उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
युरेशियन मार्श हॅरिअर!
भालचंद्र
February 2, 2009 - 7:31 am
Eurasian marsh harrier |
Eurasian marsh harrier |
दोन्ही फोटोंसाठीचा सामाईक एक्झिफ :
कॅमेरा : कॅनन रेबेल एक्स टी (३५० डी)
भिंग! : कॅनन इएफ-एस ५५-२५० एफ ४-५.६ (आय.एस)
एपर्चर : एफ्/७.१
आयएसओ : ८००
हा "युरेशियन मार्श हॅरिअर" (मराठी नाव काय?)
मागे भिगवणला गेलो होतो तेव्हा भेटला.
पक्षांची संरचना खुपच प्रेक्षणीय असते. पक्षी (विशेषतः शिकारी) वेगाने उडण्यासाठी अश्या पध्दतीने तयार झालेत की त्यांना हवेचा कमीतकमी अवरोध व्हावा. म्हणुनच समोरुन दिसणारा एव्हढा मोठा पक्षी कमीतकमी जागा व्यापतो!
जाहिरात : अजुन काही फोटो इथे: http://picasaweb.google.com/bspujari/EuresianMarshHarrier#
-भालचंद्र
--------------------------------------
http://bspujari.googlepages.com/
दुवे:
Comments
वा वा वा!....
मराठीत काय म्हणतात वगैरे ते नंतर बघता येईल.....
छायचित्रे खासच.... आवडली. भिगवण तुमची पंढरी दिसते...:-)
आयएसओ मात्र थोडा जास्त वाटला. पुरेसा प्रकाश वाटत असतानाही ८०० ठेवण्याचे काही कारण? उगाच रिस्क नको म्हणून?
-सौरभ.
==================
धन्यवाद!
:)!
आयएसओ जरा जास्त ठेवणे क्रमप्राप्त होतं. पक्ष्यांचे उडताना फोटो काढायचे असतीन तर शटरस्पीड जितका फास्ट तितके उपयुक्त, नाहीतर पक्ष्यावर कडक असा फोकस बसत नाही (ब्लर होतो). भल्या पहाटे मी १६०० आयएसओ वापरतो पण ह्या वेळी टळटळीत उन होते म्हणुन ८०० ठेवला. तसा ४००ही कदाचित चालला असता पण जसे तुम्ही म्हणालात तसेच : उगाच रिस्क नको! :)
http://bspujari.googlepages.com/
मार्श हॅरीअर - दलदल ससाणा
फोटो मस्त...
हा पक्षी आला की इतर छोट्या पक्ष्यांची सुट्टी होते :) :)
मराठीत दलदल ससाणा अथवा दलदल हारीण म्हणतात
-
ध्रुव
विनंती....
हा पक्षी आला की इतर छोट्या पक्ष्यांची सुट्टी होते :) :)
ध्रुव यांचे फ्लिकरवरचे प्रोफाईल येथल्या सदस्यांनी जरुर बघावे. पक्ष्यांच्या अनेक उत्तमोत्तम फोटोंनी ते सजलेले आहे. ध्रुव यांनी थोडा वेळ काढून पक्षीनिरीक्षणावेळचे अनुभव, पक्ष्यांच्या सवयी, dos and don'ts यासारखी लेखमाला लिहावी अशी विनंती आहे. (माझ्यासारख्यांना) बराच उपयोग होऊ शकेल.
सौरभ.
==================
दुवा
>ध्रुव यांचे फ्लिकरवरचे प्रोफाईल येथल्या सदस्यांनी जरुर बघावे.
मला ह्याचा दुवा मिळेन का?
- भालचंद्र
http://bspujari.googlepages.com/
ध्रुव
ध्रुवने काढलेले काही फोटो येथे पाहता येतील.
दुवा....
फ्लिकर प्रोफाईल
==================
शंका!
एक शंका,
युरेशिअन मार्श हॅरीअर आणि मार्श हॅरीअर एकच का?
-भालचंद्र
-----------------------------------
अप्रतिम
पहिले चित्र त्रिमितीय वाटले आणि हा पक्षी आता स्क्रीनच्या बाहेर येतो काय असे वाटले.
दुसर्या चित्रातला शार्पनेस (चमकता डोळा) पुजारी अगदी हातखंडा फोटोग्राफर असल्याची साक्ष देतो.
सुरेख.
असेच
असेच म्हणतो. अप्रतिम फोटू.
----
असेच्
मी पण असेच म्हणतो. अप्रतिम फोटो.
सहमत
आहे, दोन्ही फोटो अप्रतिम.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
पहिले चित्र फारच आवडले.
त्यातहि पक्ष्याचे टोकाची त्रिभाजीत पिसे अहाहा!
फारच सुंदर चित्र.
ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
खलास
फारच देखणा पक्षी, फारच सुंदर चित्रे
छायाचित्रण
दोन्ही छायाचित्र अप्रतिम आहेत
धन्यवाद!
सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद!
सुरेख
तुन्ही प्रकाश चित्रे अगदी मास्टरपिसेस आहेत.
आवडले.
अजून यावीत. या शिवाय हे चित्र कसे टिपता आले या विषयी पण द्या काही...
आपला
गुंडोपंत
आय्. एस्. ओ. ८००
आय्. एस्. ओ. ८०० ठेवल्याने जो नोईस येतो तो कसा घालवला?
ह्या फोटोत मी ISO २०० ठेवला. घार (किंवा गिधाड ) पुसट आले. पण नोईस भरपूर आला.
तो काढल्यामुळे चित्र आणखी पुसट झाले....
काही उपाय सुचवा.....
अनूप.
पाणघार
पाणघार
संदर्भ -
http://nagpurbirds.org/thumbnails.php?album=38
_____________________________________________________________________
गुरुदेव वैद्यराजांचे मुख शिखापतित झाले होते. त्यांच्या चक्षुंच्या परीघांवर जलसंचय झाल्यासारखा वाटत होता. क्षीण स्वरात ते उद्गारले, "महाराज, उत्तरनगरीचा मोह मला नाही, असे असत्यवदन मी तरी का करावे? पण महाराज, त्या नगरीतले ‘धरित्रीसौष्ठव’ मला सहन होत नाही."