देव डी

हे रसग्रहण नाही, कारण चित्रपटांची समिक्षा मी करू शकत नाही. हे लेखन केवळ मला हा चित्रपट कसा वाटला त्याविषयी आहे.

काल सकाळी पुण्यात परतलो आणि रात्री नुतनीकरण केलेल्या व्हिक्टरी मध्ये देव डी पाहिला. ब्लॅक फ्रायडे मुळे अपेक्षा होत्याच अनुराग कश्यप कडून. शिवाय अपेक्षा वाढवण्यासाठी अभय देओलही आहे त्यामुळे प्रचंड अपेक्षा ठेऊन देव डी पाहिला.
सुंदर चित्रपट आहे. अजिबात बोअर झालो नाही. शिवाय गाणी सुद्धा धमाल आहेत. विशेषतः 'तेरा इमोसनल अत्याचार' तर आहाहा...

जुन्या देवदासची बंगाली पार्श्वभूमी बदलून पंजाबी केली आहे. तसेच कथेला खूप डार्क शेड दिल्याने कुटुंबासमवेत पाहण्यासारखा नाही. अभय देओल सोडला तर इतर चेहरे नवीनच आहेत. सर्वांची कामे चोख. विशेषतः अभय देओल आणि नवोदित Kalki Koechlin.......माईंडब्लोइंग....

शेवटही अनपेक्षीत आहे.

एकूणच एक् चांगला अनुभव आहे. वेगळा आहे आणि गुणवत्तापूर्ण देखील आहे.

जरूर पाहावा असा...

देव डी=देवेन्द्र सत्पालसिंह धिल्लों

लेखनविषय: दुवे:

Comments

देवदास

इतर देवदासांच्या तुलनेत कसा वाटला?

थोडी अजून माहिती

थोडी अजून माहिती द्या. हे अगदी क्रिप्टिक वाटले :)

+१

हेच म्हणतो. मला वरील टिपणातून चित्रपटाबद्दल काहीच कळले नाही.

 
^ वर