हे असे का होत असावे?

सध्या उपक्रमावर एका विशिष्ट समुदायाच्या (अति)सक्रियतेला काही सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. केवळ हेच नव्हे तर या आधी सुद्धा विशिष्ट प्रकारच्या चर्चा किंवा लेख नसावे असे आक्षेप घेतले गेले आहेत.

हल्लीच एका चर्चेत (बहुधा सहज यांनी) उपक्रम हे सेल्फ गव्हर्निंग मॉडेलवर चालते असे म्हटल्याचे आठवते. या विधानात कोणतीही अतिशयोक्ती नाही असे मलाही वाटते. तसेच उपक्रमावर एखादा समुदाय व्यवस्थापनाच्या परवानगी शिवाय निर्माण होत नाही, त्यामुळे अशा समुदायातंर्गत चालणारी मालिका नक्कीच ध्येय धोरणाशी सुसंगत असणार असे मानायला हरकत नाही.

तरीही असे का होत असावे याचा विचार करता मला तीन मुद्दे जाणवले.

१) असहिष्णुता (जी सध्या सर्वच क्षेत्रात वेगाने वाढत आहे)

किंवा

२) प्रत्येक (किंवा संबंध नसलेल्याही) विषयावर आपले मत असलेच पाहिजे हा दुराग्रह.

किंवा

३) उपक्रमाचे सद्याचे स्वरूप:
म्हणजे उपक्रमाची सद्याची सदस्य व येणार्‍या लेखनाची संख्या लक्षात घेता असे होत असावे असे वाटते. म्हणजे आपण (बरेचसे सक्रिय सदस्य) जवळपास रोज उपक्रमावर येतो. दिवसात फारतर तीन ते चार नवे चर्चा प्रस्ताव किंवा लेख असतात. त्यामुळे ते वाचणे व त्यावर प्रतिक्रिया देणे सोपे होत असावे. समजा उपक्रमाची सदस्यसंख्या चार पाच लाख किंवा त्यापेक्षाही प्रचंड झाली व रोज दाखल होणारे चर्चा प्रस्ताव व लेखांची संख्या शेकडोंच्या घरात गेली तर आपल्या आवडीच्या विषयाशिवाय किंवा समुदायाशिवाय अन्य विषयात लक्ष घालणे जमणार नाही.

(डिसक्लेमरः मी उपक्रमाच्या व्यवस्थापनाशी संबंधित नाही त्यामुळे उपक्रमाची सदस्यसंख्या मला ज्ञात नाही. केवळ उदाहरणा दाखल अंदाज व्यक्त केला आहे.)

तर आपल्याला काय वाटते? वरील मुद्दे योग्य की अयोग्य? याशिवाय अन्य काही कारणे असू शकतात का?

टीपः सदर चर्चा प्रस्ताव कोणताही वैयक्तिक रोख ठेवून लिहिला नसून अशा प्रकारचे वाद टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याकरीता आहे याची नोंद घ्यावी.

लेखनविषय: दुवे:

Comments

कवितांचे समीक्षण धोरणाशी सुसंगत असावे

उपक्रम हे सेल्फ-गव्हर्निंग नाही, याबाबत सहमत. खाजगी मालकीचे संपदित स्थळ आहे, संपादनाविषयी "उपक्रम" आयडी यांचे निर्णय अंतिम आहेत, असे त्यांनी स्पष्टच सांगितले आहे :

कोणत्याही लेखनात आवश्यकतेनुसार कोणतेही बदल करण्याचे अधिकार संपादन मंडळातील सदस्यांना आहेत.

तरी सदस्यांना मते असतील याची जाणीव स्थळाच्या चालकांना असावी असे वाटते. ते म्हणतात :

आपल्या पाहण्यात आलेले आक्षेपार्ह लेख, प्रतिसाद, व्यनि, खरडवहीतील नोंदी यांची माहिती व्यनिने कळवावी ही विनंती

माझ्या बघण्यात आले आहे, की अनेक सदस्यांनी निंदा केली, आणि कोणी समर्थन केले नाही, तर काही लेखक येथे लेखन करायचे थांबतात. उपक्रमचालकांनी लेख उडवले नाही तरी असे झाल्याची उदाहरणे दिसतात. त्यामुळे या स्थळावर स्व-नियंत्रण (सदस्य-नियंत्रण) काही प्रमाणात आहे, असे मला वाटते.
- - - -

