"उपक्रमाबद्दल वाईट वाटते"का गेला?

श्री./श्रीमती उपक्रम

काल रात्री इथे पाहत असताना श्री. तात्या यांच्या "उपक्रमबद्दल वाईट वाटते" हा लेख काढला असल्याचे लक्षात आले. "लेखनविषयक मार्गदर्शन" या लेखावर प्रतिक्रिया द्यायची सोय ठेवलेली नसल्याने तात्यांनी हा लेख लिहिला होता. त्यात आक्षेपार्ह शब्द वापरले नव्हते की शिव्यागाळही केलेली नव्हती.

त्यावर प्रतिक्रिया देताना लोकांनी उपक्रमने धोरण आधी धूसर का ठेवले आणि आत्ता एकदम स्पष्ट का केले याबद्दल विचारणा केली होती. तसेच धोरणाशी सुसंगत नसलेले लेखन अजूनही का दिसते याविषयी विचारले होते. धोंडोपंत व विकी यांनी धोरणाशी सुसंगत असलेले त्यांचे लेखन का काढले याविषयी पृच्छा केली होती. या सर्व गोष्टींबद्दल उपक्रमकडून स्पष्टीकरण अपेक्षित असताना हा लेखच काढून टाकण्यात आला हे कशाचे लक्षण मानावे?

इथे मनोगत आणि वेलणकरांचे उदाहरण दिलेले अनेकांना आवडणार नाही. परंतु प्रशासकांच्या धोरणावर टीका करणार्‍या असंख्य प्रतिक्रिया असलेला जी. एस. यांचा "अभिव्यक्तिस्वातंत्र्य" लेख अजूनही मनोगतावर बघता येईल.

बहुधा हाही लेख तात्याच्या लेखाच्या मार्गानेच जाईल. हरकत नाही. पण आपण उत्तर दिलेत तर बरे वाटेल.

विनायक

लेखनविषय: दुवे:

Comments

स्पष्टीकरण

मा. उपक्रम,
या मुद्दयावर तुम्ही खरोखरच उत्तर द्यावं आणि पारदर्शकता आनावी.
नीलकांत

बांधील नाहीत!

मी माझ्या लेखनासंबंधी एक व्यनि उपक्रमजींना पाठवला होता तो अजूनही त्यांनी उघडून पाहिलेला नाही. त्याचे काय कारण असावे असा काळजी युक्त सवाल मी तात्यांच्या त्या लेखावरील प्रतिसादात केला होता. त्यावर संपादक मंडळाने दिलेले उत्तर आपण सर्वांनी वाचलेले असेलच. त्यात त्यांनी इतर काही गोष्टींबरोबर असे देखिल म्हटले होते की संपादक मंडळ सर्वच बाबतीत विशिष्ठ काळात उत्तर द्यायला बांधील नाही.नेमके शब्द आता आठवत नाही मात्र बांधील नाही हा शब्दप्रयोग मात्र ठळक अक्षरात होता.
तेव्हा मंडळी आपल्या प्रश्नाचे उतर मिळेलच ह्या आशेवर राहू नका. अगदी सुरुवातीला त्वरीत उत्तरे देणारे उपक्रमजी बहुधा रोजरोजच्या ह्या कटकटींना कंटाळले असावेत असे वाटते.तेव्हा 'मौनं सर्वार्थ साधनम्' असा काहीसा त्यांचा पवित्रा दिसतोय.
अतिशय शांतपणे त्यांनी माझा सर्किट ह्यांच्या 'आजचे माहितीपूर्ण लेखन' ह्या लेखावरचा एक उपप्रतिसाद उडवलेला आहे आणि आता तात्यांचा लेखही उडवलाय. ह्यावरून काय ते समजा! समजनेवालोंको इशारा काफी है!

सहमत

समजनेवालोंको इशारा काफी है!

काय झालं

तात्यांचा लेख ज्यात कसली ही वाईट भाषा नव्हती. आणि उपक्रमाबद्दल त्यांना जिव्हाळा वाटला होता. त्यांचा लेख काढणे चूक आहे. लेख का काढला याची किमान ५ वैध कारणं द्या.
अन्यथा लेख परत पोस्ट करा

पल्लवी

रास्त सवाल..

