पर्यावरणरक्षणाचा आव आणून `होळी' सणाला कचऱ्याची होळी करायला सांगणारी अंनिस या प्रश्नांची उत्तरे देईल का ?

१. अंनिसवाल्यांनो, होळीत जाळण्यासाठी दरवर्षी किती वृक्षांची तोड होते, याचा आपण काही शास्त्रशुद्ध अभ्यास केला आहे का ?

२. अंनिसवाल्यांनो, होळीशिवाय अन्य वेळी केली जाणारी वृक्षतोड आपल्याला दिसते का ? कि त्या वेळी आपल्या दोन्ही डोळयांत `कचरा' गेलेला असतो ?

३. अंनिसवाल्यांनो, भारतात नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रातही नव्हे; तर ज्या पाच-पन्नास गावांमधून तुमचे टिवटिव करणारे दोन/चार कार्यकर्ते आहेेत, तेथे तुम्ही पर्यावरणाच्या रक्षणासाठी वर्षभर कोणते प्रयत्न केलेत ? अनाठायी होणारी किती वृक्षतोड तुम्ही रोखलीत ? किती नवीन रोपटी तुम्ही वर्षभरात लावलीत ?

४. जो मुद्दा वृक्षतोडीचा तोच कचरा जाळण्याचा. वर्षातून एक दिवस कचरा जाळून (तोही हिंदूंच्या मोठ्या सणाच्या दिवशी) असा कोणता फरक पडणार आहे ? असे केले आणि वर्षभर कचऱ्याचे ढीग तसेच साचवून ठेवले; तर अंनिसवाल्यांनो, ते तुम्हाला आणि समाजालाही चालणार आहेत का ? किती अंनिसवाले ते रहात असलेला परिसर, त्यांची गल्ली कचरामुक्त राखण्यासाठी वर्षभर धडपडतात ?

५. श्रीगणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी वाहात्या पाण्यात सोडण्यात येणाऱ्या निर्माल्याला `कचऱ्या'ची किंमत देऊन त्याचे खत करा, असे सांगणारे अंनिसवाले होळीच्या वेळी जमवलेल्या कचऱ्याचे खत करा, असे का सांगत नाहीत ?

६. अंनिसवाल्यांनो, तुमच्या बाजूने जवळजवळ सर्व साखळी वर्तमानपत्रे, `चित्रलेखा'सारखे साप्ताहिक, दूरदर्शन, तुमचे स्वत:चे मासिक एवढी प्रसिद्धीमाध्यमे आहेत. हे सर्वजण तुम्ही सांगाल त्याची शहानिशा न करता कशालाही प्रसिद्धी द्यायला सिद्ध असतात. असे असतांना तुमची चळवळ पुढे का सरकत नाही ? गणपतीमूर्तीच्या विसर्जनाच्या दिवशी मोठ्या कष्टाने तुम्ही १०/२० मूर्ती `दान' मिळवल्या असतांना शेकडो गावांतून हजारो मूर्ती दान मिळाल्याचे सांगता. तेवढेही खोटे आकडे किंवा तुमच्या प्रबोधनामुळे वृक्षतोड थांबल्याचे (खोटे) प्रसंग तुम्ही का दाखवू शकत नाही ? तुमच्या चळवळीची ही पुच्छ प्रगती नव्हे का ?

७. अंनिसवाल्यांनो, या सर्व गोष्टीत तुम्हाला वनमंत्र्यांचे किंवा तत्सम राजकीय नेत्यांचे साहाय्य नेहमीच का लागते ?

८. अंनिसवाल्यांनो, तुमचे सर्वच `सामाजिक' उपक्रम हिंदु सणांच्या भोवती का अडखळत असतात ? ते उपक्रम स्वतंत्रपणे वाटचाल का करत नाहीत ?

९. अंनिसवाल्यांनो, तुमच्या `गणेशमूर्ती दान करा' या मोहिमेच्या वेळी महाराष्ट्रात आठ/दहा ठिकाणी तुम्ही मूर्तीदान घेण्यासाठी उभे असता; पण होळीच्या ठिकाणी वृक्ष किंवा लाकडे जाळू नका, असे सांगायला आपण का उभे रहात नाही ? तुम्हालाच उचलून होळीत टाकले जाईल, असे तर तुम्हास वाटत नाही ना ?

