पुनःश्च हरि ॐ!

सद्या उपक्रमवर जे गोंधळाचे वातावरण आहे ते पाहून मी अतिशय व्यथित झालोय. आपण सगळ्यांनी मिळून उपक्रमजींच्या ह्या कार्याला आपापल्या मगदुराप्रमाणे हातभार लावून हे संकेतस्थळ यशस्वी करून दाखवूया.मराठी माणसाला नुसतेच भांडता येते असे नाही तर वेळप्रसंगी तो एकजूटही करू शकतो हे आपण सर्वांनी इथे कृतीने दाखवून देऊ या.
माझी उपक्रमजींना नम्र विनंती आहे की त्यांनी पुन्हा एकदा त्यांची भुमिका अतिशय स्वच्छपणे आणि मोकळेपणे मांडावी. इथे येणार्‍या सदस्यांकडून असलेल्या नेमक्या अपेक्षा उघडपणे व्यक्त कराव्यात.
सदस्यांना देखिल माझे नम्र आवाहन आहे की ह्या संकेतस्थळासंबंधाने उपक्रमजी जे धोरण आखतील ते आपणही मोकळ्या मनाने मान्य करणे योग्य होईल. इथे वादविवाद करायला काहीच हरकत नसावी असे वाटते;पण आपण सर्व सुजाण सदस्यांनी अशा वादातून कोणतीही कटूता निर्माण होणार नाही ह्याची काळजी घेणे आवश्यक आहे असेही वाटते. हे संकेतस्थळ वादाच्या भोवर्‍यात सापडेल अशी कोणतीही कृती आपण करायची नाही ही खुणगांठ प्रत्येकाने आपल्या मनाशी बांधावी ही विनंती.
उपक्रमजी मी वैयक्तिकपणे आजवर जाणता-अजाणता इथे जे काही लेखन आणि प्रतिसादाच्या स्वरूपात बोललो आहे ;त्यातून जर आपणाला कोणत्याही प्रकारचा मनस्ताप,दु:ख झाले असेल तर मी आपली बिनशर्त जाहीर माफी मागतो.
माझ्याकडून ह्यापुढे केवळ आपल्याला अपेक्षित असलेले सहकार्यच मिळेल ह्याची हमी देतो.
लवकरात लवकर इथले वातावरण निवळेल आणि हे संकेतस्थळ लोकांच्या पसंतीला उतरेल अशा शुभेच्छा व्यक्त करतो.

लेखनविषय: दुवे:

Comments

एका वेगळया

लेखात आपण आपला एक प्रतिसाद उडवला गेल्याबद्दल खंत व्यक्त केलीत. तो माझ्या प्रतिसादाला दिलेला उपप्रतिसाद होता, ज्याचे नाव होते 'आपणच फक्त शहाणे'. मी माझ्या प्रतिसादात आपला कोणत्याही प्रकारे उपमर्द केला नव्हता, फक्त लेखकाला माझे म्हणणे सांगितले होते. कदाचित आपल्याला आठवत असेल की पूर्वी एकदा व्य. नि. तून मी आपल्यालाही हेच सांगितले होते की माहितीपूर्ण लेखाला किंवा साध्या लेखालाही एखादा फक्त "छान आवडले" म्हणतो तेव्हा त्याला त्यातील नक्की काय कळलेले असते आणि काय आवडलेले असते याचा मला उलगडा होत नाही कदाचित तो मैत्रीखातर आवडले म्हणून जाण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा स्पष्टपणे काय आवडले काय नाही ते सांगणारे बरे!

हे असूनही आपण मला अत्यंत व्यक्तिगत रोखाचा आणि लेखाशी संबंधित नसलेला उपप्रतिसाद दिलात. त्यावर तो काढला गेला तेव्हा नाराजीही व्यक्त केलीत.

असो.

