा विचार आपणच करायचा..
माझं डोकं सतत विचार करत होते.. सतत तर्क.. की कदाचित आपण झाडांवर अन्याय केला त्याचा बदला... किंवा विद्न्यानाने इतके बदल घडवून आणले की नेचरचा इम्बॅलन्स झाला... म्हणून झाडांमार्फत हा निसर्ग विद्न्यानाच्या जनकाला मारून टाकतोय.. इत्यादी ! पण हे काहीही न सांगता पिक्चर संपतो.. इतकंच कळते की ही वॉर्निंग आहे... कशाची, कशाबद्दल माहीत नाही...
सिनेमा संपता संपता पॅरिस मधेही हे इव्हेंट्स सुरू झाल्याचे दाखवले आहे...
शेवट थरारता करण्यात यशस्वी झालाय श्यामलन... पण तर्क, अनुमान आपणच काढायचे ! त्यामुळे जरा अपूर्णता आहे या पिक्चरमधे...
तरीही मला आवडला... क्षणभरही मी हलू शकले नाही टीव्हीपासून.. इतके मृत्यूचे थैमान असून काही १-२ अपवाद सोडले तर किळसवाणा काही प्रकार नाही... भितीदायक आहे, पण विचार करायला लावणारा जास्त आहे... पिक्चरमधे जे दाखवले आहे त्याच्या भितीने झोप उडण्यापेक्षा, असे खरंच झालं तर या विचाराने झोप उडते... आपले खरेच कहीतरी चुकते आहे आणि आपण उद्यापासून शक्य तितक्या निसर्गाच्या कलाने राहीले पाहीजे वगैरे विचार येतात ! जे मला आवडलं! पिक्चरचे सीन्स लक्षात न राहता कन्सेप्ट लक्षात जास्त राहीली आहे...
चित्रीकरण अप्रतिम ! मी श्यामलनचा चित्रपट पहील्यांदा पूर्ण पाहीला... सिक्स्थ सेन्स, साईन्स मी नीट बसून नाही पाहीले कधी... पण हे जे काही पाहीले.. त्यावरून श्यामलनची डोकॅलिटीचा अंदाज आला...
मी सर्वांना रेकमंड करीन हा मुव्ही.. नक्की पाहा! माझ्याकडून १० पैकी ९...
१ मार्क कमी कारण आपल्याला फार विचारात पाडतो.. आणि अर्धवट संपल्यासारखे वाटते म्हणून !!
Comments
नमस्कार..
हा उपक्रमवरचा माझा पहीलाच लेख. त्यामुळे ती 'पहीलं काही करण्याची' एक उत्सुकता, टेन्शन आहेच ! :)
नुकतीच झालेली चर्चा/लेख कसा असावा ही चर्चा वाचल्यामुळे हा लेख बराच मागासलेला आहे याची जाणीव आहे.
खूप विरामचिन्हांचा वापर, खूपच इंग्रजी शब्द आहेत यात. त्याबद्दल खूप क्षमस्व.
पण ब्लॉगवरून इथे आणला आहे व ब्लॉगवर लिहीताना इतका विचार करून नाही लिहीला जात.
अगदीच खटकले तर मी शक्य असेल ते बदल करेन..
धन्यवाद..
सिनेमा
श्यामलन यांच्या सिनेमाला मी फार भितो. सिक्स्थ् सेन्स् नंतरचा एकही सिनेमा मला कळलेला नाही . वेळ/पैसे/मनःशांती यांचा अपव्यय झाला. "साईन्स्" नंतर मी त्यांचे सिनेमे पहाणे सोडून दिले. "हॅपनिंग्" वर तुम्ही इतके कष्ट घेऊन लिहिले आहे. उपक्रमवरील प्रेमापोटी हा सिनेमा लिस्टवर टाकेन म्हणतो आहे खरा ; पण ...काय खरे नाही बॉ ! :-)
(ह. घ्या. !)