१०. होळी म्हणजे लोकयज्ञाचा प्रकार असून तो शास्त्रानुसार करण्याऐवजी कचऱ्याची होळी करण्यास सांगणे, हे अतिशहाणपणाचे व धर्मशास्त्रात ढवळाढवळ करणारे नव्हे काय ?

११. होळीत लाकडे जाळण्यावर आक्षेप घेऊन दरवेळी हिंदूंच्या सणांत नाक खुपसणाऱ्या मंडळींना बेकायदेशीररीत्या वर्षभर सर्रास होणारी जंगलतोड दिसत नाही का ? या मंडळींनी बांधकाम व्यावसायिकांनी तिवरांच्या जंगलांची केलेली कत्तल व मोठमोठ्या हॉटेलांमधून दररोज होणारी अन्नाची नासाडी, यांबद्दल आजवर कधीही मोहीम उभारलेली का नाही ?

१२. होळी जवळ आल्यावर जागे होणारे हे समाजसुधारक या संदर्भात वर्षभर काय करत असतात, त्यांनी किती ठिकाणी वृक्षारोपण केले ?

१३. गरिबांना वाटण्यासाठी होळीतली नैवेद्याचीच पोळी कशाला ? त्यासाठी स्वतंत्रपणे पोळया जमवण्याचे कष्ट न घेता पत्रकबाजी करून प्रसिद्धीचे डाव का रचले जातात ? गरिबांच्या पोटाची एवढी काळजी असणारे स्वत:चे वेतन देऊन आपले औदार्य का दाखवत नाहीत ?

१४. होळीला पुरणपोळी अर्पण केली, तर त्यातून भक्ताला होणारा लाभ हा आध्यात्मिक स्वरूपाचा असतो. अर्थात ज्यांना धर्मशास्त्राचेच वावडे आहे, त्यांना या आध्यात्मिक लाभाचे महत्त्व कधी कळेल का ?

१५. बकरी ईदच्या एका दिवशी लाखो बकऱ्यांचा बळी दिल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्यामुळे व घाणीमुळे जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. मात्र हिंदूंच्या सणांच्या वेळी आवाज उठवणारे हे तथाकथित सुधारक त्या वेळी कुठे अदृश्य होतात ?

१६. होळीमुळे प्रदूषण होत असल्याचे सांगणाऱ्या `अंनिस'नी कारखाने व वाहने यांच्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाय योजले आहेत ?

१७. धार्मिक परंपरांचा गळा आवळून बचत, काटकसर आदी मुद्दे जनतेला शिकवणाऱ्या `अंनिस'नी ते त्यांच्या व्यक्तीगत जीवनात कसली व किती काटकसर करतात, तेही जनतेला सांगावे ?

१८. `होळी लहान करा, पोळी दान करा' या उपक्रमाचे पत्रक काढणारी ` अंनिस ` असे पत्रक मुसलमानांच्या वा िख्र्त्यासंच्या सणांच्या वेळी का काढत नाही ? एका पुरणपोळीसाठी कंठशोष करणाऱ्या अंनिसला बकरीचा जीव दिसत नाही का ?

लेखनविषय: दुवे:

Comments

माझेही दोन प्रश्न

१. उपक्रम हे अंनिसचे प्रसिद्धीमाध्यम आहे असे वाटल्याने हे १८ प्रश्न उपस्थित केले आहेत का?

२. वरील लेखाचा विषय किंवा लेखनप्रकार भाषा असा का आहे? येथे व्याकरण, शुद्धलेखन अशी चर्चा अपेक्षित आहे का?

अनिसच्या वतीने कोण बोलेल बरं...

अनिसच्या वतीने त्यांच्या कार्यकर्त्यांनीच उत्तरे द्यायची आहेत का ?
उपक्रमी म्हणून आम्ही चर्चेत भाग घ्यावा का ?