या सर्व गोष्टींबद्दल उपक्रमकडून स्पष्टीकरण अपेक्षित असताना हा लेखच काढून टाकण्यात आला हे कशाचे लक्षण मानावे?

विनायकराव, आपला हा सवाल रास्तच आहे!

परंतु प्रशासकांच्या धोरणावर टीका करणार्‍या असंख्य प्रतिक्रिया असलेला जी. एस. यांचा "अभिव्यक्तिस्वातंत्र्य" लेख अजूनही मनोगतावर बघता येईल.

लवकरच मला उपक्रम ह्या संकेतस्थळाविषयी माझ्या चावडीवर (ब्लॉगवर) एक विस्तृत लेख लिहून बर्‍याचश्या मुद्द्यांचा माझ्या भाषेत समाचार घ्यावा लागेल, असे दिसते! ;)

बहुधा हाही लेख तात्याच्या लेखाच्या मार्गानेच जाईल. हरकत नाही. पण आपण उत्तर दिलेत तर बरे वाटेल.

हेच म्हणतो. टीका सहन करायला, तिला उत्तर द्यायला एखादा माणूस नुसताच नांवाला कोल्हापुरातला असून चालत नाही, तर तेवढ्याच निधड्या छातीचाही असावा लागतो! ;)

तात्या.

हेच..

...म्हणतो.

उपक्रम

उपक्रम हॅपनिंग संकेतस्थळ आहे. काही ना काही सुरूच असतं. कोणाचे लेख काढून टाका... कोणाला बोला.... काय चाललय काय????

:)

पल्लवी

अती झाले

अन् हसू आले
म्हणजेच आता हे प्रकार अती होत चालले आहेत.

ह्या वादात पडण्याऐवजी आपण सर्वांनी आता हे वादग्रस्त विषय बाजूला ठेवून नव्याने सुरुवात करावी ही सर्वांनाच नम्र विनंती.

विनायकराव, तात्या, मिलींदसाहेब, चित्तरंजन, प्रियाली, अनु, अत्यानंद, ऊंकार, तो, टग्या, वरुण, नीलकांत वगैरे मंडळींचे एक अस्तित्त्व आमच्या सारखी वाचक मंडळी जाणतातच.

सर्वांनीच सामंजस्याने समस्येवर समाधानकारक, सन्मानपूर्वक संमती साकारावी ही सुचना !

मुंजाराव,

ह्या वादात पडण्याऐवजी आपण सर्वांनी आता हे वादग्रस्त विषय बाजूला ठेवून नव्याने सुरुवात करावी ही सर्वांनाच नम्र विनंती.

अहो नव्याने सुरवात करायला काहीच हरकत नाही. पण आम्ही बापडे नव्याने सुरवात करून काहीबाही लेखन करायचो, आणि ते लेखन (उपक्रमरावांच्या मते!) "माहिती आणि विचारांची" देवाणघेवाण करणारं नसेल तर त्यावरून नांगर फिरायचा!

विनायकराव, तात्या, मिलींदसाहेब, चित्तरंजन, प्रियाली, अनु, अत्यानंद, ऊंकार, तो, टग्या, वरुण, नीलकांत वगैरे मंडळींचे एक अस्तित्त्व आमच्या सारखी वाचक मंडळी जाणतातच.

निषेध! निषेध!! निषेध!!

व्यक्तिगत उल्लेखाबद्दल मुंजाराव आपला त्रिवार निषेध! ;)

मुंजाराव, आम्ही आपल्या म्हणण्यात थोडा बदल करू इच्छितो. आपण ज्या मंडळींची नांवे वर घेतली आहेत ती आणि त्यांच्यासारख्या अनेक मंडळींमुळेच उपक्रम, मनोगत, मायबोली, आणि प्रस्तावित मिसळपाव यांसारख्या अनेक मराठी संकेतस्थळांचं अस्तित्व टिकून आहे! ह्या सर्व संकेतस्थळांच्या चालकांना जेव्हा ही जाणीव होईल तो सुदिन!

"हमसे है जमाना, जमानेसे हम नही!"