उपक्रमपंतांनी कवितेबद्दल काय आक्षेप घेतले होते, ते माहीत नाहीत, पण विस्तृत विवेचनाबरोबर माझ्या काही वृत्तबद्ध रचना मी स्वतः उपक्रमावर दिलेल्या आहेत. यापैकी काही लेखन उपक्रमाच्या मुखपृष्ठावरती पोचल्यामुळे उपक्रमचालकांच्या दृष्टीने हे चालते असे दिसते. अशा प्रकारचे पद्यलेखन छायाचित्र समुदायातील लेखनासारखे आहे, असे मला वाटते. मला अशा प्रकारे लेखनप्रकारांतील सामांतर्य आणि फरक जाणवला, तरी दुसर्‍या कोणाला नेमके तसेच वटणार नाही :

कविता आणि छायाचित्रे ह्यांचा तुलनात्मक विचार केल्यास दोन्हीतले माहितीचे प्रमाण साधारणतः समान असते असे दिसून येते. दोन्ही कला आहेत.

खरे तर कुठल्याही दोन गोष्टी साधारणपणे समान असतात : उदाहरणार्थ, सफरचंद आणि संत्रे, दोन्ही फळे आहेत.
तसेच कुठल्याही गोष्टी साधारणपणे अतुलनीय असतात : उदाहरणार्थ, "सफरचंद आणि संत्रे यांची तुलना करू नये" अशा आशयाची म्हण आहे.

तुलना नेमकी कुठल्या बाबतीत होत आहे, याबाबत कायदेशीर दस्तऐवजात काटेकोर (आणि किचकट) भाषा वापरणे आवश्यक असते. सामान्य आयुष्यात अशी वापरता येत नाही. तरीसुद्धा सामान्य आयुष्यात परिणाम बघून कित्येकदा अर्थनिश्चिती होते.

"सफरचंदे आणि संत्री 'फळपणाच्या दृष्टीने' साधारणपणे समान आहे" असा हट्ट धरून सफरचंदाचे मार्मालेड मी केलेच, असे समजा. ते बाजारात मार्मालेड म्हणून दुकानदाराने विकायला ठेवले नाही, तर दुकानदाराकडे कायदेशीर दस्तऐवजावरून भांडता येणार नाही. या बाबतीत "बहुधा या बाबतीत ही फळे तुलनीय नाहीत", अशी समजूत पटणे फायदेशीर असते.

पण तसे पटलेच पाहिजे असे नाही. सफरचंदांच्या सालीचा मुरंबा चविष्ट असला तर तो मार्मालेडच्या शेजारी ठेवून विकणारा दुकानदार शोधल्यास जरूर सापडेल.

हा उपप्रतिसाद "असहिष्णुता" उपविषयाला अवांतर आहे. पण उपक्रमावर "अमुक समुदाय चालतात, तमुक चालत नाहीत" हे पूर्णपणे अनियमित नसावे, असे मूळ विषयाला धरून असलेले माझे मत देत आहे.

आवडले

हे
कविता आणि छायाचित्रे ह्यांचा तुलनात्मक विचार केल्यास दोन्हीतले माहितीचे प्रमाण साधारणतः समान असते असे दिसून येते.

आणि हे
कवितांचे समीक्षण, विस्तृत विवेचन हे माहितीपूर्णच लेखन आहे . पण छायाचित्रांचा समुदाय ह्या धोरणाशी फारकत घेतोय, असे माझे मत आहे.
फार आवडले. आजकाल असे निर्भेळ विनोदी लेखन क्वचितच बघायला मिळते.
पुलेशु.

----
काय? तुम्ही चित्रपट पाहिलेत? आणि वर फोटोही काढलेत? स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला?

बरं.

ओक्के.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

लेखन नसलेल्या कविता

कविवर्य सर्किटमहाराज,

उपक्रमाचे धोरण लेखनविषयक आहे असे आपण दिलेल्या दुव्यावरून दिसले. आता असं मानू की छायाचित्रकारांनी धोरणातील कच्चे दुवे पाहून छायाचित्रे टाकली असावीत कारण छायाचित्रांत लेखनच नसते. तेव्हा आपण लेखनविरहित कविता टाका म्हणजे तुम्ही सुटलात, उपक्रम सुटले आणि तुमच्या तावडीतून बाकीचे सदस्य सुटले.