आपल्याला याप्रकाराचा खेद वाटतो किंवा नाही वाटत ते माहित नाही, परंतु होणार्‍या हुल्लडबाजीत आपला सहभाग पाहून मला नक्कीच खेद वाटला.

जाहीर माफी!

त्या आणि इतर कोणत्याही प्रकाराची (असल्यास)जाहीर माफी मागतो.

मला माफी नको

मी नेहमी आपल्याला काका म्हणत आले. आपल्याकडून माफीची अजीबात अपेक्षा नाही.

संकेतस्थळ नवीन आहे. धोरणे निश्चित होण्यास कदाचित वेळ लागतो. सदस्यांनीही समजून घेण्याऐवजी हट्ट करणे, कुरापती काढणे हे टाळायला हरकत नाही.

फक्त धीर धरावा इतकेच.

मान्य!

संकेतस्थळ नवीन आहे. धोरणे निश्चित होण्यास कदाचित वेळ लागतो. सदस्यांनीही समजून घेण्याऐवजी हट्ट करणे, कुरापती काढणे हे टाळायला हरकत नाही.

फक्त धीर धरावा इतकेच.

आपल्या भावनेशी शब्दश: सहमत आहे.

"पुनश्च हरि: ॐ "विषयी

श्री. अत्त्यानंद यांनी व्यक्त केलेल्या विचारांशी मी पूर्णतया सहमत आहे.या संदर्भात श्री.ॐकार यांचाही एक उत्तम लेख होता. मार्गदर्शनपर लेखात "लेखन मुख्यत्वेकरून माहिती प्रधान असावे ."असे लिहिले त्यात काहीच वावगे नाही. प्रतिभावंताना मार्गदर्शक तत्त्वांचा थोडा काच वाटण्याची शक्यता आहे. पण मन मोठे करून त्यांनी तत्त्वांच्या चौकटीत लिहावे.या संकेतस्थळाला मोठे करण्याचे उत्तरदायित्व त्यांच्यावरच आहे.
मर्गदर्शक तत्त्वे म्हणजे काही कायद्याची कलमे नव्हेत.प्रत्येक गोष्ट अगदी काटेकोरपणे आणि विस्ताराने मांडणे शक्य नसते.त्याची आवश्यकताही नाही.स्थळाचे सर्व सदस्य सुबुद्ध आहेत ,सर्वांना तारतम्य बुद्धी आहे हे गृहीत धरणे योग्यच आहे.
इथे काही अगदी घट्ट चौकट नाही . लवचिकता आहेच.
तरी सर्वांनी मनमोकळे पणाने आणि उत्साहाने लिहावे आणि यासंकेतस्थळाला प्रगतिपथावर न्यावे.
.........यनावाला

*******************
उपक्रमकारांचे स्वरचित कवितां विषयींचे धोरण समजण्यासारखे आहे. कवींचे वास्तवाचे भान अनेकदा सुटत असावे.कवी हट्टी असतात.आपली कविता म्हणजे प्रतिभेचा महान आविष्कार आहे.ती सर्वांनी वाचलीच /ऐकलीच पाहिजे असा त्यांचा हट्ट असतो. कुणीतरी म्हटलेच आहे : अरे! आला कवी !आता धावा पळा लपा|
पाठीराखे स्मरा किंवा रामरक्षा तरी जपा |
तसेच आचार्य अत्र्यांनी लिहिले आहे :
कुठे लिहिल्या कविता न पाच सात |
काही आल्या छापून मासिकांत |
तया वाटे की जाहलो हिरो मी |
महाराष्ट्रा हलवीन रोमरोमी | (आठवले तसे लिहिले आहे.चुका संभवतात)
(हे केवळ गंमतीने लिहिले आहे. कुणाचा अधिक्षेप करण्याचा प्रश्नच नाही.)

