छायाचित्र टिका!

रोहित

पक्ष्यांचे लक्ष थवे! गगनाला पंख नवे! -ना. धों. महानोर

रोहित पक्षी अर्थातच फ्लेमिंगो!

नुकताच भिगवणला जाण्याच योग आला तेव्हा घेतलेले हे छायाचित्र! आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया जरुर कळवा!
सध्या भिगवणच्या आसपास 'अबब' पक्षी आलेले आहेत जर पक्षीनिरिक्षणाची हौस असेन तर न चुकता भेट द्या.

रोहितची अजुन काही छायचित्रे इथे टाकलेली आहेतः
http://picasaweb.google.com/bspujari

लेखनविषय: दुवे:

Comments

फोटो....

फोटो दिसत नाही... :(
पिकासा वर बघीतले. फारच सुंदर फोटो आहेत तुमचे.. कॅमेरा लेन्स् कुठला?
१८ जानेवारीला रोहित पक्षी आहे हे छान झाले. या वर्षी तिकडे जाणे नाही झाले अजून फेब्रुवारी मध्ये जायच म्हणत आहे. बघू नशीबाने साथ दिली तर दिसतील पक्षी...

-
ध्रुव

अर्रर्...

अरेरे!
फोटो दिसत नाही?

ठिक आहे! हा दिसेनः

रोहित

-भालचंद्र
------------------------
http://bspujari.googlepages.com/

सही

मस्त फोटू. आणि पक्ष्यांची उडतानाची मोशन काय सही आली आहे.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

हेच म्हणतो

हेच म्हणतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सुंदर्

सुंदर फोटु, हवेत बाण मारल्यासारखे भासत आहेत :)

गायब

फोटू परत गायब झाला रे! :-(
----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

सुरेख!

सकळी दिसत नव्हता..आता परत दिसतोय!

मस्तच कंपोज केलाय. फारच छान!!

एकच सुचवणी : फोटो अपलोड करायला पिकासा पेक्षा फ्लिकर वापरले तर अश्या अडचणी येत नाहीत असा माझा अनुभव आहे.

मस्त

मस्त फोटो आलाय हा. बाकीचे पिकासावर जाउन बघितले. छानच आहेत.

- सूर्य.

अप्रतिम फोटो

फोटो एकदम झकास आला आहे. आवडला. पिकासावरचे इतरही बघितले. आवडले. :-)

पण खरं सांगायचं तर लेन्स आणि कॅमेरा कोणती याची उत्सुकता लागून राहिली आहे.
येर्‍यागबाळ्या लेन्सचे हे काम नसावे असे वाटते.

सौरभ
==================

संसाधने

>पण खरं सांगायचं तर लेन्स आणि कॅमेरा कोणती याची उत्सुकता लागून राहिली आहे.
>येर्‍यागबाळ्या लेन्सचे हे काम नसावे असे वाटते

नाही, हे काही तितकेसे खरे नाही.

कॅमेरा आहे: canon 350D (rebel XT) एस.एल.आर श्रेणीतील सर्वात स्वस्त!
लेन्स : canon 55-250 IS कॅननची सर्वात स्वस्त झूम लेन्स!

:)
-भालचंद्र
http://bspujari.googlepages.com/

कॅनन...

कॅननच्या लेन्स मला आवडतात. चांगले फोटो येतात! अर्थात त्यात ५०एमएम् १.८ सारखी कुख्यातही असते म्हणा.
पण सिग्मा पेक्षा कधीही कॅनन चांगलीच! परवडत असेल तर अजून चांगले!

कुणाला सिग्मा १०-२० किंवा कॅनन १०-२२ विकायची आहे का? :-)

-सौरभ.

==================

कॅनन-सिग्मा :)

मी स्वत: निकॉन वापरतो तरीपण मला कधी कधी कॅननच्या लेन्स् आवडतात :)
निकॉन व कॅनन परवडत असतील तर सिग्मा कंपनी बंद पडेल :)
माझ्या आवडत्या कॅननच्या लेन्सेसः
100-400 L IS f5.6
100 mm f2.8 (macro)
400mm f4
200mm f2.8 (ही लेन्स् फारच भारी आहे)

निकॉनः
50mm f1.4 आणि f1.8
18-200 mm VR

सिग्मा:
70-300 f5.6 स्वस्त आणि मस्त :)
150-500 mm OS HSM
10-20 mm ultrawide

बघू आवडणार्‍या गोष्टी बर्‍याच आहेत घ्यायच्या का हे महत्वाचे.
-
ध्रुव
ताकः आणि हो, कोणी निकॉन साठी ५० मिमि १.४ किंवा सिग्मा १०-२० विकणार असेल तर जरूर कळवा :)

अबब....

ध्रुव, ही माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद. कॅननच्या एल श्रेणीतल्या लेन्सेस म्हणजे पामराने काय बोलावे? उत्तम गुंतवणुकीसारख्या असतात त्या! काही वर्षांनंतर विकताना घेतल्या पेक्षाही जास्त किंमत मिळू शकते.

निकॉन व कॅनन परवडत असतील तर सिग्मा कंपनी बंद पडेल :) :-)

कधीकाळी १००-४०० माझ्याकडे असेल अशी आशा करुयात!