सर्वांनीच सामंजस्याने समस्येवर समाधानकारक, सन्मानपूर्वक संमती साकारावी ही सुचना !

'सन्मानपूर्वक संमती साकारावी' ह्या विधानाचा अर्थ कळला नाही. कुणाचा सन्मान? कुठली संमती?

असो!

मुंजाराव, आपला प्रतिसाद माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करण्यायोग्य वाटला! ;)

आपला,
(देवगडच्या पारावरचा समंध!) तात्या.

अभिव्यक्तिस्वातंत्र्य

इथे मनोगत आणि वेलणकरांचे उदाहरण दिलेले अनेकांना आवडणार नाही. परंतु प्रशासकांच्या धोरणावर टीका करणार्‍या असंख्य प्रतिक्रिया असलेला जी. एस. यांचा "अभिव्यक्तिस्वातंत्र्य" लेख अजूनही मनोगतावर बघता येईल.

हा लेख मनोगतावर मलातरी सापडला नाही. विनायकरावांनी दुवा दिल्यास त्यांचा आभारी राहीन.

विनायकराव

आदरणीय विनायकराव,

हे वाचा. खरे तर आम्ही काही लिहीणार नव्हतो पण या जोडणीसाठी दहा ट्क्क्याहून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत असा संदेश आल्यामुळे जोडणीच्या इंग्रजी अक्षरांच्या ९० टक्के अधिक शब्द भरतील असे काहीतरी लिहीणे आवश्यक आहे म्हणून ही प्रस्तावना.

उपक्रमाच्या वाढत्या मुजोरीला, गळचेपीला आणि व्यक्तिस्वातंत्र्यावरील हल्ल्याला आमचा दंडवत.

http://dhondopant.blogspot.com/2007/04/blog-post_5538.html

आपला,
(नतमस्तक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

उपक्रम

संकेतस्थळांची तुलना किंवा 'हे काय चालले आहे?' या विषयावर तोंड न उघडायचा निश्चय केला होता पण तरी बोलावंसं वाटतं की उपक्रमावर आता 'उपक्रमाची धोरणे,उपक्रमाची (तथाकथित) मुजोरी, 'माझा लेख काढला', 'अमका असे बोलला', 'तमक्या स्थळाने मला असे केले, आता मी उपक्रमावर लिहून त्याचे घर उन्हात बांधणार'' हे लेख/चर्चा उपक्रमाच्या कंटेंट पेक्षा वाढले आहेत. एखाद्या मासिकासाठी लिहीलेले आपले लेखन 'साभार परत' आले (लेखिकेने तसा वेडा धाडसी प्रयत्न अद्याप ने केल्याने तो अनुभव नाही!)तर आपण मासिकाची बदनामी करणारे लेख त्याच मासिकावर लिहितो का? आपल्या ब्लॉगवरुन त्या मासिकाला वाईटसाईट बोलतो का? एखाद्याने आपले तांत्रिक ज्ञान, वेळ, थोडा पैसा, डोके वापरुन स्वतः ना नफा ना तोटा तत्वावर बनवलेले संकेतस्थळ कसे असावे, चालकाची धोरणे कशी असावी, फेव्हरीटीझम असावा की नाही, 'वन स्टॉप शॉप' असावे की नाही हे आपण का ठरवावे?जर उपक्रमाची/मनोगताची/मायबोलीची/माझेशब्दची मी पैसे भरुन वर्गणीदार असते तर मला थोडाफार सूचना करण्याचा हक्क असता, पण 'फुकट' मिळणारी गोष्ट अशी नाही तशी हवी, या रंगाची हवी, दर्जा असा नाही तसा हवा हे ठरवणारी मी कोण? समजा सुरुवातीला धोरणे धूसर असली आणि नंतर आलेल्या काही अनुभवांनी ती ठळक बनत गेली आणि नंतरस्पष्ट केली तर हरकत काय आहे? एका संकेतस्थळावर तांत्रिक माहिती, दुसर्‍यावर गझला आणि तिसर्‍यावर ललित लेखन वाचण्यास हरकत काय आहे? सगळे एका ठिकाणी मिळणारे मॉल लोकप्रिय होतात हे खरे, पण अमुक एक ठिकाणी एक वस्तू चांगली मिळते म्हणून तिथे जाणारे आणि अशा सर्वच वस्तूंसाठी विशीष्ठ दुकानांत जाणारे आजही आहेत की.

