उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
…तर मी नेहरूंचीही हत्या केली असती ! - प्रमोद मुतालिक
वेमीत्८५
March 12, 2009 - 3:01 pm
![]() |
त्या काळात मी असतो, तर गांधीच काय, पंडित नेहरूंचीही हत्या केली असती.....विस्तारीत वृत्त...
त्या काळात मी असतो, तर गांधीच काय, पंडित नेहरूंचीही हत्या केली असती....त्या काळात मी असतो, तर गांधीच काय, पंडित नेहरूंचीही हत्या केली असती....त्या काळात मी असतो, तर गांधीच काय, पंडित नेहरूंचीही हत्या केली असती....त्या काळात मी असतो, तर गांधीच काय, पंडित नेहरूंचीही हत्या केली असती....त्या काळात मी असतो, तर गांधीच काय, पंडित नेहरूंचीही हत्या केली असती....त्या काळात मी असतो, तर गांधीच काय, पंडित नेहरूंचीही हत्या केली असती....त्या काळात मी असतो, तर गांधीच काय, पंडित नेहरूंचीही हत्या केली असती....त्या काळात मी असतो, तर गांधीच काय, पंडित नेहरूंचीही हत्या केली असती....त्या काळात मी असतो, तर गांधीच काय, पंडित नेहरूंचीही हत्या केली असती....
दुवे:
Comments
त्या काळाचं जाऊ दे हो
या काळात अशा वक्तव्यांबद्दल प्रमोद मुतालिकांना फाशी द्यावे काय ते सांगा.
उत्तम
आमची संघटना ही अहिंसावादी आहे. त्यामुळे येथे राहून देशविघातक काम करणार्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देणे, हे संघटनेचे मुख्य काम आहे; मात्र देशद्रोह्यांनी विरोध केल्यास त्यांच्याबाबत हिंसात्मक मार्गाचाही अवलंब केला जाईल. त्यासाठी संघटनेच्या तरुणांना प्रशिक्षणही दिले जात असून यातील प्रत्येक सदस्य जणू जिवंत बाँबच आहे, असे श्री. मुतालिक यांनी म्हटले आहे. या मुलाखतीत श्री. मुतालिक पुढे म्हणतात, “मुलींनी मद्य पिण्याला आमचा विरोध आहे. असे प्रकार दिसल्यास आम्ही त्यांना वठणीवर आणू.
हे उत्तम. अहिंसक बाँब ही कल्पना फार आवडली. नैष्ठिक ब्रम्हचर्यानंतर इतकी विनोदी कल्पना पहिल्यांदाच वाचली. मुलांनी मद्य पिण्यास सेनेचा विरोध नाही हे वाचून हायसे वाटले. चिअर्स!
सन्जोप राव
प्रमोद मुतालिक कोण?
प्रमोद मुतालिक कोण? आणि सदर व्यक्ती काहि बोलली तर त्यावर उपक्रमवर का चर्चा व्हावी असे वाटते?
ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
त्यात नविन काय?
कशानेही भडकणार्या डोक्यांना चुचकारण्याचा मुतालिक यांचा हा डाव दिसतो.
त्यात नविन काही नाही.
वेमीतराव तुम्ही मात्र हे समजण्या इतपत सुज्ञ असाल ही अपेक्षा.
चालायचेच ...
थोडक्यात काय तर निवडणुकींच्या मुहुर्तावर ह्या मोठ्ठ्या लोकांचा भातुकलीचा खेळ पुन्हा सुरु झाला. चांगले चालु आहे.
मुतालिकसाहेब म्हणतात ते बरोबर असु शकते.
ह्यांच्या प्रशिक्षणात सामान्य कार्यकर्ते प्रथम "गुंड" दिसावेत ही प्राथमीक पायरी आहे असे आमचे मत आहे. व्हॅलेंटाईन डे दिवशी ह्यांचे फुल्ल टल्ली असणारे आणि तोंडात पान/गुटखा टाकुन् मनोसोक्त अर्वाच्च आणि अश्लिल शिव्या हासडत "संस्कॄतीरक्षण" करणारे कार्यकर्ते पाहिले आणि भारतात लवकरच रामराज्य येणार ह्या आनंदात आम्ही मारुतीसमोर नारळ फोडला ...
संघटनेच्या नावाच्या आडुन दमदाटी करणे, गुंडागर्दी करणे, कायदा हातात घेणे, शक्य तितकी अ-संविधानीक कामे करणे वगैरे गोष्टी ह्या जिवंत देशप्रेमी आणि संस्कॄतीरक्षक बाँब बनण्यासाठी अत्यावश्यक आहेत ह्या तत्वांवर ह्या सर्वच स्वघोषीत संस्कॄतीरक्षकांचा गाढा विश्वास आहे असे दिसतेय.
चालायचेच ...!
निवडणुका आल्या आहेत्, एकदा त्या सरल्या की सर्व कैफ उतरुन डोके आओपाप ठिकाणावर येईल ...
>>मुलांनी मद्य पिण्यास सेनेचा विरोध नाही हे वाचून हायसे वाटले. चिअर्स!
हा हा हा, हे एक खरचं भारी ...
आता कुणाच्या बापाची टाप नाही आडवायची, काय झाले तर श्रीराम सैनिक आहेत बघुन घ्यायला, कसें ?
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
तेंडुलकर काय म्हणाले होते?
काही दिवसांपूर्वी तेंडुलकरही असेच काही तरी म्हणाल्याचे छापून आले होते. फक्त त्यांचे लक्ष्य नरेंद्र मोदी होते.
सेना
व्हॅलेंटाईन डे दिवशी ह्यांचे फुल्ल टल्ली असणारे आणि तोंडात पान/गुटखा टाकुन् मनोसोक्त अर्वाच्च आणि अश्लिल शिव्या हासडत "संस्कॄतीरक्षण" करणारे कार्यकर्ते पाहिले आणि भारतात लवकरच रामराज्य येणार ह्या आनंदात आम्ही मारुतीसमोर नारळ फोडला ...
हाहाहा.... संघटनेच्या नावात 'सेना' असले की असले काहीही करण्यास मुभा असते म्हणे!
सन्जोप राव