निश्चयाचा महामेरू..

राम राम मंडळी,

निश्चयाचा महमेरू, बहुत जनासी आधारू..

ह्या समर्थांच्या ओळी मला इथे द्याव्याश्या वाटतात. परंतु या ओळी माहिती आणि विचारांची कितपत देवाणघेवाण करतात हे मला माहिती नाही!

उपक्रमच्या धोरणानुसार येथे फक्त माहिती आणि विचारांची देवाणघेवाण अपेक्षित आहे. तरी या चर्चेद्वारा मी उपक्रमकर्त्यांना आणि माझ्या समस्त उपक्रमी मित्रमैत्रिणींना असे विचारू इच्छितो की समर्थांचं हे काव्य मी येथे द्यावं किंवा नाही?

कृपया सर्वांनी योग्य तो सल्ला देऊन मला मदत करावी, ही विनंती..

आपला,
तात्या अभ्यंकर.

लेखनविषय: दुवे:

Comments

दासबोध

तात्या

एवढ्या दोनच ओळी कशाला? अख्खा दासबोधच देना ! वाचायला आवडेल.

विनायक

हो, पण..

अख्खा दासबोधच देना ! वाचायला आवडेल.

हो, पण तो माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करणारा नसेल तर?? ;)

असो! विनायकराव, आपल्या सल्ल्याबद्दल अनेक धन्यवाद..

तात्या.

दासबोध

तात्या

दासबोधावर तुमचं खुमासदार शैलीत निरूपण पण आवडेल. लेखमाला होऊन जाऊ द्या!!

पल्लवी

 
^ वर