असो, इतके विद्वान बोलत आहेत त्यात माझ्या या प्रतिसादाला नेहमीप्रमाणे 'ओ, तुमचे लेखन काढले नाही म्हणून बोलता, तुम्हाला या चर्चा वाचवत नाहीत ना, मग नका वाचू ना, ओ, तुम्ही तर मारे त्या म ची बाजू घेता ना, मग येता कशाला xx मारायला उपक्रमावर,जा ना तिकडेच,ओ, तुमच्या लेखनाला बोलत नाही ना, मग गप बसा' इ.इ. आशयाचे सल्ले दिले जातील आणि माझ्या प्रतिसादाचे खंडन करणारेकानेक विद्वानांचे अनेक प्रतिसाद येतील. पण उपक्रम असो वा मनोगत, दोन्हीकडे शांतता नांदावी, चांगले लिखाण वाचायला मिळावे, चर्चांतून (फक्त संकेतस्थळांच्या धोरणांविषयीच नव्हे, तर इतर सर्व विषयांचे) सामान्यज्ञान वाढावे असे वाटते.

(डिसक्लेमरः उपक्रम किंवा मनोगत यांच्या प्रशासकीय मंडळांशी माझा कोणताही संबंध नाही/या प्रतिसादाचा कोणावरही व्यक्तीगत रोख नाही/या प्रतिसादाला शु. चि. वापरलेला नाही, र्‍हस्व दीर्घाच्या चुका चालवून घ्याव्यात/कोणालाही शहाणपणा शिकवण्याचा सूर नाही.)

पूर्ण..

सहमत आहे.

धोरणे!

वा अनुताई!

माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करणारा सुंदर प्रतिसाद!

ना नफा ना तोटा तत्वावर बनवलेले संकेतस्थळ कसे असावे, चालकाची धोरणे कशी असावी, फेव्हरीटीझम असावा की नाही, 'वन स्टॉप शॉप' असावे की नाही हे आपण का ठरवावे?

आपण हे नक्कीच ठरवू शकत नाही. परंतु संकेतस्थळाच्या चालकांनी त्याच्या धोरणांबद्दल खुलासा केल्यास ते सर्वांच्याच दृष्टीने बरे होईल असे वाटते. होतं काय, की इथे एखादा मनुष्य काही लिहितो, आणि नंतर ते लेखन संकेतस्थळाच्या धोरणात बसत नसल्यामुळे उडवले जाते. असं होऊ नये म्हणून जर चालकांनी आधीच सुस्पष्ट शब्दात संकेतस्थळाची धोरणे जाहीर केली तर अशी उडवाउडवी करण्याची वेळ येणार नाही, आणि सभासद व प्रशासक या दोघांचाही वेळ वाचेल.

आता उपक्रमाचंच उदाहरण घ्या! माहिती आणि विचारांची देवाणघेवाण हे उपक्रमाचे धोरण आहे. त्यावर आम्ही फक्त इतकाच मुद्दा मांडला की १) ललितलेखनातून, काव्यातून विचार आणि माहिती मिळत नाही काय? किंवा २) त्याला येणार्‍या प्रतिसादांतून माहिती आणि विचारांची देवाणघेवाण होत नाही काय?

अहो पण अनुताई, माझ्या या साध्या दोन शंकांचे निरसन उपक्रमने अद्याप केले नाही, याचे राहून राहून आश्चर्य वाटते!

अवांतर -

बाय द वे अनुताई, ललितलेखनातून आणि काव्यातून माहिती आणि विचारांची देवाणघेवाण होते किंवा नाही, याबाबत आपले वैयक्तिक मत जाणून घ्यायला आवडेल!

आपला,
(वैचारिक!) तात्या.