घाटपांडे साहेब, वाचताय ना प्रश्न ! :)

काही

काही मुद्दे चांगले आहेत.
तुमचे काही मुद्दे चांगले आहेत. पण सारखा धर्म धर्म करुन ओरडू नका. हिंदू धर्मातच विरोधक जास्त आहेत. तुमच्या अशा प्रकारेने तेच वाढत आहेत. दुसरा चांगला उपाय शोधा. तुमच्या प्रश्नांमध्ये पर्यावरणाचा कळवळा जाणवतो आहे. तो जास्त येऊ देत. धर्मांची तुलना न करता असे करा की, वर्षभर लोकांना निर्माल्य साठवायला सांगा, आणि बकरी ईद अथवा मोहरमच्या दिवशी त्याची हवी तशी विल्हेवाट लावायला सांगा. म्हणजे कसे, शेवटी कोणताही धर्म जर एखाद्या दिवसाला पवित्र मानत असेल तर तो पवित्रच असला पाहिजे. थोडक्यात सर्व धर्मसमभाव सुद्धा झाला, आपला धर्म पाळणे झाले आणि अनिसची परिक्षा सुद्धा झाली.
एक उपाय सुचवतो, पटत असेल तर बघा, धर्मनिरपेक्ष देशात एक संघटना एका धर्मा विरुद्ध अपप्रचार करते आणि सरकार त्यांना समर्थन करते असे म्हणून सरकार आणि अनिस या दोहोंना कोर्टात खेचा. बघु विजय धर्म निरपेक्ष देशातल्या कायद्याचा होतो की आणि कसे? वाटल्यास तुम्ही असे का नाही करत? लोकांना या प्रकारांना आळा घालण्यासाठी एखाद्या आमरण उपोषणाची हाक का नाही देत? धर्मनिरपेक्ष देशात तो सर्वोत्तम उपाय आहे. काही तरी धक्कातंत्र वापरा. वाटल्यास उपक्रमावरची चर्चा वाचा धक्कातंत्रावरची.






बकरी

बकरीचा बळी हा हिंदू धर्मातही दिला जातो. शिवाय बकरीचा जीव वाचवायचा असेल तर फक्त अंनिस / परधर्मीयांना सांगून भागणार नाही - सर्वधर्मीय मांसाहारी लोकांशी बोलणी करावी लागतील ! (मांसाहारी मंडळी कृपया ह. घ्या.)
शिवाय फक्त धार्मिक विधी आहे म्हणून आपण होळी (लाकडे पेटवून) साजरी करायची का? अंनिस वाल्यांचे हेतू प्रामाणिक नसतीलही (मी त्यांची बाजू अजिबात घेत नाही आहे) - पण फटाके उडवणे / लाकडे पेटवणे या गोष्टी करणे आजच्या काळी खरेच उपयुक्त आहेत का असा विचार आपण केला तर बरे होईल (विचार आपण करू शकतो म्हणून आपण करायचा - जे लोक विचार करू शकत नाहीत त्यांना समजवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यांचा उपयोग नक्कीच केला पाहिजे :) )

-अमित

शिमगा

वेमीत्८५शेठ,

झकास. :)) होळीच्या आधीच उपक्रमावर शिमगा सुरु केल्याबद्दल आपले अभिनंदन. :))

अंनिसवाल्यांनो, तुमच्या `गणेशमूर्ती दान करा' या मोहिमेच्या वेळी महाराष्ट्रात आठ/दहा ठिकाणी तुम्ही मूर्तीदान घेण्यासाठी उभे असता; पण होळीच्या ठिकाणी वृक्ष किंवा लाकडे जाळू नका, असे सांगायला आपण का उभे रहात नाही ? तुम्हालाच उचलून होळीत टाकले जाईल, असे तर तुम्हास वाटत नाही ना ?

हे फारच आवडले.

होळी लहान करा, पोळी दान करा. यात चुकीचे काय आहे? जागतिक मंदीमुळे हे शहाणपणाचे (म्हंजे काय वो?) होणार नाही का?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वितंडवाद

अंनिस आणि पर्यावरणवाद्यांच्या बाजूने -
हिंदुत्त्ववादी ज्यांना आपला आदर्श मानतात, ठिकठिकाणी त्यांचे फोटो लावतात अशा स्वामी विवेकानंद, महर्षी दयानंद, स्वा.सावरकर अशा प्रभृती आज या जगात असत्या तर त्यांनी अंनिसच्या चळवळीला पर्यावरण, समाजाला आर्थिक मदत , पुरोगामी विचारसरणी या सर्वच बाबतीत पाठिंबाच दिला असता.