सिक्स्थ सेन्स, अनब्रेकेबल, साईन्स, विलेज आणि लेडी इन द वॉटर
मला असे वाटते की अनब्रेकेबलचा अपवाद वगळता श्यामलन् यांचे सिनेमे हे दर्जाच्या दृष्टीने उतरते आहेत. सिक्स्थ सेन्स आणि अनब्रेकेबल मला सर्वोत्कृष्ट वाटले. आधीच्या दोन्ही सिनेमांत जाणवणारी अदृश्य शक्ती साईन्स मध्ये अंधुकशी जाणवून गेली. लेडी इन द वॉटर तर भूतपटच होता.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
सहमत
सहमत आहे. सिक्स्थ सेन्स नंतर श्यामलन ह्यांची गाडी घसरताना दिसत आहे.
चित्रपट परिचय आवडला.
सिक्स्थ सेन्स आणि अनब्रेकेबल
मलाही आवडले, पैकी सिक्स्थ सेन्स उत्कृष्ट. विलेज हा साईन्सपेक्षा जास्त आवडला. बाकीचे पाहिले नाहीत कारण चित्रपट एका पठडीतील होत असल्यासारखे वाटले.
असो.
उपक्रमावर (लेखिका म्हणून) स्वागत आहे.
असेच
सिक्स्थ सेन्स [व स्टुअर्ट लिटील - पटकथा] नंतर आवडेल असा कुठलाच नाही एम. ना.शा. कडून
बाकी लेखीकेकडून नियमीत लेखन यावे ही सदिच्छा!
ह्याच चित्रपटाबाबत
ह्या चित्रपटाबाबत गणेश मतकरी यांचा लेखही वाचनीय आहे.
दुवा
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
सुरेख
छान लेख. श्यामलानचा सिक्स्थ सेन्स आवडला होता. हा खास रेकमेंड केला आहे म्हणून यादीत टाकला आहे.
श्यामलानने पुढच्या चित्रपटासाठी देव पटेलला घेतले आहे म्हणे.
----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.
बाप रे!!!
भाग्यश्री, छान ओळख करून दिली आहेस. श्यामलनचा सिक्स्थ सेन्सच बघितला आहे आत्तापर्यंत. पण हा प्राणी भन्नाटच आहे. भूतपटांची भिती वाटते, हा भूतपट नाही हे कळले. आता हा बघावा का? असा किडा चावला आहे मला आता.
बिपिन कार्यकर्ते
वा स्वागत आहे
त्या निमित्ताने या चित्रपटाची चांगली ओळख झाली.
(मीसुद्धा श्यामलन यांचे चित्रपट सहसा टाळतो.)
श्यामलन!
वा! सिक्स्थ सेंस, व्हीलेज आणि अन्ब्रेकेबल पाहिले आहेत. त्यात मला व्हीलेजचे कथानक प्रचंड आवडले आणि सिक्थ सेंन्स ने मस्त आणि निव्वळ (किळस, रक्त, भयानक चेहेरे वगेरे जोकरपणा न करता) घाबरवले.
उपक्रमच्या लिहित्या लोकांमधे स्वागत :)
या वाक्यानंतर पुढे वाचलंच नाहि :) त्यामुळे परिक्षण कसं आहे ते सांगता येणार नाहि.. पण चित्र मस्त आहे.. चित्रपट बघितल्यानंतर परिक्षण वाचेन.
ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
असेच..
चित्रपट पाहिल्यानंतर परीक्षण वाचेन.
दोन पुस्तकांच्या नावांबद्दल धन्यवाद सन्जोप राव!
-सौरभ.
==================
अरे वा!
परीक्षण वाचून धारपांच्या 'फायकसची अखेर', 'पारंब्यांचे जग' वगैरे कादंबर्यांची आठवण झाली.
सन्जोप राव
छान
हमालांनी भीतीदायक पिक्चर बघू नयेत, असे पंचायतीचे मत आहे.
(काही भाग संपादित)
- हमाल
सारी दुनिया का बोझ हम उठते है
नमस्कार!
सर्व प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद !
चित्रपट पाहून कसा वाटला जरूर कळवा..
म्हणजे मलाच आवडला आहे हा असे नाही वाटणार! :)
पाहते
श्यामलनचा सिक्स्थ सेन्स पाहिल्यानंतर थोडी अपेक्षा वाढली होती, ती मधल्या चित्रपटांनी कमी झाली. त्यामुळे एरवी पाहिला नसता, पण आवडला असे सांगितल्याने पहावासा वाटत आहे.