विचारांची देवाणघेवाण

माझ्या मते विचारांची देवाणघेवाण गद्यातून होईल, पद्यातून होत असेल, ललित लेखनातून होत असेल, कदाचित शिव्यांतूनही होत असेल, पण 'माहिती' या शब्दात सर्वसामान्यतः(आंतरजालावरील आणि बाह्य जगांतील भाषेतही) गद्य अपेक्षित असते असे वाटते. उपक्रमाच्या चालकांना 'तांत्रिक/साहित्यिक/प्रवासविषयक/इतर काही विषयक' 'गद्य माहिती' देणारे लिखाण अपेक्षित आहे हा अर्थ मी तरी घेतला. आता ज्यांना कोणाला तो अर्थ घ्यायचा नसेल त्यांना उपक्रमाने काही लिखाणे काढून 'आय मीन्ट धिस वे' हे सांगितले आहे असे वाटते. याउप्पर केवळ शब्दात पकडून वादासाठी वाद ही भूमिका असल्यास आमची सपशेल शरणागती. आम्ही चुकलो, आपण सर्व महान आहात.

चुकतो तोच माणूस!

आम्ही चुकलो,

चुकतो तोच माणूस असतो!!

(असा एक 'विचार' आम्ही कुठेतरी ऐकला होता, त्याची देवाणघेवाण इथे करत आहे! ;)

आपण सर्व महान आहात.

कस्सं कस्सं! ;)

तात्या.

कारण

उपक्रमावरील एखादा लेख काढून टाकण्यामागे कारण केवळ त्या लेखनाचे उपक्रमाशी सुसंगत नसणे, हेच आहे. आपण उल्लेखिलेला लेख त्याच कारणामुळे काढून टाकण्यात आला आहे. ह्यापुढेही असे लेखन अप्रकाशित करण्यात येईल. संकेतस्थळाची स्तुती किंवा टीका करणारे लेख उपक्रमाच्या उद्दिष्टांशी सुसंगत असल्यास अप्रकाशित करण्याचे काहीही कारण नाही.

सुसंगत..

उपक्रमावरील एखादा लेख काढून टाकण्यामागे मुख्य कारण केवळ त्या लेखनाचे उपक्रमाशी सुसंगत नसणे, हेच आहे.

अहो पण माझा लेख तर उपक्रमाच्याच ध्येयधोरणांच्या विषयावरचा होता. अहमदसेलरमधली खाद्यस्पर्धा भाग २ आणि रोशनी हे व्यक्तिचित्र हे ललितलेखन उपक्रमच्या 'माहिती आणि विचारांची देवाणघेवाण' या तत्वात बसतात किंवा नाही याची विचारणा करणारा होता. इतर उपक्रमींचंही मत मला याबाबत मोलाचं वाटत होतं म्हणून मी तसा चर्चाविषय टाकला होता.

सबब, तो लेख उपक्रमशी सुसंगत नव्हता असं आपण कसं काय म्हणता?? की आपल्याला वाटेल तेच सुसंगत आणि आपल्याला वाटणार नाही ते सुसंगत नाही??

तात्या.

उपक्रमवर, काय असावं आणि काय असू नये...

मा. उपक्रम ,
उपक्रम वर काय असावे आणि काय असू नये याचा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. त्याबाबत दूमत नाहीच. मात्र कुणी जर लेख लिहीतो आणि इतर लोक त्यावरच चर्चा करतात, आणि अचाणकच तो लेख अप्रकाशित झाला तर , एक - दोन ओळींचं काहीतरी कारण तरी चिटकवाकी तेथे, जेणे करून येथे लेख लिहीतांना मला जर का काही लिहीण्याची उर्मी आली तर आधीचे हे कारणरूपी इशारे लक्षात ठेवून मी लिहीन किंवा लिहीनारच नाही कदाचित.
पण एखादा लेख चर्चा लिहून नंतर ती अचानकच अप्रसिध्द होते तेव्हा थोडं दुखतंच.
तेव्हा जमल्यास असा लेख अप्रकाशित केल्यास तेथे एकाद ओळीचं कारण द्यावं म्हणजे ते इतरांना मार्गदर्शक ठरेल.
असं करावंच असं काही बंधन आपल्यावर नाही. पण असं केल्यास उत्तम.

नीलकांत

तांत्रिक अडचण

आपली सूचना चांगली आहे. पण तांत्रिक अडचणींमुळे असे करता येत नाही.

हे काय चालले आहे?