प्लास्टरचे घातक रंग दिलेले मोठे गणपती आणि दुर्गा, प्रचंड आवाज करणारे - धूर निर्माण करणारे फटाके, टायर आणि जिवंत झाडांच्या फांद्या तोडून आणि जाळून केलेल्या होळ्या, कोट्यावधी रुपये खर्च करून केलेले महायज्ञ हे हिंदू धर्मशास्त्राच्या कोणत्या ग्रंथात अनिवार्य म्हणून सांगितले आहे त्याचा खुलासा लेखकाने करावा.धर्माच्या नावाखाली खपवल्या जाणार्‍या या बाबी अनिष्टच आहेत.(शिवाय कालानुसार धर्मात चांगला बदल व्हावा असे लेखकाला वाटत नाही काय?)
समंजसपणाचा अभाव हे या युगाचे द्योतक बनले आहे. आजवर सहिष्णू म्हणून नावाजलेल्या हिंदू धर्मात प्रतिक्रियास्वरूपी कट्टरपणा घुसला आहे.प्रतिक्रिया द्यायचीच असेल तर साधक अंगाने द्या. तसे करण्यासाठी अनेक उत्तम मार्ग आहेत.
(मी स्वतःही एक हिंदू आहे.)

तथाकथित हिंदुत्त्ववाद्यांच्या बाजूने -
अंनिस आणि दाभोलकरांबाबत हिंदुत्त्ववाद्यांना किती घृणा वाटते ते अशा लेखांमधून स्पष्ट होते.
अंनिसने केवळ हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरितींवर टीका न करता इतर धर्मांच्या अनिष्ट चालीरितींवरही टीका केली असती तर त्यांची तोंडे बंद झाली असती.

अवांतर-
धर्माभिमानी हिंदू ही तालिबानसारखी संघटना आहे काय? वरचे चित्र पाहून तसेच वाटले. तसे असेल तर त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे?

होळी लहान करा

"होळी लहान करा पोळी दान करा " असा उपक्रम आमच्या मित्राने राबवला होता. लोकांच्या धर्मश्रद्धेला विघातक रुप देण्यापेक्षा विधायक रुप देणे केव्हाही चांगले. बर्‍याच लोकांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. होळी ही अपप्रवृत्तींची व्हायला हवी असे केलेले आवाहन लोकांना पटु लागले आहे. काही रुढी परंपरांचे पुनर्मुल्यांकन केले पाहिजे. कालबाह्य असल्यास त्याचा त्याग केला पाहिजे. त्यातले सकारात्मक मूल्य घेउन त्याला समयोचित असे स्वरुप दिल्यास लोक ते स्वीकारतात.
प्रकाश घाटपांडे

शिमगा

हा लेख म्हणण्या ऐवजी "शिमगा" म्हणले पाहीजे असे वाटले.

वरील चित्र हे तालीबानी प्रवृत्तीचेच वाटले.

त्याव्यतिरीक्त: लेखात अनिसवर घसरलात खरे, पण अनिस नक्की असे कुठे म्हणले याची माहीती/दुवा दिला असता तर बरे झाले असते. अनिसने काय म्हणले याबद्दल नंतर, पण होळीसंदर्भातः

होळी म्हणजे लोकयज्ञाचा प्रकार असून तो शास्त्रानुसार करण्याऐवजी कचऱ्याची होळी करण्यास सांगणे, हे अतिशहाणपणाचे व धर्मशास्त्रात ढवळाढवळ करणारे नव्हे काय ?

होळी हा सण मला आवडतो, पण तो आजज्या पद्धतीने होतो, त्यात त्याला लोकयज्ञ म्हणणे म्हणजे अतीच झाले आणि तो मी एक हिंदू म्हणून तुम्ही केलेला हिंदू धर्म-रुढींचा अपमान समजतो. वाट्टेल त्या शिव्या, गचाळ बोलणे-नाचणे, दारू पिऊन धिंगाणा घालणे असा आपण जर सण साजरा करणे म्हणत असाल आणि तरी देखील स्वतःला सनातनी म्हणवत असाल तर तो एक भोंदूपणा आहे. तरी देखील एक प्रश्नः शास्त्रात होळी कशी करावी म्हणून सांगितली आहे त्याबाबत संदर्भासहीत माहीती देऊ शकाल का?

