"सत्यम्" आणि "मेटास्"

"सत्यम्" कंपनीचा संस्थापक रामलिंगम् राजू याने केलेला कोट्यवधी रुपयांचा घोटाळा सध्या चर्चेत आहे. त्या अनुषंगाने "मेटास्" या कंपनीचे नावही येत असते. ही कंपनी "सत्यम्" च्या रामलिंगम राजू यांच्या मुलाची आहे म्हणे!

या सर्व प्रकारांत माझ्या एक गोष्ट लक्षांत आली. आपल्याही ती लक्षांत आली असावी. ती म्हणजे "सत्यम्" चे इंग्रजी स्पेलिंग Satyam असे आहे. त्यांतील अक्षरे बरोब्बर उलट्या क्रमाने लिहिल्यास Maytas "मेटास्" हे नाव तयार होते.

हा अर्थातच योगायोग म्हणता येणार नाही.

"मेटास्" हे नाव का निवडले असावे याबद्दल माझे काही अंदाज :
१) "मेटास्" हे नाव ज्योतिषाला विचारून ठरवण्यांत आले असावे. डबघाईला आलेल्या "सत्यम्" ला नावाचे उलटे स्पेलिंग असलेली कंपनीच तारू शकेल असा सल्ला ज्योतिषाने दिला असावा.
२) घोटाळे करून मोठा हात मारण्याचा उद्देश असलेल्या रामलिंगम् राजूला "सत्यम्" नावाखाली खोटेपणा करणे प्रशस्त वाटले नसावे. (पहा सत्याची ताकत किती आहे ते!)
३) "सत्यम्"चीच अक्षरे उलटी करून घोटळ्यांबरोबरच पब्लिकला xx बनवण्याचा खोडकर विकृत विचार रामलिंगम् राजूच्या मनात असावा.

आपणास काय वाटते ?

लेखनविषय: दुवे:

Comments

विपरीत शब्द्

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. शरद कोर्डे यांच्या अचूक ध्यानात आले की MAYTAS हा SATYAM चा अनाग्रॅम आहे. एव्हढेच नव्हेतर सत्यम शब्दाचे स्पेलिंग उलटे वाचल्यावर मेटास शब्द मिळतो.श्री.शरद कोर्डे यांचे हे निरीक्षण वाखाणण्यासारखे आहे.ते लिहितातः" ..ही गोष्ट आपल्याही लक्षांत आली असावी." माझ्यातरी हे मुळीच लक्षात आले नव्हते.श्री. शरद कोर्डे यांनी हे निदर्शनाला आणून दिल्यावर गंमत वाटली.
हा (म्हणजे उलट सुलट शब्द हा) योगायोग नाही हे निश्चितच.तसेच त्यांच्या सर्व निष्कर्षांशी मी सहमत आहे. विशेषतः पहिल्या "१) "मेटास्" हे नाव ज्योतिषाला विचारून ठरवण्यांत आले असावे. डबघाईला आलेल्या "सत्यम्" या नावाचे उलटे स्पेलिंग असलेली कंपनीच तारू शकेल असा सल्ला ज्योतिषाने दिला असावा." या

बहुश्रुत

माफ करा. पण MAYTAS हा SATYAM चा अनाग्रॅम आहे. हे बहुश्रुत आहे.

सहमत आहे

शरदरावांनी हे अचूक ओळखले आहे मात्र हा अनाग्राम जगजाहीर आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

असत्यम.

सत्यमच्या नावाखाली खोटी कामे करताना संबंधितांनाही (जनाची नाहीतर् मनाची तरी...) लाज वाटली असेल. म्हणूनच हा सत्यमला उलटे करून असत्यम करण्याचा प्रपंच केल असावा.

मेटास हा सत्यमचा इंग्रजीतील ऍनाग्राम आहे, तर त्याचे भारतीय भाषांतर असत्यम असेच होईल, नाही?

वेगळा वर्णविपर्याय

ऍनाग्रॅम म्हणजे वर्णविपर्याय. (अर्थांतर हिते ते योगायोगाने...)

सत्यम् <-> मय्तस् / मयत्स् ->अनेक मयत

सत्यम् उलटल्यास अनेक मयत होणार

हहपुवा....

अर्थ काही घ्या...सत्यम ने असत्याने वागून अनेकांची वाट लावली आहे, हे नक्की!

लोळतो अहे

सत्यम् <-> मय्तस् / मयत्स् ->अनेक मयत

सत्यम् उलटल्यास अनेक मयत होणार

हसुन हसुन लोळतो आहे.

 
^ वर