बाकी फोटोग्राफीसाठी, वापरलेल्या खात्रीशीर लेन्स मिळण्यासाठी, नवीन कॅमेरा घेताना सल्ल्यासाठी, लेन्स, कॅमेरा इ.ची योग्य किंमत जाणून घेण्यासाठी बँगलोर फोटोग्राफी क्लब ही खूपच छान साईट आहे.
==================

टॅमरॉन

मी टॅमरॉन कंपनीची झूम लेन्स वापरतो.

माझा अनुभव चांगला आहे. कॅननहून स्वस्त आणि ५ वर्षाची ग्यारंटी देतात.

माझ्या लेन्सची झूम रिंग एकदा बिघडली होती विनामूल्य दुरुस्त लगेच पाठवली.

सुंदर

"वाईट" टीका करण्यासारखे, सल्ला देण्यासारखे माझ्यापाशी काहीच नाही :-)

लाल-पांढर्‍या रंगसंगतीत मागच्या अंधुक प्रक्षेपण मनोर्‍याने भरच पडते आहे. (हा तिथे असणे योगायोग असेल, पण योग्य फोकस असणे प्रतिमा टिपणार्‍याची कमाल.)

पक्ष्यांच्या झेपेच्या दिशेचा तिरपा कोन योगायोगाने असेल, पण वाट बघून योग्य प्रतिमा टिपणार्‍याची कमाल.

वगैरे, वगैरे.

सौरभदा यांच्यासारखेच कुतूहल लागून आहे.

धन्यवाद

>पक्ष्यांच्या झेपेच्या दिशेचा तिरपा कोन योगायोगाने असेल, पण वाट बघून योग्य प्रतिमा टिपणार्‍याची कमाल.

अगदी बरोबर .. खुप वेळ संयमाने वाट पहात बसणे! मग ह्या सुंदर पक्ष्यांच्या काढलेल्या अनेक फोटोंमधे काहीतरी चांगले हाती लागणारच!

-भालचंद्र
----------------------------------------
http://bspujari.googlepages.com/

छान पण

फोटो आहे छान पण तेवढा मानवनिर्मीत बांधकाम काढून टाकता आले असते तर परफेक्ट्. अश्यावेळी फोटोशॉपच्या क्लुप्ती कामी येतात. कोणी जाणकार सांगेल काय?

अजुन फोटो येउ दे.

बाकी गंमत म्हणजे मधे असे फ्लेमिंगो बघायचा योग आला होता तेव्हा तिथे आजुबाजुला जरा जास्तच घाण वास येत होता, हा फोटो पाहताच पहिल्यांदा ते आठवले सहाजिक फोटो [कमी] आवडण्यावर त्याचा परिणाम झाला. :-)

हो!

हो!, फोटोशॉपमध्ये 'क्लोन' किंवा तत्सदृश साधने वापरुन तो मागचा त्रासदायक कचरा काढता आला असता, पण मला ते इतके गरजेचे वाटले नाही (आणि आळस!)..
. एकुणच मला फार जास्त प्रमाणात फोटोशॉपगिरी जमत नाही! :)

>बाकी गंमत म्हणजे मधे असे फ्लेमिंगो बघायचा योग आला होता तेव्हा तिथे आजुबाजुला जरा जास्तच घाण वास येत होता,

कुठे पाहिले होते?

http://bspujari.googlepages.com/

सुंदर

शंभरात एखादाच फोटो मनासारखा येतो. त्यातून पक्ष्यांचे फोटो काढणे म्हणजे दिव्य. अभिनंदन.

शंका: वरचा फोटो तुम्ही खालच्या बाजूने क्रॉप केलेला आहे का?

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

धन्यवाद

नाही. फोटो खालुन क्रॉप नाही केलेला! पण वरुचे आणि आजुबाजुचे आकाश दुर केलय

-भालचंद्र

डेस्कटॉप बॅकग्राउंड

मस्त आहे.
डेस्कटॉपला टाकला. रंगसंगतीमुळे मस्त दिसतोय.

धन्यवाद!

अरे वाह! माझ्या फोटोला (माझ्यासोडुन) कोणाच्यातरी डेस्कटॉपवर जागा! धन्यवाद!
पण त्या फोटोची साईझ अंमळ कमीच आहे! तुम्हाला हवे असेन तर मोठा फोटो पाठवू शकतो!

-भालचंद्र
----------------------------------------------
http://bspujari.googlepages.com/

धन्यू...

बाकी मला वॉलपेपर डाऊनलोड करून वापरायला आवडत नाहीत. मी असेच फ्लिकर, पिकासा, वगैरे वरून चांगली चित्रे उतरवून घेतो आणि ती बॅकग्राउंडसाठी वापरतो.
बाकी सहक-यांपेक्षा माझा मॉनिटर त्यामुळे जरा वेगळा आणि फ्रेश वाटतो.
(बाकीच्यांकडे त्याच त्याच अँजेलिना, ऐश्वर्या, दीपिका, एमा वॉटसन(आमच्याकडे दोघांकडे ही पण आहे!) असतात ना!)

रोहित...

बाकी पक्षी मात्र सुंदर आहे हो....
काय त्याची रंगसंगती...आहाहा!
काय त्याचा रुबाब...ओहोहो!
मस्तच...!

 
^ वर