होळी जवळ आल्यावर जागे होणारे हे समाजसुधारक या संदर्भात वर्षभर काय करत असतात, त्यांनी किती ठिकाणी वृक्षारोपण केले ?

हाच प्रश्न मला तुम्हाला विचारावासा वाटतो की नक्की तुम्ही काय समाजसुधारणा जाउंदेत पण समाजसेवा केली आहेत? नुसते उठसूठ कुठल्यान् कुठल्या गोष्टींवरून शिमगा करायचा आणि अतिशय हिंसक लिहायचे अथवा चित्रे काढायची याला जर तुम्ही धर्मरक्षण/संस्कृतीरक्षण म्हणत असाल तरी मला ते तसे वाटत नाही.

अजून बरेच लिहीता येईल, पण गीता ऐकणार्‍यापुढे वाचावी(समजले तर अधिक उत्तम) असे वाटते. राहता राहीले अनिसबद्दल केवळ होळी संदर्भात:

ते जर कचरा जाळा म्हणत असतील तर तो शुद्ध आचरटपणा आहे. त्याने हवेतील प्रदुषण वाढेल. म्हणजे त्यांचा झाडे वाचवण्याचा मुद्याला परस्परविरोधी छेद जातो. पण अनिसकडून जास्त अपेक्षा करता येत नाहीत, जशा वरील लेखात विचार म्हणून अपेक्षा करणे अवघड जाते तसेच. अनिस ने अंधश्रद्धेपेक्षा हिंदू धर्मावरच जास्त रोख ठेवला आहे असे वाटायला बरीच जागा आहे आणि असली ढवळाढवळ मला देखील चालत नाही. पण त्याचबरोबर वरचे लेखनपण उलट्या बाजूने ढवळाढवळच आहे.

बाकी आता प्रश्न राहीला होळीकरता वृक्षतोडी संदर्भात:

सर्वप्रथम तुकारामाचे "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी.." हा अभंग आपल्याला माहीत असेलच.
आता प्रश्न - होळी साठी लाकडे कशी गोळा केली जातात ते समजले तर बरे होईल - (१) जळाऊ लाकूड विकत घेऊन, अथवा (२) स्वतःच्या मालकीची भोरी भाबळी वगैरे झाडे (जी परत पटकन येऊ शकतात) ती तोडून, आणि (३) इतर कुणाच्या खाजगी मालमत्तेतील अथवा सरकारी/सार्वजनीक मालमत्तेची झाडे चोरून अथवा दादागिरी करत तोडून.

जर उत्तर १ अथवा २ असेल तर काहीच चूक नाही. अवश्य होळी करावी. पण तिसरे उत्तर असेल तर तुम्हीच सांगा ते योग्य आहे का? आपल्याला योग्य वाटत नसेल तर मग ही समाजप्रबोधनाची संधी मानून लोकांना आवाहन करा की, "चोरून आणि दादागिरी करून सार्वजनीक अथवा खाजगी झाडे तोडून होळी करू नका म्हणून." आहे का तयारी?

आशा करतो की प्रश्नांची उत्तरे मिळतील.

पाच प्रश्न :)

१) होळीच्या भोवती तरुण मंडळी एकत्र येऊन रस्त्यावरील सभ्य स्त्री-पुरुषांना असभ्य शिवीगाळ करतात, होळी उत्सवाच्या निमित्ताने हे योग्य आहे का ?

२)दक्षिणेतील लोक हा उत्सव केवळ कामदेवप्रित्यर्थ असे मानतात. योगेश्वर शिव तपाचरणात गढून गेले असता.मदनाच्याद्वारे देवांनी त्यांचे लक्ष पार्वतीकडे वेधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या शंकराने तृतीय नेत्र उघडून त्या मदनास भस्मसात केले यात मदनाची काय चूक होती ?

३)कृष्ण बालवयाचा असता, कंसाच्या सांगण्यावरुन विषमय दूध पाजणार्‍या पुतना राक्षसीचा कृष्णाने प्राणही शोषून तिला यससदनास पाठवले, तिचे होळीच्या दिवशी दहन करण्यात आले. कृष्णाच्या लिलांची आठवण व्हावी म्हणून (जागतिक महिला दिन साजरा होत असतांना पुतना चा एक स्त्री म्हणून विचार करतांना ) असा आनंदोत्सव साजरा करणे योग्य आहे का ?