मनाचा मोठेपणा

वरील संवादात भाग घेतलेल्यांची प्रगल्भता पाहून बरे वाटले. मागे 'मनोगत' वर मी आणि विनायकराव यांचा एक जोरदार वाद झाला होता. त्यातील माझी टिप्पणी वैयक्तिक स्वरुपाची आहे असा आरोप संवादिनी यांनी केला होता. ते तसे नाही हे त्यांना खेडूताने पटवून दिले होते. ते पटल्याने आपण आपले म्हणणे मागे घेत आहोत असे संवादिनी यांनी जाहीरपणे लिहिले होते. 'पहिला दिवस' या माझ्या लेखातील काही वैयक्तिक स्वरुपीचे उल्लेख आवडले नाहीत असे काही लोकांनी मला कळवले होते. सुदैवाने ते लिखाण अनुदिनीवर असल्याने ते संपादित करणे शक्य होते. मी ते उल्लेख तात्काळ काढून टाकले होते. आपला अशा कोणत्याही स्वरुपाचा उल्लेख अशा लेखांतून करु नये असेही मला काही व्यक्तींनी कळवले होते, तेंव्हा त्यांच्या त्या म्हणण्याचा आदर करणे आवश्यक आहे, असे मानून मी तसे करणे टाळले होते. याउलट माझ्या काही वादग्रस्त विधानांबद्दल मी जाहीर माफी मागावी, माझे सदस्यत्व रद्द करावे अशा मागण्या केल्या जाताच, माझे विचार हे वैयक्तिक स्वरुपाचे असल्याने त्यांच्याशी सहमत न होणे हे एखाद्याचे स्वातंत्र्य आहे, पण् त्यांबाबत मला कसलाही अपराधीपणा वाटत नसल्याने मी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही अशी भूमिका मी घेतली होती.
हे इतके सरळ आणि सोपे असताना ते इतके अवघड का वाटावे हे कळत नाही!
सन्जोप राव

राव साहेब,

आदरणीय रावसाहेब,

आपण लिहिलेला प्रतिसाद अत्त्यानंदरावांच्या लेखाशी फारसा सुसंगत वाटला नाही. आपण मागचंच काहितरी आठवून भावनेच्या भरात इथे अचानक मन मोकळं केलेलं दिसत आहे! ;)

असो!

माझी आई मला "भात वाढू का? असं जेव्हा विचारते तेव्हा मीसुद्धा काही वेळेला "उपक्रमने धोरणे स्पष्ट करावीत" असं काहीसं उत्तर देतो! :))

तात्या.

सुसंगतच आहे!

आपण लिहिलेला प्रतिसाद अत्त्यानंदरावांच्या लेखाशी फारसा सुसंगत वाटला नाही. आपण मागचंच काहितरी आठवून भावनेच्या भरात इथे अचानक मन मोकळं केलेलं दिसत आहे!

तात्या, माझा प्रतिसाद अत्त्यानंद यांच्या
आपण सर्व सुजाण सदस्यांनी अशा वादातून कोणतीही कटूता निर्माण होणार नाही ह्याची काळजी घेणे आवश्यक आहे असेही वाटते
या विधानाशी सुसंगतच आहे, असे मला वाटते. स्मरणरंजन मला प्रिय असले तरी ते अस्थानी होऊ नये इतके भान मला आहे, असे वाटते.
अवांतरः भात खाताना 'उपक्रम' चे विचार मनातून काढून टाका. भात जास्त खाल्ला जाईल!

सन्जोप राव

खरंय..

माझ्याकडून देखिल काही हुल्लडबाजी झाली असल्यास त्याचे प्रायश्चित्त म्हणून फक्त माहितीपूर्ण लिखाणावरच भर द्यायचे ठरवले आहे. त्यानुसार नुकताच एक चर्चेचा प्रस्ताव लिहिला आहे. सगळेजण त्यात माहितीपूर्ण योगदान करतील अशी आशा आहे.

सहमत

सहमत

खेदजनक......

