संगणन समस्या : तांत्रिक मदत हवी
हा धागा इथे चालू करणे कितपत योग्य ते ठाऊक नाही.
सध्या संगणन करताना एक समस्या आहे. उपाय माहिती नाही. मार्ग शोधतोय.
माझ्या एका प्रोजेक्ट् मधे , एका जे एस् पी मधे काही डॉक्युमेंट्स् चे दुवे आहेत. ही सर्व डॉक्युमेन्ट्स् माझे ऍप्लिकेशन्स् "अटॅचमेंट्स्" म्हणून ऑरकल विदागारात साठवते. एकेका दुव्यावर क्लिक् केले असता , ते ते डॉक्युमेन्ट् उघडायचे का क्लायंटवर जतन करायचे याचा डायलॉग् येतो. अशा प्रकारे या अटॅचमेन्ट्स् जतन करता येतात / उघडून पहाता येतात.
आता , आमच्या ग्राहकाने अशी मागणी केली आहे की : मला अशी सुविधा हवी , जेणेकरून , सर्व /किंवा ठराविक डॉक्युमेन्ट्स् मला उपरोक्त डायलॉगशिवाय आणि ती डॉक्युमेन्ट्स् क्लायन्ट् बॉक्स् वर जतन केल्याशिवाय मुद्रणास (प्रिन्ट् करण्यास) धाडता यायला हवीत. प्रिन्ट्-डायलॉग सुद्धा येता कामा नये.
मला जावामधले कळते, पण मायक्रोसॉफ्ट् मधले काही कळत नाही. त्यातूनसुद्धा , माझ्या सहकार्याच्या मदतीने एक सीप्ल्सप्लस प्रोग्राम लिहून , त्याची एक .exe बनवून "shell execute" मधे ते कॉल करून , एकाहून अधिक डॉक्युमेन्ट्स् "प्रिन्ट् डायलॉग" शिवाय प्रिन्ट् करण्याइतपत मजल मारली आहे. पण दुव्यामधली डॉक्युमेन्ट्स् जतन न करता / टेम्प् लोकेशनवरून न उघडता एकदम प्रिन्ट्ला कशी पाठवायची ? दुसरे म्हणजे , ही .exe फाईल प्रत्येक क्लायंटवर जतन करायला हवी ! हे कसे होणार ?
हा धागा चुकीचा वाटल्यास उडवावा. मदतीबद्दल आगाऊ धन्यवाद.
Comments
धन्यवाद.
सध्या दुसरा एक मार्ग सापडलेला आहे. त्याचा प्रोटोटाईप् करून पहात आहे. मदतीबद्दल अनेक आभार.
कसे काय?
जेएसपी हे सर्वरवर जरी चालत असले तरी ज्याला ही प्रिंट हवी आहे त्याच्याजवळ कोणता प्रिंटर आहे हे सर्वरला कसे कळणार? समजा २९ मजल्यांच्या इमारतीत प्रत्येक मजल्यावर १० प्रिंटर आहेत असे गृहित धरले आणि संपूर्ण इमारतीत जेएसपीचे ७ सर्वर (क्ल्स्टर्ड) आहेत असे गृहित धरले तर कोणत्या सर्वरने कोणत्या डॉक्युमेंटला कोणत्या प्रिंटरवर पाठवायचे ही सर्व माहिती ग्राहकाने सर्वरवर पाठवणे अपेक्षित आहे का?
या एकंदर प्रोग्रॅममध्ये एरर ह्यांडलिंग कसे करणार? (समजा एखाद्या प्रिंटरची शाई संपली आहे आणि ही प्रत निघू शकली नाही तर कोणाला सूचना पाठवणार)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
बरोबर
कर्ण यानी समस्येवर बरोबर बोट ठेवलेय.
सध्या मी करत असलेला प्रोटोटाईप : सुदैवाने सगळ्या अटॅचमेन्ट्स् वर्ड् फाइल्स् आहेत. त्या सगळ्याना सर्वर साईड् वर जावा एपिआय वापरून पीडीएफ् मधे रूपांतरित करणे आणि नंतर या पीडीएफ्स् ना मालगाडी बनवणे आणि क्लायंटवर पाठवणे. (हे सर्व ग्राहकाच्या आळशीपणाला शिव्या देत देत...)
डिझाईन - १
आम्ही केलेल्या अश्या प्रकल्पांमधे (साधारण) क्लायंटच्या मशिनवरच्या डिफॉल्ट प्रिंटरला डॉक्युमेंट प्रिंटिंगला आपोआप पाठवले जाते. त्याच्या मशिनवर जर प्रिंटर इंस्टाल नसेल तर ऍड प्रिंटरचा डायलॉग दाखवला जातो. कोणत्याही एंटरप्राईज डिझाईनमधे या गोष्टी क्षुल्लक असाव्यात.