मी पहिल्यांदाच येतोय म्हणून् विचारले!

अभिव्यक्ति स्वातंत्र्य

http://www.manogat.com/node/1596

वरुणराव वर अभिव्यक्ति स्वातंत्र्य या लेखाचा मनोगतावरील दुवा दिला आहे.

फार झाले

हा प्रतिसाद गेल्या काही दिवसातील काही लेखांसाठी आहे.

१. उपक्रमाची घडी अजून बसते आहे. काही तत्वे स्पष्ट झाली आहेत, काही व्हायची आहेत- थोडा वेळ दिल्यास हे होईल. उपक्रम संपादकांना बाकीची ही कामे असतील. त्यातून वेळ काढून ते प्रतिसाद देतात. पण सर्व कामे सोडून त्यांनी सर्व प्रश्नांना तत्परतेने उत्तरे दिलीच पाहीजेत अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. उपक्रमासाठी आपला वेळ, पैसा देउन विनामूल्य ही सेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल संपादकांचे कौतुक करायचे, त्याना सहकार्य करायचे की इथे येऊन वाटेल तसा गोंधळ घालायचा?
२. लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य याचा गैरफायदा घेणे बरोबर नाही. लोकशाहीचा अर्थ असा नव्हे की मनाला वाटेल तसे वागावे. सार्वजनिक स्थळी वावरताना काही संकेत पाळणे अपेक्षित असते. आपण कुणाच्या घरी गेल्यावर आपल्याला वाटेल तसे वागत नाही. (वाटल्यास वागून बघावे परिणाम काय होतात ते) हे पटत नसेल तर नाईलाज आहे, इथे येण्यासाठी कुणीही आमंत्रण दिलेले नाही.
३. लोकांच्या कुचाळक्या करणे, टर उडवणे, काहीच्या काही लेख लिहून वात्रटपणा करण्याची आवश्यकता नसते. ह्या गोष्टी साधारणपणे कॉलेजात जाणारी मुले करतात. नंतर शहाणपणा आला की त्यांचा त्यांनाच कंटाळा येतो असे नम्रपणे सुचवावेसे वाटते कारण इथे येणार्‍या बहुतेक लोकांना हे पसंत नाही.

प्रतिसादातील अनावश्यक भाग काढून टाकण्यात येत आहे. - उपसंपादक.

काही उत्तरे आणि विनंती

धोरणाशी सुसंगत नसलेले लेखन अजूनही का दिसते

लेखनविषयक अपेक्षांची माहिती नसल्याने प्रकाशित झालेले (आणि भविष्यात प्रकाशित होणारे) उपक्रमच्या उद्दिष्टांशी सुसंगत नसलेले साहित्य वेळ मिळेल तसे किंवा विशिष्ट कालांतराने अप्रकाशित केले जाईल. संपादन मंडळातील सदस्य आपापल्या कामाचा व्याप सांभाळून संपादनात सहकार्य करत असतात त्यामुळे वेळेच्या उपलब्धतेनुसार संपादनाचा अवधी कमी जास्त होऊ शकतो या वास्तवाची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. आता लेखनविषयक अपेक्षा स्पष्ट झाल्यामुळे भविष्यात सर्व सदस्य त्याला अनुसरून लेखन करतील अशी आशा आहे.

या संकेतस्थळाविषयी असणार्‍या आस्थेतून इथे धोरणांविषयी चर्चा, टीकाटिप्पणी होते आहे याची आम्हाला जाणीव आहे पण पूर्वी म्हटल्याप्रमाणे संकेतस्थळ हे साधन आहे साध्य नाही त्यामुळे आपली उर्जा आणि वेळ यांचा उपयोग प्रामुख्याने आपापल्या अभ्यासाच्या, माहितीच्या आणि आवडीच्या विषयांवर माहितीप्रधान लेखन आणि चर्चा यासाठी करावा अशी विनंती आहे. या संबंधी काही विशिष्ट प्रश्न, शंका, सूचना असतील तर निरोपातून कळवाव्यात.

माझे परमस्नेही

धोंडोपंत आता इथे नाहीत ह्याचे खरोखर वाईट वाटते. :(
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

 
^ वर