उपक्रमचा मी एक नविन सदस्य आहे, पण अद्याप पर्यनतचे एकन्दरित वातावरण पाहून, इथे सगळे जण एकमेकाना दोष देण्यात धन्यता मानत आहेत, असेच वाटते. ईथले काही सदस्य तर,नावानेच विचीत्र वाटतात. अभिप्राय सुद्धा खवचट प्रकारे लिहीतात.अशाने उपाक्रमचे उद्दीश्ट् कसे साध्य होणार?वाईट वाटते.

उपक्रम वाढावेच !

उपक्रम वाढावेच आणि त्याची प्रगती होत जावी असं मलाही वाटतं. त्यामुळे सदस्य आणि संपादक मंडळ यांच्यात चर्चा करण्याची वेळ आल्यास तसं व्हावंही मात्र अन्यवेळी लिखाण आणि माहितीची देवानघेवान ही नक्कीच व्हावी.
मागे सुध्दा मी असं बोललो होतो की एका विशिष्ट विषयाला वाहून घेण्याचा आणि आपली व्याप्ती मर्यादीत करण्याचा हा जो नवा पायंडा उपक्रम पाडू इच्छीतं ते उत्तमच आहे.
कदाचित यामुळे येथे दर्जेदार लेख वाचायला मिळतील अशी आशा आहे.

अवांतर :
तात्या जरा हळू हो, नवे सदस्य अद्याप आपल्या शैलीशी परिचित नसतांना असा कोकणी नमस्कार कदाचित त्यांना निरुस्ताही करेल. बाकी मला तुमचा प्रतिसाद आवडला.
आता , नेमका - बरा , आवडला, खुप आवडला, उत्तम, बहोत खुब यांतील खुप आवडला अशी नेमकी निवड करतो.

नीलकांत

आवरा आता..

अपेक्षांचा कधी कधी असाही भंग होतो
हाय कधी स्वप्नांची अशी वाताहत होते

एक स्थळ वाटले होते होईल वटवृक्ष
बांडगूळ तरी ते जुन्याचेच होते

उनाड माणसे बसली करत कुचाळक्या
कारण त्याचे कठोर नियमांतही होते

अलगद सुचते काव्य लिहितो आम्ही इथे
असे काय निर्घृण आमचे प्रमाद होते

उपरती झाली खरी जराशी उशिरा
गड्या आपले अज्ञात ब्लॉग बरे होते

येणे झाले कधी इकडे कधी मधी
समजा तुम्ही पांथस्थ चुकले वाट होते

चालवा उपक्रमे तुम्ही खुशाल लोकहो
हा तुम्हाला शेवटचा काव्यनिरोप आहे

(अखेरचा दंडवत)अभिजित

अभिजित

कविता आवडली. आपलाही उपक्रमाला अखेरचा जय महाराष्ट्र का?
आपला
कॉ.विकि

नवीन सदस्य

नवीन सदस्यांना कोंडीत पकडणं तुम्हाला योग्य वाटत का?

नवीन सदस्यांना आल्या आल्या त्यांना उत्तम मराठी यायला हवं हा हट्ट कितपत

योग्य. याचा उलट परिणाम हि होऊ शकतो हि काळजी घ्यायला हवी. कारण

मी नवीन आलो होतो तेव्हा मला हि असच वाटलं होत. हे लोक उत्तम

मराठी लिहिणारे बोलणारे आहे आपला ह्यांच्या समोर टिकाव लागणार नाही.

पण त्या पेक्षा हि मला उत्तम मराठी बोलता लिहिता येणं गरजेच वाटलं.

पण इतरांना हि अस वाटेल अस सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना आपल्यात

येऊदे आणि मग त्यांना शिकवू. तुम्हाला काय वाटत ?

मी सहमत आहे

नीनाद ,
मी सहमत आहे आणि हो अद्याप शिकतोच आहे.
नीलकांत

बापरे

नीलकांत मग् तर् आम्ही तर छोटा शुशु नाहितर १ली २रित असू

हा हा हा

 
^ वर