-राजीव.

:)

हा हा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हा हा

कदाचित छायाचित्रकारांचा युक्तिवाद 'अ पिक्चर इज वर्थ अ थाउजंड वर्ड्स' असा असावा. :)

----
काय? तुम्ही चित्रपट पाहिलेत? आणि वर फोटोही काढलेत? स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला?

उहापोह

जयेश, तुम्ही मांडलेले मुद्दे आणि कारणांचा केलेला उहापोह विचार करण्यासारखा आहे. त्यावर माझी व्यक्तिगत मते थोडक्यात इथे देत आहे.

संकेतस्थळांवर वावरणार्‍या लोकांमध्ये मतभिन्नता असणे फार आश्चर्याचे नाही. मतभिन्नता उघडपणे व्यक्त करण्यातही कोणाची आडकाठी नाही. पण मतभिन्नता व्यक्त करण्याची पद्धत सार्वजनिक मंचाच्या शिष्टाचारांचे पालन करणारी असणे आवश्यक आहे. त्यातही तुम्ही दिलेल्या दोन गोष्टी
१. असहिष्णुता
२. प्रत्येक (किंवा संबंध नसलेल्याही) विषयावर आपले मत असलेच पाहिजे हा दुराग्रह.
न दाखवणे अधिकच आवश्यक आहे.

उपक्रमावर बर्‍याच वादग्रस्त विषयांवर वेगवेगळ्या आणि प्रसंगी टोकाच्या भूमिका असलेल्या सदस्यांमध्येही योग्य प्रकारे चर्चा झालेल्या आहेत. पण आपले मत व्यक्त करण्याच्या असहिष्णु आणि/किंवा दुराग्रही मार्गामुळे इतर सदस्यांना आणि एकूणच संकेतस्थळाला उपद्रव होतो हे उघड आहे. यातून काही सदस्य नाउमेद होणेही शक्य आहे. पुनः पुन्हा असे होऊ लागले तर अश्या प्रवृत्तींच्या उद्देशाविषयी शंका निर्माण होणे साहजिक आहे.

तर आपल्याला काय वाटते? वरील मुद्दे योग्य की अयोग्य? याशिवाय अन्य काही कारणे असू शकतात का?

ही प्रमुख कारणे आहेत असे वाटते. याशिवायही व्यक्ती, प्रसंग आणि परिस्थितीनुरूप इतर कारणे असू शकतात असे वाटते.

अशा प्रकारचे वाद टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येईल

मतभेद किंवा आपल्याला अपेक्षित बदल सकारात्मक पद्धतीने मांडणे हा सर्वात सोपा उपाय. (हे सर्वांना जमत असते तर मुळात हा प्रश्नच निर्माण झाला नसता). थोडक्यात यावर काही नेमका इलाज आहे असे वाटत नाही. प्रसंगी संपादन/प्रशासनाने हस्तक्षेप करणे आवश्यक होऊ शकते. वाद 'टाळता' आले नाहीत तरी त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्व सदस्यांनी आपला संकेतस्थळावरील वावर आणि सहभाग सर्वसामान्य ठेवणे महत्त्वाचे आहे.

अश्या उलथापलथीच्या भरीचा काळ कितीही त्रासदायक, उद्वेगजन्य असला तरी या उलथापालथीतून सदस्य आणि संकेतस्थळे अधिक प्रगल्भ बनत जातील असे वाटते. पण असहिष्णुता किंवा दुराग्रहाचे समर्थन करण्यासाठी हे कारण वापरता येणार नाही. म्हणजे अश्या उलथापालथीतून संकेतस्थळ चांगले व्हावे म्हणून मी असे केले इ. तर्क पटण्यासारखे नाहीत. अनुभवावरून असे वाटते की सर्वसामान्य सदस्य अश्या प्रवृत्तींना ठराविक एका काळानंतर बळी पडत नाहीत. पण असे प्रकार पुनःपुन्हा केले जात असतील तर त्यावर प्रतिबंधात्मक काही करणे प्रशासन/व्यवस्थापनास अनिवार्य होते असे वाटते.

 
^ वर