४) कोकणात ढौंढानामक एक भयंकर राक्षसीन लहान बालकांना पिडा देऊ लागली, तेव्हा तिच्या नावाने बीभत्स शिव्या शाप देऊन जिकडे तिकडे प्रचंड अग्नी पेटवून तिला बाहेर हुसकावण्यात आले. आज (भ्रष्टाचार, अनिती, ला हुसकावून देण्याची गरज असतांना ) कोणतेच कारण नसतांना अशी परंपरा पाळण्याची गरज आहे का ?

५)कर्नाटकात काही शेतकरी शिमग्याचा उत्सव आनंदाने साजरा करतात ते मद्यास शिवत नाही किंवा बीभत्सपणे शिव्याशाप देत नाहीत. तर होळीच्या निमित्ताने जमा केलेल्या पैशांचा उपयोग देवकार्यासाठी ( सांस्कृतिक कार्यक्रमासाठी करतात) ही प्रथा देशभर रुढ का झाली नाही. ( सर्व प्रश्न ह. घ्या )

-दिलीप बिरुटे

उत्तम प्रश्न

बहुदा अनुत्तरीत रहाणार.

:-)

संदर्भ मिळाल्यास बरे होईल

१) होळीच्या भोवती तरुण मंडळी एकत्र येऊन रस्त्यावरील सभ्य स्त्री-पुरुषांना असभ्य शिवीगाळ करतात, होळी उत्सवाच्या निमित्ताने हे योग्य आहे का ?
नाही

२)दक्षिणेतील लोक हा उत्सव केवळ कामदेवप्रित्यर्थ असे मानतात. योगेश्वर शिव तपाचरणात गढून गेले असता.मदनाच्याद्वारे देवांनी त्यांचे लक्ष पार्वतीकडे वेधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या शंकराने तृतीय नेत्र उघडून त्या मदनास भस्मसात केले यात मदनाची काय चूक होती ?

३)कृष्ण बालवयाचा असता, कंसाच्या सांगण्यावरुन विषमय दूध पाजणार्‍या पुतना राक्षसीचा कृष्णाने प्राणही शोषून तिला यससदनास पाठवले, तिचे होळीच्या दिवशी दहन करण्यात आले. कृष्णाच्या लिलांची आठवण व्हावी म्हणून (जागतिक महिला दिन साजरा होत असतांना पुतना चा एक स्त्री म्हणून विचार करतांना ) असा आनंदोत्सव साजरा करणे योग्य आहे का ?

४) कोकणात ढौंढानामक एक भयंकर राक्षसीन लहान बालकांना पिडा देऊ लागली, तेव्हा तिच्या नावाने बीभत्स शिव्या शाप देऊन जिकडे तिकडे प्रचंड अग्नी पेटवून तिला बाहेर हुसकावण्यात आले. आज (भ्रष्टाचार, अनिती, ला हुसकावून देण्याची गरज असतांना ) कोणतेच कारण नसतांना अशी परंपरा पाळण्याची गरज आहे का ?

५)कर्नाटकात काही शेतकरी शिमग्याचा उत्सव आनंदाने साजरा करतात ते मद्यास शिवत नाही किंवा बीभत्सपणे शिव्याशाप देत नाहीत. तर होळीच्या निमित्ताने जमा केलेल्या पैशांचा उपयोग देवकार्यासाठी ( सांस्कृतिक कार्यक्रमासाठी करतात) ही प्रथा देशभर रुढ का झाली नाही.

संदर्भ मिळाल्यास बरे होईल

आपणही काही शोधावे..

होळीच्याबाबतीत आम्ही काही थापा मारल्या असे क्षणभर समजून आपणही तसेच काही संदर्भ शोधावे, जे काही उरतील त्याचे अगदी कोणत्या पुस्तकात तसे संदर्भ आहेत, ते पृष्ठ क्रमांकासहित नक्की इथे देईन. फक्त प्रश्न विचारु नका ही नम्र विनंती.

-दिलीप बिरुटे
(अहंकारी)

सहमत

सहजरावांची भविष्यवाणी खरी ठरली म्हणायची की. :) बिरुटेसरांचा अहंकारही आवडला.

 
^ वर